रसग्रहण स्पर्धा - अकथीत सावरकर - लेखक मदन पाटील

Submitted by केदार on 2 August, 2011 - 23:57

अकथीत सावरकर
लेखक मदन पाटील
प्रकाशक - जिजाऊ प्रकाशन
मुल्य - ३०० रू
प्रथमावृत्ती - २३ मार्च २०११

खरेतर लेखक आणि प्रकाशनाचे नाव पाहून मी पुस्तक विकत घेणार नव्हतो कारण दोहोंवरून त्याची दिशा नक्की झाली होती, केवळ ब्राह्मणांचा तिरस्कार करणारे लेखन. तरी धीर धरून हे पुस्तक घेतले, म्हणलं सावरकरांबद्दल जे आधी कळाले नाही ते वाचायला मिळेल.
प्रस्तावना वाचली आणि हतबुद्ध झालो, सावरकरांवर बोलायच्या ऐवजी संघ, ब्राह्मण, टिळक, आर्य, वैदिक ब्राह्मण, जिनोम प्रोजेक्ट व त्याची भलतीच माहिती आणि मुस्लीम आज देशात का जास्त झाले ह्याचे श्रेय (अर्थातच ब्राह्मणांना) आणि गांधी हत्या व त्यातून होणार्‍या ब्राह्मण समाजाच्या सामूहिक हत्यांबद्दल चे जोरदार समर्थन (उदा " वाघाप्रमाणे खवळलेल्या जनतेंन जी कृत्यं केली, ती इतकी नैसर्गिक व शंभरातील नव्याण्णव बाबतीत अचूक होती की, देशातील बहूजन समाजाचं डोक व हिम्मत अजून शाबूत आहे हेच सिद्ध झाले" हे वाचून मला लेखकाची किव करावीशी वाटली. हे वाक्य ज्या गोर्‍यांनी लिहिले त्यांनी कदाचित आज मी चुकीचे बोललो असे विधान केले असते, पण ही व अशा कोट करून हे पुस्तक चालू होते. पेशन्स ठेवून पुढे वाचायचे ठरविले.

एक भन्नाट उदाहरण, ते (पाटील) म्हणतात की "सावरकरांना अभिप्रेत असलेला हिंदू धर्म म्हणजे वैदिक धर्म होय" आता ज्या माणसाने थोडेफार सावरकर वाचले आहे त्याला कळेल की सावरकर म्हणाले, "श्रृती-स्मृती इ ग्रंथानां आज अवास्तव महत्त्व द्यायचे कारण नाही" ," गाय हा पशू आहे, पशू सारखे वाटले तर मारावे व खावे", "पंचंगव्याला जे महत्त्व देतात ते माणसाला पशू हून हिण वागवतात व पशूला देवस्थानी माणतात", " गायीच्या शरीरात जर ३३ कोटी देव असले तर, एखाद्याने जर सहज तिला काठी मारली तर पाच पन्नास देव धारातिर्थी पडायचे, हे कसे परवडेल? आणि तो देवच काय जो स्वतःचे रक्षण करू शकणार नाही?" "गायीच्या पोटात हा देव, पाठीत हा देव इतकेच काय पायात हा देव असे माणने म्हणजे देवालाही पशूपेक्षा हिण समजणे हे होय", ही सर्व वाक्य सावरकरांचे आहेत, माझे नाहीत. जो माणूस असे लिहू शकतो त्याच्या हिंदूत्वाचा कल्पनेला वैदिक म्हणता येईल का? केवळ ब्राह्मण आहे म्हणून उचलली जीभ असे कसे करता येईल?

दुसरे एक महान वाक्य म्हणजे "सावरकरांच्या लिखाणातून बहुजन दु:स्वास स्पष्ट दिसून येतो आणि स्वजातीयांची वारेमाप भलावण व कौतूक द्सितं." काय म्हणावे ह्याला हे काही कळत नाही. अहो ज्या माणसाला खुद्द गांधी पण म्हणाले की तुम्ही जे काम रत्नागिरी, नाशकात केलं त्याला तोड नाही, कित्येक देवळ, पानवटे हे अस्पृश्यांना खुले केले ते पाटीलांना दिसत नाही वा केवळ जातीमुळे मान्य नाही. अहो खुद्दा सावरकर सत्यनारायण घालायला नको कारण त्याची गरज नाही असे म्हणत होते हे पाटील विसरले! पुढे ते म्हणतात की "काही नाटकांचे प्रयोग लोकांनी बंद पाडले ह्यावरूनच त्यांचं सामाजिक लेखन बहुजन संमत नव्हत हे दिसत", अरे बा पाटला, जो माणूस सर्वणांविरुद्ध खुद्द ब्राह्मण असून आवाज उठवत होता, त्याला सर्वण विरोध करणारच. की ते सत्यनारायणविरोधी नाटक पाहायला ज्यांना दोन वेळचे जेवन मिळत नव्हते ते अस्पृश्य येणार? उलट बा पाटला तू दोन्ही वाक्ये सलग मांडून ती दोन्ही परस्परविरोधी आहेत हे तुज कळले नाही असे खेदाने म्हणावे वाटते.

पुढे पहिल्या प्रकरणात पाटील गाजलेल्या उडीचा आढावा घेतात. ह्या उडी बद्दल अनेक प्रवाद आहेत. धनजंय कीर (चरित्रकार) जरी ही उडी महान होती असे मांडत असले तरी खुद्द उडी तितकी महान नव्हती हे य दि फडके म्हणतात, ज्यावर सावरकरांनी मौन बाळगले व आम्हास य दिं फडक्यांचे म्हणणे पटते. पण ही उडी लाक्षणिक दृष्ट्या महान होती असे आमचेही मानणे आहे कारण ह्यात खुद्द क्रिया (म्हणजे उडी) जरी महान नसली तरी ज्या रितीने तिचा प्रसार व प्रचार झाला. ब्रिटीशांना कोणी असेही टक्कर देऊ शकते हेच त्यातून साध्य झाले त्यातून अनेक क्रांतीकारक जन्माला आले हे सत्य कसे नाकारता येईल? पाटलांनी नेमके हेच नाकारले आहे. ब्राह्मण लेखकाबद्दल ते पुढे म्हणतात की " एका सामान्य दर्जाच्या कृतीला आंतरराष्ट्रीयख्यातीची कृती ठरवणे आणि तिचे बेसुमार उदात्तिकरण करणं, ह्यामागे "जातीनिष्टा" ही एकच बाब असल्याचे दिसून येते" अहो पाटील, अहो जरा य दि फडके वाचा हो, आणि ते ही ब्राह्मणच आहेत तरी त्यांनी ही उडी सामान्य होती पण तिच्यामुळे जे बुडबुडे निर्माण झाले ते असामान्य होते असे मांडले आहे.

