कथालेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे...मनमोकळेपणाने तुमच्या सुचना येवू द्या..!
"हर्षा काल का नाही आलीस गं?" लॅपटॉप उघडून मी ऑफिसचे करतच बसले होते, तेव्हढ्यात दरवाज्यातून आत येणाऱ्या हर्षाला मी विचारलं.
"सॉरी गं ताई, खूप काम होतं घरी म्हणून येत आलं नाही." चेहऱ्यावर असलेली निराशा क्षणभर बाजूला सारत हर्षा बोलली खरी पण तिचा चेहराच इतका बोलका कि, काहीही न सांगता मला खूप काही बोलून जायचा.
हर्षा!! एक अल्लड अनं निरागस मुलगी. उजळ वर्ण, बोलके डोळे, हसरा चेहरा आणि सतत बडबड करण्याची सवय यामुळेच कोणाच्याही लक्षात रहावी अशी. घरातून बाहेर पडल्यावर ऑफिसला जाणारया वाटेवरच तिचं घर. जाता-येता नेहमीच घराबाहेर बसलेली माझ्या दृष्टीस दिसायची. माझ्याकडे पाहून ओळखीचं हसायची, त्यातूनच मग तिची नं माझी ओळख वाढली.
"घरी आई आणि एक मोठा भाऊ आहे. वडील आमच्या लहानपणीच वारलेत. लोकांच्या घरी धुणी-भांडी करून आईनेच आम्हाला लहानाचं मोठ केलयं." काहीही आडपडदा न ठेवता हर्षा सुरवातीलाच मला सगळं सांगितलं. आई एकटीच काम करून घर चालवते आणि मोठा भाऊ फ़क़्त उनाडक्या करत हिंडतो. आणि त्याचबरोबर त्याला कसलेसे व्यसनही आहे. तीच्या बोलण्यातून मला हे सगळं कळलं.
पण का कळेना? सुरुवातीला माझ्याशी मनमोकळेपणाने वागणारी हर्षा हल्ली खूप अबोल आणि निराश दिसायची कदाचित घरातली तणावग्रस्त परिस्थिती हे कारण त्यामागे असू शकतं.
"जॉब पहा ना ताई माझ्यासाठी एखादा, नुकतीच बारावीची परीक्षा दिलीयं मी." असेच काही दिवस गेल्यावर हर्षा अनपेक्षितपणे मला बोलली आणी घरातल्या कटकटीपासून थोडा वेळ बाजूला राहता यावं हा हेतू तीच्या बोलण्यातून मला पटकन जाणवला.
"प्रयत्न करून पाहते मी." असं सांगून मी तिला तेवढ्यापुरता दिलासा दिला.
मग काही दिवसांनी आमच्याच ऑफिसमध्ये मॅनेजरला सांगून माझी मदतनीस म्हणून हर्षाची वर्णी लागली. आयुष्याच्या वाटेला एक वेगळेच वळण मिळाल्याने ती अतिशय हरखून गेलेली आणि तिच्यात पूर्वीसारखा दिसणारा मोकळेपणा मला पुन्हा दिसत होता.
'सोळावं वरीस धोक्याचं गं' म्हणतात ना त्याप्रमाणे ऑफिसातल्याच आनंद या माझ्या सहकारयाबरोबर तिचं पटकन सुत जुळलं. सुरुवातीच्या हाय, हॅल्लोच्या मैत्रीनंतर एकमेकांत कधी गुंतत गेले ते त्यांनासुद्धा कळालं नाही. दोघांचही एकमेकांवर जीवापाड प्रेम, आनंद हा स्वतःच्या नावाप्रमाणेच आलेला प्रत्येक क्षण आनंदात घालवणारा! ऑफिस सुटल्यानंतर बाईकवरून फिरायला जाणे हा तर त्यांचा नित्यक्रमच झालेला....
"ताई, आनंदने काल मला बाईक चालवायला शिकवली, खूप मजा आली." हर्षा आनंदित होऊन मला सांगते आणी मी तिच्याकडे पाहून फ़क़्त हसते. त्या क्षणी एक वेगळच समाधान मला तीच्या चेहऱ्यावर दिसलं. अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी तिने घरातल्यांपासून लपवून ठेवलेल्या होत्या.
रिझल्ट असल्या कारणाने आज हर्षा माझ्याबरोबर ऑफिसला येणार नव्हती. "रिझल्ट लागल्यावर फोन कर गं मला." जाता जाता दरवाज्यातूनच हर्षाला मी सांगितलं.
