कोल्हापुरातली खादाडी

Submitted by webmaster on 2 March, 2009 - 10:47

कोल्हापुरात कुठे काय खायचं, याचं हितगुज

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोल्हापुर मधे उत्तम कोल्हापुरी नॉन व्हेज जेवणासाठीचे हॉटेल सांगा. पत्त्या सकट सांगितलेत तर आणखी चांगले.

सर्वात जुने आणि चांगले म्हणजे पद्मा गेस्ट हाऊस, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी.

शरद

Hawa_ Hawai......hi list .....Victor palace Ruikar colony; होट्ल व्रुशाली,कदमवाडी; होटेल पेवेलीयन , शाहुपुरी; आमराई, महावीर गार्डन जवळ....मी बरेच दिवसात गेले नाहि पन आधी चान्गले होते हे सगळे.

मी स्वत: शाकाहारी आहे..पण माझे मासाहारी मित्र...कोल्हापुरात हॉटेल ओपल पसन्त करतात..मासाहारी जेवणासाठी...सापडायला ही सोपे..एकदम स्टँड जवळ..

हॉटेल ओपल famous आहे कोल्हापुरात...ते जुना पुणे-बेन्ग्लोर हाय वे..संगम टॉकिज च्या समोर..
शाकाहारी पण छान असते तिथले..

कावळा नाक्याचे हॉटेल पर्ल पण चांगले आहे असे ऐकले आहे...

ओपल मस्त आहे एकदम, व्हेज -नॉन व्हेज दोन्ही झक्कास.

राजारामपुरीमध्ये जनता बझार समोरचे 'निसर्ग' पण चांगले आहे.

----------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

कोल्हापुरात चांगली मिसळ कूठे मिळेल?

कोल्हपुरात चांगली मिसळ कुठेही मिळेल. फडतरे मिसळ खूप प्रसिद्ध आहे. पण मला पत्ता नाही माहीत. Happy .... ( मिसळी ची आठवण झाली... काही खरं नाही. )
.................................................................
मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली.....केव्हा तरी पहाटे !

कोल्हापूरातल्या मिसळी हा समस्त कोल्हापुर करांच्या जिव्हाळ्याचा विषय Wink
हे घ्या त्यांचे पत्ते..

१. फडतरे मिसळ हाऊस - हे हाउस वैगेरे नसुन एक झोपडी वजा टपरी सारखे हॉटेल आहे... त्यांच्या मिसळीच्या चवी बरोबरच, जर तुम्ही मिसळ घरी नेणार असाल तर ते जे पॅकिंग करुन देतात ते निव्वळ अफलातून असते..उद्यमनगर, हुतात्मा पार्क जवळ आहे..(नविन लोकाना पटकन गावनार नाही.. रिक्षा करुन जाणे...घाबरु नये..कोल्हापुरातले रिक्षा वाले पुण्यासारखे नाहित.. ;))... सोमवार बंद असते..
सकळी लाइन लागलेली असते..मिसळी साठी...

२. खासबाग मिसळ - खासबाग मैदान, KMT बस स्टॉप जवळ..आता एवढी quality राहिली नाही Sad
३. मोहन मिसळ हाउस - हे माझे आवडते :)... मिसळ बघताच चेहेर्‍याला घाम फुटतो...महाद्वार रोड वर आहे..अजुन एक आहे महाद्वार रोड जवळ्..आतल्या गल्लीत्.... नाव विसरलो...
४. बावडा मिसळ - कसबा बावडा कोल्हापुर..

आणि कोल्हापुरात कुठ्ल्याही हॉटेल मधे गेलात तरी मिसळ ही चांगलीच मिळते..in general Happy

०---------------------------------------०
ये दिल भी अडा है किसी बच्चे के तरहा...
या तो सब कुछ मुझे चाहिये...या तो कुछ भी नही..

नॉनव्हेजसाठी पर्ल, ओपल चांगले होते पूर्वी, आता माहित नाही. व्हिक्टर पॅलेसही चांगले होते.
>>कोल्हापुरात कुठ्ल्याही हॉटेल मधे गेलात तरी मिसळ ही चांगलीच मिळते..in general
हो. Happy
केदार, अजून सांग बरं माहिती!

