मशरुम्स ची भाजी - फोटोसहीत

Submitted by मी_चिऊ on 13 September, 2011 - 05:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मशरुम - २०० ग्रॅम
कांदा - १ मध्यम आकाराचा
तिखट - १ चमचा
हळद - १/२ चमचा
मीठ - चवीनुसार
जीरे - १ छोटा चमचा
तेल - फोडणीसाठी
आल-लसुण पेस्ट - १ छोटा चमचा
थोडी कोथिम्बीर

क्रमवार पाककृती: 

कांदा, कोथींबीर बारीक चिरुन घ्या.
मशरुम्स उभे (पातळ) कापुन घ्या.

फोडणीसाठी तेल गरम करुन जीरे, आल-लसुण पेस्ट, कांदा घालुन परतुन घ्या.
कांदा थोडा शिजल्यावर मशरुम्स घालुन परतुन घ्या.
नंतर हळद आणि तिखट घाला.
झाकण ठेवुन २ मि. शिजु द्या.
या वेळात मशरुम्स ना पाणी सुटेल, मग मीठ व कोथींबीर घालुन, गॅस मध्यम आचेवर ठेवुन हे पाणी आटेपर्यंत शिजु द्या.

मशरुम्स खाण्यासाठी तयार.. Happy

mashroom bhaji.jpg

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
सासुबाई
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म.. काहीच प्रतिसाद नाही Sad
बहुदा कोणालाही नाही आवडली भाजी.. किंवा रेसिपी लिहीणारीही (ओळखीची नाही ना) ..

तशी मला खात्री नव्हतीच की कोणी प्रतिसाद देइल, पण विचार केला प्रयत्न करावा.. पण.. Sad असो

चिऊ...छान आहे रेसिपी! मश्रुम म्हणजे आम्हा शाकाहारींना तेवढाच नॉनव्हेज खाल्यासारखा फायदा. फक्त फोटो टाक लवकर!

मला अजूनही मश्रूम्स कसे साफ करायचे हे लक्षात येत नाही. त्याच्या टोपीसारख्या भागात काळ्या धाग्यासारखं काहीतरी असतं ते घ्यायचं असतं का?

मला अजूनही मश्रूम्स कसे साफ करायचे हे लक्षात येत नाही. त्याच्या टोपीसारख्या भागात काळ्या धाग्यासारखं काहीतरी असतं ते घ्यायचं असतं का?>> हो ते पण घ्यायच.

फोटो काढायला विसरले.. Sad आत लवकरच परत करुन फोटो काढुन लावते

चिउ ताई चिउ ताई फोटो डकव.

मश्रूम आवडती भाजी. दिनेशदांनापण बरीच माहिती आहे मश्रूम्सबद्दल

छान पाककृती.
मला ज्या फारच थोड्या रेसिपी येतात त्यात मश्रूमची भाजी एक आहे. कृती अशीच आहे पण तेला ऐवजी लोणी, गार्लिक पेस्ट, बाकी काहीच नाही. गार्लिक पेस्टची लोण्यात फोडणी करून नंतर चिरलेले मश्रूम टाकायचे. छान लागते. वरची कृती याचे अ‍ॅडव्हान्स्ड व्हर्जन आहे असे वाटते. Happy

आभार बाबु. त्या बीबीवर छान संकलन झाले होते.
चिऊ, इथे प्रतिसाद द्यायचा आळस केला. छान कृति आहे. मी टिनमधले वापरतो, त्यामूळे झटपट होते.

चिऊ, मी सुद्धा अशीच भाजी करते. रेसिपी छान आहे. मलासुद्धा मश्रुम कसे साफ करायचे हाच नेहमी प्रश्न पडायचा. आता जमते.
आणि हो, ईथे मायबोलीवर नवीन- जुने असे काहिच नसते हो. Uhoh फक्त आपण नवीन असल्यामुळे प्रतिसाद बघण्यासाठी अधिर झालेले असतो. हा स्वानुभव आहे.

आणि हो, ईथे मायबोलीवर नवीन- जुने असे काहिच नसते हो. फक्त आपण नवीन असल्यामुळे प्रतिसाद बघण्यासाठी अधिर झालेले असतो. हा स्वानुभव आहे.>> असु शकते.. धन्स प्रज्ञा१२३

बाकि सर्वांनाही धन्स.. Happy

मला पण मश्रुम खुप आवडतात. पण इथे नागपुरात कुठे मिळत नाही फारसे.
कोणी नागपुरचे आहेत का इथे जे मला सान्गु शकतील की कुठे मश्रुम मिळतील?
- सुरुचि

चिउ मी आज वाचली रेसिपी . बरेच दिवस ही भाजी कराय्ची मनात होतं पण माहितच नव्हतं कशी करायची. आता लवकरच करुन बघेन. रेसिपीबद्द्ल धन्स!!! :)छान आहे.

थोडीशी वेगळी पद्धत( चायनीज):- मशरुमची भाजी:

लागणारा वेळ:
१५-२० मिनिटे

लागणारे जिन्नस:
मशरुम - २०० ग्रॅम
कांदा - १ मध्यम आकाराचा उभा चिरुन
पातिचा कांदा:- १ कांदा पुर्ण बारिक चिरुन
कोबी- १/२ कप (उभी चिरलेली)
गाजराचे- गोलकाप अर्धा कप
सिमला मिरची- १/२ कप( जमल्यास लाल किंवा पिवळी)
फरजबी- १/२ कप (उभी चिरलेली)
अजिनोमोटो- १ चमचा
सोया सॉस- १ डाव
चिली सॉस- २ चमचे
मीठ - चवीनुसार
तेल - १ मोठा डाव
आल-लसुण पेस्ट - १ डाव
एक चिमुट साखर

क्रमवार पाककृती:
मशरुम्स उभे (पातळ) कापुन घ्या.

कडईत तेल गरम कांदा आणि मशरुम जरा परतवुन घ्या. मग फरजबी, गाजर,कोबी, पातिचा कांदा सिमला मिरची, आल-लसुण पेस्ट घालुन परतुन घ्या(भाज्या जास्त शिजवुन नका). शेवटी अजिनोमोटो,मिठ,एक चिमुट साखर,चिली सॉस, सोया सॉस घालुन एक वाफ काढुन घ्या. या वेळात पाणी सुटेल, गॅस मध्यम आचेवर ठेवुन ते थोडेसे पाणी आटेपर्यंत शिजु द्या.

एका वेगळ्या टेस्टची भाजी बनते.

टीपः-
१) ह्यात टोमॅटो सॉस घालुन आणि चिली पएस्ट वगळुन लहान मुलांसाठी टँगी भाजी बनविता येईल.
२) ह्यात मशरुमऐवजी बेबी कॉर्न घालुन सेम भाजी पसरवता येईल.
३) सेम भाजी फक्त परतुन शिजविता पिझ्झा बेसवर घालुन पिझ्झा करता येईल.
४) सेम भाजीतुन वेज फ्रँकीपण करता येईल.

एकदा ट्राय करुन बघायला हरकत नाहिय. कारण हे सगळे एकदम हिट ठरलेय माझ्याघरी तरी.. Proud