Submitted by arun_lele on 6 January, 2008 - 07:00
मैत्रीच हे अतूट नात
कधी केवळ नुस्त बघून जाणवत
अन चिमणीच्या घासातून पोटात शिरत
कधी ओवीतून पाझरत
कधी शिवीतून बरसत
कधी गुध्द्यात पण सामावत
कधी हातात हात घेऊन खुणावत
कधी शहाण्यांना खुळावत
कधी मनातल्या मनात उमगत
कधी दुराव्यान कोमेजत
कधी जवळकीन फुलत
कधी उष्टावल्या बोरांनी आनंदत
कधी सुग्रीवासाठी धास्तावत
कधी ते कृष्ण सुदाम्याच असत
कधी ते पांचालीशी जडत
कधी विनाशाकडे खेचत नेत
अन् राधेयाचा घात करत
कधी हे कोंडाण्यासाठी पेटून उठत
अन सिंह गेला म्हणून घायाळत
हे कालातीत आहे
हे शब्दातीत आहे
हे रक्तापेक्षा असत घट्ट
हे मधापेक्षा गोड मिट्ट
हे बोलल तर कळत
हे न बोलून पण वळत
जे असतात मैत्र जीवांचे
हे त्यांना या कवितेतून पोहोचत.
......................................... अरूण लेले
---- मकर संक्रांती निमित्य , खास दुरावलेल्या मित्रांसाठी...
गुलमोहर:
शेअर करा
फिट्ट आहे!
अरूण, अगदी फिट्ट आहे!
कधी ओवीतून कधी शिवीतून....
सुदाम्याशी अन पांचालीशीही....
...मैत्र जीवांचे!
अतिशय सुंदर....
(तुमचे ते मित्रही दुरावलेले नाहीत हो. नक्की कोणत्या वळणावर वाटा वेगळ्या झल्यात ते बघायला हवं :))
हेच म्हणणे
हेच म्हणणे आहे! कविता आवडली.