प्रॉमिस

Submitted by जाई. on 18 August, 2011 - 03:00

कर्रर्र

जोसेफविलामधिल घराची बेल वाजली. "शेखर आजगावकर" अशी पाटी लावल्येल्या घराचा दरवाजा उघडला.

''काय आज उशीर?" अंजलीने शेखरच्या हातातील बॅग घेत विचारले.
''हो, अग त्या स्मिथ अ‍ॅन्ड असोसिएट्च्या अ‍ॅनालिसिसच काम आलं.ड्योक्याचा पार पिट्टा पडला.संपता संपतच नव्ह्त. त्यात या पावसाने वैताग आणलाय.लींक रोडवरुन यायच म्ह्नजे आणखि ताप.

"बरं! तू फ्रेश हो तेवढ्यात मी पानं घेतेच"

"ठिक आहे. यश कुठय?"

"उद्या ओबेरौयला जायचय ना? होमवर्क करतोय"

"एरवी कंटाळा अभ्यासाचा. पण आता ओबेरौय म्ह्ट्ल की लगेच तयार!"

"हो ना सगळ्या मित्राना सांगूनसुधा झालय"

"छान. पण आता उदयाच्या वेळेच काय?"

"का? ''

''अगं मघाशीच म्ह्ट्लना त्या स्मिथच काम आलय''

''मग आता उद्याचा प्लान कॅन्सल? ''

''छे ग! कॅन्सल कशाला जमवतो कसतरि''

''बघ तु आणि तो काय ते. ही मुलं कशाचा पण हट्ट धरतात.तो मोहित जाउन आला
तर ह्याला पण जायला हवं.''

''जाउ दे आता त्याला सांगितलय तर जाउन येउ.तसही ओबेरौय पाच मिनिटावर आहे जयप्रकाशपासून.''

''तुझ्या या लाडानेच यश शेफारत चाललय.''

''बाबा अभ्यास झाला.उद्याच पक्कं ना?'' घाईघाईने हातातल काम संपवुन यश हॉलमधे आला. आई ऊद्याचा प्लान कॅन्सल करेल या भीतीने

''येस माय सन टुमॉरो वी विल हॅव ग्रेट फन!''

''याहु! ''यशने जागीच उडी मारली

''चला आता जेवायाला'' अंजलीने यशच्या उत्साहाला आवर घातला.

जेवण झाल्यानंतर अंजली आवराआवर करु लागली. शेखरने लॅपटॉप ओपन केला.

''यश तो टीव्हीचा आवाज कमी कर. फोन वाजतोय. बाबाना नेउन दे.'' अंजली किचनमधुन ओरडली.

''हं मग कुणाचा फोन होता?'' टॉवेलला हात पुसत अंजलीने विचारले.

''मेघाताईचा.दिल्लीवरुन.'' शेखरने उत्तर दिले

'मेघाच नाव एकताच अंजलीच्या कपाळावर आठया उमटल्या.शेखरच्य्रा नजरेतून ते सुटलं नाही.

''जाउ दे गं. आपण प्रॉमिस केलय तिला.''

''काय प्रॉमिस केलय? हे सगल तुझ्या भीड्स्त स्वभावामूळे होतय''

''कसला भीडस्त स्वभाव? अग मी सोनलकडे बघुन बोललो.''

''हे बघ मला सोनलचा काहीच प्रॉब्लेम नाही.तिचा काय संबंध? प्रश्न आहे तो मेघाताईचा. येता जात आपल्या श्रीमंतीचा तोरा मिरवायचा.समोरच्याला लागेलस बोलायच.''

''हे बघ सोनलला आयआयटीत अ‍ॅडमिशन मिळालीय ईकडच्या. मेघाताईला आपण सांगितलयना तिची सोय करणार म्हणून. आणि त्यातून सोनलची आणि यशच चागल जमतं. हॉस्टेलपेक्षा घर सोयीच म्हणून मेघाताईने आपल्याकडे शब्द टाकला.''

''सोनलला ईजिनीअरिंग करायच म्हणून आता आपली आठवण. नाहीतर आपण कसे हायक्लास आणि बाकी सगळे मिडलक्लास.'' अंजली फणकार्याने म्हणाली.

''जाउ दे. आता तिला प्रॉमिस केल्यावर नाही म्हणणं योग्य नाही. तीनचार वर्षाचाच प्रश्न आहे.त्यातुन मेघाताई सोनलचा राहण्याचा खर्च देणारेय.''

