पुढील तपास सुरु आहे...

Submitted by जयनीत on 18 July, 2011 - 06:03

गावात बलात्काराची घटना घडली.
आरोपी फरार होता.
जनमानस संतप्त होते.
पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.
पोलिसांची लोकां प्रती सहानुभूती होतीच. कठोर कारवाईचे आश्वासन मिळाले.
जाणकारांच्या मते कितीही कठोर कारवाई झाली, तरीही आरोपीला जास्तीत जास्त सात वर्षे शिक्षा होणार होती.
काय! फक्त सात वर्षे?
अशांना तर भर चौकात ठेचून काढायला हवे. लोकांचे मत पडले.
दूस-याच दिवशी गावा जवळील शिवारात आरोपीचा मृतदेह सापडला.
प्रार्थमिक चौकशी नंतर आरोपीला लाठया, काठया आणि दगडांनी ठेचून मारण्यात आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.
घटना स्थळी कुणीही सापडले नव्हते.
अज्ञात व्यक्तीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गाव हळूहळू पुर्वपदा वर आले.
घटने नंतर दोनच महिन्यांनी बलात्कारित मुलीने मात्र आत्महत्या केली.
यंत्रणा पुनश्च सक्रीय झाली.
आत्महत्ये मागील कारणे शोधून काढण्याचे आदेश निघाले.
पुढील तपास सुरु आहे.

गुलमोहर: 

????

जयनीत, हा प्रकार खरेतर खुप मस्त आहे. पण बयाच गोष्टी संदिग्ध राहील्यात. लेखकाचा रोख आणि रोष म्हणाव्या तितक्या परिणामकारकतेने स्पष्ट होत नाहीये. थोडे बदल कर जमुन जाईल Happy
पुलेशु !!

सर्व वाचकांना धन्यवाद.
एक नवीन प्रयोग करून बघितला.
फीड नवे तर लीड देण्याचा प्रयत्न.

गोष्टं साधीच आहे.
जी आपण रोज वर्तमान पत्रात वाचतो तीच.
एखादी बलात्काराची घटना घडते.
आपण एक बातमी वाचतो, अमके अमके झाले.
सर्व लोकांना सहानुभूती निर्माण होते.
गुन्हेगारां बद्दल राग ही निर्माण होतो.
शिक्षे बद्दल ही अनेक मते मतांतरे असतात.
आता त्या गुन्हेगारालाही मारून टाकलंय
कायद्या पेक्षाही जास्त शिक्षा मिळालीय.
हे ही घडताच कुठे ना कुठे.
पण पुढे काय?
गाव तर पूर्वपदा वर आलं.
तरीही मुलगी आत्महत्या करते?
ती पूर्वी सारखाच जीवन जगू शकेल काय?
आता तर गुन्हेगार ही जगात नाही.
पण जगाकडुन तिला कशी वागणूक मिळेल?
कुठलीही आत्महत्या झाल्या वर पोलीस त्या मागची कारणं शोधतातच.
म्हणून म्हटलं होतं पुढील तपास सुरु आहे.
त्या तपासात काय मिळेल?
असो.
ही गोष्टं वेगळ्या पद्धतीनी ही लिहिता आली असती.
पण विषय नेहमीचाच असल्या मुळे रिस्क घेतली.
भाषा ही वर्तमान पत्रातीलच वापरली.

थोडं अजुन विस्तारानी लिहायला हवं होतं असं वाटतं.

पुन्हा एकदा सर्व वाचकांना धन्यवाद, आणी पु.ले.शु.

जयनीतजी खरेतरं नवीन प्रयोगाबद्दल अभिनन्दन.. पण वाचकाना काहिच उलघडा होत नव्हता म्हणुन अशा प्रतिक्रीया आल्या...

चिउ,
खरच मनापसुन धन्यवाद.
अशाच तर प्रतिक्रिया हव्यात मनापासुन आलेल्या.
त्यानीच तर लिहिण्यात प्रगती होईल ना?
आणि पडायला घाबरलो तर पुढे कसे जाणार?
पु. ले. शु.

तुम्ही व्यवस्थेतले दोष तसेच समाजाची मला काय त्याच या दोन्ही वृत्ती पुढे आणु पहाताय. प्रयत्न नक्कीच चांगला आहे.

हा मायबोलीवरचा किंवा समाजातला पहिलाच प्रयत्न आहे अस नाही.

