Submitted by आनंदयात्री on 11 August, 2011 - 02:07
चांदणे आहे खरे की भास नुसता?
भूतकाळाचा जिवाला त्रास नुसता!
अजुनही तितकीच आवडते मला ती
अजुनही फुलतो मनी मधुमास नुसता
अजुनही ती दाटते मेघांप्रमाणे
अजुनही मी बांधतो अदमास नुसता!
मार्ग होते वेगळे प्रत्येकवेळी
जवळ आल्याचा जरा आभास नुसता
ती तुझी नाहीच हे तू जाण वेड्या!
दोन खाटांनाच म्हण सहवास नुसता
अंबराचा थांगही लावेन म्हणतो
मोजला आहे धरेचा व्यास नुसता
मी विरक्ती घेतली आहे खरे तर
आत अजुनी नांदतो हव्यास नुसता!
मी कशी फेडू उधारी जीवना ही?
घेत असतो रोज मी गळफास नुसता
मी किती जगलो मलाही आठवेना
घेतला मी शेवटीही श्वास नुसता
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2011/08/blog-post_11.html)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
खुपच मस्त.
खुपच मस्त.:)
अजुनही ती दाटते
अजुनही ती दाटते मेघांप्रमाणे
अजुनही मी बांधतो अदमास नुसता!>>> सुंदर
ती तुझी नाहीच हे तू जाण वेड्या!
दोन खाटांनाच म्हण सहवास नुसता>>>> सुंदर
मार्ग होते वेगळे प्रत्येकवेळी
जवळ आल्याचा जरा आभास नुसता>>> फार आवडला हा!
जवळ आल्याचा जरासा भास नुसता!
मी विरक्ती घेतली आहे खरे
मी विरक्ती घेतली आहे खरे तर
आत अजुनी नांदतो हव्यास नुसता!...व्वा !!
मार्ग होते वेगळे प्रत्येकवेळी
जवळ आल्याचा जरा आभास नुसता...वा वा वा !!
मी किती जगलो मलाही आठवेना
घेतला मी शेवटीही श्वास नुसता...सुरेख शेर.
या तरहीवरील सर्वोत्कृष्ट गझलांपैकी एक.
जवळ आल्याचा जरासा भास नुसता!
जवळ आल्याचा जरासा भास नुसता! >> व्वाह!
जवळ आल्याचा जरासा भास नुसता!
जवळ आल्याचा जरासा भास नुसता! >> व्वाह!>>>>
अरे?? मी ओळ आवडली म्हणून पुन्हा खाली लिहावी म्हणून गेलो अन चुकीची टाईप झालि आणि तीच तुम्हालाही आवडली???
आभास चे भास करण्याची इच्छा नव्हती पण आपोआप झाले बहुधा!
व्वा.... क्या बात है..
व्वा.... क्या बात है..
अदमास आणि व्यास आवडले.
अदमास आणि व्यास आवडले.
वाह......
वाह......
वाहवा
वाहवा
अतिशय सुरेख!!
अतिशय सुरेख!!
सुरेख...
सुरेख...
मस्तच गझल नचिकेत!! आभास,
मस्तच गझल नचिकेत!!
आभास, सहवास आणि शेवटचा शेर हे अत्यंत खास
सुरेख, सुपर्ब. सर्वच शेर
सुरेख, सुपर्ब. सर्वच शेर आवडले.
दर्जेदार गझल, नचिकेत!!!!
दर्जेदार गझल, नचिकेत!!!!
विरक्तीचा शेर फार फार फारच आवडला....
मस्त
मस्त
अंबराचा थांगही लावेन
अंबराचा थांगही लावेन म्हणतो
मोजला आहे धरेचा व्यास नुसता
क्लास्स्स्स्स्स्स्स!!!!
आवडली.. अंबराचा थांगही लावेन
आवडली..:)
अंबराचा थांगही लावेन म्हणतो
मोजला नाही धरेचा व्यास नुसता
अशीही मजा घेतली
अजुनही ती दाटते मेघांप्रमाणे
अजुनही मी बांधतो अदमास नुसता!
अजुनही तितकीच आवडते मला ती
अजुनही फुलतो मनी मधुमास नुसता.....अजुनही ?
पण शेर छान झालेत.
अंबराचा थांगही लावेन
अंबराचा थांगही लावेन म्हणतो
मोजला नाही धरेचा व्यास नुसता
व्वा..शामने केलेला बदल मस्तच.
व्वा क्या बात है !!!!!
व्वा क्या बात है !!!!!
सुंदर गझल ...आवडली.
सुंदर गझल ...आवडली.
मस्तय
मस्तय
अप्रतिम!!! मस्तच
अप्रतिम!!! मस्तच
अंबराचा थांगही लावेन
अंबराचा थांगही लावेन म्हणतो
मोजला आहे धरेचा व्यास नुसता......... वा साहब व्वा, जीओ
अंबराचा थांगही लावेन म्हणतो
मोजला नाही धरेचा व्यास नुसता ....... शाम ने केलेल्या बदलाने मजा आली जीओ यार
गजल छानच...
आवडली... सर्वच शेर 'सव्वाशेर'
आवडली... सर्वच शेर 'सव्वाशेर' आहेत...
<<अंबराचा थांगही लावेन
<<अंबराचा थांगही लावेन म्हणतो
मोजला आहे धरेचा व्यास नुसता
मी विरक्ती घेतली आहे खरे तर
आत अजुनी नांदतो हव्यास नुसता!<<<
अ प्र ति म!! क्लासिक!!
बढीया
बढीया
ती तुझी नाहीच हे तू जाण
ती तुझी नाहीच हे तू जाण वेड्या!
दोन खाटांनाच म्हण सहवास नुसता >>> काय लिवता राव !
"जरासा भास "सही वाटले मलाही !
मजा आला....जियो यार..मस्त गझल
मजा आला....जियो यार..मस्त गझल
क्या बात.... क्या बात........
क्या बात.... क्या बात........ क्या बात.....
दोस्तहो, सर्वांना thanks..
दोस्तहो, सर्वांना thanks..
शाम, "धरेचा नुसता व्यास मोजला आहे, अंबराचा थांगही लावेन म्हणतो" असंच म्हणायचं होतं...
काफिया आणि रदीफ यांचा संबंध पाहायचा म्हटला तर वरील आशय better आहे असं मला वाटतं..
अंबराचा थांगही लावेन म्हणतो
मोजला नाही धरेचा व्यास नुसता
- धरेचा नुसता व्यास मोजला नाहीये तर अंबराचा थांगही लावेन म्हणतो यात 'ते' expression नाहीये!
आपलेही आभार!
Pages