Submitted by आनंदयात्री on 27 July, 2011 - 00:25
काय होती वेदना आनंदण्याची कारणे?
प्रसवली होती जणू पस्तावण्याची कारणे
वेस आली आडवी अन् गाव तेथे थांबला
हेरली तेव्हाच मी ओलांडण्याची कारणे
वाचले सारे खुलासे लाजर्या डोळ्यात मी
गोड होती तू दिलेली बिलगण्याची कारणे
मी फुलांचा गंध होतो अन् ऋतूंचा लाडका
ही अशी स्वप्नेच होती झोपण्याची कारणे
एवढे झाले तरीही भेटतो आहोत ना?
सांग ना आतातरी नाकारण्याची कारणे!
वाट अंधारात होती, जायचे होते पुढे
देत गेलो चांदण्यांना चमकण्याची कारणे
स्फोट झाले, जीव गेले, क्षणभरातच संपली -
माणसांनी माणसांना जगवण्याची कारणे
कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे
- नचिकेत जोशी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
कारणांमध्येच गेला जन्म सारा
कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे
सगळे शेर आवडले.
मी फुलांचा गंध होतो अन्
मी फुलांचा गंध होतो अन् ऋतूंचा लाडका
ही अशी स्वप्नेच होती झोपण्याची कारणे
कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे
हे दोन शेर आवडले. एकंदर छान गझल.
धन्यवाद आनंदयात्री.
वाचले सारे खुलासे लाजर्या
वाचले सारे खुलासे लाजर्या डोळ्यात मी
गोड होती तू दिलेली बिलगण्याची कारणे
कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे >> मस्त
एवढे झाले तरीही भेटतो आहोत
एवढे झाले तरीही भेटतो आहोत ना?
सांग ना आतातरी नाकारण्याची कारणे!>>> व्व्वा!
वाट अंधारात होती, जायचे होते पुढे
देत गेलो चांदण्यांना चमकण्याची कारणे>>> सुंदर शेर!
स्फोट झाले, जीव गेले, क्षणभरातच संपली -
माणसांनी माणसांना जगवण्याची कारणे >>> सुंदर!
कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा>>> सुंदर मिसरा!
सांग ना आता तरी नाकारण्याची कारणे - हा शेर लक्षात राहणार!
Your one of the bests...
Your one of the bests...
एकसे एक आहेत सगळे शेर.. कुठला एक सांगू शकत नाही..
क्या बात है.. लगे रहो...!
नचिकेत, गझल वाचल्यावर एकच
नचिकेत, गझल वाचल्यावर एकच शब्द डोक्यात आला - Elegant!
Elegant - Displaying effortless beauty and simplicity in movement or execution (इति वर्डवेब)
EFFORTLESS beauty
छान गझल, नचिकेत. मला शेवटचा
छान गझल, नचिकेत.
मला शेवटचा शेर आवडला.
अप्रतिम गझल... कसं सुचतं रे
अप्रतिम गझल...
कसं सुचतं रे तुम्हाला इतकं सुंदर लिहायला?
>>वाचले सारे खुलासे लाजर्या डोळ्यात मी
गोड होती तू दिलेली बिलगण्याची कारणे >>
आणि
>> कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे <<
हे दोन शेर भावले.
काय होती वेदना आनंदण्याची
काय होती वेदना आनंदण्याची कारणे?
प्रसवली होती जणू पस्तावण्याची कारणे
>> मतल्यातच गारद!
सगळेच शेर सुंदर, अभिनंदन आनंदयात्री..!
एवढे झाले तरीही भेटतो आहोत
एवढे झाले तरीही भेटतो आहोत ना?
सांग ना आतातरी नाकारण्याची कारणे!>>>
व्वा व्वा!!
>>कारणांमध्येच गेला जन्म सारा
>>कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे
वा ! मस्तच आहे गझल ही !
