![lemon rice](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2020/10/25/lemonrice4.jpg)
२ वाट्या तांदूळ
१ वाटी खवलेला ओला नारळ
३ मोठी लिंबे (परदेशातले लोक १ साधे लिंबू/ रस आणि २ मोठी लांबुडकी कमी आंबट असलेली हिरवी लिंबे असे घेऊ शकतात)
अर्धी मूठ भाजलेले शेंगदाणे (किंवा आवडीप्रमाणे)
भरपूर कोथिंबीर
हिरव्या मिरच्या
लाल सुक्या मिरच्या
चमचाभर उडदाची डाळ (धुतलेली, ओलसर)
किसलेले आले, कढीलिंबं (कढीपत्ता)
पाणी
फोडणीसाठी - तेल, जिरं, मोहरी, हळद, हिंग
हि तयारी
ही पाकृ मी करते तशी लिहितेय. जाणकार, सुगरणींची वेगळी असू शकते.
अंदाजाप्रमाणे मीठ घालून भात शिजत टाकायचा. मोकळा शिजला पाहिजे. शिजेतो फोडण्या करून घेणे.
फोडणी १ - हिरवी फोडणी
तेल तापल्यावर मोहरी, जिरं, हळद, हिंग नेहमीप्रमाणे. मोहरी तडतडली की मग हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, किसलेले आले त्यातच घालणे. गॅस बंद करणे. एकुणातला अर्धा नारळ, चिरलेली कोथिंबीर यातच घालणे. वरून अर्धे लिंबू पिळणे आणि सारखे करणे.
फोडणी २ - लाल फोडणी
तेल तापल्यावर मोहरी, जिरं, हळद, हिंग नेहमीप्रमाणे. मोहरी तडतडली की मग लाल सुक्या मिरच्या, धुतलेली उडद डाळ आणि शेंगदाणे घालायचे. गॅस बंद. नारळ आणि अर्धे लिंबू वरून. सारखे करायचे.
या फोडण्या
शिजलेल्या भाताचे दोन भाग करून एकेक फोडणी एकेका भागावर ओतून व्यवस्थित मिक्स करून घायचे. याच वेळेला मीठाचा अंदाज घेऊन गरज असल्यास अजून मीठ पण घालायचे.
आता उरलेल्या लिंबांच्या (किंवा हिरव्या लांबुडक्या लिंबांच्या) चकत्या कापून घ्यायच्या.
सर्व्हिंगच्या भांड्यात हिरवी फोडणीवाल्या भाताचा एक थर - लिंबाच्या एकदोन चकत्या - लाल फोडणीवाल्या भाताचा एक थर - लिंबाच्या एकदोन चकत्या असं भरत जायचं. थर लावून झाले की वरती गार्निशसाठी म्हणून लिंबाच्या चकत्या ठेवायच्या. आणि हे भांडे वाफेत ठेवायचे (स्टीलचे असल्यास गॅस बंद केलेल्या कुकरात, इलेक्ट्रिक राइस कुकरचे भांडे असल्यास कीप वॉर्म सेटींगवर, मावेत चालेल असे सर्व्हिंग भाडे असल्यास १ मिन फिरवून तसेच आत ठेवायचे.) खायच्या वेळेपर्यंत. तोवर लिंबाच्या चकत्यांच्यातून लिंबाचा स्वाद बरोबर उतरतो.
थर मला पण छान जमलेले नाहीत. पण तुका म्हणे त्यातल्या त्यात.
वाढताना सगळे लेयर्स येतील असा वाढावा. लेमन राईसाबरोबर रस्सम किंवा टॉमेटोचे सार सुंदर लागते.
यालाच चित्रान्न म्हणतात का तर माहित नाही. असू शकेल.
६० प्रतिक्रीया वाचून वाटलं की
६० प्रतिक्रीया वाचून वाटलं की इथे(पण) रुसवे फुगवे सुरु आहेत की काय..हुश्श
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
आंबटशौकीनांना आवडेल नक्कीच हा भात
अरे वा!!! मस्तचं रेसिपी.
