मराठी उद्योजक या ग्रूपबद्दल माहिती प्रकाशित झाल्यापासून अनेक जणांनी यात सामिल होण्याबद्दल विचारणा केली आहे. या ग्रूपमधे सामील होण्याचे निकष आणि पुढील पायर्या. सभासदत्वासाठी कुठल्याही स्वयंसेवकाशी संपर्क साधण्याअगोदर कृपया खालील गोष्टींची पूर्तता करुनच संपर्क करावा
१. फक्त मायबोलीच्या कार्यरत सभासदांना या ग्रूपचे सभासद होता येईल. जे सध्या सभासद नाहीत ते आधी मायबोलीचे सभासदत्व घेऊन मग ग्रूपच्या सभासदत्वसाठी अर्ज करू शकतील.
२. सभासदत्चासाठी तुमचे नाव, आडनाव, गाव, देश आणि व्यवसायाबद्दल माहिती जाहिरपणे व्यक्तिरेखेत लिहणे आणि तशी कायम लिहलेली ठेवणे आवश्यक आहे. फक्त हीच माहिती सगळ्यांना उपलब्ध असेल. ही माहिती खोटी आहे असे कधीही आढळल्यास या ग्रूपचे आणि मायबोलीचेही सभासदत्व रद्द केले जाईल.
३. सभासदत्वासाठी अर्ज करताना तुमच्या जवळच्या विभागातल्या (किंवा तुम्हाला सोयिस्कर असलेल्या) ग्रूपच्या प्रतिनिधिशी संपर्क करून तुमच्या फोन नंबर कळवावा. ते प्रतिनिधी तुम्हाला फोन करून तुमची माहिती विचारतील आणि ती व्यक्तीरेखेशी जुळली असेल तर तुम्हाला सभासदत्व देण्याची प्रक्रिया सुरु करतील.
४. या व्यतिरिक्त तुमचा ईमेल किंवा फोन किंवा इतर संपर्काची माहिती ग्रूपमधे कधी जाहिर करण्याची गरज नाही किंवा या ग्रूपच्या प्रशासकीय टीमलाही सांगायची गरज नाही. तुम्हाला एकाद्या व्यक्तिबद्दल विश्वास निर्माण झाला तर त्याला कुठ्ली माहिती केंव्हा द्यायची हे तुमचे तुम्हीच ठरवायचे आहे. अयोग्य व्यक्तिच्या हातात सगळ्या सभासदांच्या ईमेल किंवा फोनचा एकत्रित डाटा जाऊन त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी धोरण आहे.
५. सध्या मायबोलीवरच्या संपर्क सुविधेचा, विचारपूशिचा वापर करून सभासदांना एकमेकांत संपर्क करता येईल. इतरही सुविधांवर काम चालू आहे ज्या वापरून वेगवेगळे Filters ठेवता येईल.
६. या ग्रूपमधे उद्योजक, उद्योजक होऊ इच्छिणारे, नोकरी करणारे, नोकरी शोधणारे, विद्यार्थी सगळ्यांसाठी प्रवेश असेल. वर #२ मधे लिहल्याप्रमाणे खरी माहिती द्यावी लागेल. सभासदत्व देताना कुठल्या क्षेत्रातले असावेत यावर बंधन नसले तरी व्यवसायानुसार प्रतिक्षा यादी असू शकेल. उदा. एका क्षणी Software मधले खूप सभासद झाले तर नविन software व्यावसायिकाला थोडे थांबावे लागेल पण Manufacturing मधल्या एखाद्याला लगेच प्रवेश मिळू शकेल.
७. प्रत्येक सभासदाला त्याच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी एक धागा(एक पान) तयार करता येईल. ते त्यांना कितीही वेळा बदलता येईल. इतर सभासद त्या पानावर प्रतिक्रिया लिहू शकतील.
८. हा नेटवर्किंगचा ग्रूप आहे, मार्केटिंगचा ग्रूप नाही. त्यामुळे एकमेकात देवाणघेवाण अपेक्षित आहे. फक्त जाहिरातीची जागा नाही. #७ मधे लिहल्याप्रमाणे सुरूवातीला दिलेल्या व्यवसायाच्या माहिती व्यतिरिक्त पोस्टस,मेसेज,फोन,मेल स्वरुपात सततची जाहिरातबाजी करून इतर सभासदांना त्रास देऊ नये.. सभासदांकडुन तशी तक्रार प्रशासनाकडे आल्यास सभासदत्व रद्द होऊ शकते.
