बर्ट्रांड रसेल वुइथ देशी फिलॉसॉफी
लेखकः बब्रुवान रुद्रकंठावार
प्रकाशकः जनशक्ती बुक्स अँड पब्लिशर्स प्रा. लि.
जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद.
प्रकाशनः १६ डिसें. २००७
अनेक वर्षांनी एखादे पुस्तक वाचून इतका मनमुराद हसलो. पद्मगंधा, यक्ष इत्यादी मासिके व लोकसत्ता, तरुण भारत, सामना ह्या दैनिकातले आधी प्रसिद्ध झालेले हे स्फुट लेख आहेत. सर्व लेख हे तीन ते सहा-सात पाने ह्या मर्यादेत आहेत. बब्रुवान व त्याचा दोस्त (दोस्ताचे नाव कुठेही येत नाही. तो दोस्तच) ह्यांचे विविध प्रासंगिक विषयांवरील संवाद, चर्चा, तार्कीक विरेचन आणि शेवटी ताजा कलम मध्ये बब्रुची विशेष टिप्पणी असे लेखांचे स्वरुप आहे. बब्रुवान हा पत्रकार आहे तर दोस्त झेडपीतला पॉलिटिशियन.
बब्रुवानांनी ह्यात मराठवाडी भाषा वापरली आहे पण त्यात आजच्या काळाला अनुसरून इंग्रजी शब्दांची भरमार रेलचेल आहे. तसेच मुद्रीत भाषा ही बोलीभाषेच्या ठसक्यांसहीत लिहिली आहे. त्यामुळे वाचताना आपण आपोआपच त्या सर्व खुबींनी वाचू लागतो. उदा:
म्या मंग जोर्यांदा हास्लो. म्हन्लं, 'दोस्ता, तुझी उपमा द्देन्याची स्टाईल जबरा हाये, पन तुझं मॅथेमॅटिक्स कुठं तरी हुकून र्हायलय. काय तरी गफलत व्हवून र्हायलीय.' माझ्या अनयक्स्पेक्टेड स्टेटमेंटनं दोस्ताच्या त्वोंडावर यकदम शंभर पॉईंटाचा क्वश्चनमार्क हुभा र्हायला.
हेच वाक्य जर प्रमाणभाषेत लिहिलं तर त्यातली मजाच जाईल. भाषेच्या प्रयोगाच्या दृष्टीने हे लेख एक उत्तम नमुना आहेत.
पण ह्यातली खरी खुबी आहे ती बब्रुच्या आणि त्याच्या दोस्ताच्या फिलॉसॉफीत. आंधार सेक्युलर आन् डिव्होटेड ह्या लेखात आंधाराच्या धर्मनिरपेक्षतावादी वैशिष्ट्याला हात घालत ते धर्मनिरपेक्षतावाद व त्याच्या तथाकथीत समर्थांकाची हलकेच चिमटे काढतात. इंग्रामवाडी डॉट कॉममध्ये आपल्या डोक्यातलं सर्फिंग दाखवत दोस्त बब्रुला इंटरनेटवरचा सगळा चावटपणा/गॉसिप कसे आपल्या आतच दडलेलं आहे ते दाखवतो तर बर्ट्रांड रसेल वुइथ देशी फिलॉसॉफी ह्या लेखात दोस्त बब्रुच्या जातवाल्यांची म्हणजे पत्रकारांची मस्त खेचतो.
ह्या सगळ्या लेखात बब्रुवान कुठेही उच्चासनावर बसून शहाणपणा शिकवत नाहीत, फुकाची क्लिष्ट रुपके वापरत नाहीत की उगीच भावनांना हात घालत शेवट करत नाहीत. विविध तात्कालीन घटनांची ते विनोदी अंगाने वासलात लावत जातात इतकेच. हे विनोदाचे अंग आहे मात्र अगदी सणसणीत! काही काही ठिकाणी एखादा फालतू विनोद वा कोटी येते किंवा उगीच एखादे नैतिक विधान येते आणि आपल्याला दाताखाली खडा आल्यासारखे वाटते. पण बब्रुवान जीभेने पटकन खडा बाजूल सारत पुढे असे काही 'ष्टेटमेंट' टाकतात की त्या कोटीवर बदाबदा पाणी ओतले जाते. किंवा बब्रुने अशी कोटी केलीच वा नैतिक विधान केले तर दोस्त सरळ 'लक्ष न देता पुढे जातो'.