''हेच ते मला त्यांच आवडत नाही.पैसे दिले कि झाल,फार मोठं काम केल अस वागतात. शोबाजी नुसती.''

''हं! मेघाताई, सोनल, सुधीरराव उदद्या दुपारच्या फ्लाईट्ने मुंबईत येतायेत. फ्लाईट ईथे तीनपर्यत पोचेल. घरी यायला चार वाजतील्.तू आठल्यांकडे चावी देउन ठेव. तु उदद्या किती वाजता फ्री होशील?''

''उद्या शेवटच प्रक्टीकल पावणेतीनपर्यत संपेल. माटुगा ते गोरेगाव अर्धातास जाईल ट्रेनने.पावणेचार होतील यायला.''

''ठीक आहे.''

''तुझ्या आणि यशच्या प्लानच काय? उद्या कस जाणार तुम्ही दोघं? मला काही जमणार नाही.''

''यशचा क्लास सुटेल पाचला. मी ऑफिसमधुन लवकरच निघेन्.त्याला क्लासवरुन घेईन मग तसच डायरेक्ट ओबेरौयला जाउ.''

''अम्म्म ठीक तसच करा''

''ए मम्मी तो स्पायडरमॅनचा टीशर्ट काढून ठेव्.उद्या घालयचाय मला.''

''अजून झोपला नाहीस का? उद्या शाळेत जायचना.''अंजलीने यशला दटावले.

घड्याळ्याने चारचे टोले दिले.शट डाउनवर क्लिक करुन शेखरने लॅपटॉप बंद केला.
मघाशीच अंजलीचा फोन आलाय. ताई पोचली घरी.
आता निघु.विक्रोळी ते गोरेगाव अर्धापाउण तास लागेल्.यशचा क्लास सुटण्याआधी पोचायला हव. शेखरने विचार केला.
थोड्याच वेळात त्याने लिंकरोडला गाडी घेतली. ट्रॅफिक होतच नेहमीप्रमाणे. त्यात जागोजागी असणारे खड्डे. वैताग नुसता. पावसाची रिपरिप जोडीला.

आयाआयटी मागे पडताच ट्रॅफिक थोड कमी झालं. शेखरने सुटकेचा निश्वास टाकला.चला आता गाडीला स्पीड घ्यायला हरकत नाही. पोहोचू आता.
"होशवालोको खबर क्या" जगजीतसिंगची गझल लावून त्याने गाडीचा स्पीड वाढवला.लिंकरोडवर गाड्या सटासट जात होत्या. स्विफ्ट, ओम्नी, सॅन्र्टो, रिक्षा, ट्रक, रॉकेल वाहणार्या बैलगाड्यासुधा.खरच या मुबईत प्रत्येकाला जागा आहे.मुंबई नगरी बडी बांका...
तेवढ्यात लेफ्टसाईड्ने आलेल्या ट्रकला चुकवण्यासाठी त्याने जोरात ब्रेक मारला. क्षणभर त्याला गरगरायाला झालं.डोळ्यासमोर अंधार पसरला...

पाचच मिनिटात शेखरने स्वतला सावरले.ट्र्कवाल्याला एक शिवी हासडून तो पुढे नीघाला.गाडीचा वेग वाढ्वून तो वीस मिनिटात क्लाससमोर आलासुधा.

''बाबा! याहू'' शेखर दिसताच यशने आनंदाने ऊडी मारली.

"आताच सोड्ल सरानी. मोहितला सांगितलय मी आपाण जाणार ते.खुप शाईनीग मारतो. शोबाजी नुसती."
लेकाच्या तोडची ही मुक्ताफळे ऐकुन शेखरला हसु आवरेना.

"ठीक आहे. बस आता गाडीत नाहीतर उशीर होईल"

एक सफाईदार वळण घेउन त्याने गाडी हायवेला घेतली.पाच मिनिटात ते ओबेरौयला पोचले.

''आलो आपण! बाबा चलना लवकर""

''अरे हो हो गाडी पार्क करायला नको का ? मग प्रॉब्लेम होतो.''

गाडि पार्क केल्यावर यश धावतच गेम्स सेक्शनकडे गेला.

''बाबा येताना ते कॉईन्स घेउन या '' स्कुटीवर बसता बसता यश ओरडला

भरपुर गेम्स खेळल्यानंतर यशलापोटात कावळे ओरडत असल्याची जाणीव झाली.पिझ्झा,सॉफ्टी,कोकवर त्याने यथेछ ताव मारला.

''चला आता घरी. झालंना समाधान.उशीर होतोय्. आई रागावेल. सोनलताई वाट बघत असेल.''