पुढे ते म्हणतात की १९०७ साली जो माणूस मुस्लीम हिंदू भाई भाई म्हणतो, तो पुढे अचानक हिंदूत्वाकडे का वळतो? त्यांनी वैचारिक कोलांटउडी मारली असे लेखक म्हणतो. जे त्याचा दूरदृष्टीला कळाले नाही ते आम्ही इथे सांगू इच्छितो. सावरकरांनी १८५७ चे बंड पुनः जागृत केले व त्याला स्वातंत्र्य समर हे नाव दिले. त्याची प्रसिद्धी केली, इतकी की हे पुस्तक ज्या कडे मिळेल त्याला तुरूंगात जावे लागत होते. ह्या बंडाला त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक आयुध म्हणून वापरले. बहादुरशहा जफरचा एक शेराचा त्यांनी फारच प्रचार केला तो म्हणजे
"गाझियोमें बू रहेगी जबतलक इमान की,
तब तो लंडनतक चलेगी तेग हिंदूस्थान की "
तेंव्हा सावरकरास उर्दू माहिती नव्हते. गाझी म्हणजे मुस्लीम योद्धा, जो धर्मासाठी व मुस्लीम राष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण करतो, अल्लाचेच राज्य स्थापण्यात झगडतो. होमवर्क म्हणून आमची पाटलांना विनंती आहे की बहुजन समाजातीलच एका लेखकाने, श्री शेषराव मोर्‍यांनी लिहिलेले, "१८५७ चा जिहाद" हे पुस्तक वाचावे. लेखक ब्राह्मण नाही, त्यामुळे कृपया वाचाच असा आग्रह. मग आपल्याला कळेल की ही कोलांटौडी का? उर्दूत एक शब्द आहे दार-उल-इस्लाम व दार-उल-हरब . दार-उल-हरब म्हणजे हे इस्लामचे राज्य नाही असे येथील मुस्लीमांचे म्हणने आहे व होते. त्यामुळे १८५७ च्या पत्रांमध्ये तसे उल्लेख आहेत जे शेषराव मोर्‍यांनी व्यवस्थित मांडले आहेत.

बरं हे अजून एक बघा, " प्रामुख्याने उत्तर भारतात झालेल्या उठावात किती हिंदू सहभागी होते, ते पाहिलं तर मोजकी नावे समोर येतात, नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि मंगल पांडे. सावरकरांनी ह्या सर्वांना रणदेवता, संग्रामदेवता असे गौरविले आहे आणि ते सगळे ब्राह्मण आहेत" असे मांडून पुढे लगेच आम्ही वरच्या प्यारात जे म्हणत आहोत तेच ते मांडतात, " दार-उल-इस्लाम" चा विचार स्वत्;च्या ताकदीवर अंमलात आणंण मुस्लीमांना शक्य नव्हतं, त्यासाठी त्यांना हिंदूंची मदत लागणार होती, परंतू हिंदू माणसिकता तेवढी कडवी नव्हती हे उठाव कर्त्यांना ठावूक होते" आता घ्या. दोन्ही कडून आपलीच टिमकी अन वर परत ब्राह्मणांना मोठे केले म्हणून ओरडा.

एके ठिकाणी अजून एक गमतीदार वाक्य बघा, " प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ आणि 'रामदास हे शिवरायांचे गुरू नसून अदिलशहाचे हेर होते' असे पुराव्यानिशी हायकोर्टात सिद्ध करणारे प्रा मा म देशमुख ह्यांच्या मते, सावरकरांना अवघे दोन आठवडे कोलू ओढण्याचं काम दिलं गेलं. आणि काथा कुटण्याचे काम अवघं महिना भर दिलं गेलं." अशी कष्टाची काम बहुजनसमाजातील महिला देखील शेतात नांगरणी करताना विना थकवा करतात.

आता ह्या वाक्यातून महाशय दोन उद्दिष्ट साध्य करतात ब्राह्मण रामदास अदिलशहाचा हेर होता, हे त्यांना इथे सांगायचेच आहे, अन्यथा ह्या वाक्याची गरजच नव्हती पण ते सावरकरांवर वरील आरोपही करतात की त्यांना तेवढी सजा नव्हतीच म्हणे कारण मा म देशमुख तसे म्हणतात म्हणे! शिवाय हे काम महिला देखील करते ते सावरकरांनी कधी कधी केले व त्याचा प्रचार केला!! अहो पाटील किती तो द्वेष! अन लगेच पुढे सावरण्यासाठी ते लिहितात, "दिल्ली दरबार महोत्सवाची तयारी चालू होती तेंव्हा कैद्यांना वर्षाला १ महिन्याची सवलत (म्हणजे सावरकरांना ५० महिने) मिळणार होती, पण सावरकरांकडे एक आक्षेपार्ह पत्र सापडल्यामुळे तीन महिने एकातंवासाची शिक्षा दिली व सात दिवस हातकडीत राहण्याची शिक्षा दिली." म्हणजे वरच्या प्यार्‍यात शिव्या द्यायच्या व लगेच खाली असे लिहायचे. पण पाटील तुम्हाला एक कळतं का? की ही अशी शिक्षा कधी होते? तर इंग्रजांविरुद्ध कोठडीतून काही तरी केले म्हणून. उलट तुम्ही वर तर इंग्रजांनी त्यांना सवलतीत राहायला दिले असे म्हणता अन हे ही लिहिता? अहो काही तरी एकावर राहा. म्हणजे एकीकडे सावरकरांच्या शिक्षा कश्या साध्या असताना ब्राह्मणी प्रचारकांनी गवगवा केला हे म्हणायचे व पुढे लगेच नाही हो, त्यांना एकांतवासाशी शिक्षा केवळ पत्र सापडल्यामुळे झाली हे ही म्हणून मी तसा द्वेष करत नाही बरं हे ही साध्य करायचे.

