Submitted by निवडुंग on 25 August, 2011 - 06:34
समांतर जिणे सांधण्या पाहतो मी,
जगावेगळे मागणे मागतो मी.
बरसता तुफानी सरी श्रावणाच्या,
फुले दोन, केशी तुझ्या, माळतो मी.
निरोपास आतच अडे पापण्यांच्या,
तुझी आसवे दोन, सांभाळतो मी.
धुसर होत जाता खुणा भाळण्याच्या,
गुरफटून अंधार कवटाळतो मी.
तुझ्या अंगणी पारिजाता पखरण्या,
धुमारे तटी आज जोपासतो मी.
उणे अधिक की अधिक होते उणे, हेच,
गणित रोज सोडायला टाळतो मी.
अताशा पडूनी किती पीळ जीवा,
सुतासारखा का सरळ वागतो मी?
खुणा सोबतीच्या हरवल्या कधीच्या,
पुरावे निरर्थकच धुंडाळतो मी..
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
निवडुंगा तु पण. मस्तच!आवडली.
निवडुंगा तु पण.
मस्तच!आवडली.:)
खुणा सोबतीच्या हरवल्या
खुणा सोबतीच्या हरवल्या कधीच्या,
पुरावे निरर्थकच धुंडाळतो मी..>>>>>>>>>>>> छान ओळ आहे
तुझ्या अंगणी पारिजाता
तुझ्या अंगणी पारिजाता पखरण्या,
धुमारे तटी आज जोपासतो मी.........व्वा !!
अताशा पडूनी किती पीळ जीवा,
सुतासारखा का सरळ वागतो मी?..हा सुद्धा आवडला.
उणे अधिक की अधिक होते उणे, हेच,
गणित रोज सोडायला टाळतो मी..............ह्या शेरात वृत्तभंग झाला आहे.
हर्षे, उदयवन, खूप
हर्षे,
उदयवन,
खूप आभार.
डॉक,
प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!
"उणे अधिक की अधिक होते उणे, हेच,"
या ओळीबद्दल म्हणत असाल, तर शेवट "गा" असेल तर "गाल" ची सूट घेतली जावू शकते म्हणून तसं लिहिलंय. नुसतं "गा" लिहायला जमत नव्हतं.
अर्थात मी अजून शिकतोच आहे, त्यामुळे काही चूक असेल तर मार्गदर्शन करावे.
शेवट "गा" असेल तर "गाल" ची
शेवट "गा" असेल तर "गाल" ची सूट घेतली जावू शकते >>>
असं कोणी म्हटलंय??? प्रामाणिक शंका आहे. गैरसमज नसावा.
छान गझल. मतल्याबाबत मी
छान गझल.
मतल्याबाबत मी यथावकाश बोलेन.
मुटेसाहेब, खूप धन्यवाद..
मुटेसाहेब,
खूप धन्यवाद.. आपल्या प्रतिसादाची वाट पाहतोय!
आनंदयात्री,
बेफिकीर यांच्या गझलतंत्र लेखातच या सुटीबद्दल लिहिलं आहे - तांत्रिक सुटी या विभागात -
२. ओळीचे शेवटचे अक्षर जर वृत्ताप्रमाणे गुरू असेल व कवीला असा एखादा शब्द योजायचा असेल ज्यात त्या गुरू अक्षरानंतरही एक लघू अक्षर येते, ते लघू अक्षर तो वृत्तात बसत नसतानाही काही ठिकाणी घेऊ शकतो. मात्र, अशा सुटी प्रचंड प्रमाणात वापरणे हास्यास्पद असून त्यांचा वापर अपरिहार्य असल्याचे निदान प्रकाशित गजलेतून तरी दिसलेच पाहिजे.
म्हणून "हेच" असं लिहिलं, अर्थात दुसरा शब्द मला सुचत नव्हता तेव्हा हे ही खरं..
तुझ्या अंगणी पारिजाता
तुझ्या अंगणी पारिजाता पखरण्या,
धुमारे तटी आज जोपासतो मी.... वाह वाह!
खुणा सोबतीच्या हरवल्या कधीच्या,
पुरावे निरर्थकच धुंडाळतो मी..>. हा ही बढिय्या..
मतलाही आवडली, निवडुंग
सुरेख गझल.
सुरेख गझल.
अप्रतिम!
अप्रतिम!
चांगला प्रयत्न..
चांगला प्रयत्न..:)
मला बेफिकीर यांच गझलतंत्र
मला बेफिकीर यांच गझलतंत्र कुठे वाचायला मिळेल प्लीज सांगा.
काही कल्पना छान आहेत. चांगला
काही कल्पना छान आहेत. चांगला प्रयत्न. पुलेशु.
गझल ठीकठाक वाटली. 'बेफिकीर
गझल ठीकठाक वाटली.
'बेफिकीर यांचे गझलतंत्र'>>
नेहा, गझलतंत्र माझे नव्हे. मी ते फक्त सुलभ करून दिले आहे.
मुखपृष्ठावर तो धागा आहे खाली, मला आत्ता नंबर आठवत नाही आहे. बघा एकदा वाचून, कसा वाटतो ते!
निवडुंग - खयाल प्रॉमिसिंग वाटले.
-'बेफिकीर'!
ह्म्म..ओके! प्रयत्न चांगला..
ह्म्म..ओके!
प्रयत्न चांगला.. शुभेच्छा..
छान, आवडली.
छान, आवडली.
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आणि
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आणि सुचनांबद्दल खूप खूप आभार!
छान गझल.. आवडली. सुट घेता
छान गझल..
आवडली.
सुट घेता येते..असा धागा मलाही वाचायला आवडेल.