कोड

Submitted by slarti on 28 February, 2009 - 16:15

देशमुख जेव्हा प्रा. सुरेश उत्तुरवारांच्या घरी पोहोचला तेव्हा त्यांचे आणि पोलिस आयुक्त विनायक देसाईंचे जेवण नुकतेच संपले होते. देसाईंनी ओळख करून दिली, "सुरेश, हा विकास देशमुख. आमचा सीआयडीचा रायजिंग स्टार. सध्या एका केसवर आहे आणि त्यासाठी तू मदत करू शकशील असं त्याला वाटलं. तुझी आणि माझी मैत्री त्याला माहिती असल्याने त्याने मला ते सांगितलं आणि मलाही ते पटलं... म्हणून त्याला आज इथे बोलावलंय. विकास, आता तूच सांग. मलाही हे एकदा परत ऐकायचं आहे. बघू काही सुचतंय का ते."
.
उत्तुरवारांनी दिलेली रसमलाईची वाटी घेऊन 'थँक्यू' म्हणून देशमुखने सुरुवात केली, "सर, एक केस आहे. एका गुन्हेगाराच्या मागावर आहोत. त्याला आपण दुलारी म्हणूया. हा दुलारी आमच्यासाठी रायजिंग स्टार आहे. त्याला व्यवस्थित जाळ्यात पकडण्यासाठी आम्हाला काही भक्कम पुराव्यांची गरज आहे, त्यामुळे त्याचे आणि त्याच्या सर्वात विश्वासू अशा तीन पित्तूंचे फोन टॅप केले आहेत. दुलारी आणि त्या तिघांवर आमचे २४ तास बारीक लक्ष आहे. तो काहीतरी मोठं ऑपरेशन प्लॅन करतोय असा आमचा अंदाज आहे. तर गेल्या आठवड्यात एक घटना झाली आणि आमच्या ऑपरेशनला वेगळं वळण मिळालं... पण ती घटना सांगण्यापूर्वी मी २ आठवड्यांपूर्वी झालेली एक गोष्ट सांगतो.
हा दुलारी फार चलाख आहे, म्हणजे सर्वच गुन्हेगार चलाख असतात तसा तर आहेच, पण याचं डोकं जरा नको तितकं व्यवस्थित चालतं... म्हणजे हा माणूस एमए झालेला आहे. त्याचे हे तीन पित्तूसुद्धा चलाख आहेत... म्हणजे गुन्हेगारी चलाख. बाकी ते थोडं इंग्रजी जाणतात एवढंच. दुलारी त्याच्यासारखे हुशार लोक कामावर ठेवत नाही. दुलारीची मोडस ऑपरेंडी इतरांपेक्षा एकदम वेगळी आहे. माहिती मिळवण्यासाठी त्याचं एक स्वतंत्र असं नेटवर्क आहे. त्याची एक्झिक्युटिव्ह सेल या नेटवर्कपेक्षा वेगळी आहे. हे तिन्ही साथीदार एक्झिक्युटिव्ह सेलमध्ये आहेत. काही करायचे असेल तर आवश्यक तेवढीच माहिती आणि तीही शक्य तितक्या शेवटच्या क्षणी यांना दिली जाते आणि ते अ‍ॅक्शन घेतात. २ आठवड्यांपूर्वी हे तिन्ही साथीदार पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी होते. एक जण मंडईत, दुसरा कोथरूडमध्ये आणि तिसरा औंधमध्ये होता. दुलारीने मंडईतल्या माणसाला कॉल केला. त्याच दिवशी संध्याकाळी आमच्या एका जुन्या महत्त्वाच्या खबर्‍याचा खून झाला... 'तरूणाचा भर रस्त्यात खून' अशी मोठी बातमी होती ना... तो दिलीप काळे आमचा खबरी. हा खून केला तो त्या मंडईवाल्याच्या हाताखालच्या एका माणसाने. या खबर्‍याकडे दुलारीविषयी काही महत्त्वपूर्ण माहिती आली होती असा आमचा अंदाज आहे. तो कॉल जेव्हा आम्ही नंतर ऐकला तेव्हाच आम्हाला त्या कॉलचा आणि खुनाचा संबंध असणार याचा दाट संशय आला. ३ दिवसांनी हेच परत घडलं... कॉल आला, त्या रात्री साठे सराफांचा खून झाला. तो करणारे दुलारीच्याच टोळीतले आहेत असा आमचा दाट संशय आहे कारण काही दिवसांपूर्वी दुलारीने त्यांना खंडणी मागितली होती हे आम्हाला माहिती आहे. हा दुसरा कॉल आम्ही ऐकला आणि आमची खात्रीच झाली की कॉलचा आणि या घटनांचा संबंध आहे... एवढंच नाही, तर याचीसुद्धा की तो कॉल म्हणजे दुलारीचा आदेश आहे, आज काय करा हे सांगणारा."
