२ वाट्या तांदूळ
१ वाटी खवलेला ओला नारळ
३ मोठी लिंबे (परदेशातले लोक १ साधे लिंबू/ रस आणि २ मोठी लांबुडकी कमी आंबट असलेली हिरवी लिंबे असे घेऊ शकतात)
अर्धी मूठ भाजलेले शेंगदाणे (किंवा आवडीप्रमाणे)
भरपूर कोथिंबीर
हिरव्या मिरच्या
लाल सुक्या मिरच्या
चमचाभर उडदाची डाळ (धुतलेली, ओलसर)
किसलेले आले, कढीलिंबं (कढीपत्ता)
पाणी
फोडणीसाठी - तेल, जिरं, मोहरी, हळद, हिंग
हि तयारी
ही पाकृ मी करते तशी लिहितेय. जाणकार, सुगरणींची वेगळी असू शकते.
अंदाजाप्रमाणे मीठ घालून भात शिजत टाकायचा. मोकळा शिजला पाहिजे. शिजेतो फोडण्या करून घेणे.
फोडणी १ - हिरवी फोडणी
तेल तापल्यावर मोहरी, जिरं, हळद, हिंग नेहमीप्रमाणे. मोहरी तडतडली की मग हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, किसलेले आले त्यातच घालणे. गॅस बंद करणे. एकुणातला अर्धा नारळ, चिरलेली कोथिंबीर यातच घालणे. वरून अर्धे लिंबू पिळणे आणि सारखे करणे.
फोडणी २ - लाल फोडणी
तेल तापल्यावर मोहरी, जिरं, हळद, हिंग नेहमीप्रमाणे. मोहरी तडतडली की मग लाल सुक्या मिरच्या, धुतलेली उडद डाळ आणि शेंगदाणे घालायचे. गॅस बंद. नारळ आणि अर्धे लिंबू वरून. सारखे करायचे.
या फोडण्या
शिजलेल्या भाताचे दोन भाग करून एकेक फोडणी एकेका भागावर ओतून व्यवस्थित मिक्स करून घायचे. याच वेळेला मीठाचा अंदाज घेऊन गरज असल्यास अजून मीठ पण घालायचे.
आता उरलेल्या लिंबांच्या (किंवा हिरव्या लांबुडक्या लिंबांच्या) चकत्या कापून घ्यायच्या.
सर्व्हिंगच्या भांड्यात हिरवी फोडणीवाल्या भाताचा एक थर - लिंबाच्या एकदोन चकत्या - लाल फोडणीवाल्या भाताचा एक थर - लिंबाच्या एकदोन चकत्या असं भरत जायचं. थर लावून झाले की वरती गार्निशसाठी म्हणून लिंबाच्या चकत्या ठेवायच्या. आणि हे भांडे वाफेत ठेवायचे (स्टीलचे असल्यास गॅस बंद केलेल्या कुकरात, इलेक्ट्रिक राइस कुकरचे भांडे असल्यास कीप वॉर्म सेटींगवर, मावेत चालेल असे सर्व्हिंग भाडे असल्यास १ मिन फिरवून तसेच आत ठेवायचे.) खायच्या वेळेपर्यंत. तोवर लिंबाच्या चकत्यांच्यातून लिंबाचा स्वाद बरोबर उतरतो.
थर मला पण छान जमलेले नाहीत. पण तुका म्हणे त्यातल्या त्यात.
वाढताना सगळे लेयर्स येतील असा वाढावा. लेमन राईसाबरोबर रस्सम किंवा टॉमेटोचे सार सुंदर लागते.
यालाच चित्रान्न म्हणतात का तर माहित नाही. असू शकेल.
व्वा नीधप मस्त ग. फोटो का
व्वा नीधप मस्त ग. फोटो का नाही टाकलास ? अजुन मजा येईल फोटो टाकलास तर.
नी दोन्ही फोडण्यात नारळ आणि
नी दोन्ही फोडण्यात नारळ आणि लिंबू रस घालायचा आहे तो, फोडणी थंड करून की गॅस बंद करून गरम फोडणीतच?
बाकी रेसिपी एकदम इंटरेस्टींग आहे, १५ ऑगस्ट ला हा भात, ३ वेगवेगळ्या रंगाच्या फोडण्या (भारताच्या झेंड्यासारख्या) करून व खाऊन साजरा करू शकतो.
केला की टाकेन फोटो. खूप
केला की टाकेन फोटो. खूप वर्षात केला पण नाहीये.
वाह, मस्त ग
वाह, मस्त ग
यालाच चित्रान्न म्हणतात का तर
यालाच चित्रान्न म्हणतात का तर माहित नाही. असू शकेल. >>> अश्यच प्रकारच्या (लिंबाऐवजी) कैरी किसून घातलेल्या भाताला चित्रान्न म्हणतात, माझ्या माहीतीप्रमाणे.
छान आहे कृती. दोन फोडण्यांचं माहीत नव्हतं. मी हेच जिन्नस वापरुन करते, फक्त डाळं पण घालते यात. नारळ नव्हता घातला. आता असे करुन बघेन.
फोडणी थंड करून की गॅस बंद
फोडणी थंड करून की गॅस बंद करून गरम फोडणीतच?<<
अगदी थंडगार करायची नाही. गॅस बंद केल्यावर २-३ मिनिटांनी चालेल. म्हणजे नारळाला किंचित खमंगपणा येतो.