केदार, अजून सांग बरं माहिती!>>>

हो लालु , तशी माहिती बरिच आहे आणि ठिकाणे सुद्धा...:) त्यातली काही लिहितो आठवतिल तशी..
पण मनाला खूप यातना होतात..मला मिळत नाही ना इकडे Sad

१. महाद्वार रोड-- खादाडी करण्याचे आवडते ठिकाण...या मधे, हॉटेल कामत आणी तिथला डोसा..(लहान असताना, आई-बाबा बरोबर फिरायला आले कि हमखास कामत च्या समोर आमची चाल हळू व्हायची...मग बाबांना बरोबर काय ते समजायचे.. :))..आता बरेच दिवसात गेलो नाही...त्यासमोरच तॄषा शांती लस्सी center....एकदम नाद्खुळा लस्सी मिळते...त्यासारखी लस्सी दुसरीकडे मिळणे नाही..
मंगळवार पेठेत पण आहे एक....पण मला हेच जास्त आवडते.
२. राजाभाऊ ची भेळ....भेळ एकदम A1.
३. हॉटेल राजपुरुष....तशी कोल्हापूरात pure veg हॉटेल कमीच, पण मला त्यातल्या त्यात हे आवडते....अगदी station च्या समोर..मस्त आहे पार्ट्या, केळवण वैगेरे करायला Happy
४. अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाला लागून उसाचे रसवंती गृह..अजुनही चव चांगली आहे..
५. ताराबाई पार्क.. हा कॉ.कू (कॉलेज कुमारांचा ) चा अड्डा...आम्ही कायम पडिक विवेकानंद मधे असताना...त्यात खट्टा-मीठा तर आहेच..पण त्याच्या समोरच ला-कर्टा म्हणुन होटेल आहे..पंजाबी डिशेस छान...तिथूनच stand कडे जाताना, वाटेत woodhouse लागते...भाकरी-भाजी, वांग्याचे भरीत वैगेरे मेनू असतो..एकदम झकास... Happy
६. सोळंकी cold drink हाउस...या शिवाय माजा नाही राव....बरेच ठिकाणी आहेत यांची दुकाने पण मला भाउसिंगजी रोड वरचे मस्त आहे सगळ्यात...

तशी लिस्ट मोठी आहे...आता खरच control nahee hotaa... Happy

०---------------------------------------०
ये दिल भी अडा है किसी बच्चे के तरहा...
या तो सब कुछ मुझे चाहिये...या तो कुछ भी नही..

मांसाहारासाठी :
महादेवप्रसाद , दौलत - मंगळवार पेठ (कुणालाबी ईचारा..)
पऱख , रसिका गार्डन- मार्केट यार्ड जवळ.
वामन गेस्ट हाऊस (मासे)- शाहुपुरी.
शेतकरी- फुलेवाडी.

मिसळः
आहार - मंगळवार पेठ
चोरगे मिसळ - महाद्वार रोड.

डिटेल पत्ता कोल्हापुरात कुणालाबी ईचारा..खरंच..

फडतरे मिसळ मला तरी विशेष नाही आवडली... मला ती थोडी गोडसर वाटली...

राजारामपुरीत दौलतमधे एकदा खाल्ली होती मिसळ... नाक, तोंड, डोळे सगळीकडून पाण्याच्या धारा लागल्या होत्या... Happy कोल्हापुरी मिसळ अशी पाहिजे... नाद नाही केला पाहिजे laughing.gif

मला ती थोडी गोडसर वाटली... >>>
एकदम बरोब्बर बोला मनिश साहेब्....मल पण ती गोड्सर च वाटते..मला दौलत पेक्षा सुद्दा मोहन मिसळ हाउस महद्वार रोड आणी चोरगे मिसळ इथली जास्त झणझणीत वाटली...

आता माहित नाही...पण जाउन बघा.

०---------------------------------------०
ये दिल भी अडा है किसी बच्चे के तरहा...
या तो सब कुछ मुझे चाहिये...या तो कुछ भी नही..

पानलाईन हून पुढे गेल्यावर पण एक हॉटेल आहे, आनंद.... असं काहीतरी नाव आहे, तिथे ही मिसळ चांगली मिळते... कुणाला नाव आठवतंय का?

आता माहित नाही...पण जाउन बघा. >> देशात जाइन तेव्हा जरूर try करीन... Happy

अहाहा!!!! मिसळ!!!!!!!!!!! ईतके लिहू नका लोकानो... काम कर्र्वत नाही ईथे देशाबाहेर्.....मला तर बावड्याचीच मिसळ आवडते .....कदचीत घराजवळ आहे म्हणून असेल..
केदार्...छान.. सगळीकडे फिरून आले....मनात्ल्या मनात...
फुलरानी

काम कर्र्वत नाही ईथे देशाबाहेर्>>>

अहो तुमची अशी अवस्था वाचून, तर माझी काय झाली असेल लिहिता-लिहिता??? Happy
पण काय हरकत नाही, त्या निमित्ताने, मनाने का होइना पण कोलापूरात जाऊन आलो Happy

०---------------------------------------०
ये दिल भी अडा है किसी बच्चे के तरहा...
या तो सब कुछ मुझे चाहिये...या तो कुछ भी नही..

