Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
थान्कु
थान्कु थान्कु जायफळ नाहिये
आळत म्हणजे शिजत ना??
शिजलेल्या
शिजलेल्या डाळीत गूळ घातला कि पाणी सूटते. ते पाणी आटत आले, म्हणजे पुरणातले उलाथने, उभे राहिले, कि पुरण आळत आले म्हणायचे.
पूरणात
पूरणात व्हॅनिला इसेंस पण चांगला लागतो. खास करुन जर कव्हरसाठी फक्त मैदा घेणार असाल तर.
मला कोणी
मला कोणी शेवयाच्या खिरीची क्रुति द्याल का? खरं तर खीर सोपी असते. पण मला कधी जमतच नाही.
जमत नाही
जमत नाही म्हणजे नक्की काय होते??
आधी मी शेवया भाजुन घेतल्यावर त्याच पातेल्यात दुध ओतायचे, आणि मग ते दुध फाटुन जायचे.
मग मैत्रिणीने सांगितले की शेवयाच्या पातेल्यात दुध ओतायचे नाही तर दुधाच्या पातेल्यात शेवया टाकायच्या. तेव्हा पासुन मस्त जमायला लागली खीर...
----------------------------------------
Within each of us lies the power of our consent
to health and to sickness,
to riches and to poverty,
to freedon and to slavery.
It is we, who control these and not another.
दिनेश,
दिनेश, जायफळ इतके कडक असताना किसले जाते का?
जायफळाची
जायफळाची म्हणून एक वेगळी छोटीशी किसणी मिळते. भारतातही मिळते आणि परदेशातही. जी स्टीलची चौकोनी किसणी असते तिचाही एक भाग जायफळ किसण्यासाठी असतो. जायफळ कूट्ले तर त्यात मोठे तूकडे राहतात. मोठ्या प्रमाणात पूड करुन ठेवली तर त्याचा वास उडून जातो. आयत्यावेळी किसले तर त्याचा स्वाद चांगला येतो.
जायफळ उगाळूनही त्याचा स्वाद चांगला येतो.
अगदि
अगदि थोड्या तुपावर शेवया सोनेरि रंगावर परताव्या, बुडेल इतके पाणि घालुन शिजवुन घ्याव्या,चाळणित टाकुन वरुन गार पाणि ओतावे...दुध वेगळे आटवुन घ्यावे मग्,शेवया मिसळाव्या.
शेवया
शेवया परततानाच त्यात काजु/बदाम/अक्रोड यांचे काप घातले तर छान लागतात. शेवया खूप तुप घालुन छान खरपूस भाजल्या असतील तर पाण्यात शिजवायची गरज नाही. दूध मात्र भरपूर घालावे.
जून्या हितजुगवर दिनेशदांची कोबीच्या रबडीची कृती सापडली. तिथे कोबीच्या आतला पांढरा भाग बारीक चिरुन घ्यायला सांगितला आहे. म्हणजे काय ? ते मध्यभागी खोडासारखं असतं ते का ? (लैच गोंधळलेली बाहुली) होल मिल्क वापरुन चांगली होइल का ही रबडी ? दिनेशदा, मला सगळ्याची (कोबी, साखर, दूध) प्रमाणं द्याल काय ?
अजून एखादी रबडीची कृती माहिती आहे का कुणाला ?
मी खीर
मी खीर करताना तुपावर शेवया परतते. त्या परतत असतानाच दूध उकळत ठेवते. शेवया सोनेरी झाल्या की निथळून लगेच दुधात घालून उकळते. मग त्यातच साखर, ड्रायफ्रूटस, केशर्,वेलची इ. घालते.
मी तुपावर
मी तुपावर शेवया ,ड्राय फ्रुट्स भाजुन घेते मग त्यावर दुध घालते आणी चांगली उकळी आणते.
जरा दाट वाटायला लागली की gas बंद करते.
आपल्याकडे देशात जे दुध मिळते ते मात्र गार करुनच खीरीत घालावे म्हणजे नासत नाही .
>>>आपल्याकड
>>>आपल्याकडे देशात जे दुध मिळते ते मात्र गार करुनच खीरीत घालावे म्हणजे नासत नाही .
त्यात स्टॅबिलायझर्स कमी असतात किंवा गवळी ताजं दूध आणून देत असेल तर अजीबातच नसतात. इथे अमेरिकेत ती भानगड नसल्यामुळे दूध फाटता फाटत नाही. पण ऑरगॅनिक वापरत असाल तर भारतातल्यासारखाच प्रॉब्लेम!
जायफळाची
जायफळाची म्हणून एक वेगळी छोटीशी किसणी मिळते.>>>> हे माहीतच नव्हते, (काय हे अज्ञान ??)
इन्डीयन स्टोअर मध्ये जाय्फळ पाहिले पण सहाण नाही उगाळायला आणि इतके कडक कसे किसले जाणार म्हणुन आणलेच नाही
न्यती,
न्यती, किसणी / सहाण नसेल तर nutmeg powder मिळते इथे कोणत्याही ग्रोसरी स्टोअरमधे - ती वापरा.
अमेरिकेत
अमेरिकेत ती भानगड नसल्यामुळे दूध फाटता फाटत नाही >>> दूध फाटते म्हणुन मी गव्हाची खीर करणे बंद केले आहे ऑरगॅनिक दूध वापरते म्हणुन फाटते का ? साधे आणुन बघितले पाहिजे आता.
जायफळ पूड
जायफळ पूड सुरीने पण करता येते, तासल्यासारखे. अख्खे असेल तर जरा त्रास पडेल पण थोडे किसले असेल आधी तर त्या किसलेल्या बाजूवर सुरी वापरायची. हे म्हणजे अगदी थोडं कॉफीत वगैरे घालायचं असेल तेव्हा..