.
kod-slarti.jpg देशमुखने रसमलाई संपवून वाटी खाली ठेवली. प्राध्यापक आणि आयुक्त दोघंही काहीच बोलले नाहीत. तेव्हा त्याने परत सुरू केलं, "आता या कॉल्सचं सांगतो. गुन्हेगारांनी काही कोडवर्ड्स वापरणे आम्हाला नवीन नाही. पण हे लोक एका शब्दाला दुसरा शब्द अशा प्रकारचं एन्कोडिंग करतात. पेटी, खोका, बापट हे शब्द त्यातूनच आलेत. 'उसको बापट के साथ मिल' म्हणजे 'त्याला गोळ्या घाल'... इथे बापट म्हणजे पिस्तूल... असं जनरली असतं. हे बघा दुलारीच्या पहिल्या कॉलचं transcript," असं म्हणून देशमुखने एक कागद प्राध्यापकांच्या हातात दिला. त्यावर पुढील ओळी होत्या -
साथीदार : हॅलो
दुलारी : हॅलो, मी आर्यभट्ट बोलतोय.
साथीदार : मी वराहमिहीर.
दुलारी : तयार ?
साथीदार : ओके.
दुलारी : तीन एक पाच तीन आठ दोन पॉइंट पाच दोन दोन एक पाच तीन तीन दोन स्टॉप.
साथीदार : तीन एक पाच तीन आठ दोन पॉइंट पाच दोन दोन एक पाच तीन तीन दोन स्टॉप.
दुलारी : ओके.
.........
"एवढंच ?" उत्तुरवारांनी विचारलं.
"हो सर. आर्यभट्ट आणि वराहमिहीर हे त्यांचे एकमेकांना ओळखण्याचे कोडवर्ड्स आहेत. हेही नुकतेच सुरु झालंय. पण कॉल असाच होता. आता हे दुसरे transcript बघा..."
साथीदार : हॅलो
दुलारी : हॅलो, मी भास्कराचार्य बोलतोय.
साथीदार : मी रामानुजन.
दुलारी : तयार ?
साथीदार : ओके.
दुलारी : सात चार आठ एक चार दोन तीन दोन पॉईंट सात चार सात तीन तीन तीन स्टॉप.
साथीदार : सात चार आठ एक चार दोन तीन दोन पॉइंट सात चार सात तीन तीन तीन स्टॉप.
दुलारी : ओके.
.........
"सर, हे दोन्ही कॉल ज्याला आले त्याच्या माणसांमध्ये आमचा एकजण लो लेव्हलला आहे. आमच्या माणसाला दोन्ही वेळेला दिसलं की कॉल येतो, ब्लू टूथवर घेतला जातो, दुलारी आकडे सांगतो, पित्तू ते मोबाईलवरच लिहितो, चेक करण्यासाठी रिपिट करतो. कॉल संपतो. मग लगेच त्याच्या विश्वासातल्या माणसांना खोलीत घेऊन त्यांना काय सांगायचे आहे ते सांगतो आणि ती माणसं तो आदेश प्रत्यक्षात आणतात."
उत्तुरवारांनी कागद बघितल्यावर ते देसाईंनी नजरेखालून घातले. देशमुख पुढे बोलू लागला, "आमच्या माणसाची खात्री आहे की डीकोडर त्या मोबाईलमध्येच आहे. साथीदार काहीही दुसरं रेफर करत नाही. आता आमच्याकडे या तिन्ही साथीदारांच्या माणसांवर बारीक लक्ष ठेवता येईल इतकी माणसं नाहीत. त्यामुळे हा कोड ब्रेक करणे आमच्यासाठी आवश्यक आहे. आम्ही अंदाज केला की त्या मोबाईलमध्ये काहीतरी कोडब्रेकर प्रोग्रॅम असेल किंवा कोडब्रेकिंग की असेल. मग आम्ही आमच्या या माणसाला एक अत्याधुनिक मोबाईल कार्डरीडर दिला, त्यानं समहाऊ त्या साथीदाराचा मोबाईल मिळवला, ते कार्ड रीड केलं आणि आम्हाला ते डेटा दिला. हे मागच्या आठवड्यात झालं. What stumpd us was that there was neither any key nor any program that could be used to break this