गुगलने गुजराती पासून कन्नड पर्यंत भाषांच्या भाषातराची सोय केली आहे पण त्यातून मराठीला वगळण्यात आले आहे. याविरुद्ध दाद मागण्यासाठी भरत गोठोसकर यांनी एक ऑनलाईन याचिका बनवली आहे. याद्वारे किमान काही आवाज तरी निर्माण होईल अशी आशा आहे.
आपल्या लेखात भरत म्हणतात, 'भारतीय भाषांमध्ये प्रथम हिंदीला २००८ साली या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या देशातील अन्य भाषांना यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. आता गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती या भाषांनाही सामील करून घेतले आहे. मराठी मात्र वळचणीला टाकली आहे!'
पुढे मराठीचे महत्त्व विषद करण्यासाठी ते माहिती देतात,
'गुगलची भाषांतर सेवा ६४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. जगात मराठी भाषिक संख्येने पंधराव्या स्थानावर आहेत. याचा अर्थ मराठीहून संख्येने कमी असलेल्या ५० भाषांना या सेवेचा लाभ मिळतो. फ्रेंच, इटालियन किंवा कोरियन या भाषिकांपेक्षा मराठी भाषिक अधिक आहेत.
इंडिअन रीडरशिप सव्र्हे या संस्थेनुसार भारतात वृत्तपत्रांच्या वाचकसंख्येत हिंदीनंतर मराठी वाचकांचा क्रम लागतो. त्यानंतर मल्याळी व इंग्रजी वाचकांची संख्या आहे. मराठी भाषेत आता १० दूरदर्शन वाहिन्या सक्रिय आहेत.'
असे असूनही गुगलने मराठीला दूर का ठेवावे हे अनाकलनीय कोडे आहे.
मराठी माणसाची नाराजी गुगल पर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून त्यांनी एक ऑनलाइन याचिका बनवली आहे. या याचिकेत सही करायला विसरू नका.
दुवा: www.petitiononline.com/gmarathi
तुमच्या प्रत्येक सहीचे महत्त्व आहे, आपण सर्वांनी एकत्र येऊन काही केले तर आशा आहे. यातून गुगलला काही तरी फरक पडेल!
भरत गोठोसकर लिखित लोकसत्ता मध्ये आलेला गुगलला मराठीचे वावडे का? हा लेख.
निनाद मी सुध्दा पाठवला नॅशनल
निनाद मी सुध्दा पाठवला नॅशनल जिओ चॅनल ला......................................
मी पण केली सही.
मी पण केली सही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी २३२८
मी २३२८
मी पण केली सही .
मी पण केली सही .
2339... नॅशनल जिओ चॅनलला mail
2339...
नॅशनल जिओ चॅनलला mail पण केला...
धन्यवाद...
२३५१
२३५१
उत्तम!
उत्तम!
मी २४०२
मी २४०२
मी २३९३! स्थावरसंकेत (फिक्स्ड
मी २३९३! स्थावरसंकेत (फिक्स्ड यू आर एल) देता येत नाही. खेद वाटतो!
२४३०
२४३०
2472.
2472.
२५१७
२५१७
मी २५३५
मी २५३५
मी आधीच सही केली आहे. माझ नं.
मी आधीच सही केली आहे. माझ नं. १०९ आहे.
२५७२.
२५७२.
मीपण केली.. २६८३ दोन
मीपण केली.. २६८३ दोन दिवसापूर्वीच मला याची गरज होती (इंग्रजी-मराठी भांषातराची)... पण गूगलवर (भांषातर) मिळालं नाही... कदाचित भारत सोडून जगभर मराठी लोक्स कमी आहेत...
२७१९
२७१९
२७०६ !
२७०६ !
२८२९
२८२९
अधिक माहिती हाती आल्याने
अधिक माहिती हाती आल्याने येथील मू़ळ लिखाण उडवून टाकले आहे.
खालील लिंक पहा:
http://www.google.co.in/
धन्यवाद.
म्याबी आलो. २९२२.
म्याबी आलो.
२९२२.
सही केली ३००५.
सही केली ३००५.
३०७६ धन्यवाद.
३०७६
धन्यवाद.
झक्कींना परत एकदा अनुमोदन
झक्कींना परत एकदा अनुमोदन !!
काय बावळटपणा चाललाय हा ? केवढी मोठ्ठी बीजीनेस ऑपॉर्चुनिटी आहे इथे ! एखादा मराठी माणुस केवढा मोठ्ठा बिजनेस उभा करु शकतो यातुन ! ते सोडुन गुगलला सल्ले काय देत बसलेत !
शिवाय गुगल म्हणजे काही समाजसेवी संस्था नव्हे .... त्यांना जो बिजिनेस करायचाय तो ते करतील ....ज्यांन्ना मराठीत भाषांतर हवय त्यांन्नी स्वतः करा ना राव एखादी साईट सुरु ! ....( इतकी मस्त करा की गुगल सर्च वर पहिल्यांदा तिच दिसली पाहिजे !)
