Submitted by मी_चिऊ on 13 September, 2011 - 05:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
मशरुम - २०० ग्रॅम
कांदा - १ मध्यम आकाराचा
तिखट - १ चमचा
हळद - १/२ चमचा
मीठ - चवीनुसार
जीरे - १ छोटा चमचा
तेल - फोडणीसाठी
आल-लसुण पेस्ट - १ छोटा चमचा
थोडी कोथिम्बीर
क्रमवार पाककृती:
कांदा, कोथींबीर बारीक चिरुन घ्या.
मशरुम्स उभे (पातळ) कापुन घ्या.
फोडणीसाठी तेल गरम करुन जीरे, आल-लसुण पेस्ट, कांदा घालुन परतुन घ्या.
कांदा थोडा शिजल्यावर मशरुम्स घालुन परतुन घ्या.
नंतर हळद आणि तिखट घाला.
झाकण ठेवुन २ मि. शिजु द्या.
या वेळात मशरुम्स ना पाणी सुटेल, मग मीठ व कोथींबीर घालुन, गॅस मध्यम आचेवर ठेवुन हे पाणी आटेपर्यंत शिजु द्या.
मशरुम्स खाण्यासाठी तयार..
वाढणी/प्रमाण:
३ ते ४ जणांसाठी
माहितीचा स्रोत:
सासुबाई
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बर्र्याच प्रयत्नांनंतर मी हे
बर्र्याच प्रयत्नांनंतर मी हे पान सार्वजनीक केले (कदाचीत )
इकडे आम्हीपण टाकू शकतो का
इकडे आम्हीपण टाकू शकतो का नवीन पदार्थाच्या रेसिपीज?
बहुदा हो, जर मशरुम्स रिलेटेड
बहुदा हो, जर मशरुम्स रिलेटेड असतिल तर..
ह्म्म.. काहीच प्रतिसाद नाही
ह्म्म.. काहीच प्रतिसाद नाही
बहुदा कोणालाही नाही आवडली भाजी.. किंवा रेसिपी लिहीणारीही (ओळखीची नाही ना) ..
तशी मला खात्री नव्हतीच की कोणी प्रतिसाद देइल, पण विचार केला प्रयत्न करावा.. पण.. असो
चिउ छान आहे रेसिपी.
चिउ छान आहे रेसिपी.
धन्स जागुतै..
धन्स जागुतै..
चिऊ...छान आहे रेसिपी! मश्रुम
चिऊ...छान आहे रेसिपी! मश्रुम म्हणजे आम्हा शाकाहारींना तेवढाच नॉनव्हेज खाल्यासारखा फायदा. फक्त फोटो टाक लवकर!
मला अजूनही मश्रूम्स कसे साफ
मला अजूनही मश्रूम्स कसे साफ करायचे हे लक्षात येत नाही. त्याच्या टोपीसारख्या भागात काळ्या धाग्यासारखं काहीतरी असतं ते घ्यायचं असतं का?
चिउताई आम्हाला फोटो हवा
चिउताई आम्हाला फोटो हवा
चिऊताई,फोटो?
चिऊताई,फोटो?
मला अजूनही मश्रूम्स कसे साफ
मला अजूनही मश्रूम्स कसे साफ करायचे हे लक्षात येत नाही. त्याच्या टोपीसारख्या भागात काळ्या धाग्यासारखं काहीतरी असतं ते घ्यायचं असतं का?>> हो ते पण घ्यायच.
फोटो काढायला विसरले.. आत लवकरच परत करुन फोटो काढुन लावते
चिउ ताई चिउ ताई फोटो
चिउ ताई चिउ ताई फोटो डकव.
मश्रूम आवडती भाजी. दिनेशदांनापण बरीच माहिती आहे मश्रूम्सबद्दल
छान पाककृती. मला ज्या फारच
छान पाककृती.
मला ज्या फारच थोड्या रेसिपी येतात त्यात मश्रूमची भाजी एक आहे. कृती अशीच आहे पण तेला ऐवजी लोणी, गार्लिक पेस्ट, बाकी काहीच नाही. गार्लिक पेस्टची लोण्यात फोडणी करून नंतर चिरलेले मश्रूम टाकायचे. छान लागते. वरची कृती याचे अॅडव्हान्स्ड व्हर्जन आहे असे वाटते.
आभार बाबु. त्या बीबीवर छान
आभार बाबु. त्या बीबीवर छान संकलन झाले होते.
चिऊ, इथे प्रतिसाद द्यायचा आळस केला. छान कृति आहे. मी टिनमधले वापरतो, त्यामूळे झटपट होते.
माझीही आवडाती भाजी
माझीही आवडाती भाजी आहे.......
चिउतै, फोटो टाक लवकर.
चिऊ, मी सुद्धा अशीच भाजी
चिऊ, मी सुद्धा अशीच भाजी करते. रेसिपी छान आहे. मलासुद्धा मश्रुम कसे साफ करायचे हाच नेहमी प्रश्न पडायचा. आता जमते.
