मराठी उद्योजक या ग्रूपबद्दल माहिती प्रकाशित झाल्यापासून अनेक जणांनी यात सामिल होण्याबद्दल विचारणा केली आहे. या ग्रूपमधे सामील होण्याचे निकष आणि पुढील पायर्या. सभासदत्वासाठी कुठल्याही स्वयंसेवकाशी संपर्क साधण्याअगोदर कृपया खालील गोष्टींची पूर्तता करुनच संपर्क करावा
१. फक्त मायबोलीच्या कार्यरत सभासदांना या ग्रूपचे सभासद होता येईल. जे सध्या सभासद नाहीत ते आधी मायबोलीचे सभासदत्व घेऊन मग ग्रूपच्या सभासदत्वसाठी अर्ज करू शकतील.
२. सभासदत्चासाठी तुमचे नाव, आडनाव, गाव, देश आणि व्यवसायाबद्दल माहिती जाहिरपणे व्यक्तिरेखेत लिहणे आणि तशी कायम लिहलेली ठेवणे आवश्यक आहे. फक्त हीच माहिती सगळ्यांना उपलब्ध असेल. ही माहिती खोटी आहे असे कधीही आढळल्यास या ग्रूपचे आणि मायबोलीचेही सभासदत्व रद्द केले जाईल.
३. सभासदत्वासाठी अर्ज करताना तुमच्या जवळच्या विभागातल्या (किंवा तुम्हाला सोयिस्कर असलेल्या) ग्रूपच्या प्रतिनिधिशी संपर्क करून तुमच्या फोन नंबर कळवावा. ते प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची माहिती विचारतील आणि ती व्यक्तीरेखेशी जुळली असेल तर तुम्हाला सभासदत्व देण्याची प्रक्रिया सुरु करतील.
४. या व्यतिरिक्त तुमचा ईमेल किंवा फोन किंवा इतर संपर्काची माहिती ग्रूपमधे कधी जाहिर करण्याची गरज नाही किंवा या ग्रूपच्या प्रशासकीय टीमलाही सांगायची गरज नाही. तुम्हाला एकाद्या व्यक्तिबद्दल विश्वास निर्माण झाला तर त्याला कुठ्ली माहिती केंव्हा द्यायची हे तुमचे तुम्हीच ठरवायचे आहे. अयोग्य व्यक्तिच्या हातात सगळ्या सभासदांच्या ईमेल किंवा फोनचा एकत्रित डाटा जाऊन त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी धोरण आहे.
५. सध्या मायबोलीवरच्या संपर्क सुविधेचा, विचारपूशिचा वापर करून सभासदांना एकमेकांत संपर्क करता येईल. इतरही सुविधांवर काम चालू आहे ज्या वापरून वेगवेगळे Filters ठेवता येईल.
६. या ग्रूपमधे उद्योजक, उद्योजक होऊ इच्छिणारे, नोकरी करणारे, नोकरी शोधणारे, विद्यार्थी सगळ्यांसाठी प्रवेश असेल. वर #२ मधे लिहल्याप्रमाणे खरी माहिती द्यावी लागेल. सभासदत्व देताना कुठल्या क्षेत्रातले असावेत यावर बंधन नसले तरी व्यवसायानुसार प्रतिक्षा यादी असू शकेल. उदा. एका क्षणी Software मधले खूप सभासद झाले तर नविन software व्यावसायिकाला थोडे थांबावे लागेल पण Manufacturing मधल्या एखाद्याला लगेच प्रवेश मिळू शकेल.
७. प्रत्येक सभासदाला त्याच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी एक धागा(एक पान) तयार करता येईल. ते त्यांना कितीही वेळा बदलता येईल. इतर सभासद त्या पानावर प्रतिक्रिया लिहू शकतील.
८. हा नेटवर्किंगचा ग्रूप आहे, मार्केटिंगचा ग्रूप नाही. त्यामुळे एकमेकात देवाणघेवाण अपेक्षित आहे. फक्त जाहिरातीची जागा नाही. #७ मधे लिहल्याप्रमाणे सुरूवातीला दिलेल्या व्यवसायाच्या माहिती व्यतिरिक्त पोस्टस,मेसेज,फोन,मेल स्वरुपात सततची जाहिरातबाजी करून इतर सभासदांना त्रास देऊ नये.. सभासदांकडुन तशी तक्रार प्रशासनाकडे आल्यास सभासदत्व रद्द होऊ शकते.
ज्यांना जास्त जाहिरातीची गरज आहे त्यांना मायबोलीवरच्या इतर जाहिराती सुविधां उपलब्ध आहेत.
