हवेत असे जिगरी खेळाडू अशा जिगरी खेळ्या !

Submitted by असो on 1 September, 2011 - 01:50

इंग्लंडमधे नुकत्याच झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर काही आठवणी जाग्या झाल्या. इंग्लंडात मार खायची काही ही पहिली वेळ नाही. ४२ मधे सर्वबाद व्हायचं रेकॉर्ड आपल्या नावावर इथेच जमा आहे. त्या टीममधे पण अनेक महान फलंदाज होते.

पण काही खेळाडू असे असतात ज्यांच्यामधे डावालाच नाही तर संघाला उभारी द्यायची क्षमता असते. त्यांच्या थोड्याच खेळ्या अशा येऊन जातात कि महान म्हणवल्या गेलेल्या खेळाडूंना आपल्या कामगिरीचा विचार करण्याची पाळी येते. अशा कलाटणी देणा-या खेळाडूंमधे सर्वात आधी नाव घ्यावं लागेल ते कपिलदेव निखंज याचं. निव्वळ रेकॉर्ड किंवा आकडेवारीने गेममधला थरार कसा कळणार ?

१९८२ सालीही आजच्याच प्रमाणे इंग्लंडने ५७० च्या वर विशाल स्कोर केला होता. इयान बोथम, बॉब विलीस सारखे कर्दनकाळ बॉलर्स इग्लंडकडे होते. त्यांच्यासमोर जिंकण्यासाठी तर सोडाच पण फॉलोऑन टाळण्यासाठीही टॉप बॅटिंग ऑर्डर तग धरू शकली नव्हती. अशा वेळी गोलंदाज म्हणून संघात आलेल्या कपिलने आपली जबाबदारी ओळखत केलेली ही जिगरबाज खेळी आकडेवारीत हरवून गेली असती. रेकॉर्ड पंटर्सना त्यातला पराक्रम उलगडून सांगता नसता आला म्हणून प्रत्यक्षच पहा असं नम्र आवाहन करतानाच कपिलपर्वाच्या आठवणींना दिलेला हा उजाळा क्रिकेटरसिकांच्या चरणी अर्पण !!

१९८२ इंग्लंड वि भारत दुसरा कसोटी सामना. कपिल देव चा झंझावात
http://www.youtube.com/watch?v=2AsSJw_QnKk

१९८२ इग्लंड वि भारत पहिला कसॉटी सामना. शेपटाला घेऊन चाललेला कपिलदेवचा हातोडा..
http://www.youtube.com/watch?v=6K25C4pcsrs&feature=related

आणि फॉलोऑन टाळण्यासाठी हाणलेल्या या चार सलग सिक्सर्स
http://www.youtube.com/watch?v=1QFOLim2h2Q&feature=related

त्याच्या बॉलिंगचा थरार अनुभवलेल्या सर्वांसाठी ईएसपीएनचा हा सलाम
http://www.youtube.com/watch?v=OH8mjbAXJuk&feature=related

( परवानगी असेल तर इम्रान बद्दल इथे लिहावंस वाटतंय. आजवर पाहीलेला हा सर्वात जिगरी खेळाडू असावा असं वाटतं )

इम्रान खान दहा विकेटस
http://www.youtube.com/watch?v=cNq0TE8JCUc&feature=related

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिली - थॉम्प्सन या क्रिकेटविश्वातील सर्वश्रेष्ठ जलदगती जोडगोळीसमोर भारतीय फलंदाजी ५/७८ अशी ढेपाळलेली असताना संदीप पाटीलने दिलेली ही एकाकी झुंज. रॉडनी मार्श आणि लॅरी पॅस्को च्या तिखट मा-यापुढे जायबंदी होऊनही साकारलेली ही खेळी कुणीच विसरू शकणार नाही...

http://www.youtube.com/watch?v=SAV_MiOQvH4&feature=related

कपिलदेवच्या त्या ४ सिक्सर्स अजुनही आठवतात , समोर नरेंद्र हिरवानी होता.
बॉलर हेंड्रिक की एंब्युरी ? त्यावेळी पेपरमध्ये १ टिप्पणी वाचली होती.
बॉलर त्या उंचच उंच जाणार्‍या बॉलकडे बघत असताना विचारल्यावर अंपायरला म्हणाला, " मी विचार
करतोय की इतका उंच मारायला मला किती वेळा बॉल मारावा लागेल."
रिअली ग्रेट .

करसन घावरीने बर्‍याच लेग स्टंप काढलेले फोटोज बघीतले होते , तेही मस्तच होते.
One of them was Greig Chappel.
त्यावेळी हे लाईव्ह नाही बघता आलं , तरिही रेडिओचे कॉमेंटेटर्स ते वर्णन फार चांगल्या तर्‍हेने
ऐकणार्‍यासमोर उभे करायचे.

