Submitted by प्राजु on 8 July, 2011 - 17:04
जीवनात फ़ुलविते नवा बहर
खोल खोल आतवर तुझी नजर
मी नशेत राहतो असा सदा!
नयन की तुझे प्रिये असे जहर?
'बिलगशी कितीक रे तिला असा!!
पावसा!! पुरे अता तुझा कहर!!'
का मिठीत येत लाजतेस तू??
का हळूच कंप पावती अधर??
लाजताच तू अशी पुन्हा पुन्हा
अंतरात खोल का उठे लहर
मी कितीक दूर चाललो जरी
भेटते तुझेच नाव अन शहर
साथ दे मला तुझी अशी सखे
मिसळुदे मला तुझ्या स्वरांत स्वर
-प्राजु
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मी कितीक दूर चाललो जरी भेटते
मी कितीक दूर चाललो जरी
भेटते तुझेच नाव अन शहर>>> छान!
'बिलगशी कितीक रे तिला
'बिलगशी कितीक रे तिला असा!!
पावसा!! पुरे अता तुझा कहर!!'
मी कितीक दूर चाललो जरी
भेटते तुझेच नाव अन शहर
व्वा,फार छान.
'बिलगशी कितीक रे तिला
'बिलगशी कितीक रे तिला असा!!
पावसा!! पुरे अता तुझा कहर!!.....आवडला.
मनापासून आभार सर्वांचे!
मनापासून आभार सर्वांचे!
प्राजु आपण अजून चांगली लिहू
प्राजु आपण अजून चांगली लिहू शकला असतात असे वाटले...
पु.ले.शु.
मी कितीक दूर चाललो जरी भेटते
मी कितीक दूर चाललो जरी
भेटते तुझेच नाव अन शहर
>>>
छान! बाकी मिलिंदरावांशी सहमत!