रसिकहो, सप्रेम नमस्कार!
प्रत्येक दीपावली सृजनाचा नवा प्रकाश, नवा आविष्कार घेऊन येते. म्हणूनच कवी गोविंदाग्रज म्हणतात . . .
ही जुनी दिवाळी नव्या दमाने आली।
ही नवी टवटवी जुन्या जगाच्या गाली।
गणेशोत्सव सरता सरता देशातील, तसेच जगभर विखुरलेल्या साहित्यरसिक मराठी सुजनांना दिवाळी अंकाचे वेध लागतात. आपल्या सुजाण, अभिरुचीसंपन्न मायबोली परिवारात "हितगुज दिवाळी अंकाचे" अनन्यसाधारण महत्व आहे.
नवा विषय, नवा सकारात्मक दृष्टिकोन, तसेच आविष्कार व सादरीकरणातील नाविन्यामुळे मायबोलीचा "हितगुज दिवाळी अंक" नेहमीच रसिकांच्या पसंतीस उतरला आहे.
हितगुज दिवाळी अंकाच्या निमित्ताने प्रकाशित होणा-या वार्षिक अंकातून मराठी साहित्यातील "जे जे उत्तम उदात्त उन्नत" ते ते आपल्या चिकित्सक वाचकांपर्यंत पोचवावे, ही हितगुजच्या मागील अनेक दिवाळी अंकांची उदात्त परंपरा आहे.
मायबोली परिवारातील अनेक अनुभवी तसेच होतकरू लेखक आपले दर्जेदार साहित्य हितगुज दिवाळी अंकासाठी राखून ठेवतात हा आजवरचा अनुभव!
यास्तव, हितगुज दिवाळी अंक २०११ ही अधिकृत घोषणा सानंदे सादर करीत आहोत!
आपल्या कथा, कविता, ललित, वैचारिक लेख, बालसाहित्य, विनोदी लेख, चुटके, दिवाळी संवाद(मुलाखती), शब्दकोडं, चित्रकला, हस्तकला, व्यंगचित्रं इ. लिखित किंवा/आणि दृक्-श्राव्य अलंकारांनी नटलेल्या साहित्याची आम्ही मन:पूर्वक प्रतीक्षा करीत आहोत.
हितगुज दिवाळी अंकाच्या मागील काही अंकांप्रमाणे यंदाच्या अंकातही "एक विभाग" विशेष संकल्पनेवर आधारीत साहित्यासाठी असणार आहे. नातेसंबधावर असलेली ही विशेष संकल्पना आहे, "थांग अथांग"!
नात्यांच्या अथांगतेचा थांग लागणे कठीण असते. आयुष्यात काही नाती तात्पुरत्या सावलीसारखी सुखावून जातात आणि काही उन्हासारखी पोळून . . .
रक्ताच्या नात्यापलिकडचे ऋणानुबंध कसे जुळतात, कसे बहरतात? काही ऋणानुबंध एका क्षणात का दुरावतात? अशा अथांग नात्यांचा थांग लावता येईल का?
आपल्या आयुष्यातील कुठल्याही "नात्याबद्दल" आम्हाला लिहून पाठवा. आपली शब्दफुले आम्हाला या दुव्यावर पाठवा.
साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : ९ ऑक्टोबर २०११.
काही प्रश्न, शंका अथवा सूचना असल्यास आम्हाला इथेच अथवा sampadak@maayboli.com ह्या पत्त्यावर ई-पत्र पाठवून जरूर विचारा.
आपल्या संदर्भाकरीता खालील दुव्यांवर असलेली माहिती नक्कीच वाचनीय आहे.
१. हितगुज दिवाळी अंक २०११ नियमावली
२. मालकीहक्क (Copyright)
३. शुद्धलेखनासंबंधी नियमावली
दिवाळी संवाद/मुलाखती साधण्याआधी संपादक मंडळाशी विचारविनिमय करणे अनिवार्य आहे.
चला तर मग, विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे स्मरण करून कार्यारंभ करूया . . . लिहायला लागूया!
अवघाचि अंक, हितगुज करीन।
आनंदे भरीन "मायबोली"॥
आपले नम्र,
हितगुज दिवाळी अंक २०११ संपादक मंडळ
दिन दिन
दिन दिन दिवाळी
गाईम्हशीओवाळी
गाईम्हशी कुणाच्या
लक्ष्मणाच्या!!!!!
यावषीदेखील दर्जेदार अंक मिळो ही शुभेच्छा.
पोस्टर झक्कास. आंतरजालावरून
पोस्टर झक्कास. आंतरजालावरून घेतलंय की फोटो आहे?
