प्रधानजी - महाराजांचा ... आं, महाराज, काय झालं. चेहरा कडवट करुन का बसलायत ? जवळचं आणि लांबचे दोन्ही खपले की काय ?
महाराज - प्रधानजी ..
प्रधानजी - नाही म्हणजे झालं काय ? व्हॉटस् द मॅटर ...
महाराज - काही नाही रे. तुझ्या महाराणीने
प्रधानजी - काय केलं महाराणीने .. थांबा आत्ता जाऊन तिला खडसावतो. नको, त्याच्या नादाला
लागायची सवयच झालेय तिला. तुम्ही थांबा मी राणीला आत्ता जाब विचारून येतो.
महाराज - हूं ... वाटलचं ... तुम्ही नेहमी चान्स बघत असता ... महाराणींना भेटायला. मला म्हणायचयं आमच्या महाराणींनी आम्हाला श्रावण पाळायला सांगितला.
प्रधानजी - महाराज तुम्ही श्रावण पाळलाय.
महाराज - हो रे.
प्रधानजी - केवढा झालाय.
महाराज - प्रधानजी श्रावण पाळायला कुत्रं किंवा कोबंडं आहे का ? उगाच उचलली आणि .. एक तर डाळ भात, भेंडीची भाजी, खिचडी खाऊन तोंड कसतरी झालयं, आता तुम्ही उगाच डोक्याची खीर करू नका.
प्रधानजी - महाराज, खीरीवरून आठवलं. तुम्ही म्हणे सर्व कैद्यांना रोजा निमित्ताने शीरकुर्मा, बदाम वगैरे खायला परवानगी दिली आहेत.
महाराज - हो.
प्रधानजी - अहो, आधीच मटण बिर्याणी देऊन देऊन खजिन्याला खड्डा पडलाय. त्यात आणि ही भर ..
महाराज - प्रधानजी, सणवार चालू आहेत.
प्रधानजी - अहो, कसले ह्यांचे उपवास. वाट्टेल तेव्हा मटण बिर्याणी खाल्ली, वाट्टेल तेव्हा शीरकुर्मा ... कसा-ब-सा खजिना पुरवून पुरवून वापरतोय आपण ... अरे खाल्ल्या मिठाला तरी जागा .. .. लोकांचे जीव घेऊन कसले वाढदिवस साजरे करता ... हे सगळं तुमच्यासारख्या नालायक
महाराज - प्रधानजी ..
प्रधानजी - म्हणजे ना-लायक असलेल्या ह्या लोकांचे आज फाशी देणार उद्या फाशी देणार असे दिवस वाढ-तायत म्हणून वाढ-दिवस होतायत. आता दिवसेंदिवस मागण्या ही वाढतायत आणि त्यांचे हटट ही. आपल्याच पैशातून हे बिर्याणी, शिरकुर्मा खातायत आणि तुम्ही महाराज असून स्वत:च्याच राज्यात भेंड्याची भाजी खाताय.
महाराज - हो, पण माणूसकीच्या नात्याने.
प्रधानजी - हूं .. आले पुन्हा माणूसकीच्या लोणच्यावर. माणूसकी जपायची ठेकेदारी किती दिवस चालवायची. ह्यांनी आणि ह्यांच्या विषारी पिल्लांनी राक्षसीवृत्तीने कसंही जगायचं ... ह्यांना पोसून पोसून आपले काय हाल झालेएत ते बघा जरा.
महाराज - मी काय म्हणतोय प्रधानजी पाच मिनिटं सिंहासनावर बसता का जरा बरं वाटेल. कशाला ब्लडप्रेशर वाढवताय. बसून बोलू.
प्रधानजी - बसून बोलू. पण तूमचा श्रावण आहे ना.
महाराज - अहो, तसं बसून नाही. इथे बसून.
प्रधानजी - नाही. त्यापेक्षा तुम्हीच चला माझ्याबरोबर.
महाराज - कुठे ?
प्रधानजी - कैद्यखान्यात
महाराज - आणि ...
प्रधानजी - आणि हे शीरकुर्मा, बदाम खायला मागणार्यांचं शीर उडवा ..
महाराज - अस्सं म्हणताय. काढा पेपर जाण्याआधी .. भविष्य वाचू आणि ताबडतोब म्हणताय ते काम करू. वाचा, वाचा लवकर वाचा भविष्य.
