Submitted by तृप्ती आवटी on 17 September, 2011 - 10:09
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
अर्धी वाटी हरभरा डाळीचे वडे (सांडगे), २ मध्यम कांदे, २ चमचे दाण्याचा कूट, कोथिंबीर, १ चमचा तिखट, १ चमचा गोडा किंवा काळा मसाला, मीठ, गरम पाणी, फोडणीसाठी साहित्य- हळद, हिंग, मोहरी, एक डाव तेल.
क्रमवार पाककृती:
तेल गरम करून हळद-हिंग-मोहरीची फोडणी करावी. त्यातच वडे/सांडगे घालून लालसर परतून घ्यावेत. मग कांदा, दाण्याचा कूट, तिखट, मीठ, मसाला घालून कांदा अर्धा कच्चा शिजवून घ्यावा. गरम पाणी घालून, कोथिंबीर घालून उकळी काढावी. कांदा, वडा नीट शिजला पाहिजे पण अगदी गाळ नको. साधारण अंगाशी रस्सा होईल इतपत पाणी घालावे.
ही भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर छान लागते.
वाढणी/प्रमाण:
२ मोठे
अधिक टिपा:
_आम्ही नेहमी हरभरा डाळीचेच वडे करतो. मुगाचे कसे लागतील विचारु नये, भाजी करुन बघावी.
_गार पाणी घातले की कांदा विचित्र प्रकारे तरंगतो भाजीत.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
समोरच्या घरातल्या किचनमधुन
समोरच्या घरातल्या किचनमधुन कसल्यातरी रस्श्याचा खमंग वास येतोय.. आणि अशा वेळी रस्साभाजीबद्दल वाचताना जीभ चाळवली....
मला मुगाचेच करावे लागतील. डिमार्टात मुगडाळीचेच सांडगे मिळतात. बरे लागावेत
कर आणि सांग कसे लागतात.
कर आणि सांग कसे लागतात.
छान! गावच्या आठवणी जागवल्या!
छान! गावच्या आठवणी जागवल्या!
फोटो टाक की. त्याशिवाय कशी
फोटो टाक की. त्याशिवाय कशी दिसतेय, करुन बघावी का वगैरे कसं कळणार?
काय हे!! नाव वाचल्यावर जीभ
काय हे!! नाव वाचल्यावर जीभ खवळली ना! कृती ताबडतोब लिहून घेतली आहे. लवकरच करून खादडण्यात येईल.
उद्या. उद्याच्च. पुण्यास्न एक
उद्या. उद्याच्च. पुण्यास्न एक सांडगे पाकीट आणले आहे. त्याचे बनवेन. यू आर म्हणिंग राइट हरबरा डाळीचे इट्ट मूग डाळीत नाही. मूग डाळ पथ्याची वाटते. ल्हान पणी मी एक दोन लालसर परतलेले सांडगे पळवून खात बसत असे. स्वयंपाक होई परेन्त. किशोर मासिका बरोबर अंमळ भारी लागत.
हरभरा डाळीचे सांडगे कसे
हरभरा डाळीचे सांडगे कसे करायचे?
भिजवलेली डाळ, कोथिंबीर आणि
भिजवलेली डाळ, कोथिंबीर आणि हि मि भरड वाटायचे. त्यात मीठ घालून नीट मिसळून वडे घालायचे. कडक उन्हात वाळवायचे. प्रमाण बिमाण आईला विचारुन सांगेन करणार असशील तर.
मस्तच रेसिपी सिंडे रच्याकने,
मस्तच रेसिपी सिंडे
रच्याकने, बाजारु सांडगे बरेचदा शिजायला फार त्रास देतात असा अनुभव आहे. मूगवड्या पटकन शिजतात पण भारतातूनच आणलेल्या हरभरा / मिश्र डाळींच्या सांडग्यांबाबत असा प्रॉब्लेम आला. घरगुती सांडगे मात्र मस्तच होतात.
ओहो! आलं लक्षात कोकणात
ओहो! आलं लक्षात कोकणात त्याला बहुतेक दुसरा शब्द आहे. विचारतेच आता आईला...
हे सांडगे विकत मिळतात का घरी
हे सांडगे विकत मिळतात का घरी करायचे सिंडरेला? कारण घरी करायचे तर ह्या वर्षी चा उन्हाळा गेला. इंग्रो मधे मिळतात का? काय नाव असतं?
रेसिपी छान वाटतिये. नागपूर साईड ला वडा भात करतात त्या करता हेच सांडगे वापरतात का?
मस्त रेसिपी सिंडरेला!! नक्की
मस्त रेसिपी सिंडरेला!! नक्की करणार विकंताला...(कदाचित ऊद्याच!!)
" आम्ही नेहमी हरभरा डाळीचेच वडे करतो. मुगाचे कसे लागतील विचारु नये, भाजी करुन बघावी" हे जास्तच आवडलं..मी मुगाचेच वडे करणार!!
ईंगो मधे मिळणार्या
ईंगो मधे मिळणार्या मुगवडिचीही चांगलिच लागते(केली आहे) अर्थात हरभरा डाळिची जास्त खमंग लागते.
शुभकार्याच्या मुहुर्ताला, किंवा ऊन्हाळी कामाची सुरवात या वड्यांनी करायची पद्धत आहे, जळगाव वैगरे भागात हे झार्याने झारुन करतात, (अगदी १० किलो वैगरेचे करत असल्याने असेल.)