छान झाली आहे घोषणा. दर्जेदार
छान झाली आहे घोषणा. दर्जेदार अंकाच्या प्रतीक्षेत.
संपादक मंडळाला शुभेच्छा
संपादक मंडळाला शुभेच्छा
अरे वा! झाली का घोषणा!
अरे वा! झाली का घोषणा!
अवघाचि अंक, हितगुज करीन।
आनंदे भरीन "मायबोली"॥ - सुंदर ओळी.
संकल्पनेचं शीर्षकही आवडलं.
चला- घोषणा झाली ! आडो- फोटो
चला- घोषणा झाली !
आडो- फोटो बित्तुचा आहे असा मज दाट सौंशय आहे. त्याचा असाच फोटो आठवतोय.
संपादक मंडळास शुभेच्छा...
संपादक मंडळास शुभेच्छा...
हो रैना, मलाही तेच वाटत होतं
हो रैना, मलाही तेच वाटत होतं म्हणून तर वरचा प्रश्न विचारलाय. आता खात्रीही केली.
अरे वाह...
अरे वाह...
संपादक महोदय, कृपया वरील
संपादक महोदय, कृपया वरील चित्र कोणत्या ठिकाणाचे आहे ते सांगावेत अशी विनंती! अनेक टोलेजंग इमारती दिसत आहेत.
अंकाला खूप शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
हितगुज दिवाळी अंक २०११ -
हितगुज दिवाळी अंक २०११ - अंकास आणि
संपादक मंडळास शुभेच्छा...
संपादक महोदय, कृपया वरील
संपादक महोदय, कृपया वरील चित्र कोणत्या ठिकाणाचे आहे ते सांगावेत अशी विनंती! अनेक टोलेजंग इमारती दिसत आहेत.>>>>>>>
सम्पादक मन्डळ बान्धील नाही!
सुंदर चित्र . "हितगुज दीपावली
सुंदर चित्र .
"हितगुज दीपावली विशेषांकाचे" >> आपण नेहमी हितगुज दिवाळी अंक असे लिहितो ना ?
दैनिके/ मासिके दिवाळी निमित्त विशेषांक काढतात
धन्यवाद मेधा, बदल केला आहे.
धन्यवाद मेधा, बदल केला आहे.:)
मस्तच! संपादक मंडळाला
मस्तच!
संपादक मंडळाला शुभेच्छा!!!!
अरे वा.. मुसंबा कवयित्री..
अरे वा.. मुसंबा कवयित्री.. त्यामुळे एकदम काव्यमय घोषणा झालीये की..
छान घोषणा आणि चित्र.. "थांग अथांग" नाव आवडलं..
अंकाच्या प्रतिक्षेत...
मस्त घोषणा आणि मस्त चित्र.
मस्त घोषणा आणि मस्त चित्र. मंडळाला पुन्हा एकदा शुभेच्छा !!!
मस्त मस्त एकदम. खूप खूप
मस्त मस्त एकदम.
खूप खूप शुभेच्छा!
छान वाटतेय थींम. मंडळाला
छान वाटतेय थींम. मंडळाला शुभेच्छा!
मस्त...मंडळाला शुभेच्छा !
मस्त...मंडळाला शुभेच्छा !
मंडळाला खूप खूप शुभेच्छा!
मंडळाला खूप खूप शुभेच्छा! ह्याही वर्षी उत्तम, दर्जेदार अंक वाचायला मिळो.
खुप खुप शुभेच्छा संपादक
खुप खुप शुभेच्छा संपादक मंडळाला. अंक छानच होईल.
मंडळाला शुभेच्छा....अंकाची
मंडळाला शुभेच्छा....अंकाची वाट पहात आहोत.नातेसंबंधाची संकल्पना आवडली
खुप खुप शुभेच्छा
खुप खुप शुभेच्छा
अनेक शुभेच्छा.
अनेक शुभेच्छा.
अनेकानेक शुभेच्छा...
अनेकानेक शुभेच्छा...
वा फारच छान म्हणजे आम्हाला
वा फारच छान म्हणजे आम्हाला दिवाळीच्या फराळाबरोबर वाचनाचा आनंद सुद्धा मिळणार की
थांग-अथांग... आवडलं... खूप
थांग-अथांग... आवडलं... खूप शुभेच्छा... नेहमीप्रमाणेच अगदी सुर्रेख असणारय अंक.
व्वा! खूप शुभेच्छा!
व्वा! खूप शुभेच्छा!
दाद+१. खूप खूप शुभेच्छा!
दाद+१. खूप खूप शुभेच्छा!
Pages