एके ठिकाणी पाटील म्हणतात की "सावरकरांनी ने मजसी ने" हे गीत कोठडीत लिहिले कारण आपल्या जीवनाकडे (भविष्याकडे) पाहून ते उदास झाले, त्यांनी मृत्यूपत्र तयार केले त्या उदासीतच हे गीत लिहिले. आम्ही पाटलांस मराठी काव्याचे धडे गिरवायला पाठवावे असे इच्छितो. कारण ते काव्य ब्रायटन इथे लिहिले आहे, तेंव्हा मदनलाल धिंग्रा एपीसोड चालू होता, अशातच त्यांना त्यांचा मुलगा वारल्याचे पत्राने कळले म्हणून त्यांनी " तो बाल गुलाबहि आता रे फुलबाग मला हाय पारखा झाला ॥ सागरा प्राण तळमळला" अशी रचना केली. ज्यांना साधे हे गीत कधी व कुठल्या परिस्थितीत लिहिले गेले हे माहिती नसते त्यांनी पुस्तक लिहिण्याच्या अट्टहास का करावा? हे कळले नाही.

आणखी एके ठिकाणी ते म्हणतात, " सावरकरांनी आपली लेखणी राबविली ती खुज्यांचं कौतूक करण्यासाठीच. चंद्रगुप्ताला दासीपुत्र, धनानंदाला भेकड, जुलमी रंगवून आणि पळपुट्या चाणाक्याला मात्र राष्ट्र निर्माता ठरवून सत्य इतिहासाचा मुडदा पाडला" ह्यावर मी टिपण्णी करणार नाही कारण ह्या विषयावर भरपुर साहित्य उपलब्ध आहे. खोट कोण लिहितं ते वाचल्यावर कळेल. आणि शिवाजीची आठवण त्या काळच्या मृतप्राय जनतेत सतत तेवती ठेवली ती सावरकरांनी हे मात्र पाटील विसरतात.

इतर अनेक शुल्लक घटनांना देखील त्यांनी बाऊ करून मांडले आहे. गांधी हत्या, संघ इत्यादी मध्ये ते कुठेही ब्राह्मणाला शिव्या देण्याचे कमी करत नाहीत. इतकेच नव्हे तर सावरकर क्रांती कारक की इंग्रज मित्र? असा प्रश्न ते विचारतात. आम्ही त्याचे उत्तर देत नाही, गरज वाटत नाही पण पूर्ण पुस्तकच असे विरोधाभासाने व केवळ बाम्हणद्वेषाने भरले आहे. इतकेच काय त्या कुठल्याश्या जिनोम प्रोजेक्टने म्हणे ब्राह्मण हे आर्य असल्याचे सिद्ध झाले आणि ते युरोशियनच आहेत असे मत टिळकांपासून अनेक ब्राह्मणाचे होते असे लेखक म्हणतो. टिळकांच्या काळी मॅक्समुलर मुळे आर्य बाहेरून आले हे सर्वमान्य होते, तो इंग्रजी प्रचाराचा एक भाग होता, पण पुढे जाऊन हडप्पा-मोहंजदाडोचा शोध लागल्यावर (१९२१) ते आजपर्यंत अनेक नवीन संशोधन होऊन ही थेअरी बाद असल्याचे निष्पन्न होत आहे, तरी लेखकू जुन्याच थेअरीस कवटाळून बसले आहेत व ब्राह्मण हे बाहेरचे आहेत असे प्रतिपादत आहेत.

आम्ही ब्राह्मण आहोत म्हणून आम्हास ते खपले नाही असा कीव करण्याजोगा विचार कृपया करू नये तर आम्ही केवळ पुस्तक परिचय घडवून देत आहोत. पुस्तक परिचय का? तर पुस्तक कसे लिहू नये? ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक होय. सावरकरांचे विचार खोडायला काहीच हरकत नाही पण ते जातीय चष्मा लावून पाहू नये. सावरकर व्यक्ती म्हणून पाहावे व सारासार विचार करून त्यांचे विचार खोडावेत असे आम्हाला वाटते. पुढे असे पुस्तक पाटलांनी लिहिले तर आम्ही त्याचे स्वागतच करू. तूर्तास पाटील जातीय द्वेष वाढीस लावत आहेत असे मात्र आम्ही म्हणू इच्छितो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे थांबवा..
ऊगीच भलीतकडे विषय न्यायलाच हवा का? केदार ने पुस्तक वाचलं त्याचं रसग्रहण केलं तो रस थोडा कडू आहे ईतकच! या बा.फ. वर ईथेच ते थांबवायला हवय.
कदाचित जशी मूळ लेखकाच्या हेतूबद्दल शंका आहे तशीच हे खुपणारे पुस्तक निवडून त्याबद्दल ईथे लिहीणे यामागे केदारचा नेमका हेतू काय अशी शंका रास्त आहे.. पण त्याचे ऊत्तर केदारच्या रसग्रहणातील शेवटच्या परिच्छेदात आलेच आहे.
माझी मूळ सूचना/विनंती ही निव्वळ या बाफ च्या पुढे जावून हे रसग्रहण आणि त्या अनुशंगाने वाचकांच्या प्रतिक्रीया लेखक्/प्रकाशकापर्यंत पोचवाव्यात या हेतून केली होती. त्यामूळे बहुदा एकंदर बाफ भलतीकडे भरकटला? Sad

अशोक,
तुमची पोस्ट वाचून बरे वाटले. मा.बो. वर अशी स्पष्ट पोस्ट सहसा वाचनात येत नाही.

बंडुपंत कुठेतरी हा निषेध नोंदवायलाच हवा ह्या मताचा मी आहे. वर्तमानपत्रातून पत्र छापायचे म्हणले तर ते वर्तमानपत्रवाले घेणार नाहीत ह्याची खात्री आहे. ब्रिगेडवाल्यांना बोलून काहीच फायदा नाही हे ही माहिती आहे.
अशी पुस्तक अनुल्लेख करावीत असे खूप जण म्हणत असतात, पण किती पुस्तकांचा अनुल्लेख करायचा. उलट ज्याला माहिती आहे त्यांनी अशा पुस्तकांचा विरोध (भांडारकर सारखा नाही) करावा. सावरकरांवरच काय सगळ्या ब्राह्मण नेत्यांवर योग्य ती टिका जरूर करा, ती वाचायला सगळे तयार आहेत. पण हे म्हणजे जरा अतिच आहे असे वाटते.