"हो" गंभीर आवाजात हर्षाकडून प्रतिसाद आला, तिच्यासमोर तिचा नालायक भाऊ बसलेला होता. नुकतच त्यांच कडाक्याच भांडण झालं असावं असं त्या दोघांकडे पाहून वाटत होतं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
"काय?" अक्षरश बसल्या जागेवरच मी मोठ्याने किंचाळले. ऑफिस मध्ये जाऊन तास/दीड तास होत नाही तोच हर्षाचा फोन आला होता.
"ता आ आ इ ई, मी वि..ष प्या यलयं" हर्षाचा अडखळता आवाज.... कोणीतरी तप्त लोखंडाचा रस माझ्या कानात ओतावा तसे ते तीन शब्द माझ्या कानात गेले, काहीच सुचेना, सगळ्या संवेदना बधीर झाल्या होत्या. बिचारा आनंद! त्याच्या मनातला गुलमोहर बहरण्याआधीच कोसळू पाहत होता.... नव्हे कोसळून पडला होता. तडक त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहचले. ऑफिस ते हॉस्पिटल प्रवासादरम्यान असंख्य विचारांनी मनात गर्दी केली. 'तिने असं का केलं असावं?' हा एकाच प्रश्न मनाला खूप सतावत होता.
आम्ही हॉस्पिटलला पोहोचण्याआधीच तिचे सगळे शेजारी-पाजारी गोळा झाले होते.
"दोन विषय गेले ना तिचे म्हणून केलं असेल."
"नाही, नाही सकाळी भावाबरोबर झालेलं भांडण याला कारणीभूत असेल."
"विष घेतल्यावर तिने ऑफिसात फोन केला होता म्हणे."
त्या लोकांच्या चर्चेतून हे सगळं ऐकायला मिळत होत. भराभर आनंदबरोबर पहिल्या मजल्यावर पोहचले जिथे हर्षाला ठेवलं होतं. बाजूलाच तिच्या आईने मोठ्याने हंबरडा फोडलेला...उर फोडून ती माउली रडत होती. नर्सला आम्ही तिच्यावरचा कपडा थोडा बाजूला सारायला सांगितला.
आणि....
एक निष्पाप जीव अगदी काळ्या-निळ्या अवस्थेत तिथे निपचित पडला होता.
ती गेली होती.....आयुष्याच्या प्रवासात आनंदला एकट्याला सोडून.....खूप सारे प्रश्न अनुत्तरीत ठेऊन......पुन्हा परत कधीही न येण्यासाठी.
सूचना: एका सत्य घटनेवर आधारित हि कथा आहे आणि अजूनही आम्हाला तिने असं का केलं असाव? हा प्रश्न पडतो.
(No subject)
काय कथा आहे वाह....!
काय कथा आहे वाह....!
(No subject)
उत्तम प्रयत्न आहे. पु.ले.शु
उत्तम प्रयत्न आहे. पु.ले.शु
उत्तम प्रयत्न आहे. पु.ले.शु
उत्तम प्रयत्न आहे. पु.ले.शु
चांगली मांड्ली आहे किसनशेठ.
चांगली मांड्ली आहे किसनशेठ. गुंतून जायला होते आहे कथेत. पण हर्षासार्ख्या निरागस मुलीने असे का करावे हे लक्षात न आल्याने जीव फार हळहळतो.
पण मित्रा, पहिलीच कथा दु:खांत का लिहिली बरं?
कथा अजुन रंगवता आली
कथा अजुन रंगवता आली असती...
जशीच्या तशी घटना लिहण्याच्या ऐवजी थोडेसे अजुन रंग भरले असते तर अजुन छान झाली असती...
पुलेशु
उत्तम प्रयत्न आहे. पु.ले.शु
उत्तम प्रयत्न आहे. पु.ले.शु
एक कथा म्हणून छान आहे...पण
एक कथा म्हणून छान आहे...पण सत्यकथा असल्याने वाईट वाटलं.
रात्रीनंतर दिवस येतोच हे लक्षात ठेवून आयुष्य जगले पाहिजे. जर कोणी अशा मनस्थितील व्यक्ती पहिली तर मित्रत्वाच्या नात्याने सकारात्मक विचार त्यांच्या समोर बोलावेत जेणेकरून अशा दुर्दैवी आत्महत्या टाळता येतील.