विडा

Submitted by वर्षा_म on 13 July, 2011 - 04:29

बॅकेच्या पासबुकचे पान
तुझ्यासमोर काय उघडले
तू जणु सुपारीच घेतलीस
मला कर्जबाजारी करायची

मोठा चुना लागल्यावर
माझ्या लक्षात आली
माझी चुक

आता मीही कात टाकली
माणसे ओळखायला शिकलोय

शेवटी तुला सुधारण्याचा
विडा उचलावाच लागला!

आई शप्पथ! भन्नाट आहे हा विडा.. Happy
वर्षामाई __/\__

( बीडो दुजे थाली का,
लगे बडा मसालेदार,
हो मन करे चकमक,
चकमक चकमक
चकमक.. Proud )

वर्षे, डावी बाजु, उजवी बाजु, भाकरी, भाजी, भात वरण झालं नंतरचा विडा पण झाला. पण जेवणात काहितरी गोड असल्याशिवाय विडा खाण्यात मजा नाही. Happy
बाकी हे जमलय खासच Happy

वर्षे... ___________/\_____________ दंडवत गं माये Happy

एकदम जबरदस्त झालाय विडा..

मस्त Happy