बेडरेस्ट

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 2 August, 2011 - 05:27

वावरात काम करता करता बुडी एकदम चक्कर येऊन पडली. तसा तिच्या भोवती बायांचा घोळका जमा

झाला. एव्हाण कोणीतरी बातमी बुडीचा पोरगा दादुच्या कानावर घातली. तसा दादु पळतच वावरावर

पोहोचला. बुडीचा श्वास तेवढा वर-खाली होत होता. दादुन लगेच बुडीला बैलगाडीत टाकले आणि सऱळ

गावाकडच्या डॉक्टर कडे निघाला. सोबत शेतातल्याच २ बाया घेतल्या. बैलगाडी दवाखान्यापाशी

पोहोचली तसा बूडीचा श्वास मंद झाला. डॉक्टरनी तडक बुडीला शहराकडे न्यायला सांगीतले. तसा दादुही

घाबरला होता. कसाबसा डॉक्टरकडे पोहोचला. पोहोचल्यावर डॉक्टरनी तपासणी केली. काही टेस्ट

सांगीतल्या

डॉ. बाईची ब्लड आणि युरीन टेस्ट करा मग पाहु. काय होते ते.

दादु. वर खाली पाहात. अहो डॉक्टर बुडी हाय हे. युरिन कायले पाहीजे टेस्ट करुन. काही भानगड

असिल तर बर्‍या बोलान सांगा.

डॉ. तुम्ही पहीले रिपोर्ट घेऊन या.

तसा दादु पुन्हा डॉ. मले शरमल्यावाणी वाटते हो.

डॉ. अहो युरिन बुडीच चेक करायचे, त्यात तुम्हाला काय शरमल्या सारखे वाटले.

बर डॉ. जातो, पण बुडीची कायजी घ्यायेले ह्या माया शेजारच्या बायका ठुन जातो अथी.

डॉ. बर बर जा लवकर

दादु शेजारच्या बायांना सांगतो. बुडीच युरिन चेक कर्‍याले चाल्लो. लक्ष ठुवा.

तशी शेजारची बाई कोकलते आत्ताव माय ! बुडीच युरिन बुडात कईचा खपला.

दादु- आत्ता ईचार करायची येळ नाही मी येतो रिपोर्ट घीऊन.

मग शेजारच्या बाया आपाआपसात गप्पा मारतात.

पहीली- बाई यमुने आजकाल काही ईश्वास्च ठेवता येत नाही कूणावरबी.

दुसरी- अव अस कस म्हणत वं.

दुसरी- तरी मले वाटले शेजारचा म्हाद्या हिचेकडे कसा येजा करते.

पहिली - अव म्हाद्या तर निरा पांडूरंगाचा अवतार हाय वं त्यो नशिन यात.

पहिली- मंग तुले काय वाटते. काय ह्युईन बुडीले.

दुसरी- आता काय होणार हाय ५ झाले तरी.

तसा दादु रिपोर्ट घेऊन येतो.

दादु- शेजारच्या बायांना - काय मावशे आतालोक काही झालं नाही ना बुडीले.

पहीली- दादु तु बस पहिले अजुन काय बी झालं नाय.

दादु नर्सला विचारतो हाईत काय डॉक्टर

नर्स- जेवायला गेले येतील १ तासानी

तसा दादु स्वगत येरझारा मारत बडबडु लागतो. बुडीची कुठची हे भानगड. बायकोच्या डिलीवरी वक्तीच

डॉ. नी युरिन टेस्ट करायले सांगीतली व्हती.

तो पुन्हा नर्सला विचारतो- काय ताई- हे पाय रिपोर्ट तुले समजत अशीन तर सांग काय होणार हाय.

कायले सांगतले डॉ. नी युरिन टेस्ट कर्‍याले माहा तर डोक निरा खराब झालं

नर्स- मला येवढ नाही समजत काय झालं ते डॉ. पाहातील.

तसे डॉ. आल्यावर नर्स त्याला आत घेऊन जाते.

डॉ. ध्या ते रिपोर्ट

दादु- घ्या. जी. पण बराबर पायजा काय व्हते ते.

डॉ- बुडीला तपासुन बरं मी आता बुडीला १ इंजेक्क्षण देतो. आणि बुडीले बेडरेस्टची जरुरी आहे. तेव्हा.

बुडीले आराम द्या.

दादु. - बेडरेस्ट.