code. त्यातले सर्व फोननंबर्स खरंच अस्तित्वात आहेत. मेसेजेसमध्ये काही नाही. त्या साथीदाराने हा कोड डीकोड कसा केला हेच आम्हाला कळत नाहीये. त्याने की डिलीट केली नाही हे आम्हाला माहिती आहे, कारण कार्ड रीड करून झाल्यावर दोन दिवसांनी असाच एक कॉल आला आणि एका पेट्रोलपंप मालकाला गाडीने उडवलं. आम्हाला रिलायेबल इन्फर्मेशन आहे की हे दुलार्‍याच्या टोळीचंच काम होतं.... त्यामुळे हा कोड ब्रेक करणे हाच गेल्या आठवड्यापासून आमचा प्रायॉरिटी इश्यू आहे."
.
देसाईंनी घसा खाकरला. "ओके. विकास, मी हे आकडे कागदावर लिहून घेतले आहेत. मला तरी असे वाटत नाही की ते आकडे सांगण्याच्या पद्धतीत काही क्लूज आहेत. मी दुलारीला थोडं ओळखतो. स्वतःवर खुश असलेला माणूस आहे. त्याला हे नक्की माहिती असणार की आपण फोन्स टॅप केले आहेत. तेव्हा आर्यभट्ट, रामानुजन वगैरे कोडनेम्स घेऊन आणि असे गणिती कोड वापरून तो आपल्याला खिजवत आहे. तो हा कोड फार काळ वापरणार नाही... लवकरच तो हे बदलेल अशी मला खात्री आहे, पण तोपर्यंत आपण हा कोड ब्रेक करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. एनीवे, मला सांगायचं होतं की त्या transcripts मधून आपण एवढेच घेऊ शकतो..." असं म्हणून देसाईंनी आकडे लिहिलेला कागद दाखवला -
३१५३८२.५२२१५३३२
७४८१४२३२.७४७३३३
उत्तुरवार आणि देशमुखने तो कागद पहायला घेतला.
देसाई पुढे बोलू लागले, "पहिल्या संख्येमुळे दिलीप काळेचा खून झाला. तो उत्तम आणि महत्त्वाचा खबरी होता कारण तो स्वतः एक गुन्हेगार होता. गुन्हेगारी जगतात तो सर्वांनाच माहिती होता, त्यामुळे त्याचे फक्त नाव सांगणे पुरेसे असणार. म्हणजे पहिली संख्या हे त्याचे नाव आहे असे आपण मानू शकतो. तीच गोष्ट दुसर्‍या संख्येची. साठे सराफ हे नाव कळवणे पुरेसे आहे. हे जर नाव असेल तर तो पॉइंट म्हणजे एक सेपरेटर असावा... त्याच्या आधीचा भाग म्हणजे नाव आणि नंतरचा नाव म्हणजे आडनाव असं किंवा हे उलटंही असू शकतं म्हणा. पण मी आधी पहिली शक्यता बघतो.
आता दिलीपच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये ५ अक्षरं आहेत, प्रत्येक अक्षराला एक आकडा असे धरले तर ते आकडे ३, १५, ३, ८, २ असे घेऊ शकतो... काळेसाठी ५२, २१, ५३, ३२ असं... असं काही करून बघितलं का तुझ्या टीमने ?"
"सर, आम्हीही आधी तसाच विचार केला... एका अक्षराला काही आकडा असाईन केला असेल... इथे आम्ही बरीच पर्म्युटेशन्स-कॉम्बिनेशन्स ट्राय केली... पण आम्हाला तरी काहीही फॉर्मुला सापडला नाही, दुसरे महत्त्वाचे म्हणजे आम्ही सर्व पर्म्युटेशन्स ट्राय केलीत याचीही गॅरंटी नाही. मग माझ्या डोक्यात विचार आला की हा कोड इतका अवघड नसणारच... कारण असे कुठलेही कोड डीकोड करायला २६ अक्षरांसाठीची की लागेल... तसे आम्हाला काहीच सापडले नाही."
"पण काहीतरी फॉर्म्युला असू शकतो ना. म्हणजे इकडून आकडा घातला की तिकडून अक्षर बाहेर. उदा. ५ वर काहीतरी मॅथेमॅटीकल ऑपरेशन्स केली की काहीतरी एक आकडा येईल जो त्या अक्षराचा अल्फाबेट्समधला क्रमांक असेल... म्हणजे ५ घे, apply some mathematical formula आणि शेवटी १ आला तर तो A... असं काहीतरी," देसाईंनी सुचवलं.
