लाल / तांबडा भोपळा सालासगट, किसून साधारण ५ वाट्या
३ हिरव्या मिरच्या - चिरून
७-८ लसूण पाकळ्या
दोन पेरं आल्याचा तुकडा
भरपूर कोथिंबीर
पळीभर तेल
हिंग
मोहरी
हळद
तिखट
मीठ
धणेपूड -चमचाभर
डाळीचं पीठ - वाटीभर.
भाजलेल्या तीळ-दाण्याचा कूट (ऐच्छिक)
*तेलाच्या फोडणीत आधी चमचाभर कीस घालून त्यावर आलं लसूण वाटणाची गोळी आणि हिरव्या मिरच्या घालून परतायचं.
* वाटणाचा ऊग्र वास गेल्यावर यात हळद, तिखट, मीठ आणि धणेपूड घालून पुन्हा परतून घ्यायचं.
* (तीळ-शेंगदाणे कूट घालायचा असेल तर तो आता घालायचा.)
* उरलेला कीस घालून पुन्हा एकदा व्यवस्थीत परतून कीस-मसाले मिसळून घ्यायचे.
* झाकण न ठेवता भोपळा शिजून द्यायचा. सुटलेलं पाणी आटू द्यायचं.
* भोपळा शिजला की यात आता डाळीचं पीठ भुरभुरवून एकत्र करायचं.
* पुन्हा एकदा झाकण न ठेवता दणदणीत वाफ येऊ द्यायची.
* कोथिंबीर घालून १-२ मिनिटं परतलं की कोरोडा तयार.
* मीठ घालताना जपून घालायचं. कारण भोपळ्याचा कीस शिजून अर्धा होतो आणि न शिजलेल्या किसाच्या अंदाजानं मीठ घातलं तर खारट होऊ शकतं.
* डाळीचं पीठ आधी खमंग भाजून घेतलं तर चांगली चव येते. पण भाजलं नाही तरी बिघडत नाही.
* भोपळा मुळातच गोड असल्यामुळे यात जराही साखर-गूळ घालायची गरज नाही.
*भोपळा अती गोड असेल तर वरून जरासं लिंबू पिळावं किंवा आमचूर पावडर घालावी
नवीनच पाककृती ऐकली मृणमयी.
नवीनच पाककृती ऐकली मृणमयी. छानचं आहे.
भोपळ्याचे पिठले असं काहीतरी वाटतयं.
आता बरेच भोपळे येतायेत त्यामुळे ट्राय करायला भरपूर
चांस आहे.
मला लाल भोपळा अजिबात आवडत
मला लाल भोपळा अजिबात आवडत नाही. पण अशा पद्धतिने आवडेल असं वाटतयं. करून बघते आवडतोय का
धन्यवाद, मृ.
भारी वाटतीये रेसिपी, करुन
भारी वाटतीये रेसिपी, करुन बघते
मस्तच ! माझ्या सासूबाई
मस्तच ! माझ्या सासूबाई अशाच पद्धतीने काकडीचं कोरडं सुद्धा करतात . ते सुद्धा मस्त लागतं .
वा! वेगळीच पाकृ! करून बघणार.
वा! वेगळीच पाकृ! करून बघणार. धन्स मृण्मयी
मस्तच गं मॄ. तू मागे अशाच
मस्तच गं मॄ. तू मागे अशाच पद्धतीने काकडीचा ( की झुकिनीचा ? ) कोरोडा पण सांगितला होतास ना ? तेव्हा तो करुन पाहिला होता. मस्तच लागला होता
बटरनट स्क्वॉश घेतला तरी सालासकट घ्यावा का ? बटरनटचे साल खातात का ह्याची कल्पना नाही म्हणून विचारले.
मृण्मयी, वेगळीच पाकृ आहे.
मृण्मयी, वेगळीच पाकृ आहे. करुन बघिन. मला असाही लाल भोपळा आवडतोच. संपदा म्हणते तशी काकडीची ही करुन बघायला पाहिजे.
छानच प्रकार. (कुठल्या भागातला
छानच प्रकार. (कुठल्या भागातला आहे ?)