९. NO means NO. ग्रूपमधे एखाद्या व्यक्तिने तुम्हाला मदत करण्यास नकार दिला किंवा असमर्थता दर्शवली तर त्या व्यक्तीला परत मायबोलीद्वारे किंवा बाहेरून संपर्क करू नये. या नियमाचे ३ पेक्षा जास्त वेळेस उल्लंघन केल्यास सभासदत्व रद्द केले जाईल.
तुमच्या सोयीनुसार , ग्रूपचे सभासद होण्यासाठी खालील स्वयंसेवकांशी मायबोलीची संपर्क सुविधा वापरून संपर्क करावा.
अ)संपर्कात तुमचा दूरध्वनी आणि तुमच्यासाठी सोयीची वेळ कळवावी. ब) वर #२ मधे लिहल्याप्रमाणे जाहीरपणे स्वतःच्या व्यक्तिरेखेत नाव, आडनाव, गाव, देश, आणि व्यवसायाबद्दल माहिती प्रकाशित करावी.
मुंबई
मिलिंद माईणकर (भ्रमर)
दीपक कुलकर्णी (डुआय)
पुणे
दीपक ठाकरे (साजिरा)
मयूरेश कंटक (मयूरेश)
उत्तर भारत
अल्पना खंदारे (अल्पना)
दक्षिण भारत
अश्विनि खाडिलकर (अश्विनीमामी)
नवीन केळकर (शुभंकरोति)
अमेरिका पूर्वकिनारा
अनिलभाई सांगोडकर(अनिलभाई)
रूपाली महाजन(रूनी पॉटर)
अजय गल्लेवाले (अजय)
अमेरिका पश्चिमकिनारा
भाग्यश्री कुलकर्णी-करकमकर (बस्के)
समीर सरवटे (समीर)
कॅनडा
वैशाली कालेकर (आशि)
ऑस्ट्रेलिया
निलेश डोंगरे (चंबू)
निनाद कट्यारे (निनाद)
डुआय, धागा चुकला, हा
डुआय,
धागा चुकला, हा सार्वजनिक धागा आहे. सभासद्त्व दिले आहे.
अओ सॉरी मास्तर.
अओ सॉरी मास्तर.
मराठीत लिहिताना थोडीशी गडबड
मराठीत लिहिताना थोडीशी गडबड होते, पण आपले विचार सरळ मायबोलीवर मांडताना खूप बरं वाटते आहे. मनापासून धन्यवाद.
मराठी उद्योजकः सभासदत्व कसे मिळवावे ? मी गोव्यात आहे. कुठे आणि कोणाला संपर्क करायचा ?
नाव, आडनाव, गाव, देश आणि व्यवसायाबद्दल
माझे नाव : निलेश आडनाव: कंटक गाव : गोवा (पंचवाडी),फोंडा) देश: इंडिया व्यवसायाबद्दल: कॉम्पुटर सॉफ्टवेअर व वेबसाईट डेवेलोपर Prop.of Kantaks Corporation kantaks.co.in and Director of : Guru Web Tech Pvt Ltd www.guruwebtechpvtltd.com संपर्क: ९१५८२८६७७८ वेळ : सकाळी ९ ते १० व संध्याकाळी ६
इमेल आयडी : nileshkantak@gmail.com facebook.com/nileshkantak
हेल्लो माझे नाव निर्मला आहे.
हेल्लो
माझे नाव निर्मला आहे. माझा मनुके विक्रिचा व्ययसाय आहे. मि स्वता शेतकरि अस्ल्याने मधे कोनिहि नहि म्हन्जे ब्रोकेर किवा दलाल नाहि.
व्होल्सेल दराने मनुके मिल्तिल ते सुधा ओरिगिनल
०२५१-२२०४१३१
Hi, Good evening, can anybody
Hi, Good evening, can anybody here who guide me... i am facing problem in writting in marathi. मला या ग्रुप् चे सभासद्त्व हवे आहे.काय करु
हेमलता या ग्रूपचे सभासदत्व
हेमलता
या ग्रूपचे सभासदत्व मिळवण्यासाठी वरचा मुद्दा क्र २ आणि ३ पहा.
मराठी लिहायला अडचण येतेय - हे पहा.
नेट वर घरात बसून मंथली इनकम
नेट वर घरात बसून मंथली इनकम होइल असा काही उद्योग सुचवाल का?
नेट वर घरात बसून मंथली इनकम
नेट वर घरात बसून मंथली इनकम होइल असा काही उद्योग सुचवाल का?
(No subject)
कल्पवृक्ष कन्येसाठी...!