>>पण भारतातूनच आणलेल्या हरभरा / मिश्र डाळींच्या सांडग्यांबाबत असा प्रॉब्लेम आला.>>> अगो! थोड्या तेलावर आधी वडे शॅलो फ्राय करायचे मग, किंचित भरड कुटुन घ्यायचे अस केल्याने रस्सा मिळुन येतो आणि वडे लवकर शिजतात.
शुभकार्याच्या .... >>> हो हो
शुभकार्याच्या .... >>> हो हो
निराली, इंडियन ग्रॉसरीमध्ये मिळतात ते मुगाचे असतात. हरभरा डाळीचे देशात मिळत असावेत. मी नेहमी घरी केलेले घेऊन येते इथे. त्यामुळे कल्पना नाही.
तोंडाला पाणी!
तोंडाला पाणी!
मस्त लागतो हा
मस्त लागतो हा रस्सा.
आमच्याकडे चैत्रगौरीच्या हळदी-कुंकवाला केलेली कैरीची डाळ उरली की सांडगे होतात
हळदी-कुंकवाला केलेली कैरीची
हळदी-कुंकवाला केलेली कैरीची डाळ उरली की>>>>>>> उरते ही डाळ? आमच्याकडे "आधीच नका संपवू" अशी तंबी द्यावी लागायची!
असो. दिवा घे गं हवा तर.
केला पाहिजे असा रस्सा. छान वाटतेय रेस्पी.
उरते ही डाळ? आमच्याकडे "आधीच
उरते ही डाळ? आमच्याकडे "आधीच नका संपवू" अशी तंबी द्यावी लागायची! >> धारवाडला आमच्याकडे एकदा त्या गौरेच्या हळदीकुंकवाला बाया आल्या तवर समस्त बच्चेकंपनीनी डाळीचे वाडगे धुवून ठेवले होते.
ही कृती मस्त आहे. डाळीचे सांडगे खाऊन खूप दिवस झाले.
सिड्रेला हरभरा डाळिचे वडे कसे
सिड्रेला हरभरा डाळिचे वडे कसे करायचे?रेसिपी देणार का?
तो कांदा कसा तरंगतो तो पहायचा
तो कांदा कसा तरंगतो तो पहायचा आहे. फोटो टाकच :हाहा:.
आम्ही खोबर घालतो आता दाण्याचा कुट घालून करेन.
तू दिलेले सांडगे मी नुसतेच
तू दिलेले सांडगे मी नुसतेच तळून खाल्ले नुकतेच. आधी नाही का टाकलीस ही रेसिपी. आता तूच परत सांडगे देशील तेंव्हा करेन
मस्त वाटतेय रेसिपी. मुगाच्या डाळीचे सांडगे आणून करून पाहीन.
आई हरबरा आणि मुग डाळ मिक्स
आई हरबरा आणि मुग डाळ मिक्स करते वड्यात, पण नेमकं प्रमाण नाही माहित. आणि त्यात आलं-लसुण पण घालते.
बनवायची पद्धत माझी पण तुझ्यासारखीच आहे.
आई हरबरा आणि मुग डाळ मिक्स
आई हरबरा आणि मुग डाळ मिक्स करते वड्यात, पण नेमकं प्रमाण नाही माहित. आणि त्यात आलं-लसुण पण घालते.
बनवायची पद्धत माझी पण तुझ्यासारखीच आहे.
मी करते मुगवड्यांची भाजी
मी करते मुगवड्यांची भाजी साधारण अशीच (दाण्याचं कुट न घालता) , आलं लसुण पण घालते.
छान लागते.
मस्त वाटयेत पाकृ. मूगवड्यांची
मस्त वाटयेत पाकृ. मूगवड्यांची या पध्दतीनं करून बघेन.
अॅरिझोना मधले सुध्धा कडक उन
अॅरिझोना मधले सुध्धा कडक उन संपले आता त्यामुळे भाजी पुढील वर्षी करणार.
कृती छान मात्र.
आमच्याकडे उन्हाळ्यात
आमच्याकडे उन्हाळ्यात वाळवणांची सुरुवात पण ह्याच वड्यांनी होते त्यामुळे चैत्र गौरीची डाळ नुसती खायलाच
असो, आईला विचारुन ह.डाळीच्या वड्यांची कृती टाकते.
त टि. टिंबाची नोंद घ्यावी.
मी कधिच हे सांडगे/वडे
मी कधिच हे सांडगे/वडे खाल्लेले आठवत नाहित. आईला विचारलं पाहिजे की ती करत नाही कि मीच विसरले ते.
वा मस्त रेसीपी, सांडगे म्हटलं
वा मस्त रेसीपी,
सांडगे म्हटलं की, तों पा सु प्रकार..
आम्ही मटकीच्या डाळीचे सांडगे करतो, अतिशय चविष्ट, आणि खमंग लागतात....
सारीका. प्रचंड अनुमोदन माझी
सारीका. प्रचंड अनुमोदन
माझी एक मामी करते मटकीच्या डाळीचे सांडगे ( मला आधी माहीतच नव्हतं की पिवळ्या मुगाच्या डाळीसारखी पांढरी मटकीची डाळही मिळते ते. ) लसूण, लाल तिखट वगैरे घालून करते. जबरीच लागतात ते.
Pages