देशमुख उत्तरला, "सर, यात एकच प्रॉब्लेम आहे. असा फॉर्म्युला घेऊन त्याच्यावर डोक्यातच काम करणं यासाठी दुलारीचा त्याच्या साथीदारांच्या डोक्यावर तितका विश्वास पाहिजे. त्यांना अशी गणिते डोक्यात सोडवता आली असती तर दुलारीने त्यांना टोळीतच घेतले नसते. तेव्हा असा काही फॉर्म्युला नक्कीच मोबाईलमध्ये असता."
"ह्म्म्म्म... गुड पॉईंट विकास. ती गुरुकिल्ली पाठ केली असेल अशीही एक शक्यता आहे... पण दुलारीसारखा माणूस अशा जोखमीच्या कम्युनिकेशनसाठी इतरांच्या स्मरणशक्तीवर विसंबून राहील ही शक्यता तर आणखीनच कमी आहे." असं बोलून देसाई उत्तुरवारांकडे वळले. उत्तुरवार तोपर्यंत त्या संख्यांकडे पाहत उरलेल्या दोघांचं बोलणं ऐकत बसले होते. "What says our world famous mathematician ?"
"मला आधी एक सांगा की या साथीदाराचा मोबाईल काही खास आहे का ? म्हणजे आयफोनसारखा सोफिस्टीकेटेड आहे का ?" उत्तुरवारांनी विचारले.
देशमुख उत्तरला, "नाही, बाजारात सगळीकडे मिळणारं स्टँडर्ड मॉडेल आहे."
"ओके. तुमच्या दोघांचा नावाचा हायपॉथिसिस पटला. एकंदरीत परिस्थिती बघता हा कोड कॉम्प्लिकेटेड असेल असं वाटत नाही. मी त्या कॉलचा अगदी स्टेप बाय स्टेप विचार केला. कॉल आला. आता हा दुलारीचा कॉल नंबर्समध्ये असतो हे त्याच्या साथीदारांना माहिती आहेच. मग ऑब्व्हियस स्टेप काय असावी ? तर कागद पेन तयार ठेवणे... देशमुख म्हणतात की तो साथीदार मंडईत होता. म्हणजे तिथे त्याला पटकन पेन मिळवणे अगदी अशक्य नव्हते... पेनाने हातावरसुद्धा लिहून घेता येते, जे लगेच पुसून टाकता येते. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे दुलारी जर खरोखर इतका हुशार असेल आणि त्याचवेळी त्याचा साथीदारांच्या बुद्धीमत्तेवर फार विश्वास नसेल तर तो साथीदारांना सतत निदान पेन तरी बाळगायला सांगेल... हातावर नंबर्स लिहा, डीकोड करा आणि नंतर हात चोळून ते पुसून टाका... हे मुळीच अवघड नाही, किंबहुना कॉल चालू असता मोबाईलवरच लिहून घेण्यापेक्षा तरी नक्कीच सोपे आहे... विचार करा, दुलारीसारखा माणूस असा महत्त्वाचा निरोप देतोय, तर त्याने ही बेसिक काळजी घेण्याची सूचना कशी काय केली नाही ? आणि साथीदाराने त्या सूचनेकडे दुर्लक्ष केले असेल असे मुळीच नाही. बघा हं, दुलारी त्याला 'तयार ?' असे विचारून साधे पेन मिळवण्याचा चान्स देत आहे... असे असूनही ब्लूटूथचा वापर करून मोबाईलवर लिहिणे हे मला फार महत्त्वपूर्ण वाटले. म्हणून मी विचार केला, समजा मोबाईल हाच की असेल तर ? म्हणजे मोबाईलची एखादी intrinsic characteristic जी आपल्याला 'डीकोडर की' म्हणून वापरता येईल... आता देशमुख म्हणतात की फोन तर साधा आहे, म्हणजे ही characteristic सुद्धा तशा फोन्सची पाहिजे. कोड इतका साधा पाहिजे की मोबाईलचा वापर करून तो दोनेक मिनिटांत कळला पाहिजे, बरोबर ? म्हणून मी मोबाईलवर लिहिणे कसे असेल हे पाहतो. देशमुख, तुमचे लग्न झाले आहे का ? किंवा एखादी खास मैत्रीण ?"