प्रधानजी - अवघ्या राज्याचं भविष्य अंधारात आहे. तरीही.
महाराज - अहो, आधी आपलं भविष्य कसं आहे ते कळायला नको ... राज्याचं काय आज राहीलं तर उद्या बघता येईल. काय ? वाचा.
प्रधानजी - एवढं सगळं तातडीचं बाजूला ठेवून आज ही भविष्य ऐकायला हवचं का महाराज.
महाराज - म्हणजे काय ?
प्रधानजी - ऐका. (पेपरातील भविष्य कॉलमवर नजर फिरवीत) श्रावण मासी हर्ष मानसी .. हिरवळ दाटे चोहीकडें असं काहीसा तुमचा हा महीना जाणार आहे. श्रावणी सोमवार, शनिवार न चुकवता केलेत तर त्याचे फलित निश्चित मिळेल. दिर्घाआयुष्य आणि ऐश्वर्यासाठी आवडत्या देवतेची पुजा-अर्चा, जप केलात तर अगदी शीरकुर्मासारखं सगळं गोड होईल. जात, पात न मानता दानधर्म केलात तर अगदी दुधात बदाम. या महिन्यात कुणास अपशब्द, कुणाबद्दल वाईट विचार मनात येऊ नये असं जर वाटत असेल तर चुकता, विसरता, मनोभावे वरील उपाय श्रध्देने करा. श्रावणासह येणारा कालावधी उत्तम जाईल.
महाराज - बघा, प्रधानजी. भविष्य वाचलं म्हणून किती बरं झालं ते. नाहीतर माझ्या हातून काहीतरी विपरीत घडलं असतं.
प्रधानजी - म्हणजे तुम्ही ?
महाराज - दरबार सोडून कुठेही जाणार नाही.
प्रधानजी - अहो, पण मग बदाम, शीरकुर्मा खाणार्या नराधम यात कसा-ब-दल ...
महाराज - तुर्तास नको. रोझा होऊ दे. मग बघू
प्रधानजी - हूं .. असचं गोंजारत, कुरवाळत रहा त्यांना. आता रोझा होऊ दे ... आणि आतापर्यंत त्यांनी केलेले हल्ले, बॉम्बस्फोट .. अशा तुमच्या बेफी़कीर वागण्याने रोज होऊ दे.
महाराज - मला काही म्हणालात. बोला ना. आं, प्रधानजी काय झालं. चेहरा कडवट करुन का बसलायत ? चला, तुमचा मुड आपण चेंज करुया. बदाम घातलेला शीरकुर्मा कसा झालाय ते टेस्ट करून पाहू.
प्रधानजी - नको, जा तुम्हीच खा.
महाराज - बरं. (महाराज जातात)
प्रधानजी - खरं तर महाराज. आपल्या डाळभात, खिचडीपेक्षा. तुम्हालाच शीरकुर्माची चटक जास्त आहे, प्रत्येकवेळी त्यांनाच का दोष द्यायचा. श्रावण मासी हर्षमानसी ... बिर्याणीसह आता शीरकुर्मा, बदाम दिसे ... एवढं खरं यावर्षी आपल्या श्रावणाला रोझा भारी पडला. हट, मी ही कसा-ब-डबड करतोय उगाच.
मस्त !
मस्त !
आवडले.
आवडले.
मस्त लिहिलय....
मस्त लिहिलय....
मस्त.. एकदम मर्मिक.
मस्त.. एकदम मर्मिक.
(No subject)
श्री, बेफीकीर, चिमुरी, राजा,
श्री, बेफीकीर, चिमुरी, राजा, लालू ... प्रतिसादाबद्दल आभार !!
मस्त !
मस्त !
प्रधानजी - महाराज तुम्ही
प्रधानजी - महाराज तुम्ही श्रावण पाळलाय.
महाराज - हो रे.
प्रधानजी - केवढा झालाय.
>>>>>>>>>>>
मस्त...
जबरा
जबरा
छानच...
छानच...
निनाद आजकाल दिसत नाहीत स्किट
निनाद आजकाल दिसत नाहीत स्किट तुमची इकडे डकवता की काय ??

छान आहे हे
(No subject)