कल्पवृक्ष कन्येसाठी...! देशातील एकमेव नारीशक्तीचा हुंकार
कोकणातील नारळाला कल्पवृक्ष म्हटले जाते. हे लहानपणापासून त्यांच्या विविधांगी उपयोगितेच्या चर्चेसह आपण वाचत आलो आहोत. मात्र, नारळाच्या ज्या विविधांगी उपयोगितेची आपण चर्चा करतो ती नुसतीच चर्चा राहू नये यासाठी कोकणी माणसांनी काय प्रयत्न केले आहेत, याबाबतही कृतीसह चर्चा होण्याची गरज आहे. कोकणातील खेकडा वृत्तीची चर्चा केव्हाही कोंकणी माणूसच अधिक करताना दिसतो तो केवळ त्या अनुभवामुळे आलेल्या नैराश्यापोटीच. पण वेंगुर्ल्यातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रज्ञा प्रदीप परब यांनी 'कल्पवृक्ष कन्येसाठी...!' या गाण्याचे बोल सार्थक करीत महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था, मर्यादित वेंगुर्लाचे सक्षमपणे व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे. महिला सक्षमीकरणास आदर्शवत् असे कार्य कोकणातील या महिला काथ्या कामगार प्रकल्पाद्वारे उभे राहिले आहे, जे संपूर्ण देशातील एकमेव महिलाप्रधान काथ्या उद्योग असलेले हे महाराष्ट्रातीलही या उद्योगाचे एकमेव उदाहरण आहे.
सिंधुदूर्ग जिल्हयातील नवयुग महिला विकास सहकारी पतसंस्था मर्यादित, सागरेश्वर महिला पर्यटन सहकारी संस्था मर्यादित आदींचे अध्यक्षपद समर्थपणे भूषविताना सावित्रीबाई फुले महिला सहकारी पतसंस्था, मर्यादित, सूर्यकांता महिला औद्योगिक सहकारी संस्था यांचे संचालकपदही सौ. प्रज्ञा प्रदीप परब सांभाळीत आहेत. सिंधुदूर्ग जिल्हा न्याय विधी प्राधिकरण आणि वेंगुर्ला तालुका दक्षता समिती व वेंगुर्ला महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित संस्थांच्या त्या सदस्याही आहेत. सिंधुदूर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या उपाध्यक्षा असलेल्या सौ.प्रज्ञा परब यांना महाराष्ट्र सरकारने अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करून नारीशक्तीचा यथोचित गौरवही केला आहे.महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिमेच्या जिल्हाबाह्य मुल्यमापन समितीच्या वेंगुल्यातील दौ-यात तेथील पोलीस इन्स्पेक्टर वाखारे यांनी पोलादपुरच्या नायब तहसीलदार कुमारी श्रद्धा चव्हाण, अड़.माधवी धारिया, पोलिस इन्स्पेक्टर विजय कदम यांच्यासोबत वेंगुर्ल्यातील या नारीशक्तीचा परिचय करून दिला.
कोकण विकास मंडळामध्ये सेवेत असलेल्या प्रज्ञाताईंनी ग्रामीण विकास यंत्रणा, क्वायर बोर्ड, जिल्हा उद्योग केंद्र आणि अन्य माध्यमातून काथ्या कामगारांचे ट्रेनिंग सेंटरही चालविले. महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेतील सध्याची गुंतवणूक सुमारे दीड कोटीपर्यंत असताना ती केंद्र सरकारकडे प्रोजेक्ट सादर करून पाच कोटींपर्यंत वाढविण्याची मानसिकता या उद्योगाला नजिकच्या काळात गरूडझेप घेण्यास प्रवृत्त करणार आहे. केरळ राज्यात १०० टक्के जर या उद्योगाचे अस्तित्व मानले तर महाराष्ट्रातील हा एकमेव काथ्या उद्योग असल्याने स्पर्धा नाही आणि मागणी अधिक असल्याने हा प्रकल्प पूर्णवेळ कार्यरत आहे.सध्या शेकडा ६५ रूपयांपर्यंत स्क्रॅप खरेदी करणा-या या उद्योगाने ग्रीन हस्टसाठी शेतक-याला थेट मालपुरवठा केल्यास चांगला मोबदला देण्याची तयारी ठेवली आहे. शेतक-याच्या बागेत ३० ते ५५ रूपये मोबदला देऊन वाहतूकही वाचविली आहे.
