Submitted by विभाग्रज on 18 August, 2011 - 13:20
गौळण......................
मारितो खडा,फोडितो घडा
पखरण दह्या दुधाची,
काहे कान्हा-काहे कान्हा
खोडी काढीतो गोपिंची.
बालके रडताना तुम्ही तुमची
सोडता काचोळी गे,
पाडसा गाईच्या दुर्मूख का गे
मातेची आचोळी गे,
म्हणूनी मारितो खडा,फोडितो घडा
सजा ही गुन्ह्याची.
काहे काहे काहे मैया मोरे
वकिली करिशी तू गोपिंची..!
मारितो खडा,फोडितो घडा....
गोधन का गोकुळातले
या विकती गे बाजारी,
पाडसे बालके अशक्त होउनी
पडती गे आजारी,
म्हणूनी काढीतो खोडी,चाखितो गोडी
गोधन दह्या दुधाची.
काहे काहे काहे मैया मोरे
वकिली करिशी तू गोपिंची..!!
मारितो खडा,फोडितो घडा....
बहूत दिन का नच मी दिसलो
या होती गे व्याकूळी,
परी तरिही त्या चुगलखोर का
करीती माझी कागाळी,
जरी काढीतो खोडी,लाविती गोडी
गुंता ही प्रेमाची.
काहे काहे काहे मैया मोरे
वकिली करिशी तू गोपिंची..!!!
मारितो खडा,फोडितो घडा....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विभा दा, सुंदर प्रयास. छान.
विभा दा,
सुंदर प्रयास. छान. पुलेशु.
छानच!
छानच!:)
सुंदर गौळण गीत. माझ्या काही
सुंदर गौळण गीत.
माझ्या काही गौळण तुम्हाला येथे पाहता येतील.
http://www.maayboli.com/taxonomy/term/3645
धन्यवाद, निनाव्,हर्षदा,आणि
धन्यवाद,
निनाव्,हर्षदा,आणि मुटे साहेब.
छान! गवळण या प्रकाराबद्दल
छान! गवळण या प्रकाराबद्दल थोडी माहिती देणार का? हवी आहे माहिती.
धन्यवाद बेफिकीरजी.
धन्यवाद बेफिकीरजी.
सुनंदर गौळण! पण... "काहे काहे
सुनंदर गौळण! पण...
"काहे काहे काहे मैया मोरे " ही एकच ऊळ
हिंदी क? काही कारण?(माफी असावी..चुक नाही काढत आहे..पाण सहज विच्यारावस वाट्ल )
नाही,काही खास कारण नाही,हे
नाही,काही खास कारण नाही,हे आपोआप लिहिलं गेलय.
धन्यवाद!
द्वापारयुगातल्या कान्हाला
द्वापारयुगातल्या कान्हाला कलियुगात आणून सोडलेस.छान आहे गौळण .
मस्त गौळण मस्त चाल लावता
मस्त गौळण
मस्त चाल लावता येतेय जरा उडती चाल जरा फास्ट ठेका मस्त वाटतोय
मी चालीतच वाचली मजा आली
एखाद्या हौशी + तज्ञ माबोकारांकडून चाल लावून आम्हाला ऐकायला द्याल का ! उदा: प्रमोद देव जी
खूप मजा येईल
गौळण या काव्यप्रकाराबद्दल अधिक माहिती द्याल का
मुटे सरांच्या ब्लॉगवरील गौळणीही मी पूर्वीच वाचल्या आहेत त्याही छान आहेत
कळावे
आपला नम्र
वैवकु
धन्यवाद !!
मस्त. गौळणीबद्दल मलाही माहिती
मस्त.
गौळणीबद्दल मलाही माहिती हवी आहे.
ज्योत्सनाजी,वैभवजी,चैतन्यजी
ज्योत्सनाजी,वैभवजी,चैतन्यजी धन्यवाद.
कृष्ण आणि त्याच्या लिलांवर जे काव्य रुपात भजनात गायले जाते त्याना गौळणी असे संबोधले जाते असा माझा समज(गैरसमजही असू शकेल).
