रसिकहो, सप्रेम नमस्कार!
प्रत्येक दीपावली सृजनाचा नवा प्रकाश, नवा आविष्कार घेऊन येते. म्हणूनच कवी गोविंदाग्रज म्हणतात . . .
ही जुनी दिवाळी नव्या दमाने आली।
ही नवी टवटवी जुन्या जगाच्या गाली।
गणेशोत्सव सरता सरता देशातील, तसेच जगभर विखुरलेल्या साहित्यरसिक मराठी सुजनांना दिवाळी अंकाचे वेध लागतात. आपल्या सुजाण, अभिरुचीसंपन्न मायबोली परिवारात "हितगुज दिवाळी अंकाचे" अनन्यसाधारण महत्व आहे.
नवा विषय, नवा सकारात्मक दृष्टिकोन, तसेच आविष्कार व सादरीकरणातील नाविन्यामुळे मायबोलीचा "हितगुज दिवाळी अंक" नेहमीच रसिकांच्या पसंतीस उतरला आहे.
हितगुज दिवाळी अंकाच्या निमित्ताने प्रकाशित होणा-या वार्षिक अंकातून मराठी साहित्यातील "जे जे उत्तम उदात्त उन्नत" ते ते आपल्या चिकित्सक वाचकांपर्यंत पोचवावे, ही हितगुजच्या मागील अनेक दिवाळी अंकांची उदात्त परंपरा आहे.
मायबोली परिवारातील अनेक अनुभवी तसेच होतकरू लेखक आपले दर्जेदार साहित्य हितगुज दिवाळी अंकासाठी राखून ठेवतात हा आजवरचा अनुभव!
यास्तव, हितगुज दिवाळी अंक २०११ ही अधिकृत घोषणा सानंदे सादर करीत आहोत!
आपल्या कथा, कविता, ललित, वैचारिक लेख, बालसाहित्य, विनोदी लेख, चुटके, दिवाळी संवाद(मुलाखती), शब्दकोडं, चित्रकला, हस्तकला, व्यंगचित्रं इ. लिखित किंवा/आणि दृक्-श्राव्य अलंकारांनी नटलेल्या साहित्याची आम्ही मन:पूर्वक प्रतीक्षा करीत आहोत.
हितगुज दिवाळी अंकाच्या मागील काही अंकांप्रमाणे यंदाच्या अंकातही "एक विभाग" विशेष संकल्पनेवर आधारीत साहित्यासाठी असणार आहे. नातेसंबधावर असलेली ही विशेष संकल्पना आहे, "थांग अथांग"!
नात्यांच्या अथांगतेचा थांग लागणे कठीण असते. आयुष्यात काही नाती तात्पुरत्या सावलीसारखी सुखावून जातात आणि काही उन्हासारखी पोळून . . .
रक्ताच्या नात्यापलिकडचे ऋणानुबंध कसे जुळतात, कसे बहरतात? काही ऋणानुबंध एका क्षणात का दुरावतात? अशा अथांग नात्यांचा थांग लावता येईल का?
आपल्या आयुष्यातील कुठल्याही "नात्याबद्दल" आम्हाला लिहून पाठवा. आपली शब्दफुले आम्हाला या दुव्यावर पाठवा.
साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख : ९ ऑक्टोबर २०११.
काही प्रश्न, शंका अथवा सूचना असल्यास आम्हाला इथेच अथवा sampadak@maayboli.com ह्या पत्त्यावर ई-पत्र पाठवून जरूर विचारा.
आपल्या संदर्भाकरीता खालील दुव्यांवर असलेली माहिती नक्कीच वाचनीय आहे.
१. हितगुज दिवाळी अंक २०११ नियमावली
२. मालकीहक्क (Copyright)
३. शुद्धलेखनासंबंधी नियमावली
दिवाळी संवाद/मुलाखती साधण्याआधी संपादक मंडळाशी विचारविनिमय करणे अनिवार्य आहे.
चला तर मग, विघ्नहर्त्या श्रीगणेशाचे स्मरण करून कार्यारंभ करूया . . . लिहायला लागूया!
अवघाचि अंक, हितगुज करीन।
आनंदे भरीन "मायबोली"॥
आपले नम्र,
हितगुज दिवाळी अंक २०११ संपादक मंडळ
"थांग अथांग" ही कल्पना छान
"थांग अथांग" ही कल्पना छान आहे. खूप खूप शुभेच्छा
साहित्य पाठवल्यावर मला हे पान
साहित्य पाठवल्यावर मला
हे पान पहायची परवानगी नाही.
दिवाळी अंक २०११ लेखन ______ has been updated.
तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. (हे जर गृप मधले पान असेल तर गृपचे सभासद होऊन पहा. पुष्कळदा काही पाने फक्त गृपच्या सभासदांसाठीच मर्यादित असतात)
असा संदेश येतोय काय करावे? मी सभासद आहेच.
मंदार्_जोशी, आपला लेख
मंदार्_जोशी, आपला लेख मंडळाकडे सुपूर्त झाला आहे. आपल्याला पोचपावती मिळाली का?
साहित्य पाठविल्याबद्दल आभार.
हाय, मेल केली आहे उत्तर मिळेल
हाय, मेल केली आहे उत्तर मिळेल का?
"थांग अथांग" ही कल्पना आवडली.
"थांग अथांग" ही कल्पना आवडली. दिवाळीअंकास खूप खूप शुभेच्छा
संपादक, आजची जाहिरात बघितली.