एक खटकलेली बाब म्हणजे कुठल्याही लेखाच्या शेवटी वा अनुक्रमणिकेत त्या लेखाच्या पुर्वप्रसिद्धीची तारीख/प्रकाशन हे नमूद केलेले नाही.
ह्या पुस्तकातल्या त्याच नावाच्या लेखाची सुरुवात इथे नमुन्यास देतो आणि थांबतो. नमुना मुद्दामून देत आहे की वाचून तुम्हाला पुस्तक घेण्याची/वाचण्याची इच्छा होवो:
त्या दिवशी दोस्त जादाच फ्रस्ट्रेट झाला व्हता. म्या भेटताच मला म्हन्ला, 'बबर्या, लायब्ररीमंदी चालतोस का? लई दिस झाले.'
म्या जरा पॉज घितला. मंग म्हन्लं, 'आजच्याला नगं राव, स्सालं सकाळच्याला डोस्कं धरतं, हँगओव्हर झालं की मंग सारा दिस फुकटछाप जातो. उद्दाच्याला कामंबी लई हायेत. तब्येतबी पैल्यावानी साथ देत न्हाई.'
त्यो म्हन्ला, 'यवडा कामून भाव खावून र्हायलास? जादा टाईम न्हाई बसायचं. रॉयल स्टॅगच्या दोनेक स्टोर्या वाचू, जादा न्हाई. तुला 'हॉट' वाचायचं नसंन तं तू कोल्डमंदी वाच. ऑस्ट्रेलियाचा फोस्टर बराय म्हने, टाईमपास.'
म्या म्हन्लं, 'दोस्ता, आज लई फॉरेन ऑथर्सचे नाव घिवून र्हायलास? सांप्रतला देशी ऑथर्स आठवत न्हाई का कोनी दमदार?'
तसं त्यो म्हन्ला, 'बबर्या स्टेटस्चा क्वश्चनै. आता पैले दिस र्हायले न्हाईत. आन् देशी ऑथर्स कवाकवा लय इमोशनल लेव्हलला नेतेत, आपन त्येंच्यात यवडं इन्वॉल्व्ह व्हतो की मंग आपन आपले र्हात न्हाई. इंडियाच्या डेव्हलपमेंटसाठी आपलं कायबी डिव्होशन न्हाई आसं अन्नेसेसरी आपल्याला वाटू लागतं आन् आपल्या डोळ्याला आपसूक पानी येतं. त्येच्यापेक्षा आपले फॉरेन ऑथर्स कवाबी बरे आस्तेत. त्येंच्या स्टोर्याबी लाईट आसतेत आन् जादा इमोशनल व्हन्याचा टाईमबी येत न्हाई.'
मस्तच रे!! घ्याला पायजे हे
मस्तच रे!! घ्याला पायजे हे पुस्तक आसं वाटाय लागलय.
अरे, मस्त लिहिलंय. वाचायच्या
अरे, मस्त लिहिलंय.
वाचायच्या पुस्तकांची यादी वाढत चाललिये माझ्या.
अल्पना तुला जामच आवडेल. लेखक
अल्पना तुला जामच आवडेल. लेखक तुमच्या भागातलाच पत्रकार आहे. खरे नाव मात्र माहिती नाही लेखकाचे.
टण्या वेगळच की पुस्तक. मस्त
टण्या वेगळच की पुस्तक. मस्त लिहिलस. लेखकानी नाव भारी घेतलय एकदम.
