दुर्ग-गणेश

Submitted by आशुचँप on 2 September, 2011 - 12:16

मंडळी...
मायबोली गणेशोत्सवात प्रसिद्ध, अप्रसिद्ध मंदिरे पाहून मला दुर्ग-गणेशची संकल्पना सुचली. जरी बहुतांश गडांवर महादेव किंवा भवानीमातेची मंदिरे आढळत असली तरी गणराय देखील काही ठिकाणी आपल्या भक्तांना दर्शन देत असतात.
या दुर्गभ्रमंती दरम्यान पावलेल्या या काही बाप्पांची प्रकाशचित्रे माबोकरांसाठी सादर करत आहे.
माबोकर आनंदयात्रीला ही संकल्पना सांगितल्यावर त्यानेही उत्साहाने प्रतिसाद देत त्याच्याकडील आणि रोहन एक मावळा कडील काही बाप्पा पाठवले....
सर्व भटक्यांनी देखील आपल्याकडे असलेली दुर्ग गणेशांची प्रचि पाठवाव्यात जेणेकरून एक सुंदर असे संकलन करता येईल...
धन्यवाद...

प्रचि १

पहिले बाप्पा.. कुलाबा किल्ल्यावरील..अलिबागच्या जवळील या किल्ल्यात सिद्धिविनायकाचे प्रसिद्ध मंदिर आहे. आजही मोठ्या प्रमाणावर भाविक इथे भेट देतात. दीड फूट उंचीची ही संगमरवरी मूर्ती अतिशय लोभसवाणी आहे. राघोजी आंग्रे यांनी हे मंदिर बांधले असे म्हणतात...

प्रचि २

हे बाप्पा अनेकांना माहिती असतील...राजगडच्या सुवेळा माचीवर विराजमान झालेल्या या बाप्पांना वंदन करून मगच राजगडची फेरी पूर्ण होते...सर्वसाधारणपणे माची किंवा पहार्याच्या ठिकाणी मारूती आढळतो पण गणेश अपवादानेच आढळतात.

प्रचि ३

काळ्या संगमरवरातील गणेशमूर्ती...कोल्हापूरजवळील गगनगडावर आढळलेली...
विशेष म्हणजे माझ्या पाहण्यात महादेव मंदिरात सहसा गणेश आढळलेले नाहीयेत पण इथे आपल्या वडीलांबरोबर आपले स्थान राखून आहेत.

प्रचि ४

ही देखील अजून एक प्रसिद्ध गणेशमूर्ती...हरिश्चंद्रगडावर अत्यंत अनघड ठिकाणी बांधलेल्या सुबक हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या आवारात विराजमान झालेली....

प्रचि ५

आणि ही तिथून जवळच असलेल्या गुंहेत...या गुहेला नावच गणेश गुहा आहे. दुर्ग गणेश मध्ये आकाराने सर्वात मोठा.

प्रचि ६

प्रचि ७

मोरधन उर्फ मोराचा डोंगर च्या पायथ्याशी एका वडाच्या झाडाखाली विराजमान झालेले हे रेखीव गणेश...(कळसूबाई रांग)

प्रचि ८

साल्हेर किल्ल्यावरील गणेशप्रतिमा

प्रचि ९

मुल्हेर माचीवर एक सुरेखसे गणेशमंदिर आहे...तिथली एक गणेशमूर्ती...(फोटो- रोमा)

प्रचि १०

त्या मंदिराच्या बाहेर विराजमान झालेले अजून एक बाप्पा

प्रचि ११

हा फोटो यो रॉक्सने काढलेला...वॉमावरून कळेलच अर्थात Happy

प्रचि १२

किल्ले अजिंक्यताराच्या बळकट प्रवेशद्वारावर विराजलेले बाप्पा..
(फोटो - आनंदयात्री)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचि १३

शिरपुंज्याच्या भैरवगडावर..

प्रचि १४

रतनगडावर.. शिडी चढल्यावर लगेच असलेल्या गणेश दरवाजावर उजव्या हाताला बाहेरील बाजूस.

प्रचि १५

रतनगडावर.. हनुमान दरवाजावरील गणपती बाप्पा-रिद्धी-सिद्धी

प्रचि १६

भामेर दुर्गावर असलेल्या लेण्यांपैकी एका दरवाजावर.

प्रचि १७

कोरीगडाच्या पायथ्याशी..

छानच आहेत फोटो आणि कल्पना...आम्हाला गड न चढता बाप्पांच दर्शन घडवल्याबद्द्ल धन्यवाद...

हे काही माझ्याकडुन....


किल्ले अवचित... रोहा-रायगड


हडसरच्या शिवमंदिरातील गणेश....


लोहगड प्रवेशद्वार.....


राजमाची...किल्लेदाराचा वाडा....


रुमटेक गोंफा...सिक्कीम...


वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी.. मारुती-गणेश जोडगोळी...


खिरेश्वर मंदिर.... खुबी....


हरिचन्द्रगड्...मुख्य मंदिरासमोरील छोट्या गुहेवजा मंदिरात....

मस्त Happy

हेम आणि गिरी......जबरदस्त....
रतनगडावरचा गणेश माझ्याकडे रोल कॅमेरातला होता पण बाकीचे तर अगदीच मिसले रे मी....
सिक्कीमचा तर अगदीच क्लास...
आणि खिरेश्वरचा मंदिरावर बाप्पा कोरले आहेत हे कधी ऐकले पण नव्हते रे...
आणि हे नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या रुपातले आहेत. युद्धावर वगैरे चालले असावेत असा भास होतोय...
खूप खूप धन्यवाद...

आणखी भटक्यांनीही त्यांची प्रचि टाका लवकर...

व्वा हेमानु...मस्तच कलेक्शन
मुल्हेरचा उपगड असलेल्या 'मोरा' गडाच्या सुंदर दरवाज्याला आतील बाजून कोरलेला सुंदर गणपती.. या परिसरातल्या गडांचे दरवाजे खासच आहेत..


- - - - - -

Pages