''काय मग! आज अगदी जीवाची मुंबई केलीसना. दोन तास मज्जा केलीस. .'' गाडीत बसताना शेखरने विचारलं

''येस आता मोहितला सांगेन कि मी किती मज्जा केली ते.जास्तच हुशारी दाखवतो''
.
''हो हो.आता जरा व्यवस्थित बस. आणि ती चॉ़कलेट सांभाळ नीट. अर्धी सोनलला दे,''

''थॅक्स बाबा.''

''कशाबद्द्ल?''

''फॉर कीपिग प्रॉमिस''

'''वेल माय सन आय ऑलवेज कीप माय प्रॉमिसेस'''
.

''काय रे प्रसाद कुठेय?'' धावतधावत जीने चढण्यार्या यशला आठल्यांनी विचारले.

''प्रसाददादा मला काय माहीत?''

''अरे प्रसाद गेला होता ना तुला क्लासवरुन आणयला?''

''प्रसाददादा कुठे! मी आणि बाबा गेलेलो ओबेरौयला. बाबा आले होते मला घ्यायला.''

''काय?''

''हो ना आम्हीना खुप मजा केलिय. सोनलताई आलीय ना आमच्याकडे?
तिला पण सांगायचिय गंमत''

''ठीक ठीक जा जा घरी.'' आठ्ले अडखळ्त म्हणाले

''च्च च्च फार वाईट झाल नाही.!''

''हो ना ऐकुन धक्काच बसला अगदी''

''पण मी म्हणते अस कस झाल एकदम?''

''अहो ट्रकने उड्वलय लिंकरोडवर. या ट्रकवाल्याना तर शिस्तच नाहीये.कसेही चालवतात. गाडी सरळ चेपलीच गेली ट्रकखाली.गॅसकटर बोलवावा लागला.गाडी कापून काढली तेव्हाच बॉडी बाहेर काढता आली.पूर्ण चेंदामेदा झालाय बॉडीचा.त्यात पाउस आणाखी.
आयकार्ड्वरुन ओळ्ख पट्ली.दोन तास लागले या सगळ्याला.कसा वाचणार जीव? आपल्याकड्चा कारभार हा असलाच भोंगळ.''

''मग अंजूला कस कळल?''

''फोन आला होता पोलिसांचा पंधरा मिनिटापूर्वी. अंजूतर बेशुध पड्ली होती.मेघा आलीये म्हणून बरं. नाहितर कोणालाच कळल नसत्. तिनेच पाठवलय प्रसाद्ला यशला आणायला.सुधीर, शिंदे, डिसोजा हॉस्पिटलला गेलेत''

''पण फार वाईट झाल नाही.! किती छान मुलगा होता.सगळ्याना मदत करायला पुढे!''

''हो ना फार वाईट झाल''

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मला कळली... आणि अश्या स्वरूपाची पूर्वी मायबोलीवर एक कथा आली होती बहुतेक.

डॅश लाईन देउन एक एक प्रसंग लिहा...(एकत्र निट जमला नाहीय)

प्रसाद कोण आहे...? हे पटकन कळत नाहीय.....

(शेखरच्या आत्म्याने येउन आपल्या मुलाला(यशला) दिलेले प्रॉमिस पुर्ण केले आणि त्याच कारने (घरांत्/दारापर्यंत घराजवळ कुठे? आणुन सोडले याचा उल्लेख नाही) सोडले. हेच चित्रण अपेक्षित आहे ना? :अओ:)

शेखर यशच्या समोरुन कसा अदृश्य झाला/कुठे गेला..?

अश्या स्वरूपाची पूर्वी मायबोलीवर एक कथा आली होती बहुतेक.>> खुप आहेत. त्यात मामीचीच एक "जबरदस्त" कथा आहे. Happy

सहज लिहिण्याच्या प्रयत्नांत थोडीशी निसटली. चातकांनी वरती लिहिलंय, मी तेच गृहीत धरलं.
चांगला प्रयत्न Happy 'पाचंच मिनिटांत' हे जरा खटकलं, कारण पाच मिनिटं खूप होतात गाडी सावरायला, त्यामुळे कथा उलगडायलाही तेवढा वेळ लागला नाही.

भाग्यश्री अमित,vinayakparanjpe,प्राजक्ता_शिरीन,चातक,Harshalc, मामी, तृष्णा ,सुनिधी, मनस्विता, तसेच सर्व मायबोलीकरांचे प्रतिसादाबद्दल आभार.