गेलात ना जातीवर???? अत्यंत रुचीहीन कमेंट!!! >>>

हो कारण माझा मागचा अनुभव असाच आहे. तरी बेफकिर आपणास तसे म्हणायचे नव्हते ह्या हे मला उशीरा कळाले त्या बद्दल दिलगीर आहे. खरचं मनापासून.

बाकी मृ जेंव्हा जातीवर लोक जात होते तेंव्हा तू कधी रुचीहीन कंमेट म्हणून पोस्ट नाही टाकलीस? आणि ज्यांनी हे रुचीहीन लेखन केले त्याबद्दल आपले काय मत?

केदार, रसग्रहण ची स्टाईल आवडली नाही. 'हा मुर्ख बघा काय आणी कस चुकीच लिहितोय' हा सूर सतत जाणवला. रसग्रहण माझ्या मते

१) वापरलेली भाषा व त्यावरचे लेखकाचे प्रभुत्व,
२) विशयाची माण्डणी व त्याचा एक वाचक म्हणुन तुझ्यावर झालेला परीणाम,
३) विषयातील दाखल्यांची सत्यासत्यता
४) विषय माण्डणीमागे लेखकाचा उद्देश
५) लेककाचे वाचकासंदर्भात असलेली अध्यारुते

ई अपेक्षीत होते. हे बरेचसे तुझ्या लेखात असले तरी अंतस्थ सूर खटकला जरी हे पुस्तक संपुर्ण विपर्यास असले तरीसुधा.

कारण सांगते, तुझं आधीचं लिखाण वाचल्यावर, काही ठिकाणी चर्चेच्या ओघात तुझ्याकडून लिहिल्या गेलेल्या, 'मी जात-पात यावर विश्वास ठेत नाही' (अशा अर्थाचं) वाचल्यावर तुझ्याकडून वरचं वाक्य बघून सखेद आश्चर्य वाटलं. बाकीच्यांनी केलेल्या जातींवरच्या निगेटिव्ह कमेंट्सबददल बोलले नाही कारण त्या माझ्या दृष्टीनं आगापीछा नसलेल्या, बिनबुडाच्या आणि फारसा विचार न करता लिहिलेल्या कमेंट्स होत्या. (म्हणजे मला त्या तशा वाटल्या.) त्यांना फारसं महत्त्व द्यावं असं वाटलं नाही. असो,

यावरची तुझी दिलगिरी भावली. त्यामुळे वाद वाढवायची इच्छा नाही.

योग,

<<<पण त्याचे ऊत्तर केदारच्या रसग्रहणातील शेवटच्या परिच्छेदात आलेच आहे.>>>

असे आपण म्हंटले आहेत, पण एक विनंती की कृपया खालील परिच्छेद बघावात!

<<<आम्ही ब्राह्मण आहोत म्हणून आम्हास ते खपले नाही असा कीव करण्याजोगा विचार कृपया करू नये तर आम्ही केवळ पुस्तक परिचय घडवून देत आहोत. >>

येथे 'आम्ही' या शब्दाचेच प्रयोजन समजले नाही. पण ते असो, 'पुस्तक परिचय' करणे हा 'केवळ' उद्देश असल्यास ही प्रवेशिका रसग्रहणाची नसून परिचयाची आहे हे मान्य होऊ नये काय?

<<<पुस्तक परिचय का? तर पुस्तक कसे लिहू नये? ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पुस्तक होय.>>>

हे विधान सापेक्ष आहे. मी (उदाहरणार्थ) असे हिंदूबद्दल म्हणतो.

रसग्रहण इज 'ट्रान्स्लेटिंग द ज्युसेस फॉर दोज हू डोन्ट हॅव टन्ग दॅट हॅज बॉडिली कनेक्शन विथ माईन्ड'!

<<< पुढे असे पुस्तक पाटलांनी लिहिले तर आम्ही त्याचे स्वागतच करू. तूर्तास पाटील जातीय द्वेष वाढीस लावत आहेत असे मात्र आम्ही म्हणू इच्छितो.>>>

हे मतप्रदर्शन आहे व रसग्रहण नाही असे आपले माझे नम्र मत आहे.

आता 'केवळ वाद वाढवायचा' म्हणून नव्हे (म्हणजे त्यासाठी तर नव्हेच) कृपया सांगा की 'अरे थांबवा' हे आपण का म्हणालात? Happy

राग मानू नयेत ही विनंती!

-'बेफिकीर'!

(आपण म्हणाल्यास ही माझी अंतिम पोस्ट) Happy

मी स्वत जात पात माणत नाही हे खरेच आहे. पण परत एकदा सांगतो मी केदार "जोशी" आहे म्हणून लोकांनी माझ्या मुद्याला जातीय रंग मायबोलीवर दिलेला आहे. ह्यात माझ्याकडून नाही तर चूकी वाद घालणार्‍या आयडींकडून झालेली आहे. मग ह्या बाफवरही तसेच कोणी करणार नाही, ह्याची अपेक्षा मी कशी ठेवू शकतो. शिवाय मी लिहिलेला लेख ही जातीयरंगाने जाणारा आहेच, मग केवळ ब्राह्मण माणसाने ब्राह्मणाविरूद्ध लिहिलेल्या लेखावरची प्रतिक्रिया यायला किती वेळ लागला असता? (अशी प्रतिक्रिया देणारे लोक जातीवरून काँमेट करतात. विपूत वाटल्यास कोण कोण अशी कंमेट करते ते सांगू का?)

बाकी आश्चर्याची पाळी माझी आहे. कारण माझा स्टॅन्ड तुला माहिती असताना व मागील अनूभव वाचून माहिती असताना पण तुझ्याकडून अशी कंमेट येणे ह्याचे जास्त आश्चर्य वाटले. परत तुझी कंमेट ही लिखानाला नसून कंमेटवर कंमेंट अशा प्रकारची आहे. तसे असले असते (म्हणजे त्या पाटलांचा निषेध करून, माझाही निषेध) केला असतात तर मला त्या कमेंट बद्दल अजिबात दुखः , आश्चर्य वाटले नसते.

