प्रेरणा:
http://www.maayboli.com/node/27195
http://www.maayboli.com/node/27262
http://www.maayboli.com/node/27270
http://www.maayboli.com/node/27277
--------------------------------------------------
मी कच्च्या केळ्यासारखा द्वाड,
अन् तू धारोष्ण दुधासारखी,
फेसाळणारी,
शुभ्र, नितळ, उबदार..
तुझ्या मखमली कायेच्या विरहात,
खुंटीला टांगलेला जीव,
पिकून पडला चित्री पिवळाजर्द..
तू मात्र शेकोटीचे असह्य चटके सोसत,
माझ्यावरचं सर्व प्रेम एकवटून,
दाट सायेत मूक कबुली देत..
तुझं उतू जाणारं प्रेम पाहिलं,
अन् माझी कितीही सालवटं निघत,
काळजाचे तुकडे पडले,
तरी हसत राहिलो मी,
शेवटच्या घटकेपर्यंत..
नशिबी होतंच ना शेवटी आपल्या मीलन..
तुझ्या दाट प्रेमाच्या सायेत,
आकंठ बुडून,
त्याने वरून पांघरलेल्या,
गोड साखरेच्या दुलईत,
तू जेव्हा घट्ट बिलगलीस मला,
मधुर तरंगांची शिरशिरी,
रोमरोम भर उजळत,
जीव पुरता विरघळून गेला,
तुझ्यात एकजीव होण्या..
खरंच सांगतो तुला,
त्या एका क्षणासाठी,
कितीही "शिखरं" आणि "रणं" जिंकायची
तयारी आहे माझी,
हे शिक(तू)राणी..
अप्रतिम जमलिये काकाक
अप्रतिम जमलिये
काकाक नाहीये ही...
वा वा, रुपकासाठी वाहवा
वा वा, रुपकासाठी वाहवा
वा.. मस्त
वा.. मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझी ही कालवाकालव झाली शेवटी
माझी ही कालवाकालव झाली शेवटी
निवडुंगा मस्त!
निवडुंगा मस्त!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निवडुंगा माय फेव्हरेट डीश मन
निवडुंगा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माय फेव्हरेट डीश
मन लाऊन बनवलंस की रे, शिकरण
आता 'पान' वाढलं बघ
http://www.maayboli.com/node/27288
निवडुंगा.. छान
निवडुंगा.. छान
लाजो, बेफिकिर, वर्षा,
लाजो, बेफिकिर, वर्षा, मुक्तेश्वर, आर्या, किरण,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप खूप आभार..
बागे,![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मन लाऊनच बनवतो मी जे काही असेल ते..
मस्तच जमलीय
मस्तच जमलीय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शिकरण अगदी चवदार जमलंय हं
शिकरण अगदी चवदार जमलंय हं निवडुंगा..... झक्कास!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरंच सांगतो तुला,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्या एका क्षणासाठी,
कितीही "शिखरं" आणि "रणं" जिंकायची
तयारी आहे माझी,
हे शिक(तू)राणी.. >>> हे तर फारच आवडलं
पनू खूप आभार.. सानी, ते
पनू खूप आभार..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सानी,
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ते कालचं वैतागाचं शिकरण वरून सुचलंय.. लक्षात आलं की पुरणपोळ्या आपल्याला झेपायच्या नाहीत..
हे भारी आहे. सगळीच विडंबने
हे भारी आहे. सगळीच विडंबने मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बेत फक्कड जमला आहे अगदी!
शिकरण, माझी फेव्हरिट डिश
शिकरण, माझी फेव्हरिट डिश![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निवडुंग मस्त जमलय शिकरण
(No subject)
प्रकाश, दक्षिणा, मंदार, खूप
प्रकाश, दक्षिणा, मंदार,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप खूप आभार..