अगो, बटरनटच्या सालाची काहीजणांना अॅलर्जी असू शकते.
वा वेगळीच पाकृ आहे. नक्की
वा वेगळीच पाकृ आहे. नक्की करुन बघेन.
माझ्या आतेसासूबाई खुप मस्त
माझ्या आतेसासूबाई खुप मस्त करतात. पण त्यात त्या आलं लसूण टाकत नाही.
तुझा काकडीचा कोरोडा मला आवडला
तुझा काकडीचा कोरोडा मला आवडला होता. भोपळाही आवडतो तेव्हा करुन बघेन.
खायचं कशाबरोबर ? भोपळा आवडतो
खायचं कशाबरोबर ?
भोपळा आवडतो त्यामुळे करुन बघेन .
भोपळा आवडतो, पण सालीसकट
भोपळा आवडतो, पण सालीसकट किसायचा?
मी साल काढून किसून घेतला तर चालेल का? कसा लागेल? (खरंच विचारतेय.)
धन्यवाद मंडळी. >> तू मागे
धन्यवाद मंडळी.
>> तू मागे अशाच पद्धतीने काकडीचा ( की झुकिनीचा ? ) कोरोडा पण सांगितला होतास ना ?
व्हय जी! याच पध्दतीनं काकडीचा कोरोडा होतो. पण काकडीला भोपळ्यापेक्षा जास्त पाणी सुटतं, त्यामुळे बराच वेळ परतंत बसावा लागतो. बटरनट स्क्वॉशचा कधी करून बघितला नाही. पण वाईट कशाला लागतोय? त्याचं सूप करताना साल काढलं होतं.
>>>कुठल्या भागातला आहे ?
माझ्या माहितीनुसार विदर्भातला. वैदर्भीय दिसेल त्या भाजीत डाळीचं पीठ घालतात. काकडी, भोपळा, ढोबळ्या मिरच्या, पानकोबी, कांदे, कांद्याची पात, लसणाची पात, जवळपास सगळ्या पालेभाज्या, ..
>>>खायचं कशाबरोबर ?
पीठ पेरलेल्या भाज्या ज्याच्याज्याच्याशी खाता येतात त्या सगळ्याबरोबर. घरी भातात घालून, वर तळलेल्या मिरच्यांची फोडणी घेऊन, किंवा लोणच्याचा खार घेऊन पण खातात.
>>>सालीसकट किसायचा?
हो. उत्तम लागतो. साल अगदी मऊ शिजतं.
अगो, बटरनटच्या सालाची
अगो, बटरनटच्या सालाची काहीजणांना अॅलर्जी असू शकते.
>>> बापरे, हे माहीत नव्हतं. तसंही बटरनटचे साल बरेच कडक असते. साल काढूनच करुन बघेन.
मस्तच! मी कालच आणलाय भोपळा.
मस्तच!
मी कालच आणलाय भोपळा. आज नक्की करून पहाणार.
मीपण कालच आणलाय भोपळा. नक्की
मीपण कालच आणलाय भोपळा. नक्की करून पहाणार आज-उद्यात. आमच्या कडे याला भरडा म्हणतात.
वा, छान आहे रेसिपी ..
वा, छान आहे रेसिपी ..
भोपळ्याची 'कोरडी' भाजी म्हणून 'कोरोडा' का?
कोरोडा कि कोरडा ? माझ्या
कोरोडा कि कोरडा ?
माझ्या सासरी कोरडा म्हणतात.
भोपळ्याचा कोरडा कधी खाल्ला नाही , काकडीचा करते नेहेमी, पण खूप कोरडा नाही थोडा झुणका टाइप :).
काकडीचा स्वाद आणि हिंगाची फोडणी एकत्र स्वाद सही लागतो , बरोबर वर्हाडी ठेचा मस्ट.
छान आहे रेसिपी मृण्मयी!!