बाकी कोण माझ्याबद्दल काय विचार करते ह्यावरून मी कसा आहे हे कसे ठरेल? त्यामुळे मलाही वाद घालायचा नाहीच. तुझे मत तसे असू शकते.

येथे 'आम्ही' या शब्दाचेच प्रयोजन समजले नाही >> बेफिकीरा कृपया रसग्रहण वाचा. आम्ही हा शब्द प्रयोग खूप लोक वापरतात. तो स्वतःसाथी ष्टाईल म्हणून वापरलेला असतो. आम्ही मध्ये ब्राह्मण नाहीत. ब्राह्मण गेल उडत!! मग तर बास?

बेफिकीरा कृपया रसग्रहण वाचा. >>. तेच शोधतोय. (दिवा)

आम्ही हा शब्द प्रयोग खूप लोक वापरतात.>>> कबूल आहे.

तो स्वतःसाथी ष्टाईल म्हणून वापरलेला असतो. >>>> ओके

आम्ही मध्ये ब्राह्मण नाहीत.>>>>> Lol

ब्राह्मण गेल उडत!! >> सहमत आहे.

मग तर बास?>>> अगदी! Happy

बेफिकीरा कृपया रसग्रहण वाचा. >>. तेच शोधतोय. (दिवा) >>> परत तेच !! अहो माझे रसग्रहण हे रसग्रहण नाही हे तुम्ही सांगण्याची जरूरी नाही, ते नाही हे मलाही माहित आहे. पुस्तक परिचय आहे.

तुम्ही बाकी महान लोकांनी केलेली रसग्रहण वाचा, त्यात आम्ही हा शब्दप्रयोग वारंवार असतो. असो. वाचन (तशा पुस्तकांचे) तर हा प्रश्न पडला नसता. ~ दिवा !

परत तेच !! अहो माझे रसग्रहण हे रसग्रहण नाही हे तुम्ही सांगण्याची जरूरी नाही, ते नाही हे मलाही माहित आहे. >>>

अहो तुम्ही खालील शीर्षक दिलेत म्हणुन म्हंटले, राग मानू नयेत, पुस्तक परिचय म्हंटल्यास 'तुमच्या बाजूने तुटून पडू' ही खात्री बाळगावीत. Happy

रसग्रहण स्पर्धा - अकथीत सावरकर - लेखक मदन पाटील
केदार | 2 August, 2011 - 23:57

=====================================

तुम्ही बाकी महान लोकांनी केलेली रसग्रहण वाचा, त्यात आम्ही हा शब्दप्रयोग वारंवार असतो. असो. वाचन (तशा पुस्तकांचे) तर हा प्रश्न पडला नसता. ~ दिवा !

रसग्रहणे मधील 'णे' ऐवजी 'ण' आले आहे व 'असते' किंवा 'केले असतेत' यापैकी एक शब्दप्रयोग राहिला आहे व त्यातील कोणताच 'टायपो' नाही असे मात्र मी म्हणणार नाही व अशोकरावांना शब्द मागे घ्यायला लावणार नाही याबाबत आश्वस्त असावेत आणि दिवा घ्यावात. Happy

महान लोक ज्या पुस्तकांची रसग्रहणे करतात ती पुस्तकेच हातात धरवत नाहीत तर रसग्रहण कसले हो? Lol

-'बेफिकीर'!

अशोकरावांना शब्द मागे घ्यायला लावणार नाही याबाबत आश्वस्त असावेत आणि दिवा घ्यावात >>> दिवा कशाला?ते खरेच आहे. माझ्याबाबतीत (भाषेसंबंधी) टायपो कमी आणि अज्ञान जास्त आहे. खरे तर तुम्ही मुदा १ की दोन मध्ये तसे अशोकरावांना उद्देशून लिहिले परत द्विरूक्ती कशाला? जे खरे ते खरेच की!

विषयावर (पुस्तकाबद्दल) काही बोलायचे असेल तर बोलू पण उगाच व्यर्थ पोस्टी दवडण्यात अर्थ नाही.

धन्यवाद.

>> त्या पुस्तकावर इथे (सविस्तर) लिहून त्याचे महत्व वाढवित आहात
अनुमोदन. 'रसग्रहण' मध्ये किंबहुना 'वाचू आनंदे' मध्ये तरी या पुस्तका बद्दल काही लिहावे इतकी त्या पुस्तकाची अर्हता आहे असे वाटत नाही. त्या पुस्तकाकडे एरवी कुणी ढूंकूनही पाहिले नसते त्याला उगाच प्रसिद्धी कशाला? एखाद्या जातीबद्दल किंवा धर्माबद्दल विद्वेश पसरविणारी अशी अनेक चोपडी असतील. त्यातले नेमके हेच निवडण्यामागचे प्रयोजन कळले नाही.

>>आणि गांधी हत्या व त्यातून होणार्‍या ब्राह्मण समाजाच्या सामूहिक हत्यांबद्दल चे जोरदार समर्थन.
गांधी हत्येनंतर झालेल्या ब्राम्हणविरोधी दंगली आणी १९८४ किंवा गोध्रा घतनेनंतर झालेल्या दंगली या सर्वच निषेधार्ह आहेत हे आपल्यास मान्य आहे का?