मस्त. बहुधा बर्‍याचश्या बघितलेल्याच आहेत पण चेक करतो. कपिल ची जिगर जबरीच होती. इम्रान चा वेग कपिलपेक्षा जास्त असेल (पण कपिल ची बॅटिंग जास्त चांगली होती) पण जिगर किती आहे याची तुलना कशी करणार. त्यात इम्रान कडे मियाँदाद, माजिद खान, सर्फराज नवाझ, अब्दुल कादिर, झहीर अब्बास, नंतर अक्रम, वकार वगैरे लोक होते, त्यामानाने कपिलकडे अशी टीम होती की भारतात फक्त फलंदाजी चालायची आणि परदेशात फक्त गोलंदाजी Happy

कपिलची आणखी लिन्क सापडली तर देतो - रिचर्डस ने ५६ चेंडूत शतक केल्याचे माहीत असेल. पण विंडीज चा तोफखाना ऐन भरात असताना (१९८३) त्यांच्या भूमीवर त्यांच्याविरूद्ध कपिल ने ५४ बॉल्स मधे ८९ मारल्या होत्या. कपिल सुरूवातीला कव्हर ड्राईव्ह वगैरे मारू लागला की समजायचे, साहेब फॉर्म मधे आहेत Happy

अनिल, आपली हरकत नसेल तर यातील काही लिन्क मी कपिल वरती एक बाफ तयार केला होता तेथे टाकतो.

कोर्टनी वॉल्शला जिगरी खेळाडू म्हणता येईल का याबद्दल वाद असू शकतो. मायकेल होल्डिंगचा विद्यार्थी शोभावा इतका सुंदर रन अप आणि प्रत्येक बॅटसमनची परिक्षा घेणारे सहा वेगवेगळे चेंडू. त्याच्याकडे नॅचरल बाऊन्स होता, तसाच वेगाने आत येणार इनस्विंगरही होता. इनस्विंगच्या अ‍ॅक्शनमध्ये टाकण्यात येणारा दुर्मिळ आउटकटरही त्याच्याकडे होता. इतकी गुणवत्ता असूनही त्याचं कौतुक म्हणावं इतकं कधीच झालं नाही. कदाचित वेस्ट इंडीजचा दबदबा कमी होत चालला होता. तरीही तोफखाना बंद पडलेला नव्हता. कर्टली अ‍ॅम्ब्रोजसारखा साथीदार त्याला मिळाला होता. अशा टीममधे एकाच गोलंदाजाने पाच विकेटस काढणे हे अभावानेच घडतं.. अर्थात दोन चांगले गोलंदाज असूनही विंडीजला विजय दुर्मिळ झाल्याने त्यांच्या कामगिरीचं कौतुक झालं नसावं.

ते काहीही असो. वॉल्शचा शारजामधला ड्रीम स्पेल ज्यांनी पाहिला ते कुणीही तो विसरणार नाहीत. श्रीलंकेवविरूद्ध खेळताना वॉल्शच्या पहिल्या स्पेलचं पृथक्करण होतं.

४.३ - ४ - १- ५ पाच ओव्हर्स, चार मेडन, एक रन आणि पाच विकेटस.

http://www.cricandcric.com/cricket-videos/79/Courtney-Walsh-Destroying-C...

अशी जिगरी खेळी अभावानेच पहायला मिळते. कर्‍तली अ‍ॅम्ब्रोजने जरी ऑस्ट्रेलियाविरूद्ध याहीपेक्षा सरस कामगिरी केली असली तरी शारजाच्या पाटा विकेटवरच्या वॉल्शच्या त्या स्पेलचं महत्व वेगळंच आहे.

कोर्टनी वॉल्श हा आवडता खेळाडू असल्याने कर्टली अ‍ॅम्ब्रोजकडे कदाचित दुर्लक्ष झाले असेल तर रसिकांनी क्षमा करावी. क्रिकेट हा खेळच असा आहे. या खेळाकडे निरपेक्षपणे कदाचित हर्षा भोगलेही पाहू शकणार नाही. असो.

कर्टली अ‍ॅम्ब्रोजच्या केवळ १ रन देऊन घेतलेल्या सात विकेटसच्या स्पेलची ऑस्ट्रेलियाला आजही एखाद्या दु:स्वप्नासारखी आठवण होत असेल ( जसा आपल्याला यंदाचा इंग्लंड दौरा ) . वाकाच्या वेगवान खेळपट्टीवर अ‍ॅम्बरोज असा काही खुलला कि ऑस्ट्रेलियन्स त्याच्या मा-यापुढे संपूर्णपणे ध्वस्त झाले.

ऑस्ट्रेलिया पहिला डाव :

http://www.youtube.com/watch?v=a5G4pqb4nns

डावाच्या शेवटी अ‍ॅब्रोजच्या खात्यात २५ धावात सात बळी होते. शेपटाने प्रतिकार केला नसता तर टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात देखील १ रन मधे पाच किंवा पेक्षा जास्त विकेटस हा विक्रम विंडीजच्या नावावर जमा झाला असता. अर्थात ऑस्ट्रेलियाच्या सात विकेटस २५ धावात काढणे ही पण काही साधी गोष्ट नाहीच !