डॉ. अनिल अवचट यांचं 'सृष्टीत..गोष्टीत' हे पुस्तक गेल्या वर्षी प्रकाशित झालं. बाबाचा हा पहिला कथासंग्रह. निसर्गाशी संवाद साधताना त्याला सुचलेल्या या गोष्टी. या कथासंग्रहातील काही गोष्टी मायबोलीकरांसाठी खास, बाबाच्याच आवाजात..
"पहिल्यांदाच गोष्टी लिहायला लागलोय. जवळच्या टेकडी परिसरातील जंगलात फिरू लागलो.
अचानक मला एक भाषा सापडली. तिच्यामुळे मी ओळखीच्या झाडांशी बोलू लागलो. नंतर कळलं, गवत, झुडपं सगळेही त्याच भाषेत बोलताहेत.
मग काय नुसत्या गप्पा आणि गप्पाच.
कधीतरी पक्ष्यांनी, किड्यांनीही येऊन बोलायला सुरूवात केली. आणि घरी आल्यावर वरचा पंखाही त्याच्या घसघस भाषेत म्हणाला, 'काय माझ्याशी नाही बोलायचं वाटतं.'
या सगळ्यांनी माझं जीवन काठोकाठ भरून टाकलंय.
त्यांच्या गप्पांमधून निघालेल्या या काही गोष्टी."
- डॉ. अनिल अवचट
---------------------------------------------------------------
गोष्ट १.
गोष्ट २.
गोष्ट ३.
---------------------------------------------------------------
डॉ. अनिल अवचट यांचे छायाचित्र डॉ. शीतल आमटे यांच्या सौजन्याने
---------------------------------------------------------------
वा किती
वा किती सोप्या पण सुंदर गोष्टी आहेत. थोडंसं गालात हसू आणणार्या पण शब्दांमधल्या जागेत डोकावून पाहिलं तर खूप काही सांगून जाणार्या.
Namaskar sir, Tumache samajik
Namaskar sir,
Tumache samajik karyatil yogdan khupach atulniya aahe.
Sir mala tumachya vicharankadun khup prerana mialali aahe ,agadi sadha saral jivan ,sakaratmak drushtikon kay asto aani jivanat khara aananda mhanaje nemaka kay he tumchyakadun kalata.
Sir mi ek Ayurved vaidya aaahe, sadhya mi USA madhe aahe.
Mster's in public health ya madhe mi US madhe master's sathi 2 varsha ethe aahe aahe. .
mala tumachya sobat kaam karanyacha bhagya labhava. maza dheyya hi tech aahe.sir mala asha eka aadarsha vyakti sobat kaam karanya chi sandhi milavi evadhich aasha.
फोटो खरेच सुरेख काढला आहे.
फोटो खरेच सुरेख काढला आहे. ऑडिओ आरामात ऐकणार.
धन्यवाद.
ऑफिसमध्येच ऑडियो ऐकला,राहवलंच
ऑफिसमध्येच ऑडियो ऐकला,राहवलंच नाही.
तिसरी गोष्ट जास्त आवडली.
तिन्ही गोष्टी छान आहेत.