अहो मुद्दामहून निवडलेले अजिबात नाही. भारत भेटीत अनेक पुस्तके घेतली त्यात हे. आणि परवा सोमवारी फ्लाईट मध्ये हे पुस्तक वाचायचा मुहूर्त लागला. डोक्यात विचार होते ते काल मंगळवारी मांडले. तुम्ही म्हणता तसे प्रयोजन वगैरे बाळगून निदान मी तरी गोष्टी करत नाही. आधी वाचू आनंदेच निवडले, पण नेमके रसग्रहण स्पर्धाही होती म्हणून तिथे लिहिले. ते पण शेवटच्या क्षणी तसे वाटले व स्पर्धेत निवड होणे हा भाग नसून जे मान्यवर परिक्षक आहेत, त्यांची साहित्यिक लोकात उठबस होते त्यातून ते अशा विषयांवर वाचा फोडू शकतात, वर्तमानपत्रातून लिहू शकतात, अशी भावना ठेवून हे इथे लिहिले आहे. वाचू आनंदे मध्ये लिहिले तर असे लिखाण करू नये असे जे मी मांडत आहे ते फक्त ५-५० लोकांपुरते मर्यादित राहील,

पुस्तक प्रसिद्धी होईल ही भीती निराधार आहे. जे वाचक असतात, ते वाचतात. मी त्या विचारांचा नसून ते पुस्तक घेऊन वाचलेच ना? पुस्तक आहे. छापलेले आहे, फडतूस असले तरी ते आहे, पण त्यावर लिहू नका, मायबोलीवर असे लिखाण येऊ नये, माझ्या लिखाणामुळे इथे जाती द्वेष वाढेल वगैरे ऐकून आता मला अंमळ गंमत वाटू लागली आहे.

पुस्तकाची अर्हता आपण कोण ठरवणार? प्रत्येक पुस्तकाला एक वाचक वर्ग असतोच असतो. उलट अशा पुस्तकांची दखल घेऊन उगाच साप समजून भुई थोपटणार्‍यांना वेळीच उत्तर प्रिंट मिडीया मधून द्यावे, मी मायबोलीवर येतो म्हणून इथे दिले. रादर इथे कोणी जातीयभांडण करत नाही हे अजून लक्षात आले नाही, पण हे इथे यायला नाही पाहिजे वगैरे ही पोलीसगीरी असह्य आहे. असो तुमच्या आधीही लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या, त्याला उत्तर म्हणून ही प्रतिक्रिया. लोकाग्रह असेल तर हे लिखाण आपण अ‍ॅडमिनला सांगून काढून टाकू शकता. मी सांगणार नाही!

१९८४ किंवा गोध्रा घतनेनंतर झालेल्या दंगली या सर्वच निषेधार्ह आहेत हे आपल्यास मान्य आहे का? >>> हा प्रश्न तुम्ही मुद्दाम विचारला आहे हे मला माहित आहे. ह्या प्रश्नाचा आणि पुस्तकाचा काही संबंध नाही. उगाच टॅन्जंट जायचे.

उत्तर हो निषेधार्ह आहे. ह्याच नाही तर कुठल्याही दंगली, जाळपोळ, बॉम्बस्फोट हे सर्व निषेधार्ह आहे. जिथे जिथे माणूस उगीच मरतो ते सर्व निषेधार्ह आहे. . पण जर कोणी मला मारीत असेल तर त्याला मी मारणे हे कधीच निषेधार्ह नसते. त्याला बचाव म्हणतात.

इथे बर्‍याच वेळा फुकट प्रसिद्धी मिळत आहे असा उल्लेख केला गेलाय. केदारच्या मुद्द्यानुसार परत, केदारनी वाचलय तसे इतर वाचक सुद्धा वाचतील. त्यांनी (इतर वाचकांनी) त्यांचे डोकं वापरुन, लेखकानी विपर्यास केला आहे समजून दुर्लक्ष केलं तर तो त्यांचा प्रश्न आहे पण जर केदार ला वाटलं की ही विचारसरणी पसरू नये आणि त्या करता जर त्या पुस्तकाती मुद्द्यांचे खंडन करत त्यानी लेख लिहीला तर ते लगेच त्या पुस्तकाला प्रसिद्धी देणं कसं काय होतं?
तुम्ही ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवत आलातच की इथे पोस्ट पाडायला. पोस्टींच्या संख्येमुळे बाफं प्रसिद्ध होतो त्यामुळे इथे येऊन उगाच पोस्ट टाकून तुम्ही त्याच्या प्रसिद्धीला हातभारच लावत आहात.
कोणी बाफं उघडून लगेच अशी प्रसिद्दी झाली असती तर मग काय राहतं? एक तर त्यानी आधीच "वाचू आनंदे" मधे टाकतो असं आधीच सांगितलय तर मग त्यानंतर उगाच हे प्रसिद्दी वगैरे बद्दलची शेरेबाजी कशाला? आवरा आता.

मलातरी हा लेख (रसग्रहण, पुस्तकपरिचय काय असेल ते) माबोवर अस्थानी वाटत नाहि. माबोवर या पुस्तकाची ओळख, चर्चा झाली नाहि म्हणजे पुस्तकातले विचार अपेक्षीत वाचकवर्गाकडे पोचणार नाहित असं गृहित धरणं हे हास्यास्पद आहे. उलटपक्षी या लेखाद्वारे पुस्तकातील बेबुनियाद मुद्दे खोडुन काढण्यासाठी मायबोलीने एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिलं असं मी म्हणेन.

पाटलांचे समर्थक पुस्तक वाचतील आणि दंगा करतील पण त्यांना रोकणार्‍यांना पुस्तक परिचय हवा कि नको?

मी वाचले आहे ते पुस्तक आणी मला आवडले म्हणण्यापेक्षा पटले.. मी मदन पाटील यांच्याशी सहमत आहे.. पण तेच १००% बरोबर आहेत आणी त्या पुस्तकाला विरोध करणारे चुकीचे आहेत असा माझा दुराग्रह नाही.. पसंद अपनी अपनी .. Happy

@ अशोक. , सहमत, बहुसन्ख्य मराठा समाज या असल्या प्रचाराला कधीच भीक घालत नाही हा स्वानुभव आहे.
@ वैद्यबुवा, सहमत, असत्य पुन्हा पुन्हा उगळले असता सत्यासारखे भासू शकते, व एखाद्या गोष्टीचे खन्डनच झाले नाही, तसा प्रयत्नच झाला नाही, तरी ते असत्य मान्य आहे असे गृहित धरले जाते, तेव्हा परिक्षणाचे निमित्ताने का होईना, पुस्तकातील मुद्द्यान्चा प्रतिवाद होणे गरजेचे आहेच आहे.