छान आहे रेसिपी मृण्मयी!! नक्की करून पहाणार!! मला वाटतं की जरा झणझणीतच जास्त छान लागेल. मी भोपळा सोडुन बाकी सगळे प्रकार नेहेमीच करते. थोडे तेल आणि तिखट जास्त घालते मी. हा पण प्रकार करुन पाहीन आता!!
डीजे मस्त फोटो. मी पण ही
डीजे मस्त फोटो.
मी पण ही रेसिपी पहिल्यांदा ऐकली. नक्की करुन बघणार. काकडीचा ही करुन बघेन.
डीजे, मस्तं फोटो. कोरोडा
डीजे, मस्तं फोटो. कोरोडा सात्त्विक दिस्तोय. फुलका पण आवडला. (गॅसवरचा का? )कांदा आणि वर्हाडी ठेचा तोंडीलावणं.. सही काँबो!
कोरडा/कोरोडा/कोरडं.. बरीच नावं आहेत.
अमया, हिरव्या मिरच्या वाटणात, सांडगी मिरची फोडणीत आणि लाल तिखट आलं-लसूण गोळीबरोबर असं घेतलं की भरपूर तिखट लागतो. (मग मातुर वर्हाडी ठेचा नको. :P)
कोरोडा केला. चपातीबरोबर आणि
कोरोडा केला. चपातीबरोबर आणि मग नुसताच खाल्ला..
थँक्स मृ, हो, फुलका फ्लेम
थँक्स मृ,
हो, फुलका फ्लेम वाल्या गॅस वरचा ( सुजाता मल्टिग्रेन आटा.)
अमया, हिरव्या मिरच्या वाटणात, सांडगी मिरची फोडणीत आणि लाल तिखट आलं-लसूण गोळीबरोबर असं घेतलं की भरपूर तिखट लागतो. (मग मातुर वर्हाडी ठेचा नको. फिदीफिदी)
<< तों पा.सु बाहुली..
खेडेगावात ह्यालाच कोरड्यास
खेडेगावात ह्यालाच कोरड्यास म्हणतात का ?
आमच्याकडे काकडीचा असा प्रकार
आमच्याकडे काकडीचा असा प्रकार करतात. थोडेसे ताकही घालतात ह्यात आंबटपणासाठी अन वरुन लसणाची खमंग फोडणी. सही लागतो तो प्रकार ! हा पण मस्त लागत असणार्,नक्की करुन पाहिन.
थॅंक्स, मस्त रेसिपी दिल्याबद्दल.
दीपांजली, फोटु मात्र सुरेख हं ! वर्हाडी ठेचा कसा केलास ?
वेगळा प्रकार. करुन बघते
वेगळा प्रकार. करुन बघते
आज मला अचानक आठवलं. आम्ही
आज मला अचानक आठवलं. आम्ही साधारण अशीच दोडक्याची भाजी करतो. ह-हि-मो च्या फोडणीत कडिपत्ता, हि मि घालायची. वरुन दोडक्याचा कीस, थोडी साखर घालून अर्धा कच्चा वाफेवरच शिजवून घ्यायचा दोडका. त्यात मग मीठ आणि दाण्याचा कूट. नीट हलवून पुन्हा एक वाफ काढायची की भाजी तयार. वरुन कोथिंबीर पेरायची. यम्मी
किति मस्त माझा नवरा खात नाहि
किति मस्त
माझा नवरा खात नाहि भोपळा
आता त्याचि मज्जा...................
हो ग सिंडे आय मिस दोडका....
हिवाळ्यात मुबलक भाज्या आल्या/
हिवाळ्यात मुबलक भाज्या आल्या/ स्वस्त झाल्या की ज्या त्या भाजीचा कोरोडा / कोरड्यास करता येतं. आम्ही भोपळा, काकडी, पत्ताकोबी, फुलकोबी इ..चा केलेला आहे सिझनमध्ये. तेल अन तिखट जरा बर घालावं लागत पण. अन मीठ जपून लिहीलय ते अगदी बरोबर आहे.
गावाकडे करडईची पाने स्वहस्ते खुडून त्याची भाजी अथवा सॅलड (घोळाणा) करायचो ते आठवून तोंपासू झाले
Pages