मायबोली शीर्षकगीत स्पर्धा (नियम) : "ज्योतीने तेजाची आरती..." - मायबोली गणेशोत्सव २०११

Submitted by संयोजक on 18 August, 2011 - 08:54

jyotine_0.jpg

भारताचे राष्ट्रगीत ..... महाराष्ट्राचे महाराष्ट्रगीत ........ मग मायबोलीचं आपलं स्वत:चं मायबोलीगीत का बरं नाही???

आपल्या मायबोलीवर कितीतरी प्रतिभासंपन्न कवी-कवयित्री आहेत. त्या सगळ्यांना यंदा ही सुवर्णसंधी आहे. आपल्या लाडक्या मायबोलीचं सुंदर वर्णन, तिचं तत्वज्ञान, तिचे पैलू उलगडून सांगणारं, छानसं चालीवर बसवता येईल असं गीत तयार करायचं... खास "मायबोली शीर्षकगीत".

एक खुषखबर! : मायबोली सदस्य 'योग' यांनी या स्पर्धेत विजेत्या ठरणार्‍या शीर्षकगीतास संगीत देवून त्याचे जमल्यास खास मायबोलीकरांच्या निवडक समूहाच्या आवाजात ध्वनिमुद्रण करून एक कायम स्वरूपी ठेवा/भेट म्हणून करायची इच्छा व्यक्त केली आहे. यानिमित्ताने योग यांच्या सहकार्यामुळे मायबोलीचे एक कायमस्वरूपी शीर्षक-गीत बनवता येईल.

********************************************************

स्पर्धेचे नियम :
१. एका आयडीतर्फे एकच प्रवेशिका स्वीकारली जाईल.
२. गीतात किमान ३ आणि जास्तीत जास्त ५ कडवी असावीत.
३. स्पर्धेसाठी पाठवलेले गीत या आधी मायबोलीवर किंवा इतरत्र प्रकाशित झालेले नसावे.
४. गीतांमध्ये गेयता अपेक्षित आहे. गीत चालीत रचण्यायोग्य व संगीतबद्ध करण्यायोग्य असावे.
५. स्पर्धेचा अंतिम निकाल परीक्षकांच्या मताने ठरवण्यात येईल. तो स्वीकारणे सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील.

प्रवेशिका कशा पाठवाल?

प्रवेशिका पाठवण्याची पद्धत सोपी करण्याच्या उद्देशाने, प्रवेशिका पाठवण्याबद्दलचे नियम बदलण्यात आले आहेत याची कृपया नोंद घ्यावी.

प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत (१ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०११) स्विकारण्यात येतील. प्रवेशिका पाठण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०११' या गृपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा गृप सदस्य-नोंदणीकरता १ सप्टेंबरला खुला करण्यात येईल.

१. 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घ्या. त्याकरता या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०११' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर "सामील व्हा" या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०११' या गृपचे सभासद झाला आहात.

२. याच गृपमध्ये उजवीकडे "नवीन लेखनाचा धागा" या शब्दांवर टिचकी मारा. (मायबोलीवरील नवीन लेखन करा, गणेशोत्सव २०११ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत)

३. नवीन लेखनाचा धागा उघडला जाईल. त्यात शिर्षक या बॉक्समध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :
मायबोली शिर्षकगीत स्पर्धा - "ज्योतीने तेजाची आरती" - स्वतःचा मायबोली आयडी

४. विषय या बॉक्समध्ये ड्रॉपडाऊन मेन्युमधून 'मायबोली - उपक्रम' हा पर्याय निवडा.

५. शब्दखुणा या बॉक्समध्ये "मायबोली शिर्षकगीत स्पर्धा, ज्योतीने तेजाची आरती, मायबोली गणेशोत्सव २०११" हे शब्द लिहा.

६. मजकूरात आपली प्रवेशिका लिहावी / कॉपी-पेस्ट करावी.