खोखोच्या खेळाला आचानक गोल्फची कॉमेंट्री सुरू झाली तर खेळाडूचे काय होईल तसे झाले... देशमुख भांबावलाच. मग सावरून तो म्हणाला, "नाही सर, लग्न नाही आणि मैत्रीणसुद्धा नाही. पण..."
"सांगतो, सांगतो," त्याला अर्ध्यावरच तोडत प्राध्यापक म्हणाले. "आजकालची तरूण पोरं मोबाईलवर सारखं sms करत असतात, माझा २० वर्षांचा मुलगा घरातला निम्मा वेळ तेच करतो. मी त्याला काही sms पाठवण्याचा प्रयत्न केला पण ते टाईप करता करता मी वैतागलो. तुम्हाला लग्नाचे विचारले कारण तुम्ही जगाला नाही तरी निदान तुमच्या खास मैत्रीणीला sms करत असाल... नाही ? बरं. Actually, तुम्ही ते जर सतत करत असता ना तर कदाचित या कोडची गंमत तुमच्या लक्षात आली असती," मिश्कीलपणे प्राध्यापक म्हणाले. पण देशमुख आणि देसाई या दोघांच्याही चेहर्‍यावर आता पूर्णपणे हरवल्याचे भाव होते. तेव्हा त्यांनी आपले विवेचन पुढे सुरु केले.
"आपण मोबाईलवर पी कसा लिहितो ? सातचं बटन एकदा दाबून. एल लिहितो पाचचं बटन तीनदा दाबून... अशा पद्धतीने लिहावे लागणे ही मोबाईलची खासियत आहे. जर ती वापरायची असेल तर मला हट्टाने मोबाईल वापरवा लागेल."
"अरे, म्हणजे हा कोड..." देसाई आता एकदम उत्तेजित होऊन म्हणाले,
"होय, हा कोड मोबाईलवर लिहिला की सुटतो. मोबाईलवर लिहिणे हीच त्याची की आहे. बघा हां... ३१५३८२ हे मी ३१, ५३, ८२ असे विभागले. का ? कारण दोन आकड्यांनी मोबाईलवर एक अक्षर बनते - कुठला आकडा आणि तो किती वेळा दाबायचा. म्हणून आकड्यांच्या जोड्या करायच्या. पहिला आकडा मला मोबाईलवर कुठला आकडा दाबायचा हे सांगतो आणि दुसरा आकडा किती वेळा दाब हे सांगतो. तसे केले तरे मला काय मिळते ?
३१, ५३, ८२ - D L U आणि
५२, २१, ५३, ३२ - K A L E
म्हणजे दिलू काळे... "
"This is fantastic !! पण थांब, हे कशावरून की पहिला आकडा म्हणजे दाबायचा आकडा आणि दुसरा आकडा म्हणजे किती वेळा दाबायचा हे दाखवणारा ?" देसाईंनी विचारलं.
"सर, मी सांगतो," आता देशमुखही उत्तेजित झाला, "तसेच बरोबर आहे कारण या आकड्यांच्या जोडीतले दुसर्‍या क्रमांकाचे आकडे ४ च्या वर गेले नाहीयेत. याउलट पहिले आकडे मात्र ४ च्या वर गेले आहेत. मोबाईलवर अक्षरवाली बटन्स जास्तीत जास्त ४ वेळाच दाबता येतात."
देसाई उद्गारले, "ओह येस ! तुझं बरोबर आहे. आपण दुसरा कोडही ट्राय करू.
७४, ८१, ४२, ३२ - S T H E
७४, ७३, ३३ - S R F
पर्फेक्ट ! साठे सराफ !!"
"सर, आता दुलारी 'तयार' का विचारतो तेही कळतंय. ही बटनं तशी दाबल्यावर अक्षरे येण्यासाठी मोबाईलवर योग्य त्या विभागात जावे लागेल उदाहरणार्थ, अ‍ॅड्रेस बुक. तो मोड रेडी आहे हे बघण्यासाठी दुलारी विचारतो. मग ते लिहिल्यावर त्याचे साथीदार ती अक्षरे मोबाईलच्या कीबोर्डवरून परत उलटी आकड्यांमध्ये वाचून दाखवतात... थोड्या प्रॅक्टीसने हे कुणालाही अगदी पटपट करता येईल. वा ! उत्तुरवार सर, तुम्ही खरंच ग्रेट आहात ! या खुन्याला पकडण्यासाठी तुम्ही अमूल्य मदत केली आहे. तुमचे अगदी मनापासून आभार."
"अरे मग उगीच का तो जगप्रसिद्ध आहे !" देसाई अभिमानाने म्हणाले.
......................
समाप्त