मात्र, तामीळनाडू, केरळसह दाक्षिणात्य राज्यांत वर्षांतून ११ वेळा नारळ काढणी केली जाते तर कोकणात सहसा नारळ काढले जात नाहीत तर ते पडण्याची वाट पाहिली जाते. कोकणात नारळ काढण्याचे प्रमाण वर्षातून केवळ ३ वेळा असे आहे. यामुळे शेतक-याने ३ महिन्यापेक्षा अधिककाळ नारळ झाडावर अनावश्यकरित्या ठेवल्यास झाडांच्या पुढील पिकावर दुष्परिणाम होतो. पण यासाठी शेतक-यांचे प्रबोधन व्यापक प्रमाणावर करण्यासाठी प्रज्ञाताई प्रयत्नशील आहेत. नारळ हिरव्या रंगाचा असतानाच काढण्यात आला तर शेतक-यांना अधिक पिक मिळण्यासोबतच उत्पन्नातही भरघोस वाढ करता येईल, असा त्यांचा विश्वास आहे. या वाढीव प्रोजेक्टसाठी व्हर्जिन ऑईल प्रॉडक्ट तयार करण्यासंदर्भात जे नारळ खरेदी करावे लागणार आहेत. ते कोकणातीलच उत्पादन असावे म्हणजे शेतक-यांना करवंटी, ग्रीनहस्ट, खोबरे आणि तेल यांच्या उत्पादनामुळे अधिक मोबदला देता येणार असल्याचे त्या सांगतात.
महाराष्ट्रातील एकमेव महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था असल्याने या संस्थेला शाळांतील विद्यार्थ्यांच्या बैठका बनविण्याचे मोठे काम मिळणार होते. मात्र, अचानक साऊथ इंडियन लॉबी सक्रीय झाल्याने काहीशी अडचण निर्माण झाली. देशातील बिग बझार सारखे मॉल्स या संस्थेचे विक्री केंद्र असून येथे बनविले जाणारे काथ्यापासूनचे प्रत्येक उत्पादन ग्राहकांकडूनच शोध घेत खरेदी केले जात आहे. काथ्याचे दोर, वॉलपीस, मॅटस्, खेळणी, गांडूळखत अशी विविध उत्पादने इकोफ्रेंडली तर आहेतच शिवाय टिकाऊ आणि आकर्षकही असल्याने ही उत्पादने बनविण्यासाठी होणा-या मेहनतीला योग्य दामही मिळत आहे. या काथ्यानिर्मितीदरम्यान तयार होणा-या भुशाचेही महत्व केवळ खेळणी अथवा गांडूळखत निर्मितीपुरतेच मर्यादित नसून हा कोकोपीट भुसा त्याच्या वजनाच्या ६ पट पाणी शोषून घेण्यासाठी उपयुक्त असल्याने बागेतील हिरवळ म्हणजेच लॉन तयार करण्यासाठी याचा मोठया प्रमाणात गार्डनिंगमध्ये वापर होतो.
साऊथ इंडियन राज्यांत सबसिडी आणि कर्जमाफी असल्याने ते उद्योग पूर्ण भरात असून व्यावसायिक स्पर्धेत महाराष्ट्रातही आघाडीवर राहतात पण महाराष्ट्रात मात्र, शेतक-याला जेवढे उत्पन्न तेवढेच सरकारला व्हॅटद्वारे कररूपी उत्पन्न देणारा हा काथ्या उद्योग महिला बचत गटांमार्फतही चालविला जात आहे. या भागात सुमारे साडेपाचशे महिला बचतगटांची निर्मिती या उद्योगामुळे शक्य झाली आहे. मुंबईसारख्या महानगरात प्लास्टीक प्रदुषणामुळे गटारे तुंबण्याचे प्रकार नारळाच्या चोथ्यामुळेच अधिक असल्याचे सर्वेक्षणांती दिसून आल्याने मुंबई महानगरपालिका जागा उपलब्घ करून या काथ्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी विचार करीत आहे. तळकोकणातील या आदर्श काथ्या प्रकल्पात ग्रीन हस्ट ग्रायडींगपासून काथ्या वळणे आणि कोंबिंग व अन्य मशिनरीवर केवळ महिला कामगार असून त्या प्रामाणिक असल्याने त्यांच्यावर कोणीही सुपरवायझर नाही, हे खास वैशिष्ठय आहे. राज्यातील महिला सक्षमीकरणाचा हुंकार वेंगुर्ल्यातून दिला गेला आहे आणि त्याचे कोकणभर नारीशक्तीच्या जागरात रूपांतर होण्यासाठी राज्यसरकारने अधिक सहकार्याचे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
सौ.प्रद्न्या प्रदीप परब
मोबाइल क्र. ९४२२०६४६८२
लेखक -शैलेश पालकर.
