आनंदमेळा- छोटे कलाकार- माझे आवडते घर- नचिकेत

Submitted by पूनम on 2 September, 2011 - 04:44

'तुझ्या मनातलं घर कोणतं?' असं विचारताच, 'चॉकलेटचं!!' असं एका क्षणाचाही विलंब न करता उत्तर आलं. पण चॉकलेटचं घर करताना, त्याला डिंक लावून ते कागदाला/ पुठ्ठ्याला चिकटवावे लागेल आणि ते करताना अनेक खाद्यपदार्थांची नासाडी होईल, म्हणून साध्या कागदावरच मॉडेल करायचं ठरलं. हे 'मॉडेल' अ‍ॅज सच नसल्यामुळे कदाचित नियमांमध्ये बसणार नाही, तसे असल्यास, कळवा, मी काढून टाकेन इथून.

पाल्याचे नाव- नचिकेत
वय- आठ वर्षे
आमची मदत- साहित्य आणून देणे, कारंज्याचे 'तुषार' करणे. बाकी सर्व त्याचे त्याने केले आहे.

पूर्वतयारी-

sahitya.jpg

कामात असताना-

tayari.jpgtayari1.jpg

झालं घर करून-

चॉकलेटच्या डोंगराला, 'पर्क'ची नदी, डोंगराच्या पोटात चक्क मनुका आणि बेदाणे, 'पोलो'चा सूर्य आणि 'मार्बल्स'ची झाडं, बिस्किटांचे घर, 'जेम्स'ने भरलेला घराचा माळा, पक्षी आणि फुलंही 'जेम्स'ची, कारंज्यातही बेदाणे, तर पाणी श्रीखंडाच्या गोळ्यांचं आणि तुषार बडीशेपेच्या गोळ्यांचे! दारात उभा असलेला 'तो' आनंदात असेल नाहीतर काय! Happy

final.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर... Happy
फोटो बघून असावा सुंदर चॉकलेटचा बंगला... चटकन गाण ओठांवर आले....
छान नचिकेत... Happy

छान आहे, नचिकेत तुझे घर.

तुझे घर पूर्ण होऊ शकले यातच तुझ्या संयमाचं कौतुक वाटतं. माझे घर कधीच पूर्ण होऊ शकले नसते. कच्चा माल कधीच पुरवठी आला नसता. Proud

ऑस्सम.
शाब्बास नचिकेत. आणि आईचे विशेष आवर्जून कौतुक. खाद्यपदार्थांची नासाडी करु दिली नाही.

गजानन Lol

धन्यवाद लोक्स Happy

गजा, त्याच्या दातांच्या वाईट परिस्थितीमुळे, एरवी त्याला चॉकलेट देत नाही, म्हणून तर सुप्त इच्छा चॉकलेटच्या घराची Happy आता बिस्किटं वगळता, हा कच्चा माल सगळा वाटून टाकला लगेच!

हह, तिथे बडिशेपच्या गोळ्यांची नदी करायची होती, पण शेवटी पेशन्स संपला, म्हणून रिकामं रॅपरच ठेवलं नदी म्हणून! Lol
ह्यावेळी कटाक्षाने काहीही सूचना करायच्या नाहीत असं ठरवलं होतं, त्यामुळे कष्टाने माझं तोंड बंद ठेवलं Proud

नचिकेत, तुझं खूप खूप कौतुक! तू बांधलेलं ड्रीमहाऊस फार फार आवडलं. ते घडवतानाचा पेशन्स आणि घरबांधणीला इतका जबरजस्त कच्चामाल वापरताना तोंडावर ठेवलेला ताबा सॉलिडच आहे.

(आणि दुसर्‍या प्राकाराच्या) तोंडावरच्या ताब्याबद्दल आईचं विशेष कौतुक! Proud

(आणि दुसर्‍या प्राकाराच्या) तोंडावरच्या ताब्याबद्दल आईचं विशेष कौतुक! >> एकदम अनुमोदन !
सुंदर आहे घर एकदम. वाकून ते करतानाचा फोटो भारी गोड. माळ्यावर जेम्स भरणे ही आयडिया तर भारी आहे.

मस्त आहे चॉकलेटचा बंगला. Happy
(तो अशा घरात आल्याबद्दल दोन्ही हात वर करून आनंद व्यक्त करणारा दारातला मुलगा भारी आहे. :P)

Pages