वैभव वसंतरावना अनुमोदन. खूप
वैभव वसंतरावना अनुमोदन. खूप सुन्दर गवळण. मला खूप आवडतात गवळणी.(गीत प्रकार)
विभाग्रजजी अनेकदा
विभाग्रजजी
अनेकदा वाचली.
बालके रडता का तुम्ही तुमची
सोडता काचोळी गे,
पाडसा गाईच्या दुर्मूख का गे
मातेची आचोळी गे,
या ओळींचा अर्थ समजला नाही. कुणाच्या तरी प्रतिसादातून उलगडेल म्हणून प्रतिसाद द्यायचा राहून गेला. आणखी एक शंका आहे.. "गे" हे अक्षर गवळणीत येतं आहे..त्याचा काय अर्थ आहे ?
किरण, बहुतेक तिथे 'बालके' हा
किरण,
बहुतेक तिथे 'बालके' हा शब्द असल्याने अर्थबोध नीट होत नसावा.
मी संपूर्ण गवळण अशी वाचली
पहिल्या चार ओळीत गोपी कान्ह्याची तक्रार यशोदेकडे करताहेत.
त्यानंतरच्या कडव्यात (बालके पासून पुढे) यशोदा गोपींना सांगतेय, त्याला शिक्षा मिळेलच (सजा ही गुन्ह्याची मधून मला उमगलेला हा अर्थ आहे)
आणि शेवटच्या दोन कडव्यात कान्हा तो खडा मारून घडा का फोडतो याची कारणे सांगताना यशोदेला 'तू गोपींची वकिली का करतेस'? असा प्रश्न विचारतो आहे.
बाकी अजून स्पष्ट विभाग्रजजी सांगू शकतील.
गे हा शब्द स्त्रीला संबोधनार्थ म्हणून वापरला जातो.
उदा. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे
बालके रडता का तुम्ही
बालके रडता का तुम्ही तुमची
सोडता काचोळी गे,
पाडसा गाईच्या दुर्मूख का गे
मातेची आचोळी गे,>>>>कान्हाची तक्रार घेउन गौळणी आल्या आहेत की हा आमची दह्यादुधाची मडकी फोडतो,त्यावेळी कान्हा मातेला आणि इतर स्त्रिय्याना सांगतो तुमची बालके(मुले)भुकेने रडत असतात त्यावेळी तुम्ही तुमच्या चोळिची(ब्लाउज्)गाठ सोडता आणि त्याना दुध पाजता,मग गाईच्या पाडसाना भुक लागत असताना तुम्ही गाईचे दुध बाजारात का विकता,त्याना त्यांच्या आईच्या दुधापासुन वंचित(दुर्मूख) का ठेवता.
चैत्यनजीनी सांगितल्याप्रमाने गे हा शब्द स्त्रिय्याना संबोधनार्थ वापारला जातो.त्यामुळे काव्याची गेयता वाढली गेली.
खुप खुप आभार किरणजी.
सुरेखाजी,चैत्यनजी खुपच आभारी आहे.
बालके रडताना तुम्ही तुमची
बालके रडताना तुम्ही तुमची >>>
असा बदल योग्य वाटेल का ?
बालके रडताना तुम्ही तुमची असा
बालके रडताना तुम्ही तुमची
असा बदल योग्य वाटेल का ?>>>>>
योग्य वाटतो, बदल केला आहे,धन्यवाद.
अतिसुंदर गवळण. माफ करा. अजून
अतिसुंदर गवळण.
माफ करा. अजून या बदलांना अंगवळणी पाडणे शक्य झालेले नाही. म्हणून प्रतिसादाला उशीर झाला.
प्रद्युम्न्जी आभार.
प्रद्युम्न्जी आभार.
छान आहे. चालीत म्हणायचा
छान आहे. चालीत म्हणायचा प्रयत्न केल्यावर आणाखी छान वाटते.
खरं आहे जोशी साहेब्,तिला
खरं आहे जोशी साहेब्,तिला सुंदर चाल लागते.
धन्यवाद.