संपादक, आजची जाहिरात बघितली. 'मराठी माणसाचे सोनेरी केस' ही संकल्पना पचायला थोडी जड गेली. त्यामुळे ती इमेज आपली न वाटता नेटवरून घेतलेली वाटते आहे. अगदीच राहवले नाही म्हणून लिहिले
'मराठी माणसाचे सोनेरी केस'
'मराठी माणसाचे सोनेरी केस' >>>>> अहो माधव, त्या आमच्यासारख्या तरुण मुली आहेत हो, केस 'हायलाईट' केलेत त्यांनी
माधव, इमेज सोडा हो...
माधव, इमेज सोडा हो... त्याखालचा मजकूर वाचलात का? तो ही तितकाच महत्त्वाचा आहे.
मंजू
मंजूडी ललिता आजच्या
मंजूडी
ललिता आजच्या जाहिरात-युगात 'इमेज सोडा हो' असे म्हणता येइल का?
संपादक धन्यवाद, पोच मिळाली
संपादक
धन्यवाद, पोच मिळाली
मुलीनी सांगितलेली गोष्ट
मुलीनी सांगितलेली गोष्ट पाठवल्यास चालेल का?
मी 'अपूर्ण' लिखाण थेवले
मी 'अपूर्ण' लिखाण थेवले होते... ती मला सापडत नाहिये... हित्गुज दिवळी अंक लिखाण म्हणून लिहिले होते.
उपरण्यात ठेवली नाती भूतलावर
उपरण्यात ठेवली नाती
भूतलावर असते जशी माती, कुठे नापीक कुठे सुपीक,
उगवतात कुठे काटे कुठे सोनेरी मोती !
आयुष्याच्या उपराण्याला असंख्य पडती गाठी,
डोंगर उतरणीला वेलदोड्याची शेती !
काट्यांच्या संगतीत नाजूक फुलांची रासं उगवती !
निवृत्ती नंतर कट्ट्यावर घडती भेटी -
सुटतात तिथे उपरण्याच्या रेशीम गाठी -
कळत नकळत कुणी म्हणतो आज ते दिसत नाहीत ,
जवळपास कोलात्या खेळता कुणी सांगतो "गेले" रात्री !
निश्वास टाकून मौन बोलके - घरात इंतके कां नकोशे होते !
अबोल जरी - काठीने फक्त पाचोळा सारायचे -
डास पळवायला पाचोळा पेटवायचे !
अंधार होणार परतुया घरी, बघणार नाही कुणी वाट--
वर्दळीच्या झगझगाटात चुकेल उगीचच आपली वाट !
भास्कर लेले
bnlele ,आपले साहित्य
bnlele ,आपले साहित्य http://vishesh.maayboli.com/node/add/v-article1 इथे पाठवायच आहे.
गिरीराज, आपल्या पाऊलखुणांमधे बघीतलत का?
माधव, आवर्जून इथे कळवलत, धन्यवाद
आयडू, उत्तर पाठवलं आहे.
संपादक, मेल केली आहे. ती
संपादक, मेल केली आहे. ती मिळाली का हे प्लीज कळवा.
अखेर साहित्य आत्ता पाठवले.
अखेर साहित्य आत्ता पाठवले. पोच द्यावी.
मी पण आत्ताच लेखन पाठवले आहे
मी पण आत्ताच लेखन पाठवले आहे कृपया पोचपावती द्यावी.
मी काल रात्रीच मेल द्वारे आणि
मी काल रात्रीच मेल द्वारे आणि दिवाळी अंकाच्या धाग्यावर लेख पाठविला पण मला पोहोचल्याची पावती मिळाली नाही. संपादकांना मेल वर पाठवला त्या मेलचा रिप्लाय आला की पुन्हा मायबोलीच्या अॅडरेसवरून पाठवा तिथूनही पाठवला पण अजुन रिप्लाय नाही मिळाला.
मी १ कविता पाठविली होती
मी १ कविता पाठविली होती मिळाली काय?
पोच कालच मिळाली. धन्यवाद.
पोच कालच मिळाली. धन्यवाद.
मुक्तेश्वर, तुम्ही वरच्या
मुक्तेश्वर,
तुम्ही वरच्या धाग्यावर कविता पाठवली होती का? sampadak@maayboli.com या ई-मेल आयडीवर?
जागू, तुमचा लेख मिळाला आहे धन्यवाद.
धन्यवाद संपादक.
धन्यवाद संपादक.
मुदत आणखी वाढणार आहे का ?
मुदत आणखी वाढणार आहे का ?
पोच मिळालीएर्कदाची
पोच मिळालीएर्कदाची
अंक कधी प्रकाशीत होणार आहे?
अंक कधी प्रकाशीत होणार आहे? आमचा फराळ तयार आहे.
नवा दिवस नवे वर्ष , नवी आशा
नवा दिवस नवे वर्ष , नवी आशा नवा हर्ष
नवे विचार नवी कल्पना , नवे पाऊल नवी चेतना
मनापासून ही एक इच्छा
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
(दिवाळी अंकाची आतुरतेने वाट पहात आहोत)
उत्सुक्तता वाढीस लागली
उत्सुक्तता वाढीस लागली आहे..
अंक कधी येणार?
लोकहो, अजून थोडाच वेळ...
लोकहो, अजून थोडाच वेळ...
साहित्य फराळाची वाट बघतोय ...
साहित्य फराळाची वाट बघतोय ...

अजुन एकही दिवाळी अंक वाचला
अजुन एकही दिवाळी अंक वाचला नाही. अतीभयंकर वाट पहात आहे मायबोली दिवाळी अंकाची.
Pages