रात्रीस खेळ चाले.....

Submitted by रोहित ..एक मावळा on 24 September, 2011 - 08:10

ठाणे शहर म्हणजे तलावांचे शहर
या आमच्या तलावांच्या शहरातील सगळ्यांच आवडत ठिकाण म्हणजे मासुंदा तलाव उर्फ तलाव पाळी.

रात्रीच्या अंधारात कृत्रिम दिव्यांच्या लखलखाटात येथील नजारा टिपण्याचा हा छोटासा प्रयत्न ...

प्रकाशचित्र १

प्रकाशचित्र २

प्रकाशचित्र ३

प्रकाशचित्र ४

प्रकाशचित्र ५

प्रकाशचित्र ६

प्रकाशचित्र ७

प्रकाशचित्र ८

गुलमोहर: 

मस्तच फोटो. या तलावाभोवती अनेक फेर्‍या मारल्यात, पण त्यावेळी तो दुर्लक्षितच होता. आता खरेच सुशोभित दिसतोय.

धन्यवाद Happy
आता खरेच सुशोभित दिसतोय. >> हो सुशोभित केलाय ... अन आता नवरात्रीला तळ्याकाठी जत्रा भरणार .. तेव्हा त्याची रौनक अजुन वाढेल. Happy

अती उत्तम ..प्रकाश चित्र ४ व ६ फारच उच्च आहेत . ..कोणता कॅमेरा ..किती वेळ एक्स्पोजर दिले ? माहिती मिळु शकेल का ?

मस्तच!
मला 'ब्लू डॅन्यूब' च्या काठावर रेंगाळलेले बरेच क्षण आठवले.

मी यापुर्वीही प्रकाशित केलेला एक फोटो झब्बू म्हणून.

IMG_0714.jpg

मस्त रे. Happy
पहिल्यात फ्लॅश मारलेला असणार त्याशिवाय तलावातला तो गाळ दिसला नसता...
या अशा क्लिका मारल्यत मीपण तिथे. त्यामुळे याचे फोटो घेतांना फ्लॅश ऑफ ठेव. तसेच तलावाच्या कठड्यावर जर कॅमेरा ठेवला असतास तर अजून शार्प फोटो मिळाले असते...

सर्वांचे धन्यवाद Happy

कोणता कॅमेरा ..किती वेळ एक्स्पोजर दिले >> कॅनन इक्सस १३० (डिजिटल कॅमेरा )

प्रकाश चित्र ४ >> Exposure - 2.0 sec ,ISO - 80 , Aperture - 8.0

प्रकाशचित्र ६ >> Exposure - 1.0 sec , ISO - 80 , Aperture - 2.8

नलिनी तुम्ही दिलेला झब्बु आवडला.

पहिल्यात फ्लॅश मारलेला असणार त्याशिवाय तलावातला तो गाळ दिसला नसता... >>

स्मितहास्य .. अरे मित्रा वरील कुठल्याही फोटोसाठी फ्लॅश वापरला नाही.
पहिल्या फोटोतला जो उजेड दिसतोय तो तिथल्या दिव्याचा आहे..

रोहित .....खुप खुप आभार माहीती दिल्या बद्दल ..माझ्या कडे नोकिया ३०११ स ल र आहे ..थोडे बदलुन प्रयत्न करिन ....पुन्श्च आभार ...

वा छान !! आमचे तळ छान दिसतय. मागे सेंट जोन ला जर lighting असते तर वेगलाच इफ्फेक्ट मिळाला असता.
लै भारी गड्या !!!!

धन्यवाद लोक्स Happy

ट्रायपॉड वापरयाला पाहिजे होतास अजून कल्ला फोटो आले असते... >> नक्कीच आशु पुढच्या वेळी प्रयत्न करेन Happy

Back to top