प्रश्न आहे

१) मग अशीच घटना अश्या देशात जिथे लोकसंख्या कमी आहे आणि पोलीस आणि नागरिक यांचे प्रमाण अपेक्षीत आहे अश्या ठिकाणी जेव्हा घडते तेव्हा किती लवकर तपास लागतो ? हे शोधता येईल का ?

२) आपल्या पेक्षा जास्त लोकसंख्येच्या उदा. चीन या ठिकाणि किती वेगाने तपास घडतो ?

३) आपल्या पेक्षा कोणत्या देशात अशी समाज व्यवस्था आहे जिथे बलात्कारीत स्त्रीला जगणे नकोसे
होते अशी सामाजिक परिस्थिती नाही ? असे असल्यास कोणत्या पध्दतीने समाज शिक्षण देता येईल ?

४) वरच्या घटनेत बलात्काराच्या आरोपा खालिल व्यक्तीला जमाव अश्या पध्दतीने मारल अश्या घटना
अन्य कोणत्या देशात घडतात का ?

५) जर जमाव कायदा हातात घेतो तर पोलीस तपास या यंत्रणेवर पर्यायाने कायद्यावरच विश्वास नाही
ही परिस्थीती लोकशाही असलेल्या किती देशात आहे ? याची कारणे फक्त तपास मंदगतीने ? राजकीय नेत्यांच्या सोयीचा की अन्य काही ?

या सारखे अनेक प्रश्न उपस्थित होतात.

यावर सामाजीक संशोधन करता येईल का ?

मायबोलीवरचे काही सदस्य अश्या संशोधनात भाग घेतील का ?

परदेशातले मायबोलीकर यात सहभागी होतील का ?

जयनीत, तुम्ही कवितेच्या फॉर्मॅटमधे का लिहिताय? तुमची कथा, तुमचा प्रतिसाद.. कवितेसारखं एका ओळीत एकच वाक्यं अशी का आहे?

दाद,
हा फॉर्म कवितेचा आहे हे माहीत नव्ह्तं.
पण तुमचा मुद्दा बरोबर आहे.
कारण एक कथा लिहिलिय ती कवितेच्या फॉर्मेट मधेच उतरलीय.
मी स्वत:ला कवी वगैरे समजत नाही. त्या मुळे ती कवितेच्या विभागात पोस्ट करावी असे मला वाटत नाही.
आणी ती जर कथेच्या विभागात टाकली तर अजुन गडबड होइल असे वाटते.
काय करावे हेच समजत नाही.
मी पहीले नाटकाच्या फोर्मेट मधे लिहित होतो. त्या फॉर्मेट मधे आधी पासुन मनात असलेले खुप काही लिहायचे बाकी आहे. पण अजुन एकाही विषयाला गेल्या काही महिन्यात हात लावलेला नाही.
तिथेही असे झाले तर मात्र खरंच गडबड होइल.

नेमके तुमचे म्हणने काय आहे .........??????????
हे अजुन स्पष्ट केले नाहीत........
एक बातमी सांगितली.........
एक कथा सांगीतली...
एक गुढ कथा म्हनुन सांगीतली...
एक अत्याचार झालेला आनी त्या बद्दल ची चीड आपल्याला आली हे व्यक्त केले......
की.....हे असे असे झाले.............असे फक्त सांगीतले वृतांत म्हनुन.................?????????????????

अजुन काही.................

उदय कथा वाचल्या बद्दल धन्यवाद.
तुम्ही म्हटल्या प्रमाणे मी कथेच्या विषया बद्दल स्पष्टीकरण ही दिले, पण त्यात ही अजून तुम्हाला शंका बाकी आहेत.
हरकत नाही.
कथेचा अर्थ समजावून घेण्या साठी जे ही तुम्ही प्रयत्न करीत आहात तेव्हा उत्तर देणे माझे काम आहे.
सर्वप्रथम ह्या कथेत काहीही गूढ नाही.
मी वेगळ्या प्रयोगा बद्दल म्हटले होते. लीड देण्या बद्दल.
कारण ही एक ओपन एन्डेड कथा म्हणून लिहिण्याचा माझा प्रयत्न होता.
मी फक्त एका घटनेच्या तीन वेगवेगळ्या बातम्या सांगितल्या.
पार्श्वभूमी सांगितली.
निष्कर्ष वाचकां वर सोडला.
तुम्ही विचारले की माझे नेमके काय म्हणणे आहे?
शिक्षा होऊ नये असे माझे म्हणणे नाही.
माझ्या मते इथे गुन्हेगाराला शिक्षा होऊन सुद्धा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही.
धन्यवाद आणि पु.ले.शु.

Back to top