मंडळी...
मायबोली गणेशोत्सवात प्रसिद्ध, अप्रसिद्ध मंदिरे पाहून मला दुर्ग-गणेशची संकल्पना सुचली. जरी बहुतांश गडांवर महादेव किंवा भवानीमातेची मंदिरे आढळत असली तरी गणराय देखील काही ठिकाणी आपल्या भक्तांना दर्शन देत असतात.
या दुर्गभ्रमंती दरम्यान पावलेल्या या काही बाप्पांची प्रकाशचित्रे माबोकरांसाठी सादर करत आहे.
माबोकर आनंदयात्रीला ही संकल्पना सांगितल्यावर त्यानेही उत्साहाने प्रतिसाद देत त्याच्याकडील आणि रोहन एक मावळा कडील काही बाप्पा पाठवले....
सर्व भटक्यांनी देखील आपल्याकडे असलेली दुर्ग गणेशांची प्रचि पाठवाव्यात जेणेकरून एक सुंदर असे संकलन करता येईल...
धन्यवाद...
प्रचि १
पहिले बाप्पा.. कुलाबा किल्ल्यावरील..अलिबागच्या जवळील या किल्ल्यात सिद्धिविनायकाचे प्रसिद्ध मंदिर आहे. आजही मोठ्या प्रमाणावर भाविक इथे भेट देतात. दीड फूट उंचीची ही संगमरवरी मूर्ती अतिशय लोभसवाणी आहे. राघोजी आंग्रे यांनी हे मंदिर बांधले असे म्हणतात...
प्रचि २
हे बाप्पा अनेकांना माहिती असतील...राजगडच्या सुवेळा माचीवर विराजमान झालेल्या या बाप्पांना वंदन करून मगच राजगडची फेरी पूर्ण होते...सर्वसाधारणपणे माची किंवा पहार्याच्या ठिकाणी मारूती आढळतो पण गणेश अपवादानेच आढळतात.
प्रचि ३
काळ्या संगमरवरातील गणेशमूर्ती...कोल्हापूरजवळील गगनगडावर आढळलेली...
विशेष म्हणजे माझ्या पाहण्यात महादेव मंदिरात सहसा गणेश आढळलेले नाहीयेत पण इथे आपल्या वडीलांबरोबर आपले स्थान राखून आहेत.
प्रचि ४
ही देखील अजून एक प्रसिद्ध गणेशमूर्ती...हरिश्चंद्रगडावर अत्यंत अनघड ठिकाणी बांधलेल्या सुबक हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या आवारात विराजमान झालेली....
प्रचि ५
आणि ही तिथून जवळच असलेल्या गुंहेत...या गुहेला नावच गणेश गुहा आहे. दुर्ग गणेश मध्ये आकाराने सर्वात मोठा.
प्रचि ६
प्रचि ७
मोरधन उर्फ मोराचा डोंगर च्या पायथ्याशी एका वडाच्या झाडाखाली विराजमान झालेले हे रेखीव गणेश...(कळसूबाई रांग)
प्रचि ८
साल्हेर किल्ल्यावरील गणेशप्रतिमा
प्रचि ९
मुल्हेर माचीवर एक सुरेखसे गणेशमंदिर आहे...तिथली एक गणेशमूर्ती...(फोटो- रोमा)
प्रचि १०
त्या मंदिराच्या बाहेर विराजमान झालेले अजून एक बाप्पा
प्रचि ११
हा फोटो यो रॉक्सने काढलेला...वॉमावरून कळेलच अर्थात
प्रचि १२
किल्ले अजिंक्यताराच्या बळकट प्रवेशद्वारावर विराजलेले बाप्पा..
(फोटो - आनंदयात्री)
रोहा- ( माणगाव-जिते
रोहा- ( माणगाव-जिते )कुरडुगडाच्या पायथ्याच्या एका जीर्ण मंदिराच्या बाहेर असलेले बाप्पा.
किल्ले सिंधुदुर्ग वरील वाळुचा
किल्ले सिंधुदुर्ग वरील वाळुचा गणपती..
![IMG_0501.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4892/IMG_0501.JPG)
![IMG_0502.JPG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4892/IMG_0502.JPG)
सतिश मस्तच फोटो... ईनमीन तीन
सतिश मस्तच फोटो...
ईनमीन तीन ..तुमचाही फोटो मस्तच... पण कुर्डुगड म्हणजे माणगाव-जिते इथला का? रोह्याजवळही कुर्डुगड असल्याचे माहीत नव्हते.
प्रकाशजी... पिकासाची काही गडबड झाली होती... आता फोटो दिसले पाहीजेत...
मस्त थीम आहे. फोटोंचे
मस्त थीम आहे. फोटोंचे कलेक्शनही मस्त. धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच मस्त!!!!
मस्तच मस्त!!!!
आशु, अतिशय सुरेख संकल्पना.
आशु, अतिशय सुरेख संकल्पना. किती छान छान फोटो बघायला मिळाले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त थीम अन मस्त फोटो. फार
मस्त थीम अन मस्त फोटो. फार छान संकलन आहे .
b manoj -पण कुर्डुगड म्हणजे
b manoj -पण कुर्डुगड म्हणजे माणगाव-जिते इथला का? >>>> अगदी बरोबर - कोकणरेल्वे मुळे रोहा टाकले आहे वरती बदल केलेला आहे.
इनमिनतीन - मस्त फोटो...खूप
इनमिनतीन - मस्त फोटो...खूप धन्स
सतिश - तुम्हालाही..मी पाहिला नव्हता हा वाळूचा गणपती...
रायगड - जगदीश्वर मंदिराच्या
रायगड - जगदीश्वर मंदिराच्या गणेशपट्टीवरील बाप्पा.
From October 5, 2011
आशू, धन्यवाद!. अरे पावसला
आशू, धन्यवाद!. अरे पावसला गेलात तर, स्वामी स्वरूपानंदांच्या मठाशेजारी आवळ्याच्या झाडात एक गणपती आहे. त्याचा फोटो कुणीतरी काढा रे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किल्ले अर्नाळा
किल्ले अर्नाळा
![](https://lh5.googleusercontent.com/-v6ggFNwM4FM/T6AG-rym5tI/AAAAAAAAGS4/hid3BOUwqeY/s640/IMG_4716.JPG)
ॐ गं गणपतये नमः ....
ॐ गं गणपतये नमः ....
व्वा व्वा ... मस्तच.
व्वा व्वा ... मस्तच.
धागा वर आणण्यासाठी
धागा वर आणण्यासाठी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धोडप माची वरिल
धोडप माची वरिल श्रीगणेश
मुल्हेर माची वरिल श्रीगणेश
![](https://lh4.googleusercontent.com/-4OsQ90pOCEg/Ut-xPMdEoSI/AAAAAAAANSo/0nl3c7wqrFM/s800/IMG_7248.JPG)
मस्त इंद्रा
मस्त इंद्रा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माघी गणेशजयंतीच्या
माघी गणेशजयंतीच्या शुभेच्छा...
धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद
धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद सेनापती!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माघी गणेशोत्सवात गणपतीचं दर्शन झालं..छान वाटलं
धागा वर आणण्यासाठी
धागा वर आणण्यासाठी
धागा वर आणण्यासाठी
धागा वर आणण्यासाठी
धागा वर आणण्यासाठी
धागा वर आणण्यासाठी
आशु, मनोज यांचे फोटो कां दिसत
आशु, मनोज यांचे फोटो कां दिसत नाहीयेत लेखातले?
उडाले असतील
उडाले असतील
किंवा अकाउंट बदलले असेल
Pages