पिंटू आणि पिंकी ... (१)

Submitted by देवनिनाद on 29 July, 2011 - 06:34

आजचा दरबार प्रमाणेच एक नवं सदर मी सुरू करतोय. पिंटू आणि पिंकी.

पिंकी - ये पिंटू.

पिंटू - काय गं, पिंकी

पिंकी - अरे दोन दिवसांनी श्रावण सुरु होणार ना.

पिंटू - मग

पिंकी - मग काय ? आता एक महिना मटण, चिकन, मच्छी सगळं बंद.

पिंटू - मग बरचं झालं की

पिंकी - काय बरं झालं. आमचा टॉमी काय खाईल.

पिंटू - अरे हो. मग आता.

पिंकी - काय करावं तेच कळत नाहीए. चपाती-भाजी, भात-डाळ असलं तो खात नाही. वास असेल तर घास असं आहे रे त्याचं.

पिंटू - मग आता .... तू टॉमीला पण श्रावण करायला लावणार.

पिंकी - हो ना. कारण त्याच अटीवर कुत्रा पाळता येईल असं आईने सांगितलं होतं. या श्रावणात कसं होणार माझ्या टॉमीचं.

पिंटू - पिंकी, आयडीया.

पिंकी - बोल लवकर.

पिंटू - तू, काय कर सोसायटीतील जे लोक श्रावण पाळत नाही ना, त्यांच्याकडे टॉमीला ये-जा करायची सवय ठेव. सोप्पयं ...

पिंकी - नको. कुणी ना कुणी आईला येऊन सांगेलच. आज तुमच्या टॉमीला आम्ही मटन दिलं.

पिंटू - मग आयडीया. तू बाजारातून मटन मसाला / मच्छी मसाला घेऊन ये आणि टॉमीच्या डाळ भातात ते कालवून दे. बघ कसं मचक मचक करत खाईल.

पिंकी - हो पण.

पिंटू - पण काय ?

पिंकी - महिनाभर मटण मसाला, मच्छी मसाला आणण्या इतका माझा तेवढा पॉकेटमनी नाही रे.

पिंटू - हां, यार. पिंकी आयडीया

पिंकी - आता जरा चांगली आयडीया सांग हां.

पिंटू - अगं ही आयडीया सॉलिड आहे.

पिंकी - मग सांग.

पिंटू - तू काय, कर टॉमीला रोज सकाळ संध्याकाळ देवळाजवळ घेऊन जा. देवदर्शनाने, तिथल्या वातावरणाने कदाचित त्याचं मतपरिवर्तन होईल, आणि मग तू देशील ते तो खाईल. काय !

पिंकी - हां .. हे जमण्यासारखं आहे.

पिंटू - मग ... (विचार करत)

पिंकी - काय रे कसला विचार करतोयस.

पिंटू - काही नाही गं. विचार करतोय असचं जर प्रत्येक भ्रष्टाचारी माणसानं केलं (म्हणजे देवाच्या दारी तो ही गेला) तर त्याच ही मतपरीवर्तन होईल, आणि पिंकी मग सगळा समाज श्रावणासारखा शुध्द होईल.

पिंकी - म्हणजे ? .... तू काय बोलतोयस मला नाही कळलं

पिंटू - हीच तर शोकांतिका आहे ... चल, टॉमीला देवळाजवळ घेऊन जाऊ या.

पिंकी - हां .. चल.

गुलमोहर: 

देवा, अरे टॉमी त्या मानाने खूप शुद्ध आहे रे. पण हे भ्रष्टाचारी अशक्य आहेत. Happy
हा जरा प्रयत्नच वाटला. एखादं चपखल काहीतरी होऊन जाऊदेत यार !

हो रे. पण आपल्याला हे नमुद करायला लागतयं हीच शोकांतिका यातली. बाकी, मोठ्यांच्या गोष्टी छोट्यांच्या मुखातून इनोसंटली देण्याचा ह्या लेखना मागचा खास हट्ट. विषय बरेच आहे ... बघू नवीन भागात ... पिंकी आणि पिंटू ... माझ्या लेखणीतून काय बडबड करतायत.

पण चिमुरी, नादखुदा ... मनापासुन धन्यवाद.

सस्नेह
देवनिनाद

अरे अरे! कुत्र्यांचा इतका अपमान नका करु रे! त्यांना चक्क राजकारण्यांच्या पंक्तीला बसवताय! Happy

अरे अरे! कुत्र्यांचा इतका अपमान नका करु रे! त्यांना चक्क राजकारण्यांच्या पंक्तीला बसवताय...खरय्....खुप ईमानी असतात ती........देवनिनाद छान मान्डलत.....

सावरी