Submitted by मंदार-जोशी on 14 September, 2011 - 05:26
एरवी आपल्यातल्या अंतराला
नियतीची क्रूर चेष्टा
म्हटल्यावर...
"पार्ट ऑफ लाईफ आहे,
तक्रार नाही रे कसलीच"
असं धिटाईनं
समजावणारी तू
आणि आज.........
"आपण काय एकमेकांना
'एका हाकेवर' आहोत"
म्हटल्यावर....
भावनांचा हिशेब लगेच
किलोमीटरमधे मांडून
कुरकुरणारीही तूच
आपला प्रवास कायम
समांतर राहणार आहे
हे गृहितच धरलं आहेस का?
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
अल्याड तू पल्याड मी.
अल्याड तू पल्याड मी.
मस्त रे.. दुसरा पॅरा फार
मस्त रे.. दुसरा पॅरा फार आवडला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख. एकुणच साध्या नेहमी
सुरेख. एकुणच साध्या नेहमी वापरातल्या शब्दांची कविता आणि विषय आवडला.
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चटकदाssssर
चटकदाssssर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आशय सुरेख!!! मांडणीही
आशय सुरेख!!! मांडणीही मस्त....!
तुझी कुरकुर कळाली>>>:)
भन्नाट....लय भारी. तुझ्याकडून
भन्नाट....लय भारी. तुझ्याकडून दिक्षा घेइन म्हणते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दुसरा मुद्दा विशेष आवडला. गुड
दुसरा मुद्दा विशेष आवडला. गुड वन!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छानच आहे....आवडली...
छानच आहे....आवडली...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भावनांचा हिशेब
भावनांचा हिशेब लगेच
किलोमीटरमधे मांडून
>> ही शब्दरचना विषेश आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थोडक्यात पण चांगलं मांडलं
थोडक्यात पण चांगलं मांडलं आहेस मंदार.
भावनांचे हिशेब मांडल्यावर प्रवास समांतरच राहतो हा सर्वसाधारण अनुभव आहे.
दुसरं कडवं विशेष आवडलं, अगदी
दुसरं कडवं विशेष आवडलं, अगदी वास्तवात घेऊन जातं.
शेवटी प्रत्यक्ष अंतरापेक्षा मना मनामध्ये पडलेलं अंतर फार त्रासदायक..
आपला प्रवास कायम समांतर
आपला प्रवास कायम
समांतर राहणार आहे
हे गृहितच धरलं आहेस का?
छानच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंदारा,
एकदम साध्या मांडणीत खूप काही सांगून गेलास. मस्त!
दक्षिणा +१
दक्षिणा +१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वाह!! दक्षिणा +१
व्वाह!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दक्षिणा +१
छान...
छान...
वाह...मस्तच!
वाह...मस्तच!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आवडली
आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वा, कमी शब्दात चांगल लिहीलय.
वा, कमी शब्दात चांगल लिहीलय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच आहे. टु गुड (Too Good)
मस्तच आहे.
टु गुड (Too Good)
अंतरा इतकंच, समांतर रहाणं
अंतरा इतकंच, समांतर रहाणं गृहीत धरलंय तर .....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंदार, आणि आज..... असे
मंदार,
आणि आज.....
असे दुसर्या कडव्याच्या आधी लिहीले आहेस म्हणजे पहिल्या कडव्याच्या आधी "एके काळी...." असे गृहीत धरायचे आहे काय? त्यात एरवी हा शब्द आहेच पण तो खूपच जनरल आहे असे मला वाटले..
फारच कीस पाडतोय असे वाटून घेऊ नकोस....तुझी कविता बहरत जात आहे असे मनापासून वाटतेय म्हणून आपुलकीने काही गोष्टी सांगतोय...शेवटी अपेक्षा आल्या की जबाबदारी वाढते म्हणून हे सगळे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंदार, मस्त लिहितोयस रे.
मंदार, मस्त लिहितोयस रे. हीप्पण आवडली.
तुझ्या कविता साध्या सरळ सोप्या पण आशयानी एकदम श्रीमंत असतात.
भावनांचा हिशेब
भावनांचा हिशेब लगेच
किलोमीटरमधे मांडून
कुरकुरणारीही तूच
आपला प्रवास कायम
समांतर राहणार आहे
हे गृहितच धरलं आहेस का?
मंदार, नात्यांमध्ये रुक्ष व्यवहाराने प्रवेश केला की नात्यांतला ओलावा नाहीसा व्हायला वेळ लागत नाही, हे तू कवितेतून सुंदर मांडलंयस.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच छान...
खुपच छान...
बेस्ट!
बेस्ट!:)
भावनांचा हिशेब
भावनांचा हिशेब लगेच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किलोमीटरमधे मांडून
कुरकुरणारीही तूच................. आईशप्पथ..........काय गजब आहे
आवडली ! शेवट खुप छान आहे!
आवडली !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवट खुप छान आहे!
खूप खूप सुरेख शेवट! आवडली
खूप खूप सुरेख शेवट! आवडली कविता.
@ दक्षिणा, वनराई आणि
@ दक्षिणा, वनराई आणि उल्हासकाका
विशेष धन्यवाद.
@ कणखर
"एके काळी" असं नव्हे. मला "एरवी" असंच म्हणायचं होतं, फार जनरल असलं तरी.
म्हणजे नेहमी धीराची असणारी कवितेतली "ती" आज हळवी झाली आहे असं सांगायचं आहे.
>>फारच कीस पाडतोय असे वाटून घेऊ नकोस....तुझी कविता बहरत जात आहे असे मनापासून वाटतेय म्हणून आपुलकीने काही गोष्टी सांगतोय...शेवटी अपेक्षा आल्या की जबाबदारी वाढते म्हणून हे सगळे
अजिबात नाही विदिपा, तुमच्या प्रतिसादामुळे काय सुधारणा करता येईल पुढच्यावेळी याचा अचूक अंदाज आला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यामुळे तुम्ही आपुलकीने केलेले मार्गदर्शन नेहमीच स्वागतार्ह आणि स्वीकारार्ह आहे.
शिवाय माझी कविता बहरते आहे असं तुमच्यासारख्या सिद्धहस्त कवीला वाटणं हेच माझं सगळ्यात मोठं यश आहे.
Pages