डॉ. हो बेडरेस्ट. आणि उद्या परत आणा दाखवायला. सध्या बुडीले काही सांगु नका, आराम

करुद्या.

दादु- बर बरं. हं बिल दिऊका.

डॉ. द्या त्या नर्स जवळ- बर- जाताना डॉ. सहज दादुच्या हातात हात घेतात.

दादु. अहो डॉ. इतल्या लवकर अभिनंदन.

डॉ. अहो सहज केलं हो. शेक हँड

दादु बुडीला घरी घेऊन जातो. तसे बायकोलाही सांगतो. आव आयकलका बुडीले बेडरेस्ट सांगतली तवा

वावरात तु जाजो

दादूची बायको - अव माय वं

दादू- आण बुडीले सांगू नको

बायको- बरं

बूडी- अव सुनबाई मी आज बावरात जातो. आता थोड जिव बरा हाय. लय घाबरला होता त्या रोजी.

सुनबाई- जी काय नका जाऊ. डाँ. नी तुमाले बेडरेस् सांगीतली हाय.

बूडी- मले कायची बुहारीनले बेडरेस्.

सुनबाई- अव थांबा अजुन थोड. काय व्हणार हाय ते डॉ. सांगणार हाय २ दिवसात.

बूडी- तुव डोक्स ठिकाणावर हाय की नाय.

तेवड्यात दादु येतो.

दादु- अव सही सांगतेय हेव.

बुडी- चाल बर त्या डॉक्टर क्डे त्याच मुस्काड फोडीन,

दादु- चालं

दवाखान्यात गेल्यावर-

दादु- बघा डॉ- तुमी सांगतल्या प्रमाण म्या केलं बुडीले काय व्हतं ते सांगा आता.

बुडी- काय म्हणता डॉ- मले बेडरेस, आण काय व्हतंय सांगणार हाय. अव कायच्या कै.

डॉ- अहो आजी अस काय करता, तुम्हाला मी आराम करायला सांगीतला. युरिन आणि बेडरेस्ट सांगीतली

म्हणजे काही होणारच असं नसते.

दादू- छ्या माय्ला म्या वेगळ समजलो डॉक्टर.

डॉ. बरं बरं- पण बुडीले अजुन १० दिवस बेडरेस्ट द्या............ समजले- मग काही होणार नाही.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

.

मुकु, चांगली झाली सुरवात पण शेवट काही जमला नाही. परत एकदा खुलवुन लिहिता येइल. बरेचसे संदर्भ विस्कळीत वाटताहेत. प्रयत्न चांगला आहे. लिहित रहा.

युरीन टेस्ट फक्त प्रेग्नंन्सी चेक करण्यासाठीच करतात असा समज असल्याने डॉक्टरने म्हातारीची टेस्ट सांगितल्यावर सगळ्याना म्हातारी प्रेग्नंट आहे असेच वाटते. अशी गम्माडी जम्मत होते पण वाचकाला हसायची संधी न देता आपल्याच तोर्‍यात मिरवणारा अस्सल विनोदी बाज हाच या कथेचा आत्मा असल्याने, वा! छान न हसवता विनोद साधणारी आहे कथा! असाच प्रतिसाद द्यावासा वाटतो. आवडली. सुरेख लिखाण!

माझ्या ओळखीचा एक माणुस होता. त्याची आई वारली. डोक्यावरचे सगळे केस उतरवुन जेव्हा तो कामाला आला तेव्हा आम्ही रितीप्रमाणे ( चवकशी ) केली.

काय वय होत ?

शंभरच्या आसपास

तुझ आता वय काय

चाळीस

आई म्हणजे तुझीच आई होतीना ? कारण गावाकडे आज्जीला मोठी आई म्हणण्याची पध्दत असते. मी विचारल.

यावर तो त्याची सख्खी आई वारली या मतावर ठाम दिसला.

आभार सर्वांचे !!!
ह्.बा. यांनी केलेले विश्लेषण छानच आहे. मान्य आहे विनोद लिखानात शब्दा शब्दावर हासवता आले नाही.
ह्.बा. यांचे विशेष आभार.

विनोद वाक्या वाक्यावर हसवणारा असायलाच हवा असं काही नाही... मला आवडली, अशा काही कथा नाटक किंवा लघुपट रुपात मांडल्या कि फार मज्जा येते. मी इमॅजिन केल मला मज्जा आली.

दादू, गावातल्या बायका, त्यांची कुजबुज.. डॉ.. आणि सावळा गोंधळ.. वेल डन.!!!