शिवाय, माझे मते, इन्टरनेटादिक आधुनिक साहित्य वापरणार्‍या सुशिक्षित जनतेस, त्यान्चे पुणेमुम्बैअमेरिकादिक कोषाचे बाहेरील भारतात त्यान्चेविरुद्धच काय पसरवले जाते याचे भान आणणे देखिल जरुरीचे आहे. मी दरवेळेस सान्गतो की १९४८ अचानक घडले नाही, निमित्त गान्धीवधाचे, पण त्याची सूप्त पूर्वतयारी तत्कालिक परिस्थितीप्रमाणे आधीपासूनच होत होती, तत्कालिक ब्राह्मणजमातीस त्याचे आकलन झालेच नाही, तद्वतच, १९८० ते १९९० दशकात "खलिस्तान" चळवळीसोबतच सुरू झालेली ही विषपेरणी ब्राह्मण व ब्राह्मणेतरांस अजुनही २०११ मधेही नीटशी उमगलेली नाही हे वास्तव आहे. येथिल काही मोजके लोक असली पुस्तके वाचणार नसली तरी रिकामे हात अन रिकाम्या डोक्याच्या अगणित लोकान्पर्यन्त हा व अशाच मजकुराचा भडीमार, पुस्तके/भाषणे/मिटिन्गा या मार्फत १९८५ पासुन सर्वदूर महाराष्ट्रात होतो आहे.
अन काहीही झाले हे पुस्तक परिक्षण आहे, पुस्तकात जे लिहिलय त्यावर ते कसे लिहिलय याचबरोबर लिहिलेले कसे खोटे आहे याचे हे परिक्षण आहे. काय हे ना की आम्हाला दरवेळेस कशावर तरी भारावून जाऊन कुणाला तरी आलेले अनुभव गुडीगुडी भाषेत वाचायची सवय लागली आहे त्यापुढे वरील परिक्षण बोचल्यासारखे, किन्वा आमच्या "शान्ततापूर्ण सुखासीन" आयुष्यात ढवळाढवळ करणारे वाटणारच, अन मग तर्‍हेतर्‍हेचे "औचित्यभन्गाचे" मुद्दे देखिल उपस्थित होणार. प्रश्न फक्त इतकाच की असे पुस्तक इये महाराष्ट्रदेशी प्रकाशित होऊ शकते तर त्यावरील विरोधी मताचे परिक्षण स्पर्धेत दिले तर असे काय आभाळ कोसळले?
केदारने हे परिक्षण उपजत सौम्यतेने संयत भुमिका स्विकारुन सुसंस्कारीत भाषेतच केले आहे व ते योग्य, चान्गले आहे असे माझे मत.

@ लिम्बुटिम्बू
"केदारने हे परिक्षण उपजत सौम्यतेने संयत भुमिका स्विकारुन सुसंस्कारीत भाषेतच केले आहे व ते योग्य, चान्गले आहे असे माझे मत."

~ नक्कीच. प्रश्न केदार यानी ते का केले असा बिलकुल नसून [मला तर सुरुवातीला, इथे नवा असल्याने, हे 'रसग्रहण' प्रकरणच उमजले होते. मी थेट तो विषय पाहून त्यांचा लेख आहे असे समजून वाचनास सुरूवात केली होती] सद्यस्थितीत एखाद्याने जनमानसातील प्रतिमा खरवडून टाकण्याचा प्रयत्न केला (आणि तोही असंस्कृत भाषेत) तर त्याला किती आणि का 'वेटेज' द्यावे, हा कळीचा मुद्दा आहे, अनेकांच्या दृष्टीने.

तुम्ही इंटरनेट प्रसारण ताकतीचा जो उल्लेख वर प्रतिसादात केला आहे तो योग्यच आहे. आज एक ओळ जरी लिहिली तर नेटद्वारी ती दुसर्‍या सेकंदाला साता समुद्रापलिकडे जाते हे सत्य आहेच. पण याचा अर्थ असाही नसतो की तिथे राहणारा/री व्यक्ती अविवेकी असून त्या लिखाणाला डोक्यावर घेऊन नाचायला सुरूवात करेल. परदेशस्थ असणारे आपले सगेसोयरे, सखेमित्र, परिचित, अपरिचित वैचारिक पातळीवर परिपक्व असणार याची शक्यता खूप दाट असल्याने कितीही 'भडकाऊ' लिखाणाचा मारा नेटद्वारे झाला तरी ते इतिहासात आदराचे स्थान मिळविलेल्या व्यक्तीविषयी मत बदलणार नाहीत. शक्यता आहे की ते वाचतील आणि 'झाले वाचून, देऊ या टाकून'...मिटला प्रश्न त्यांच्यापुरता.

आपण सर्वच हे जाणतो की अशा स्वरूपाच्या लिखाणाला आपल्याच मातीतील काही शक्ती स्वयंस्वार्थ आणि राजकीय हेतूसाठी योग्य ते आर्थिक पाठबळ देऊन खतपाणी घालत असतात. त्या विषयात खोलवर जाण्याचीही गरज नाही. नेटर्स म्हणून आपलीही काही अंशी जबाबदारी असावी की आपण अशा गोष्टींना कारणीभूत होऊ नये ज्यामुळे सुशिक्षित समजल्या जाणार्‍या लोकांच्यामध्ये अकारण अस्वस्थता पसरेल. त्यातही मदन पाटील म्हणजे कुणी रावसाहेब कसबे, अ.ह.साळुंके वा डॉ.हरी नरके नव्हेत की ज्यांचे लिखाण वाचताना (जरी त्यातील मते पटत नसली तरी...) त्यांनी त्या त्या विषयाचा केलेला सखोल अभ्यास जाणवावा.

तात्या सावरकर यांच्या कार्याबद्दल चित्पावन ब्राह्मणांना जितका अभिमान वाटतो, आदर वाटतो तितकाच 'मराठ्यां'नादेखील वाटतो असे मी जर इथे प्रतिपादन केले तर त्यावर समस्त ब्रह्मवृंदानी विश्वास ठेवणे अगत्याचे आहे. एक 'पाटील' त्यांच्याविरूध्द लिहितो म्हणून समस्त पाटलांनी त्याच्या पंगतीत आणून बसविण्याची शक्यता का वाढते तर अशा पुस्तकांनी प्रसिद्धी दिली गेली तरच. श्री.केदार यानी लेखशीर्षात उल्लेख केल्याप्रमाणे श्री.मदन पाटील यांच्या त्या पुस्तकाचा प्रकाशन महिना आहे 'मार्च २०११'. पण आता ऑगस्ट सुरू झाला तरी मला (एका मराठ्याला, जो बर्‍यापैकी पुस्तक संग्रहकदेखील आहे) त्याचा अजिबात पत्ता नव्हता, म्हणजेच हेच मीटर अन्य मराठ्यांनाही लावता येईल. सांगायचा उद्देश्य असा की, अशा पुस्तकांची जाहिरातबाजी थांबवणे आपल्याच हाती असते.