तुला 'हॉट' वाचायचं नसंन तं तू कोल्डमंदी वाच. >>
गेल्या आठवड्यात तु निवांतपणे वाचलेल्या तीनचार पुस्तकांपैकी दिसतय हे एक. उरलेली दोनतीन कुठायत?
सहीच. वाचणार. धन्यवाद टण्या.
सहीच.
वाचणार. धन्यवाद टण्या.
जबरी. वाचायलाच पाहिजे. या
जबरी. वाचायलाच पाहिजे. या बीबीच्या नावावरून येथे यायला घाबरत होतो पण शेवटी न राहवून बघितलेच, आणि बरे झाले बघितले
फारेंड + १
फारेंड + १
किती छान. कुठे मिळेल बरे हे
किती छान. कुठे मिळेल बरे हे पुस्तक? भाषा शैली वेगळी व छान वाटते आहे.
वाचायला पायजेल. (यिऊन जाऊन
वाचायला पायजेल.
(यिऊन जाऊन पंध्रा दिसांनी हुकलं म्हना की मॅथमॅटिक्स ह्येंचं आन् कृषिवलचं! :P)
हे मायबोली खरेदी मध्ये आहे का
हे मायबोली खरेदी मध्ये आहे का ?
मलाबी वाचाव वाटु लागलय !
मलाबी वाचाव वाटु लागलय !
बब्रुवानांचे लेख कुठेतरी
बब्रुवानांचे लेख कुठेतरी वाचले होते. झकास शैलीमुळे लक्षात राहीले. असं एकत्रित पुस्तक वाचायलाच हवय. मस्त लिहिलं आहेस टण्या.
सुरेख लेख, ह्या विनोदाची
सुरेख लेख, ह्या विनोदाची जातकुळी निराळीच आहे.
"धनंजय चिंचोलीकर" हे बब्रुवान चे मूळ लेखक - हा दुवा (चौथा परिच्छेद) पहावा.
ह्याच पुस्तकाचे हे अजून एक लघु परिक्षण
टण्या,वाटसरू धन्यवाद. कोणत्या
टण्या,वाटसरू धन्यवाद. कोणत्या ऑनलाईन खरेदी वेबसाईट वरून मिळेल हे पुस्तक? बब्रु लय भारीये.
कालपासून आठवायचा प्रयत्न करत
कालपासून आठवायचा प्रयत्न करत होते, की बब्रुवान कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय. बहूतेक रविवारच्या तरूण भारतमध्ये वाचलंय एकदा. घरी कधी तरूणभारत येत नव्हता त्यामूळे नक्की आठवत नव्हतं. शेवटी आज घरी फोन करुन विचारलं तेंव्हा बाबांनी सांगितलं.
त्यांना धनंजय चिंचोलीकर म्हणजे बब्रुवान हेसुद्धा माहित होतं. धनंजय चिंचोलीकर पत्रकार म्हणून मलाही माहित आहेत.
जेवळीकरांचं परिक्षण पण छान आहे. धन्यवाद वाटसरु.
मायबोली खरेदी विभागात आहे की
मायबोली खरेदी विभागात आहे की नाही माहिती. पण इथे आहे. मी बूकगंगावरुनच घेतले.
http://www.bookganga.com/eBooks/Book/5178389186893274840.htm
@वाटसरू, मटामधलं परिक्षण मस्त आहे.
लई भारी लिवलय की तुमी आम्च्या
लई भारी लिवलय की तुमी आम्च्या मराटवाड्यातल्या लोकाइ बद्दल.
वाचनार आमी बी
वाचनार आमी बी
सही ... धन्यवाद ओळकह करून
सही ...
धन्यवाद ओळकह करून दिल्याबद्दल. लेखकाचे नाव खरे आहे का ?
सही ... धन्यवाद ओळकह करून
सही ...
धन्यवाद ओळकह करून दिल्याबद्दल. लेखकाचे नाव खरे आहे का ?