पोलादपूर-रायगड
9890320127
@शैलेश-वसंत : वरील लेखासाठी
@शैलेश-वसंत : वरील लेखासाठी हा धागा योग्य वाटत नाही. तो योग्य धाग्यावर हलवता आला तर बघा.
चुकीच्या धाग्यावर टाकलेला
चुकीच्या धाग्यावर टाकलेला लेख.
कार्यक्रम आणि माहिती दोन्ही स्तुत्य आहे पण देशातील एकमेव वगैरे नाहीये. संपूर्ण महाराष्ट्रभर स्त्रियांच्या बचतगटांच्या माध्यमातून प्रचंड काम केलं जातंय.
मला सभसद व्हय्चय
मला सभसद व्हय्चय
mala sabhasad zlyananater
mala sabhasad zlyananater kontyaprakarachi madat athava margdarshan mile, yabaddal mala mahiti milel ka?
सभासदत्वासाठी इमेल केला आहे
सभासदत्वासाठी इमेल केला आहे पण अजुन काहीच उत्तर आलेले नाही.
तुम्ही कुणाला ईमेल केली आहे
तुम्ही कुणाला ईमेल केली आहे हे लिहिणार का म्हणजे पाठपुरावा करता येईल.
मराठी उद्योजक ग्रूपच्या
मराठी उद्योजक ग्रूपच्या सभासदत्वासाठी मी डुआय यांना ईमेल केली होती त्यांनी आज सकाळीच माझ्याशी संपर्क केला. धन्यवाद!
मी 'स्ट्रायडर' (विशल बोंद्रे
मी 'स्ट्रायडर' (विशल बोंद्रे http://www.maayboli.com/user/36849) ह्यांच्याशी बोललोय. त्यानी योग्य ती माहीती प्रोफाईल मधे लिहीली आहे. तरी त्याना मराठी उद्योजक ग्रूप चे सदस्यत्व देण्यात यावे.
नमसम्लल, मला सभासद बनाय्चे
नमसम्लल,
मला सभासद बनाय्चे आहे. कोनशि सम्पर्क करु.
नमसाकार , मि गिरिश
नमसाकार ,
मि गिरिश चाल्के
माझा न ९८९२ ८१२ ४१०.
e mail : giribc02@gmail.com
मला ह्या ग्रुपचे सभासत्व हवे
मला ह्या ग्रुपचे सभासत्व हवे आहे. मी बस्के ला ईमेल केली आहे. आणि महागुरुंना गटगच्या वेळेस भेटलेली आहे. प्रोफाईल पण अपडेट केले आहे.
मी मधुरा. यांना भेटलो आहे.
मी मधुरा. यांना भेटलो आहे.
मी राजगुरूनगर ला रहातो . मला
मी राजगुरूनगर ला रहातो .
मला राजगुरुनगर ला एक business चालू कार्य चा आहे.
तर कोणता business चालू करता येईल.
करुपया सुचवा.
दुबईस्थित मायबोलीकर योगेश
दुबईस्थित मायबोलीकर योगेश जोशी (योग) यांना उद्योजक ग्रूपचे सभासदत्व देण्यात यावे ही विनंती.
त्यांनी आपल्या ग्रूपच्या
त्यांनी आपल्या ग्रूपच्या नियमाप्रमाणे आवश्यक ती माहिती व्यक्तिरेखेत भरल्यावरच त्यांना सभासद करता येईल. भविष्यात शिफारस करायच्या अगोदर जर स्वयंसेवकांनी इच्छूक मायबोलीकरांना ही माहिती दिली तर हे जास्त सोपे होईल.
मला सभासद व्हायची इच्छा
मला सभासद व्हायची इच्छा आहे
कृपया पुढील मार्गदर्शन व्हावे
इथे विनंती करायच्या आधी
इथे विनंती करायच्या आधी त्यांना कळवले होते वेमा.
माहिती भरली का नाही ते तपासले नाही, त्याबद्दल दिलगीर आहे.
मी योग्य माहिती भरलेली आहे.
मी योग्य माहिती भरलेली आहे. मला कृपया सभासद करून घावे.
मी पूर्वी मेल पाठवलेली होती.
धन्यवाद.
फारच छान पण मला सभासदत्व
फारच छान पण मला सभासदत्व मिळावे हि विनंती.
नचिकेत प्रकाशन
श्री. अनिल सांबरे
९२२५२१०१३०
PLEASE HELP MI SIR..... HOW
PLEASE HELP MI SIR.....
HOW TO TYPE IN MARATHI FONT?
Pages