भिंती

Submitted by सुप्रिया जाधव. on 19 July, 2011 - 07:51

भिंती

उरल्यात चार भिंती...
खचल्यात पार भिंती

परजून आठवांना....
करतात वार भिंती

आकांत ऐकुनीही...
बहि-याच ठार भिंती

गाठून एकटीला...
छळतात फ़ार भिंती

सोसून पावसाळे...
पडती न 'गार' भिंती

पाहून आसवांना...
द्रवती न ’यार’ भिंती

ओसाडश्या घराला....
ठरतात भार भिंती

-सुप्रिया (जोशी) जाधव.

गुलमोहर: 

उरल्यात चार भिंती...
खचल्यात पार भिंती

परजून आठवांना....
करतात वार भिंती

आकांत ऐकुनीही...
बहि-याच ठार भिंती

अप्रतिम्...कमी शब्दात खुप परिणाम कारक्...आवडली

आकांत ऐकुनीही...
बहि-याच ठार भिंती

गाठून एकटीला...
छळतात फ़ार भिंती

ओसाडश्या घराला....
ठरतात भार भिंती>>>

सुंदर! Happy

-'बेफिकीर'!

परजून आठवांना....
करतात वार भिंती >> खरंय यार!

पाहून आसवांना...
द्रवती न ’यार’ भिंती >>>>क्या बात है

गाठून एकटीला...
छळतात फ़ार भिंती >अगदी अगदी!

आकांत ऐकुनीही...
बहि-याच ठार भिंती >> लाजवाब!

ओसाडश्या घराला....
ठरतात भार भिंती >>> व्वा!

सुप्रिया खुप छान गझल........एक से एक बढिया शेर! अप्रतिम!