गुलमोहर: 

मस्त गोष्ट आहे, आवडली. फक्त काही ठिकाणी दुलारी आणि काही ठिकाणी दुलारा झाले आहे. तसेच कोड ब्रेक करणे फारसे अवघड नव्हते. त्यासाठी प्रसिद्ध गणितज्ञाऐवजी एखादा अनुभवी वरिष्ठ अधिकारी पण चालला असता Happy

छान. Happy

एकंदरीत armchair mysteries हा प्रकार आवडतो वाटतं तुला...

मस्त! आकड्यांचं विश्लेशण अगदी सुरेख केलंय.

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

स्लार्टी मस्तय. डीकोडिंग आवडलं. रागावु नका पण कथेचं नाव "कोडं" असं हवं ना?

कोड- Code ह्या अर्थाने असावं ते.

सहा एक दोन एक सात चार आठ एक दोन एक दोन तीन चार दोन...! Biggrin

७४५३२१७३८१४३ व्वा!! Wink
उत्तुरवार>>> ग्रेट कथा कर्ता! Happy

Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!! Wink

गोष्ट मस्त जमलीये. सिंडीला अनुमोदन.

मस्तं जमलीये, slarti.

कथा मस्त आहे एकदम...

पण ती 'स्लार्टीची' वाटली नाही. Happy

मस्त आहे.
----------------------
एवढंच ना!

मस्तच रंगवली आहे.. छोटा प्रसंग छान खुलवलाय.
---------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

सर्वांना धन्यवाद.
सिंडे, डुलक्या लक्षात आणून दिल्याबद्दल तुझे विशेष आभार Happy आता ते सुधारले आहे. तुझं कोडचं स्पष्टीकरण बरोबर आहे.

    ***
    Entropy : It isn't what it used to be.

    ह्म्म! छान Happy

    -----------------------------------
    शेवटी साथ नशीबाचीच!

    डुलक्या लक्षात आणून दिल्याबद्दल तुझे विशेष आभार >>> म्हणजे डुलकी लागली की दुलार्‍याऐवजी दुलारी दिसत होती का Proud

    स्लार्टी छानंय ष्टगो. आवल्डी ही आयडिया.
    सिंडरेला Happy

    मस्त रे, कल्पना आवडली मित्रा.

    सस्नेह...

    विशाल.
    ____________________________________________

    रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

    http://maagevalunpahataana.blogspot.com

    स्लार्टी कथा आवडली, पण कोड खूप सोपा ठेवलास मित्रा.
    'आयफोन सारखा सोफिस्टीकेटेड फोन' हे वाचल्यावर, ते सहज डिकोड केले. Happy

    स्लार्टी छान कथा. हे कोड जर डिकोड करायची जबाबदारी वाचकांवर टाकली असती, तर अनेक अर्थ काढून दाखवले असते मायबोलीकरानी. !!!

    मस्त रे. आवडली.. Happy

    --
    संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
    ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?

    स्लार्टी : मस्त जमलीय ... Happy

      -------
      स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले
      स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले

        छान जमलीय्...मस्त..

        २३४२४२२२१२१६२!
        ~~~
        पकाक पॅक पॅक पॅक पॅक

        Pages