आणि हो, ईथे मायबोलीवर नवीन- जुने असे काहिच नसते हो. फक्त आपण नवीन असल्यामुळे प्रतिसाद बघण्यासाठी अधिर झालेले असतो. हा स्वानुभव आहे.
चिऊ ,रेसिपी आवडली . करून
चिऊ ,रेसिपी आवडली .
करून बघणार
आणि हो, ईथे मायबोलीवर नवीन-
आणि हो, ईथे मायबोलीवर नवीन- जुने असे काहिच नसते हो. फक्त आपण नवीन असल्यामुळे प्रतिसाद बघण्यासाठी अधिर झालेले असतो. हा स्वानुभव आहे.>> असु शकते.. धन्स प्रज्ञा१२३
बाकि सर्वांनाही धन्स..
मला पण मश्रुम खुप आवडतात. पण
मला पण मश्रुम खुप आवडतात. पण इथे नागपुरात कुठे मिळत नाही फारसे.
कोणी नागपुरचे आहेत का इथे जे मला सान्गु शकतील की कुठे मश्रुम मिळतील?
- सुरुचि
ईथे युरोप मध्ये वेगळेवेगळे
ईथे युरोप मध्ये वेगळेवेगळे प्रकार चे मश्रुम दिसतात .. कोणि सांगु शकेल भाजि साठी कोणते चांगले लागतात
सुरुची, आता माहित नाही पण आधी
सुरुची, आता माहित नाही पण आधी रामनगर चौकाजवळ जे मोठे भाजीवाले होते त्यांच्याजवळ असायचे.
या वरच्या प्रकारे भाजी करायला
या वरच्या प्रकारे भाजी करायला बटन मश्रूम किंवा बेबी पोर्टाबेला मश्रुम्स बेस्ट,
चिउ मी आज वाचली रेसिपी . बरेच
चिउ मी आज वाचली रेसिपी . बरेच दिवस ही भाजी कराय्ची मनात होतं पण माहितच नव्हतं कशी करायची. आता लवकरच करुन बघेन. रेसिपीबद्द्ल धन्स!!! :)छान आहे.
धन्स. ही भाजी मी बटन
धन्स.
ही भाजी मी बटन मश्रूम्स वापरुन केलेली आहे.
थोडीशी वेगळी पद्धत( चायनीज):-
थोडीशी वेगळी पद्धत( चायनीज):- मशरुमची भाजी:
लागणारा वेळ:
१५-२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
मशरुम - २०० ग्रॅम
कांदा - १ मध्यम आकाराचा उभा चिरुन
पातिचा कांदा:- १ कांदा पुर्ण बारिक चिरुन
कोबी- १/२ कप (उभी चिरलेली)
गाजराचे- गोलकाप अर्धा कप
सिमला मिरची- १/२ कप( जमल्यास लाल किंवा पिवळी)
फरजबी- १/२ कप (उभी चिरलेली)
अजिनोमोटो- १ चमचा
सोया सॉस- १ डाव
चिली सॉस- २ चमचे
मीठ - चवीनुसार
तेल - १ मोठा डाव
आल-लसुण पेस्ट - १ डाव
एक चिमुट साखर
क्रमवार पाककृती:
मशरुम्स उभे (पातळ) कापुन घ्या.
कडईत तेल गरम कांदा आणि मशरुम जरा परतवुन घ्या. मग फरजबी, गाजर,कोबी, पातिचा कांदा सिमला मिरची, आल-लसुण पेस्ट घालुन परतुन घ्या(भाज्या जास्त शिजवुन नका). शेवटी अजिनोमोटो,मिठ,एक चिमुट साखर,चिली सॉस, सोया सॉस घालुन एक वाफ काढुन घ्या. या वेळात पाणी सुटेल, गॅस मध्यम आचेवर ठेवुन ते थोडेसे पाणी आटेपर्यंत शिजु द्या.
एका वेगळ्या टेस्टची भाजी बनते.
टीपः-
१) ह्यात टोमॅटो सॉस घालुन आणि चिली पएस्ट वगळुन लहान मुलांसाठी टँगी भाजी बनविता येईल.
२) ह्यात मशरुमऐवजी बेबी कॉर्न घालुन सेम भाजी पसरवता येईल.
३) सेम भाजी फक्त परतुन शिजविता पिझ्झा बेसवर घालुन पिझ्झा करता येईल.
४) सेम भाजीतुन वेज फ्रँकीपण करता येईल.
एकदा ट्राय करुन बघायला हरकत नाहिय. कारण हे सगळे एकदम हिट ठरलेय माझ्याघरी तरी..
रुपाली, धन्स. बघते ट्राय
रुपाली, धन्स.
बघते ट्राय करुन.
पचायला जड असते का ? काही
पचायला जड असते का ? काही काळजी घ्यावी लागते का ?
मशरुम पचायला जठवड नसतात. फक्त
मशरुम पचायला जड नसतात. फक्त निट स्वच्छ करूनच वापरावे.
छान
छान