मस्त ! वेगळ्या प्रकारचा
मस्त ! वेगळ्या प्रकारचा नारळीभात म्हणुन उद्या करायला हरकत नाही
>> चित्रान्नामध्ये पंढरपुरी डाळ पण असतं
येस नी, फुटाण्याच डाळं ही
येस नी, फुटाण्याच डाळं ही अॅडीशन असते चित्रान्नात आणि कैरीचा कीस किंवा अगदीच नसला तर लिंबुरस. बाकी सगळे जिन्नस तू सांगितल्याप्रमाणेच.
दोन फोडण्यांच इण्टरेस्टींग
चित्रान्ना मधे कैरी आणि चणा
चित्रान्ना मधे कैरी आणि चणा डाळ, उडीद डाळ, मस्ट असते. कैरीचा सीझन नसताना लिंबू पिळून पण करतात पण मग चित्रान्नाची चव येत नाही.
ही कृती छान आहे. मी लेमन राईस करताना मोहरी हळद सुक्यामिरच्या आणि शेंगदाणे, कढीपत्त्याची फोडणी करते. आणि सोबत पेपर रस्सम. (तिखट तिखट आणि आंबट आंबट)
मॉस्त लागतो. आम्ही दर
मॉस्त लागतो. आम्ही दर आठवड्यात एकदा तरी करतोच. तेवढेच कोंबड्यांस्नी जीवदान. मी परातीत भात गार करून वरनं सर्व फोड्ण्या इ. मिसळते. व वाढून फस्त. चिंचेचा कोळ पण घालता येतो लिंबू नसलेच तर.
बरोबर चपटा खमंग डाळ वडा पण मस्त लागतो. पिकनिक ला पण मस्त.
सोबत पेपर रस्सम<<< हे आणि
सोबत पेपर रस्सम<<<
हे आणि साधे रस्सम (रस्सम मसाल्याच्या पाकिटावर लिहिलेल्या कृतीप्रमाणे केलेले) काही वेगळे असते का?
वाह.. मस्तच... आत उद्याच करुन
वाह.. मस्तच... आत उद्याच करुन बघेन..
रच्याकने.. चित्रान्न हा शब्द 'चित्रान्न' असा आहे की 'चैत्रान्न' असा आहे?
चित्रान्ना नी, मिरी घातलेले
चित्रान्ना
नी, मिरी घातलेले रस्सम (टामाटू न घालता
०
मी तरी लहानपणापासुन
मी तरी लहानपणापासुन चित्रान्नच ऐकलाय. कदाचित चैत्रान्नचा अपभ्रंश असु शकेल. माहित नाही.
इन्टरेस्टिंग आहे. लिंबाच्या
इन्टरेस्टिंग आहे. लिंबाच्या चकतीमधला रस हळूहळू झिरपत जाणं- हे भारी वाटतंय.
कारण कैरी आणि डाळ हे प्रकार
कारण कैरी आणि डाळ हे प्रकार बहुतेकदा चैत्रातच असतात म्हणुन विचारले..
हो लेमन राईस म्हणून नुसती
हो लेमन राईस म्हणून नुसती लिंबू वाढवले तर ते नुसतेच आंबट होते. त्या चकत्यांमधून जो स्वाद लागतो ना त्यात गंमत असते.
वा, छान आहे कृती. चकत्यांचे
वा, छान आहे कृती. चकत्यांचे माहित नव्हतं. ३ दि.च्या सुट्टीत करून पाहता येईल.
मस्त पाकृ!! नक्की करून
मस्त पाकृ!!
नक्की करून बघणार.
नी नक्की करुन पहानार बादवे
नी नक्की करुन पहानार
बादवे बिर्याणीला तांदुळ शिजवल्यावर पाणी काढुन टाअकते. तसे केले तर मस्त सुटसुटीत होइल हा भात
वर्षा, शिजवल्यावर काढून
वर्षा, शिजवल्यावर काढून टाकायला पाणी शिल्लक रहाते?
मला बिर्याणीही येत नाही त्यामुळे...
जौद्या! ढ पणा असा बाहेर येतो.
बादवे हा भात साध्या तांदुळाचाही चांगला लागतो आणि बासमतीचाही.
ओल्या नारळाला डेसिकेटेड
ओल्या नारळाला डेसिकेटेड कोकोनटचा पर्याय चालेल कां?
मस्त च..
मस्त च..
शिजवल्यावर काढून टाकायला पाणी
शिजवल्यावर काढून टाकायला पाणी शिल्लक रहाते? >> अग २ वाट्या तांदळाला ५ वाट्या टाकते. बोटाचेपा शिजला की चाळणीत ओतुन काढते. स्टार्च निघुन गेल्यामुळे भात मस्त सुट्टा होतो. अर्थात पौष्टीक नाहीच असे करणे. पण बिर्याणीच्या चवीसाठी चालते एखादवेळेस
मस्त लागेल हा भात ....
मस्त लागेल हा भात .... वेगळ्या पद्धती ने आहे... करुन बघेन नक्किच...
डेसिकेटेड कोकोनटचा << म्हणजे
डेसिकेटेड कोकोनटचा <<
म्हणजे काय?
नीधप, डेसिकेटेड कोकोनट म्हणजे
नीधप, डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुकवलेली कोकोनट पावडर
हो लक्षात आलं ते गुगलल्यावर
हो लक्षात आलं ते गुगलल्यावर पण बर्याचदा यात साखर घातलेली असते. ती नसेल तर थोडावेळ पाण्यात भिजवून फुलल्यावर वापरून बघायला हरकत नाही.
ओक्के, कारण बाकी सगळं साहित्य
ओक्के, कारण बाकी सगळं साहित्य आहे म्हणजे करून बघायला हरकत नाही.
साधाच तांदुळ बरा पडेल. बासमती
साधाच तांदुळ बरा पडेल. बासमती अति होइल. सोना मसुरी बेस्ट.
Pages