उगाच गुगलला भीक मागितल्या सारखं करु नका
हे एक छान काम
हे एक छान काम आहे..................हवे तर सगळे मायबोली मिळुन हे करु शकतो आपन...............
ज्यांना इंग्रजी मराठी भाषांतर
ज्यांना इंग्रजी मराठी भाषांतर हवे आहे त्यांनी शब्दकोष वापरा.
http://www.shabdkosh.com/mr/
>>केवढी मोठ्ठी बीजीनेस
>>केवढी मोठ्ठी बीजीनेस ऑपॉर्चुनिटी आहे इथे ! <<
खरंय. पण ती वेळ निघुन गेलीय असं नाहि वाटत? गुगल सारख्या बलाढ्य कंपनीने अंडरलायिंग इंन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडि डेवलप केलेलं असताना, परत "रिइन्व्हेंटिंग द व्हील" हा बिझनेस सेंस असु शकतो?
अहो, गुगल सारख्या कंपनीलाच मायक्रोसॉफ्टच्या "ऑफिस" प्रॉडक्ट बरोबर टक्कर घेताना तोडाला फेस येतोय...
म्हणतात ना; "इफ यु कांट बीट देम, जॉइन देम"...
गुगल सारख्या बलाढ्य कंपनीने
गुगल सारख्या बलाढ्य कंपनीने अंडरलायिंग इंन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडि डेवलप केलेलं असताना, परत "रिइन्व्हेंटिंग द व्हील" हा बिझनेस सेंस असु शकतो?
अशीच असेल आजकालची मराठी भाषा तर हवीच कशाला मराठी गूगलवर? इंग्रजीच काय वाईट आहे?
आणि त्यातूनहि हवेच असेल मराठी तर, अंडरलायिंग इंन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडि डेवलप असले तरी त्यावर मराठीचे झोपडे बांधायला हवे ना कुणितरी?
नाहीतर गेल्या पाचशे वर्षात सगळे अंडरलायिंग इंन्फ्रास्ट्रक्चर इतरांनीच ऑलरेडि डेवलप केले आहे, पण ते शिकून शेवटी प्रोग्रॅमिंगच्या पाट्या टाकून आज कित्येक भारतीय जगात स्वतःची वाहवा करून घेतातच ना?
असे म्हणतात की चिनी, जपानी लोक म्हणतात, इतरांना करता येते, तर आपल्यालाहि करतात येईल नि आपण ते स्वस्त नि मस्त करू. भारतातले लोक म्हणतात इतर लोक कर॑ताहेत ना, मग आपण कशाला काही करा. बसू स्व॑स्थ, मग त्यांनी नवीन काही केले की आपण जुने सगळे चोर्या मार्या करून, नक्कल करून घेऊ! उगाच कष्ट करायचे, दहा वेळा प्रयत्न फसेल, लोक हसतील, त्यापेक्षा नुसत्या गप्पा मारू!
नुसते दुसर्या कुणि काही सुचवले तर ते कसे वेडगळपणाचे आहे ते सांगू. पण स्वतः काही विचार करून, स्वतःचा शहाणपणा वापरून काही मार्ग काढणार नाही!! भीक मागून पोट भरत असताना उगाच सांगितले आहे कुणि काम करायला?
उत्तम बिझनेस सेंस !!
अहो म्हणुन तर हवी आहे गुगल
अहो म्हणुन तर हवी आहे गुगल मराठी. ठळक इंग्रजी शब्दांचे मराठी अनुवादित शब्द तुम्हाला माहित असतील तर कळवा.
बाकि उरलेल्या पोस्टच्या संदर्भातः तुमच्या बाबतीत कल्पना नाहि, पण सगळे भारतीय प्रोग्रॅमिंगच्या पाट्या टाकतात, असा तुमचा गैरसमज असेल तर तो दुर करायला आवडेल. हे माझ्या कडुन "हॅपी अवर" चं आमंत्रण समजा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
राजशी सहमत. झक्की - इतरांनी
राजशी सहमत. झक्की - इतरांनी म्हणजे त्यात बर्याच गोष्टींचा शोध लावणारे, पेटंट मधे नाव असलेले भारतीय आहेतच की. गूगल, फेसबुक, ट्विटर सारख्या मूळ कल्पना भारतीयांच्या नसतीलही. त्या का नाहीत कल्पना नाही. पण याच कंपन्यांत बाकी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणार्या टीम्स मधेही असंख्य भारतीय असतात. काही दिवस बे एरियात राहून बघा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाकी "बिझिनेस मराठी" साठी योग्य शब्द रूळायला हवेत. जरूर सुचवा कोणाला माहीत असतील तर.
Pages