निसर्गाच देणं ६) गुंज

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 November, 2010 - 02:35

गुंजेची वेल पावसाळ्यात उगवते. ह्याची पाने चिंचेसारखी असतात. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये गुंजेला फुल येतात. ही फुले फिक्कट गुलाबी रंगांची असतात.

Gunj.JPG

फुलांना नंतर शेंगा येतात. कोवळ्या शेंगा दिसायला छान वाटतात.
Gunj1.JPGGunj2.JPG

ह्या शेंगा ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये सुकुन फुटतात आणि त्यातुन शेंदरी-काळे असे मोत्यासारखे गोंडस गुंज बाहेर पडतात.
Gunj3.JPG

लहान असताना हे गुंज साठवायची खुप हौस होती. कारण ऐकल होत की हे गुंज डोळे बनवायला, चिकटवुन डिझाईन करायला उपयोगी येतात. पण मला गोळा करुन ठेवायला आवडायचे.

गुंजेचा पाला बाजारात मिळणार्‍या सुगंधी गोड बडीशेपमध्ये आढळतो. झाडावरचा हा पाला खाल्ला की मिंटसारखा वाटतो. खोकल्यावर हा पाला उपयोगी पडतो असे म्हणतात. आमच्या गड्याने तर हे गुंज डोळ्यात घालुन फिरवुन डोळे साफ करतात असा भयानक प्रकारही सांगितला. खात्री पटल्याशिवाय करु नका हो. मी पण नाही केला आधीच माबोबर दिवसभर बसुन डोळे कामातुन गेलेत.
जाणकार अजुन सांगतीलच.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुंजेची वेल असते काय?? नॅ.पार्कमध्ये एका झाडाखाली गुंजा पडलेल्या दिसल्या. वर पाहिले तर गुंजेच्या शेंगा लटकत होत्या.

आधीच माबोबर दिवसभर बसुन डोळे कामातुन गेलेत.
ह्म्म्म... अगदी खरेय..... Sad

हि फुले खरेच सुंदर दिसतात. यापेक्षा वेगळी गुंज असते, तिचे झाड असते. मुंबईत बरीच झाडे आहे हिची (दादर टिटी, महपौर निवासचा बसस्टॉप, मलबार हिल, विल्सन कॉलेजजवळ ) तिला पिवळी फूले येतात. त्या गुंजा, उडत्या तबकडीच्या आकाराच्या असतात. पुर्वी वजनासाठी या गुंजा, भार म्हणून वापरत असत.

<<गुंजेचा पाला बाजारात मिळणार्‍या सुगंधी गोड बडीशेपमध्ये आढळतो.>> अच्छा.. त्याचे झाड का हे मस्त निदान बघायला तरी मिळाले. शेंगा मस्तच
<<आधीच माबोबर दिवसभर बसुन डोळे कामातुन गेलेत.>> हे मात्र १०० % खरे., Happy

दिनेश बरोबर. मी नॅपामध्ये पाहिलेल्या गुंजा शेंदरी लाल रंगाच्या आणि टोकाला जरासा काळा रंग अशा होत्या. या वेलगुंजा अर्ध्या लाल शेंदरी आणि अर्ध्या काळ्या आहेत. ही वरची गुंज घेवडा, पावटे , फरसबी या जातीतली दिसतेय Happy फुलांची रचना अगदी सारखी आहे.

पानात गुंजेचा पाला वापरतात हे मी बरेचदा ऐकलेय, पण पान खाताना पानवाला तो पाला घालायला लागला की मला तो नेहमी चिंचेचा पाला वाटतो Happy

दिनेशदा, साधना मी अजुन गुंजेचे झाड नाही पाहीलेले. गुंजा भार म्हणुन वापरायचे हे मी ऐकलय.

?

आधीच माबोबर दिवसभर बसुन डोळे कामातुन गेलेत.
जाणकार अजुन सांगतीलच.

जागु ,
यावर मग या "गुंजेचा" उपाय केला तर चालेल का ?
Lol

धन्स ग जागू. तुझ्यामुळे हे सगळे निदान फोटोतुन बघायला मिळते. शाळेत असताना रविवारी गुंजा गोळा करायला गावाबाहेर नेहमी भटकणे व्हायचे.

जागू, मी पण झाडच पाहिलंय. लहाणपणी आम्हीही गुंज डोळ्यांतून फिरवायचो. कशासाठी काय माहीत. कदाचित दुसरा करतोय, मग आपण पण करा. त्याने काही अपाय झाला नाही, कारण गुंज अतिशय गुळगुळीत असते. गुंजेचा पाला चवीला अतिशय रुचकर असतो. आजारपणात तोंडाला चव येण्यासाठी या पाल्याइतकी चघळायला चांगली गोष्ट मला तरी माहीत नाही.

जागू, फोटो छानच. माझ्याकडे आहेत दोन गुंजा. ३/४ वर्ष्यापुर्वी कोकणात गेले होते. तेव्हा माझ्या काकूने मला दिल्या.

डॉ. बर झाल सांगितलत्.म्हणजे लहान मुलांच्या हातात पडल्या नाही पाहीजेत अश्या ठेवायला हव्यात.
शोभा धन्स.

फोटो आणि माहिती मस्त... Happy
दिनेशदा, चपट्या गुंजांचा फोटो असेल तर टाका ना.. उत्सुकता आहे.. Happy

>>>>लहाणपणी आम्हीही गुंज डोळ्यांतून फिरवायचो. कशासाठी काय माहीत. कदाचित दुसरा करतोय, मग आपण पण करा. त्याने काही अपाय झाला नाही, कारण गुंज अतिशय गुळगुळीत असते. गुंजेचा पाला चवीला अतिशय रुचकर असतो. आजारपणात तोंडाला चव येण्यासाठी या पाल्याइतकी चघळायला चांगली गोष्ट मला तरी माहीत नाही.

>>>> अगदी अगदी..

आमच्या गावाला गुंजेची भरपूर झाडं आहेत.. बाबांनी ही पोस्ट बघितल्यावर ते म्हणाले की ते आणि त्यांचे गुराखी मित्र १४- १५ वर्षांचे असताना (साधारण ३०- ३५ वर्षांपूर्वी ---- सांगायचं कारण म्हणजे तुम्हाला नेमका काळ कळावा ) एकावेळी ३ - ४ गुंजा डोळ्यात घालयचे... म्हणजेच एका कोप-यातून घालून दुस-या कोप-यातून काढायचे... Uhoh

जागूतै, या गुंजा ओल्या असताना किंवा त्या भिजवून नरम झाल्यावर त्यांची माळ करतात...

पलक, झुझी आमचा गडी सांगत होता की ह्या गुंजा डोळ्यांत फिरवल्याने डोळे साफ होतात व ह्याचा पाला खाल्याने खोकल्याला आराम मिळतो. रेडीमेड बडीशेपमध्ये जो पाला असतो तो गुंजेचाच असतो बहुतेक.

नलिनी नाही त्या पारंगा/पारिंग्याच्या बिया.

त्या बिया गुंजेपेक्षा बर्‍याच मोठ्याही असतात. साधारण बोटाच्या पेर्‍याएवढ्या. दोन प्रकारच्या असतात ना? एक करड्या रंगाच्या आणि दुसर्‍या तांबड्या.

डोळ्यांत काय फीरवनार डोळ्या॑चे माबो वर फीरुन बटाटे झालेत...
पण माहीती दील्या बद्द्ल धन्यवाद.