अरे वा!!! मस्तचं रेसिपी. लिंबांच्या चकत्याची आयडिया मस्तचं.
मला लेमन राईस खूप आवडतो पण नेहमी करायला गेलं कि आपला मराठी फोडणीचा भात व्ह्यायचा आणी कळायचच नाही कि काय चुकतयं. चव पण लेमन राईस साऱखी यायची नाही.
आता कळालं कि भात फोडणी ला न घालता, फोडणी भातात घालायची.
आज केला होता हा भात, बरोबर
आज केला होता हा भात, बरोबर रस्सम. रस्सम हुकुमी एक्का आहे पण भात छानच झाला होता. वेळेअभावी फोटो नाही काढला.
रेसिपीबद्दल धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेयर्सने मजा येते ना?
लेयर्सने मजा येते ना?
काल स्वातीस्टाईल नारळीभात
काल स्वातीस्टाईल नारळीभात केला. आज उरलेल्या ओल्या खोबर्याचा लेमन राईस करणार विथ लिंबाच्या चकत्या, वेगवेगळ्या फोडण्या आणि लेयर्स. चव जमली तर आभाराचा एसेमेस करणेत येईल.
शर्मिला, बरोबर रस्सम किंवा
शर्मिला, बरोबर रस्सम किंवा टॉ.चं सार जमव. फक्कड होईल मग.
जोरात आहे लेमन राईस सोबत
जोरात आहे लेमन राईस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सोबत रस्सम किंवा टॉमेटो सार म्हणजे सगळं आंबट चिंबट जेवण आहे म्हणायचं. सोबत चव पालटीसाठी काय घेता येईल?
सोबत चव पालटीसाठी काय घेता
सोबत चव पालटीसाठी काय घेता येईल?>>>>>> घट्ट दह्यातली गोडसर चवीची कोशिंबीर चांगली लागेल असं मला वाटतंय किंवा सौम्य चवीचे पालक सूप.
थँक्स मंजू. नुसतंच आंबट
थँक्स मंजू. नुसतंच आंबट खाल्लं की माझा घसा धरतो.
मी केला. एकदम मस्त. लिंबाची
मी केला. एकदम मस्त. लिंबाची चव मस्त आली.
पण भात खूपच मोकळा झाला. फडफडीत म्हणता येईल असा. की असेच अपेक्षित आहे?
फडफडीतला १ पायरी कमी असा
फडफडीतला १ पायरी कमी असा अपेक्षित आहे पण माझ्या मातेने काय अगदीच फडफडीत असे त्याचे वर्णन केले होते.. तेव्हा तुझं काही गंडलं नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चव पालटीसाठी सांडग्याच्या मिरच्या तळून वरून चुरणे, पापड बरोबर घेणे, दही घेणे असं करता येईल.
केश्वे, सौदिंडियन पदार्थ असल्याने आंबटपणाला पर्याय नाही. पण लेमन राइस असला तरी आंबटढाण भात नसतो हा. आणि रस्सम चिंचेच्या कोळावरचं असलं तरी तू ते झणझणीत करू शकतेस, चिंच कमी करू शकतेस.
हो ना केलेल्यांनो आडो, पौर्णिमा?
मी साबांजवळ हा प्रयोग करुन
मी साबांजवळ हा प्रयोग करुन बघणार. त्यांना आंबट खूप आवडतं.
पूनम, भात नुसताच शिजवून
पूनम, भात नुसताच शिजवून घेण्यापेक्षा तांदूळ धुवून तुपात परतून आधणाचं पाणी घालून शिजवून घेतले तर फडफडीत होणार नाही असं मला वाटतं.
माझा भात फडफडीत नाही पण मोकळा
माझा भात फडफडीत नाही पण मोकळा झाला होता, पुलावासारखा. तोही नी म्हणते तसं आंबटढाण वै नव्हता झालेला.