७. मजकूरात प्रचि टाकायचे असल्यास मजकूराच्या बॉक्सखाली 'मजकूरात image किंवा link द्या.' यातील image शब्दावर टिचकी मारा. एक नविन विंडो उघडेल. त्यात वरती दिलेल्या ऑप्शन्सपैकी upload हा ऑप्शन निवडा. मग 'browse' हा पर्याय क्लिक करून तुमच्या कॉप्युटरवरून योग्य ती फाईल 'upload' करा. फाईल अपलोड झाली की कालच्या करड्या बॉक्स मध्ये तसा मेसेज दिसेल. मग ही फाईल सर्वात वरती दिलेल्या ऑप्शन्सपैकी 'Send to textarea' हा ऑप्शन वापरून तुमच्या मजकूरात समाविष्ट करा.
प्रचि टाकण्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.

८. नविन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या बटणाच्या वर गृप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेला बॉक्स क्लीक करा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.

९. Save चे बटण दाबा. कधी कधी सेव्ह व्हायला वेळ लागतो, त्यामुळे थांबा. तुमची प्रवेशिका प्रकाशित होऊन सगळ्यांना दिसू लागेल.

१०. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल / बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा ऑप्शन वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.

शुभेच्छा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव. भारी आयडिया आहे.
क्रियेटीव्हीटी मस्तय तुमच्या टीमची. Happy

काही वर्षांपूर्वीची स्वातीआम्बोळे आणि जयवी यांच्या प्रवेशिका आठवल्या. Happy

क्रियेटीव्हीटी मस्तय तुमच्या टीमची. >>>> अनुमोदन !!! मस्त स्पर्धा, मस्त जाहिराती, मस्त पोस्टर्स.. सगळं एकदम प्रोफेशनल आहे. Happy

भारी!!!

मस्त स्पर्धा!!!! Happy

क्रियेटीव्हीटी मस्तय तुमच्या टीमची.>>>>>+१. अगदी अगदी

शिर्षकही भन्नाट Happy

स्पर्धेमध्ये सामील न करता केवळ गीत म्हणून लिहायला परवानगी असेल तर

मी लिहायचा अवश्य प्रयत्न करेल. Happy

गंगाधर मुटे, आपल्या मागणीचा पूर्ण आदर आहे.

परंतु ही स्पर्धा असल्याने इथे येणार्‍या सर्व प्रवेशिका स्पर्धेकरता आल्या आहेत हे गृहित धरले जाईल याची कृपया नोंद घ्यावी.

छान!!

संयोजक,
या बाबतीत मायबोली संपर्कातून ईमेल केली आहे. कृपया ईमेल ने अभिप्राय द्याल का?

धन्यवाद!

मस्त Happy

मायबोलीवर कविता, गझलांचा खच पडतो म्हणता? पण मग खुद्द मायबोलीचं शीर्षकगीत लिहायला कोणी कवी सापडू नये?

कवी / कवयित्रींनो, आपल्या लाडक्या मायबोलीकरता छानसं शीर्षकगीत लिहिताय ना तुम्ही? तुमच्या गाण्याला सुरेखशी चाल लावून त्याचं कायमस्वरूपी मायबोली शीर्षकगीत बनणार आहे. ही सुसंधी सोडू नका.

छान स्पर्धा.
याच्या प्रवेशिका कुठे बघायच्या?
मायबोलीवर कविता, गझलांचा खच पडतो म्हणता? पण मग खुद्द मायबोलीचं शीर्षकगीत लिहायला कोणी कवी सापडू नये?>>>> Happy

मला कविता जास्त दिसल्या नाहित. मी जास्त वाचन करत नाही त्यामुळे प्रतिक्रियही देत नाही पण तुमची ही आयडिया आवडली म्हणून मला या प्रवेशिका वाचायच्या आहेत.

मायबोली म्हणजे परदेशात येऊन...

अहो आम्ही देशातच रहातो,अजून पासपोर्टही नाही तरी मायबोली आमची लाडकी बरं का !