त्यात
त्यात स्टॅबिलायझर्स कमी असतात किंवा गवळी ताजं दूध आणून देत असेल तर अजीबातच नसतात. इथे अमेरिकेत ती भानगड नसल्यामुळे दूध फाटता फाटत नाही. पण ऑरगॅनिक वापरत असाल तर भारतातल्यासारखाच प्रॉब्लेम!
>>> मी ऑर्गॅनिकच वापरते .. आणि तुपावर शेवया परतून त्यावर दुध घालते .. काहीच प्रॉब्लेम नाही ..
शेवयाच्या
शेवयाच्या खीरीसाठी मी दूध मायक्रोवेवमधे गरम करुन घेते आणि मग ज्या कढईत शेवया भाजल्या त्यात दूध घालते. शेवयाची खीर कधी फाटत नाही पण गव्हाच्या खीरीत गूळ, नारळ घातले की लगेच फाटते.
बर आता रबडीबद्दल पण बोला थोडं, तिला बिचारीला वाईट वाटेल.
ती किसणी
ती किसणी नसली ना तर ओरेंज झेस्टर म्हणून एक गिझ्मो मिळतो तो पण चालेल.
बेड, बाथ
बेड, बाथ आणि पल्याड मधे हमखास मिळेल
सिंडे,
सिंडे, गव्हाची म्हणजे क्रॅक्ड व्हीटची का? खोबरं परतून घेतेस की कसं?
मी क्रॅक्ड व्हीट तुपावर परतून घेऊन पाणी घालून प्रेशर पॅनमधे शिजवून घेते आणि मग दूध, गूळ/साखर वगैरे घालते. खोबरं नव्हतं घातलं कधी.
इकडेच
इकडेच कुठेतरी वाचल्याचं आठवतंय आणि भारतात पण अनुभवलंय गव्हाच्या खीरीत दुध घातल्यावर फाटतं ते .. गुळात म्हणे काही केमिकल्स् घालतात त्याने होत असावं असं म्हंटलं होतं ..
हो,
हो, क्रॅक्ड व्हीटची. अशीच करते फक्त (खोबरं नाही ) फ्रोझन नारळ आणि गूळ घालुन करते. आई इथे असताना १००० वेळा केली असेल पण दूध फाटलं नाही. मी जेव्हा पण केली, प्रत्येक वेळी दूध फाटलं
मी गेल्या
मी गेल्या चार पाच वर्षांत जेव्हा जेव्हा केलीये तेव्हा दुध फाटलंच .. पण मी नेहेमीच्या खीरीप्रमाणे तुपावर दलिया (cracked wheat) परतून घेते, त्यातच खोबरं परतून घेते मग दुध घालून उकळून दलिया शिजेपर्यंत ठेवते .. सगळ्यात शेवटी गुळ .. पण बहुतेक गुळ घातल्यानंतरच दुध फाटतं .. आणि हे आताच भारतात गेले होते तेव्हाही झालं ..
गव्हाची
गव्हाची खीर फाटते कारण गूळातील केमीकल्समुळे. पण गव्हाच्या शेवया वा गव्हले वा लापशी तूपात आधी जराशी परतून घेवून मग गूळ टाकून चांगला पुर्ण वितळून झाला की मग घोटून घ्यायचा त्या तूपात की शेवटी मगच उकळलेले दूध(कुठलेही असो ऑरगॅनिक वा नॉरमल) घातले की अजीबात फाटत नाही. दूधाचे पण तापमान सेम पाहीजे(म्हणजेच दूध गरम किंवा जरा उकळते असावे). एकदा खीर दूध टाकून खदखदायला लागली शेवटी ओले खोबरे + वेलची वगैरे टाकायचे नी ढवळून बंद करायचे आणि जर घट्ट वाटलीच तर उकळलेले दूध मागाहून घालायचे. खोबरे शेवटी टाकले की शिजून बेचव होत नाही आणि त्याचे खोबरेल तेल तवंग सोडत नाही खीरीत. जर तशी खोबर्याची चव आवड्त असेल तर काही फरक पडत नाही करून पहा.
आमच्या घरी
आमच्या घरी असंख्य प्रकारच्या खिरी गुळ घालून केल्या जातात . जवळ जवळ प्रत्येक प्रकारात गुळ आधी घालतात अन मग नारळाचे दुध घालून एक उकळी आली की गॅस बंद. कधी फाटत नाही!
नारळाच्या
नारळाच्या दुधाला नेहेमीच्या दुधाचेच नियम असतात का? म्हणजे फाटण्याच्या characteristics बद्दल विचारतेय मी?
मी तेच
मी तेच विचारायला आले की नारळाचे दूध वापरुन कशी करायची ही खीर
सेम तशीच
सेम तशीच वरच्या सारखीच. नारळाचे दूध घालून सुद्धा. नारळाचे दूध नाही उकळायचे पण शेवटी घालायचे.
अजीबात खीर कधीच फाटत नाही कुठलेही दूध वा गूळ घालून.
शूनू,
हो तेच. आमच्या घरी सुद्धा तर गूळच वापरला जातो ज्यास्तीत ज्यास्त. तेव्हा खीर फाटते वाचून मला जरा आश्चर्य वाटले.असो.
नारळाचं
नारळाचं दुध साध्या दुधासारखं फाटत नाही. साधं दुध सर्वसाधारण पणे आम्ल पदार्थांमुळे फाटतं - ( casein नावाचा घटक याला कारणीभूत असतो मला वाटतं ).
पण नारळाच् दुध कुठल्याही पदार्थात घातल्यावर जास्त उकळू नये - पदार्थाची चव बिघडते. परत परत गरम सुद्धा करू नये म्हणतात.
Pages