मिसळीची इतकी जाहीरात... ??
मोठ्या शिवाजी पुतळ्याला युनायटेड वेस्टर्न बँकेच्या जवळ संध्याकाळी बटाटे वड्याची गाडी लागते. 'प्रकाश' नाव आहे. खाऊन बघा.. पूण्याचे २ वडे घातले तर तिथला एक वडा होईल...

मिसळीची इतकी जाहीरात... ??>>>
इथे जाहिरात वैगेरे करत नाही कोणी...माहिती देत आहोत..
पुणेरी खडूस पणा आलेला दिसतोय दर्शना मधे... Wink

०---------------------------------------०
ये दिल भी अडा है किसी बच्चे के तरहा...
या तो सब कुछ मुझे चाहिये...या तो कुछ भी नही..

अरे वा वेगळा बा.फ. पण सुरू झाला. धन्यवाद सर्वांना इतकी माहिती दिल्या बद्दल. पाटिल तुम्हाला विशेष धन्यवाद. हे आता अनेकांना उपयोगात येईल.
माझ्याकडे दुपारचे मोजके दोन तास होते कोल्हापुरात. पाटलांनी सांगितलेल्या पद्मा गेस्ट हाऊस मधे आम्ही जेवलो. साधेसेच आहे पण स्वच्छ, मुख्य म्हणजे उत्तम जेवण. खिमा आणि पांढरा रस्सा बेस्ट होता!

केड्या आता ही दर्शना कोण? >>>
ओह्ह... चुकुन चुकी झाली.... भावनांओंको समझो ... ;)... दक्षिणा असे लिहायचे होते..

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

अरे केदार, ती महाद्वार जवळची शीवपार्वती ची मिसळ पण झणझणीत मस्त असते. आणि न्यू पॅलेस जवळ बटाटेवडे वाला असतो त्याचे वडे आहाहा क्या बात है... सोळंकी मधे आमचे एखाद दा तरी लंच/डीनर असते. त्यांचे फ्रुट कॉकटेल आणि जिंजर (सोडा घालुन करतात ते) सहीच असते....छ्या तोंडाला पाणी सुटलं... हल्ली न्यू पॅलेस जवळ संध्याकाळी रस्त्यालगत भाकर्‍या भाजुन मिळतात. तुम्ही ऑर्डर दिलीत की तुमच्या समोर खमंग भाजुन देतात....

होय लाजो...शिवपार्वतीची मिसळ पण छानच असते....तु पण कोल्हापुर ची?...कोल्हापुरात कुठे?
न्यू पॅलेस जवळ संध्याकाळी रस्त्यालगत भाकर्‍या भाजुन मिळतात>>>> हे मला माहित नव्हते..आता कोल्हापुराच्या दौर्‍यात नकी try करिन.

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

<<<तु पण कोल्हापुर ची?>>>... नाही रे बाबा, आम्ही पूण्यनगरी निवासी. पण माझी ताई कोल्हापूरात असते. त्यामुळे सारखे जाणे येणे असते. न्यु पॅलेस च्या भाकर्‍या यंदाच्या कोल्हापूर भेटीत खल्ल्या. फारच सही होत्या.

राजपुरोहीत च्या मिठाया, गोल्डन (???) बेकरीची खारी, कोल्हापूरी कांदा-लसूण चटणी इ इ या सगळ्यांची टोटल फॅन........:)

झालचं तर पुणे-कोल्हापूर हाय्-वे वर पुर्वी वारणाचा स्टॉल होता. तिथे गार फ्लेवर्ड दूध, कंदी पेढे, श्रीखंड मिळायचे. प्रवासात येता-जाता इथे थांबायचोच. पण आता एक्सप्रेस वे मुळे हा स्टॉल बंद पडलाय Sad

मासे खाण्यासाठी वामन गेस्ट हाउस बेस्ट, कोंबडी वड्यांसाठी हॉटेल मारुती झकास.
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

गोल्डन (???) बेकरीची खारी,>>>>
लाजो तुला बहुतेक हिंदुस्थान बेकरी म्हणायचे असेल....त्यासारखे बेकरी चे पदार्थ मी आजवर आयुष्यात कुठेही खालेले नाहीत आणि यात काही अतिशयोक्ति नाही...

खूप जुनी आणी अजुनही टेस्ट अतिशय सुंदर ... :)...त्यान्ची खारी, पेस्ट्री खासच!!
कपिलतिर्थ मार्केट च्या समोर्..ताराबाई रोड ला लागुन्..आतल्या बोळात ही बेकरी आहे....झक्कास एकदम!!

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

Pages

Back to top