Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 September, 2011 - 03:53
मायबोली शिर्षकगीत
नावातच तुझ्या अभिमान मायबोली
साहित्याचा अमुल्य ठेवा मायबोली.
दिली बिन चेहर्यांची मैत्री मायबोली
महाराष्ट्रीयांना आधार परराष्ट्री मायबोली ||१||
संस्कृतीची जपणूक मायबोली
सणासुदींची बरसात मायबोली
कला, इतिहासाची खाण मायबोली
दाखविलीस तू महाराष्ट्राची किर्ती मायबोली ||२||
मैत्रीस ना अट वयाची मायबोली
जिव्हाळ्याची गुंफली नाती मायबोली
सुख-दु:खाची सोबती मायबोली
समस्या, अडथळ्यांवर मात मायबोली ||३||
ज्ञान,प्रशंसा उदरी मायबोली
गुणवंतांचे गुण उधळी मायबोली
मायबोलीकरांस स्वामिनी मायबोली
नतमस्तक मी सदा ऋणी तुझी मायबोली ||४||
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली मायबोली
आवडली मायबोली
धन्यवाद क्रांती. कवितांच्या
धन्यवाद क्रांती. कवितांच्या बाबतीत मी ज्ञानी नाही. पण जे मनात भाव होते ते लिहीले आहेत. गोड मानून घ्यावी. स्पर्धा ह्या हेतुनेही मी ही कविता टाकली नाही.
छान गीत. मायबोलीबद्दलच्या
छान गीत.
मायबोलीबद्दलच्या तुमच्या भावना या गीतातून उत्कटतेने प्रकट होतायत.
---------------------------------------------------------------------------------------------
अवांतर :
तुमचं हे गीत, ’नवीन लेखन’ मध्ये दिसतं आहे. पण, 'प्रवेशिकां'मध्ये ते दिसत नाहीये.
जागू रचना छान आहे. जात हा
जागू रचना छान आहे. जात हा शब्द वगळता आला तर बघ.
शेवटच्या ओळीत पण ह्या च्या जागी तूझी असा शब्द आला, तर वाक्याचा अर्थ नीट लागेल.
बाकी तू लिहिलीस म्हणूनच प्रतिक्रिया द्यायचे धाडस केले !
सही.. जागू छान मांडले आहेस..
सही.. जागू छान मांडले आहेस..
छान रचना आहे.
छान रचना आहे.
मस्त
मस्त
उल्हासजी संयोजक नंतर तिथे
उल्हासजी संयोजक नंतर तिथे टाकत असतील.
दिनेशदा धन्स चुक लक्षात आणून दिल्या बद्दल. योग्य तिथे बदल केला आहे.
सारीका, मुटेजी, रोहित धन्यवाद.
<<दिली बिन चेहर्यांची मैत्री
<<दिली बिन चेहर्यांची मैत्री मायबोली
महाराष्ट्रीयांना आधार परराष्ट्री मायबोली <<<
सही!!! सुरेख गं!
आवडली
आवडली
मस्तच!
मस्तच!
छान!
छान!