एवढे झाले तरीही भेटतो आहोत
एवढे झाले तरीही भेटतो आहोत ना?
सांग ना आतातरी नाकारण्याची कारणे!.......खल्लास...!!!
कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे...वाह ! क्या बात !!!
आवडली गझल.
मला जे लिहायच होतं ते वर
मला जे लिहायच होतं ते वर मुक्ता अगोदरच लिहुन गेल्यायत ....अप्रतीम गज़ल राव... जियो !!!
नाखु, डॉक, वर्षा, गिरीश,
नाखु, डॉक, वर्षा, गिरीश, सुप्रिया, नंद्या, कणखर, झाड, ज्ञानेशसाहेब - सर्वांना धन्यवाद!
मुक्ता, thanks a lot!! बर्याच दिवसांनी दिसलीस! नवीन लिहिलं नाहीस बरेच दिवसांत! बिझी असतेस वाट्टं!
ललित thanks रे
बेफिकीर, विशेष आभार!
दक्षिणा, कसं सुचतं रे तुम्हाला इतकं सुंदर लिहायला? >> the most difficult question to answer
धन्स गं!
ग्रेट.
ग्रेट.
अप्रतिम गजल ..!!खुप आवडली !!
अप्रतिम गजल ..!!खुप आवडली !!
ग्रेट! तुस्सी बेस्टेस्ट हो!
ग्रेट! तुस्सी बेस्टेस्ट हो! भाळण्यापेक्षा सांभाळण्याचीच कारणे जास्त... म्हणून बापुडा!
त्रिवार मुजरा!
त्रिवार मुजरा!
आवडली रे
आवडली रे
सही रे... <<<स्फोट झाले, जीव
सही रे...
<<<स्फोट झाले, जीव गेले, क्षणभरातच संपली -
माणसांनी माणसांना जगवण्याची कारणे>>>
<<<कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे>>>
एकसे बढकर एक...
हे नसे तुज सांगणे, तू असा लिहितोस रे,
जाणतो तू काय आहे 'बहरण्याची' कारणे...
जब्बरदस्त!!! प्रत्येक शेर
जब्बरदस्त!!! प्रत्येक शेर खणखणीत.
अप्रतीम. प्रत्येक शेर सुन्दर
अप्रतीम. प्रत्येक शेर सुन्दर आहे.
छायाताई, क्रांतिजी, उमेश,
छायाताई, क्रांतिजी, उमेश, प्राजु, हर्षल, तायड्या, डूआया, चेतना - thanks a lot!
एवढे झाले तरीही भेटतो आहोत
एवढे झाले तरीही भेटतो आहोत ना?
सांग ना आतातरी नाकारण्याची कारणे!
वाट अंधारात होती, जायचे होते पुढे
देत गेलो चांदण्यांना चमकण्याची कारणे
स्फोट झाले, जीव गेले, क्षणभरातच संपली -
माणसांनी माणसांना जगवण्याची कारणे
कारणांमध्येच गेला जन्म सारा बापुडा
भाळण्याची कारणे, सांभाळण्याची कारणे...............
क्या बात है............. निवडक १०...............
खास! आवडत्या १०त!
खास!
आवडत्या १०त!
नचिकेत राव, तु लिहिण्याची
नचिकेत राव,
तु लिहिण्याची तहान अशी शमवतोस की,
काही वेगळं आपलं लिहावसच लागत/ वाटत नाही बघ!!
जीय्यो!!!
बेस्ट.....! अगदी छक्कास....
बेस्ट.....! अगदी छक्कास....
एखाद्यास बेस्ट म्हटलो तर इतर शेरांवर अन्याय होईल.
खासच. खुपच आवडली
खासच. खुपच आवडली
छान, आवडली. वाट अंधारात
छान, आवडली.
वाट अंधारात होती, जायचे होते पुढे
देत गेलो चांदण्यांना चमकण्याची कारणे
>>>
मस्तच
आवडली
आवडली
Pages