चित्रकला- घर
Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
41
मुलाच्या चित्रकलेत हळूहळू (मनात असेल तर) प्रगती होत आहे.
ह्या चित्रामध्ये उजवीकडचं चित्र प्रिन्टेड होतं, आणि मुलाने फक्त रंग भरले होते.
आता तेच चित्र त्याने संपूर्णपणे पहिल्यापासून काढून रंगवले आहे. ही प्रगती आहे असं वाटले, आणि ह्या आधीचीही चित्र इथे दिली असल्याने, हे चित्र इथे देत आहे. कसे वाटले हे सांगा, जाणकारांना काही प्रगती वाटत आहे का?
हे जरा जवळूनः
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
शाब्बास नचिकेत. छान काढलंय
शाब्बास नचिकेत. छान काढलंय चित्र.
डबल पोस्ट.
डबल पोस्ट.
गोड आहे हं चित्र, नचिकेत.
गोड आहे हं चित्र, नचिकेत. शाब्बास !
चांगली आहेत. दुसरं छान जमलंय
चांगली आहेत. दुसरं छान जमलंय रंगवायला.
पूनम, रंगवण्यातील सफाई,
पूनम, रंगवण्यातील सफाई, रेषांतला नीटनेटकेपणा चांगलाच जाणवतोय
गजानन, उजवीकडच्या चित्रात (जे
गजानन, उजवीकडच्या चित्रात (जे नुसतं रंगवलं आहे) त्यात प्लॅस्टिक फिनिशचे खडू होते, त्यामुळे त्याला एक चमक आली आहे.
त्याच्या चित्रासाठी साधे तेलकट खडू वापरलेत, त्यामुळे ते थोडे खडबडीत दिसत आहे.
अल्पना, खूप खूप आवडलं ना तुला?
धन्यवाद रैना, केश्विनी वयाबरोबर हळूहळू बदल होत आहे- हे निरिक्षण करायला मस्त वाटतं
वाह. मी काय जाणकार वगैरे
वाह. मी काय जाणकार वगैरे नाही. पण प्रगती आहे हे मात्र निश्चित. (आता त्याला त्याचा माबो आयडी काढून दे, म्हणजे तोच त्याची चित्रे पोस्ट करेल.)
मस्तच नचिकेत. अशीच छान छान
मस्तच नचिकेत. अशीच छान छान चित्रं काढ आणि तुझ्या त्या "कार्टुन" वर केलेल्या कवितेसारख्या कविताही कर खुप खुप
नचिकेत शाब्बास
नचिकेत शाब्बास
मस्त चित्र रे नचि..
मस्त चित्र रे नचि..
छान
छान
छान.
छान.:)
मस्त! कुंपण विशेष आवडलं. ते
मस्त!
कुंपण विशेष आवडलं. ते चितारणं आणि रंगवणं यावरून त्याचा हात बसलाय हे कळतंय
छान, प्रगती निश्चितच आहे. पण
छान, प्रगती निश्चितच आहे.
पण माझ्या मते सर्वात महत्वाचे असे की, चित्रासारखे चित्र काढताना देखिल, स्वतःचे कल्पनास्वातन्त्र्य कुठेही गमावू दिलेले नाही. आन्धळेपणाने कॉपीपेस्ट सारखे केले नाहीये हे महत्वाचे. घराच्या दरवाजापासून बाहेर येणारा रस्ता हे त्याचे उदाहरण आहे असे मला वाटते. मूळ चित्रात ती "पायवाट" कशातरी नागमोडी रेषान्नी दाखवली आहे, जणू काही पाणी वहात येतय वा एखादा ओहोळ दाखवलाय, पण स्वतःच्या चित्रात मात्र तोच रस्ता आखिव रेखिव दाखवला आहे. इतर एक दोन मुद्दे देखिल आहेत.
लिंबुला अनुमोद, रस्त्याच्या
लिंबुला अनुमोद, रस्त्याच्या अलिकडे पलिकडे त्याने फुलसदृश गोल गुलाबीही काहीतरी काढलंय... ते पण छान दिसतंय. शिवाय मूळ चित्रातलं घर थोडं तिरकं वगैरे आहे, पण तुझ्या मुलाने चित्रात चौकोन आयत वगैरे बरोब्बर मापात काढलेत.
सही आहे.
सही आहे.
सुरेख काढलंय चित्र. शाब्बास
सुरेख काढलंय चित्र.
शाब्बास नचिकेत
लिंबूच्या निरीक्षणास अनुमोदन.
लिंबूच्या निरीक्षणास अनुमोदन.
नचिकेत, good job !
शाब्बास नचिकेत! खुप आवडलं
शाब्बास नचिकेत! खुप आवडलं चित्र!
धन्यवाद लोक्स दक्षिणा, ती
धन्यवाद लोक्स
दक्षिणा, ती फुलंच आहेत, हिरवळीवर पडलेली म्हणे!
बघ त्याचा Aesthetic Sense
बघ त्याचा Aesthetic Sense किती जबरदस्त आहे ते.
छान प्रिंटेड आणि त्याने
छान
प्रिंटेड आणि त्याने काढलेल्या चित्रांमध्ये रंग कुठेही बाहेर गेले नाहीयत, हात बसलाय व्यवस्थित!
मीही हेच लिहीणार होते की रंग
मीही हेच लिहीणार होते की रंग फार छान भरतो तुझा मुलगा, अजिबात बाहेर रंग आलेला नाही, मागच्या चित्रांमध्ये सुध्दा नव्हता. नीटनेटके आणि सुबक चित्र शाबासकी त्याला.
शाब्बास नचिकेत!! चित्र खूऽप
शाब्बास नचिकेत!! चित्र खूऽप सुंदर काढलं आणि रंगवलं आहेस!
कुंपणाच्या फळ्या काढताना मागच्या रांगेतल्या फळ्यांच्या रेघा, समोरच्या ओव्हरलॅपिंग फळ्यांमधे दिसू नयेत म्हणून कित्ती पेशन्स ठेवून काढावं लागतं! ते फार मस्त जमलंय. चित्रातले छान प्रसन्न रंग आणि तुझं अॅडिशन म्हणून मूळ चित्रापेक्षा वेगळी हिरवळीवरची फुलं आवडली.
म्रु +. प्रगती पेक्षाही
म्रु +. प्रगती पेक्षाही त्याला आवडतेय म्हणून चित्र काढतोय हे अधिक मह्त्वाचे माझ्या मते.
मस्त चित्र नचिकेत
मस्त चित्र नचिकेत
भारी आहे एकदम शाब्बास
भारी आहे एकदम शाब्बास नचिकेत!
अरे मस्त!
अरे मस्त!
वा!! गुड जॉब नचिकेत. खूप
वा!! गुड जॉब नचिकेत. खूप आवडलं तुझं चित्र
शाब्बास नचिकेत! छान काढलं
शाब्बास नचिकेत! छान काढलं आहेस चित्र. रंगही सुरेख भरले आहेस. मन लावून चित्र रंगवल्याचं जाणवतंय.
Pages