उद्या "लता मंगेशकर यानी आम्हाला गायनक्षेत्रात पुढे येऊ दिले नाही...आणि मंगेशकर भगिनी या गायिकाच नव्हेत...." असा गळा काढीत शमशाद बेगम, शारदा यानी वा त्यांच्यातर्फे अन्य कुणी लिखाण केले आणि त्या स्वरलतेचा अश्लाघ्य भाषेत उल्लेख करून काढलेल्या पुस्तकाला 'परिचय' म्हणून इथे करून प्रसिद्धी देणे कितपत योग्य होईल ?

असो. श्री.केदार यानीही इथे प्रकट झालेल्या [वा होत असलेल्या] मताबाबत इतकेच ध्यानी ठेवणे गरजेचे आहे की, हे विचार त्यांच्याविषयी सदस्यांच्या मनी असलेल्या चांगल्या भावनांचेच रूप आहे.

अशोक पाटील

अशोक., तुमच्या विचारांशी नक्कीच सहमत Happy
(फक्त ते एके ठिकाणचा "कितीही 'भडखाऊ' लिखाणाचा" यातिल ठळक केलेला शब्द "भडकाऊ " असा दुरुस्त करुन घ्याल का प्लिज? क चा ख झाल्याने अर्थाचे अनर्थ होऊ शकतोय इतकेच!)

केदार, हे पुस्तक निवडावे की नाही हा सर्वस्वी तुझा अधिकार आहे आणि ते निवडल्याने काही औचित्यभंग झाला असे मला तरी वाटले नाही. तरीही हे रसग्रहण वाटले नाही हे ही खरेच.
ज्याप्रमाणे एखाद्या पाटलाने असे लिहीले म्हणजे ते सर्व मराठा समाजाचे प्रातिनिधीक मत नव्हे त्याप्रमाणेच एका जोशींनी लिहीले ते सर्व ब्राह्मणांचे मत नव्हे हे समजण्याइतपत जाण आणि तारतम्य इथे सर्वांना आहे किंबहुना असावे अशी अपेक्षा!

>>तरीही हे रसग्रहण वाटले नाही हे ही खरेच
मला वाटतं यावर वेगळा "संवाद" होवू शकेल..
(पेशव्याने दिलेली "रसग्रहणाची यादी" ग्राह्य धरली तर यादीतील सर्व मुद्दे बहुतांशी वरील लेखात आले आहेत, फक्त एकंदर लेखाचा टोन/सूर थोडा तीव्र झाला आहे असे मला वाटते. थोडक्यात नेहेमीच्या भैय्याने रोजच्यापेक्षा जरा जास्तच तिखट पाणीपूरी दिल्याने आता वर एक मटका कुल्फी फ्री दे असे म्हणावेसे वाटते. Happy ईथे केदार यांना "भैया" म्हटलेले नाही आणि हा शब्द जातीवाचक म्हणून वापरलेला नाही याची कृ. नोंद घ्यावी! असो. अधिक न वाढवणेच ऊचित!)

उद्या "लता मंगेशकर यानी आम्हाला गायनक्षेत्रात पुढे येऊ दिले नाही...आणि मंगेशकर भगिनी या गायिकाच नव्हेत...." असा गळा काढीत शमशाद बेगम, शारदा यानी वा त्यांच्यातर्फे अन्य कुणी लिखाण केले आणि त्या स्वरलतेचा अश्लाघ्य भाषेत उल्लेख करून काढलेल्या पुस्तकाला 'परिचय' म्हणून इथे करून प्रसिद्धी देणे कितपत योग्य होईल ?

कारण नसताना असा गळा कोण काढेल? म्हणजे थोडक्यात यशस्वी व्यक्तीने आपल्याला हवा तसा इतिहास लिहावा, हाच अर्थ झाला..

पुस्तक कुठे, परिक्षण कुठे आणि चर्चा कुठे असं झालंय सगळं.
परिक्षणासंदर्भात पेशवा आणि योगशी सहमत.
पुस्तक निवडू नये किंवा त्याची जाहिरात होतेय हे मला पटले नाही. दृष्टीआड केल्याने ते नाहीच असं होणार नाहीये.
तमाम मराठा समाज या पुस्तकाच्या मागे लागणार नाहीये या अशोक यांच्या मुद्द्याशी सहमत.
असो...

अशोकराव व इतर,

मदन पाटील मराठा आहेत व केदार जोशी ब्राह्मण आहे हा योगायोग आहे. मराठ्याने हे लिहिले म्हणून चुकीचे असा सूर कधीही लावलेला नाही. पुस्तक चुकीचे आहे हे आणि इतकेच माझे म्हणणे आहे व राहील. उद्या एका जोश्याने असे पुस्तक लिहिले (खोटे) आणि मराठ्यांवर टिका खोटी टिका केली आणि मी ते वाचले तर त्या जोश्याविरुद्धही मी लिहिल.

जेम्स लेन वर मायबोली व इतर साईटसवर गोंधळ झाला. भांडारकर त्यामुळे घडले. इथे किती जनांनी ते पुस्तक वाचले होते? मे बी दोन किंवा तीन. पुस्तकाला इथे दुर्लक्ष केले म्हणजे वाचक नाहीत असे नसते.

मी टोन मुद्दाम ओपन पत्राचा ठेवला आहे. मला तो आवश्यक वाटला. उद्या येथील जनता सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? ह्यालाही अनावश्यक टोन म्हणू शकते. तसेच डॉ आंबेडकरांच्या काही पुस्तकाचा टोन देखील असाच आहे. (अर्थात मी टिळक नाही, आंबेडकरही नाही) ती कधी कधी गरज असते.

Pages