हो अश्विनी, झणझणीत खाऊ शकत असशील तर तसं कर रस्सम किंवा नंदिनीला विचार पेपर रस्समची कृती.
हो, इतका आंबटढाण नाही लागत,
हो, इतका आंबटढाण नाही लागत, लिंबाची सुरेख चव येते.
मन्जू, मी कूकरात नाही, आधणाचं पाणी घालून थेट शिजवला भात. बरोब्बर दुप्पट पाणी. पण अशाने भात मोकळाच होणे अपेक्षित असते ना? हा मोकळ्याच्याही पुढचा झाला. तांदूळ जुना आहे, बहुधा पाणी जास्त लागेल. आता नारळीभात करणार आहे. त्याला घालते जास्त पाणी जरा.
धन्स नी... मी काल बनवला लिंबू
धन्स नी...
मी काल बनवला लिंबू भात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फक्त ओला नारळ available नसल्याले घातला नाही
छान झालेला माझ्या पप्पानां खुप आवडेश!!!!!!
अगं पण ओल्या नारळातच गंमत
अगं पण ओल्या नारळातच गंमत आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुढच्या वेळेला ओल्या नारळासकट करून बघ. तोही आवडेल त्यांना.
आज केला मी लिंबू भात या
आज केला मी लिंबू भात या पद्धतीने. लिंबाचा सालींचा सौम्य आणि छान फ्लेव्हर उतरलाय. फोडण्याही छान दिसताहेत. सोबत आख्क्या मसुराची झणझणीत गरम मसाल्याची आमटी केली होती. मस्त लागलं कॉम्बो.
next time लिंबू भात with ओला
next time लिंबू भात with ओला नारळ...
नक्की!!!
नेमकी मी पुण्यात असताना केलास
नेमकी मी पुण्यात असताना केलास ना शर्मिला. मुंबईत असते तर मी आले असते तुझ्या घरापर्यंतचा प्रवास करून.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अग परत करु ना. राईसकुकरमुळे
अग परत करु ना. राईसकुकरमुळे मस्त मॉईस्ट राहीला होता. मी आंबेमोहोरचा केला.
अरे फोटो टाका रे....
अरे फोटो टाका रे....
मी दोन्हीचा केलेलाय आणि मला
मी दोन्हीचा केलेलाय आणि मला दोन्ही मस्त वाटले होते. राइस कुकरमधे एकदम मस्त रहातो.
मुंबईला परतले की मी करेन आणि
मुंबईला परतले की मी करेन आणि काचेच्या भांड्यात लेयर्सचे फोटु टाकेन ओक्के..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छ्या... एव्हढ्या पोस्टी पण
छ्या... एव्हढ्या पोस्टी पण एकही फोटु नाही....![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
नी रेसिपी आवडेश
करुन बघण्यात येइल ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केला केला आज हा भात केला
केला केला आज हा भात केला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लागतोय.
पण ओला नारळ, कोथिंबिर मिळण्याचा स्कोप नसल्याने तसाच केला.
सावली, ओला नारळ मिळणार नाही
सावली, ओला नारळ मिळणार नाही बरोबर. अगं डेसिकेटेड कोकोनट १०-१५ मि. दूधात भिजवला की अगदी ओल्या नारळासारखा होतो.
आडो, तशीच कोथिंबीर पण मिळते
आडो, तशीच कोथिंबीर पण मिळते बहुतेक... पाण्यात भिजवली की झाली तयार![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेमन राईस केला होता पण इतक्या
लेमन राईस केला होता पण इतक्या छान पद्धतीने नाही. आता ही पद्धत उचलणार पुढच्या वेळेपासून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शँक्या, लेमन राईस मिळतो काय
शँक्या, लेमन राईस मिळतो काय तसा? पाण्यात भिजवला की तय्यार![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
Pages