ज्यांना जास्त जाहिरातीची गरज आहे त्यांना मायबोलीवरच्या इतर जाहिराती सुविधां उपलब्ध आहेत.
९. NO means NO. ग्रूपमधे एखाद्या व्यक्तिने तुम्हाला मदत करण्यास नकार दिला किंवा असमर्थता दर्शवली तर त्या व्यक्तीला परत मायबोलीद्वारे किंवा बाहेरून संपर्क करू नये. या नियमाचे ३ पेक्षा जास्त वेळेस उल्लंघन केल्यास सभासदत्व रद्द केले जाईल.
तुमच्या सोयीनुसार , ग्रूपचे सभासद होण्यासाठी खालील स्वयंसेवकांशी मायबोलीची संपर्क सुविधा वापरून संपर्क करावा.
अ)संपर्कात तुमचा दूरध्वनी आणि तुमच्यासाठी सोयीची वेळ कळवावी. ब) वर #२ मधे लिहल्याप्रमाणे जाहीरपणे स्वतःच्या व्यक्तिरेखेत नाव, आडनाव, गाव, देश, आणि व्यवसायाबद्दल माहिती प्रकाशित करावी.
मुंबई
मिलिंद माईणकर (भ्रमर)
दीपक कुलकर्णी (डुआय)
पुणे
दीपक ठाकरे (साजिरा)
मयूरेश कंटक (मयूरेश)
उत्तर भारत
अल्पना खंदारे (अल्पना)
दक्षिण भारत
अश्विनि खाडिलकर (अश्विनीमामी)
नवीन केळकर (शुभंकरोति)
अमेरिका पूर्वकिनारा
अनिलभाई सांगोडकर(अनिलभाई)
रूपाली महाजन(रूनी पॉटर)
अजय गल्लेवाले (अजय)
अमेरिका पश्चिमकिनारा
भाग्यश्री कुलकर्णी-करकमकर (बस्के)
समीर सरवटे (समीर)
कॅनडा
वैशाली कालेकर (आशि)
ऑस्ट्रेलिया
निलेश डोंगरे (चंबू)
निनाद कट्यारे (निनाद)
साजिरा, सदस्यत्व दिल्याबद्दल
साजिरा, सदस्यत्व दिल्याबद्दल धन्यवाद.
पियू, उशिर झाल्याबद्दल
पियू, उशिर झाल्याबद्दल क्षमस्व. आज तुम्हाला उद्योजक ग्रुपात अॅड केलं आहे.
मि तुम्चे निय्म वाच्ले मि लोक
मि तुम्चे निय्म वाच्ले मि लोक रिच्या विन कामाचे वर्ग घेते त्याचि माहिति ह्यात देता येईल का?
अर्चनाअ, हो जरुर. वरील
अर्चनाअ,
हो जरुर. वरील नियम नीट वाचा. स्वतःच्या व्यक्तिरेखेत (प्रोफाईल) नाव, आडनाव, गाव, देश, आणि व्यवसायाबद्दल माहिती प्रकाशित करा. व मग आपल्या जवळच्या विभागातल्या (किंवा तुम्हाला सोयिस्कर असलेल्या) ग्रूपच्या प्रतिनिधिशी संपर्क करून आपला फोन नंबर कळवा.
भ्रमा, मलापण सभासदस्व हवं काय
भ्रमा, मलापण सभासदस्व हवं काय करु त्यासाठी?
मला सभासदत्व मिळावे हि विनंती
मला सभासदत्व मिळावे हि विनंती.
भावना, vishwajit तुमच्या
भावना, vishwajit तुमच्या प्रोफाईलमधे तुम्ही काय व्यवसाय करता / करू इच्छीता ते लिहिले नाही. ते लिहिलेत की सभासदत्व देता येईल.
मला सभासदत्व मिळावे ही विनंती
मला सभासदत्व मिळावे ही विनंती. मी आवश्यक माहिती प्रोफाइल मध्ये लिहिली आहे. पुढे काय करावे लागेल सभासदत्वासाठी?
नमस्कार,
नमस्कार,
हा ग्रुप सुरु आहे का?
मी साजिरा ह्यांना मेल केली आहे. कृपया उत्तर द्या.
Pages