ह्या आधीचे..........
राजाराम सीताराम एक ......प्रवेश
राजाराम सीताराम........ पुढचे चार दिवस
सुरवातीचे दिवस – भाग २
………….. मला कधी एकदा रूम मध्ये जाऊन झोपतो असे झाले होते. वेळापत्रका प्रमाणे आता एकदम दुपारी ४ वाजता गेम्स पिरियड होता. मी जेवण पटकन संपवून माझ्या खोलीमध्ये पोहोचतो व कपडे बदलून आता पलंगावर आडवे होणार तेवढ्यात मधल्या अंगणात जिसी परितोष शहाने अनाऊन्स्मेंट केलेली मी ऎकली.
अटेन्शन अटेन्शन अटेन्शन 14 प्लटून. ऑल फर्स्ट टर्मर्स टु फॉलइन, इन द स्क्वेअर, इमीडिएटली इन गेम्स रिग. अटेन्शन ….. ……………स्क्वेअर म्हणजे मधले अंगण.
झाले... मला समजले, की आम्हाला सीनियर्सने बोलावले आहे. पटापट आम्ही सगळेजण गेम्स ड्रेस घालून मधल्या अंगणात फॉलइन झालो. संख्या मोजली गेली. सीनियरला संख्येचा रिपोर्ट द्यायचा होता पण आमच्या ४० जणांमध्ये दोन जिसी कमी आढळल्या मुळे जिसी अमित वर्मा बुचकळ्यांत पडला. आमच्या टर्मचा ह्या आठवड्याचा संख्या देणारा जिसी अमित वर्मा होता. रिपोर्ट न देता, अमित गैरहजर जिसींची वाट बघत थांबला पण आमचा सीनियर, कॉर्पोरल बैन्सलाला मुळीच दम धरवत नव्हता.
यु ब्लडी क्लॉट गिव द रिपोर्ट अॅज इट इज. बैन्सला अमित वर्मावर खेकसला. तसा जिसी अमित वर्माने पटकन रिपोर्ट दिला.
परेड सावधान. तसे आम्ही लागलीच ताठ उभे राहून सावधान झालो. अमित वर्मा स्वतः पळत जाऊन कॉर्पोरल बैन्सला समोर उभा झाला. सावधान केले व मोठ्याने रिपोर्ट दिला.
गुड अफटर्नून सर, 38 जिसीज प्रेझेंट 2 जिसीज अब्सेंट फॉर द परेड. सर. तेवढ्यात जिसी सुब्रमण्यम आणि जिसी अशोक पांडे लडखडत आले. जिसी सुब्रमण्यमला आम्ही सुब्बू म्हणायचो. सुब्बूची चाल विचित्र होती. तो नेहमी डुलत डुलत चालायचा. हा डुलतं चालणारा सुब्बू जेव्हा पळायचा म्हणजे आयएमएच्या भाषेत ‘ऑन डबल्स’ मध्ये यायचा तेव्हा अगदी सोंग दिसायचा. अशा प्रत्येक फॉलइनला कोणी एक नेहमी उशिरा यायचा. फॉलइनला लवकर येणारे नेहमीच लवकर येतात व जे उशिरा येतात ते नेहमीच उशिरा येतात. काही लोकांची खुबी असते ऎनवेळेवर पोहोचायची व काही लोकं किमान पंधरा मिनिटे तरी आधी येऊन उभी राहायची.
यु क्लाऊन्स व्हाय आर यु लेट. स्टार्ट रोलिंग फ्रॉम देअर इटसेल्फ अॅन्ड जॉईन द फॉलइन. सुब्बू व पांडेला उद्देशून कोर्पोरल बैन्सला खेकसला. माझ्या सारख्यांना बरे वाटले मनातून. आम्ही मरत लवकर यायचे मग उशिरा येणाऱ्यांना काही प्रसाद नको का.
नाव लिसन. यु शुड बी एबल टू पुट युअर रिग इन 2 मिनीटस्. डॅटस् द रिझन वि हॅव कॉल्ड यु.....
झाले काय होते, आमची पिटी परेड झाल्यावर कॅप्टन गिलनी आमच्या सीनियर्सना प्री मस्टर निट केले नव्हते म्हणून झापले होते. सुब्बू आणि पांडे यांना कपडे बदलायला उशीर लागला, व फॉलइनला उशीर झाला हे कारण ऎतेच मिळाले होते आमच्या सीनियर्सना. मग काय विचारता लागलीच कॉर्पोरल बैन्सलाने पट्टी परेडचा हुकूम सोडला. आम्हाला गणवेश व पोशाख निट, वेळेत व बरोबर कसा घालायचा हे शिकवण्यासाठी ही पट्टी परेड. आमची पट्टी परेड पुढे दोन तास चालली. पट्टी परेड म्हणजे पटापट वेगवेगळे पोषाख बदलायचे. प्रत्येक पोषाख बदलण्यासाठी दोन मिनिटे मिळायची. मग सगळे पोषाख व गणवेश त्या दोन तासात दोन दोन मिनटात बदलले गेले.
त्या दिवशीचे दृश्य पाहण्यासारखे होते. कोणी रोलिंग, क्रॉलिंग करत आहे, तर कोणी मुर्गा बनले आहे, कोणी जिसी स्वतःची सायकल गळ्यात अडकवून उभा आहे, तर अजून कोणी फायरमॅन्स लिफ्ट सारखे दुसऱ्याला पाठीवर घेऊन पळते आहे. मजा अशी की प्रत्येकाला दुसऱ्याला झालेली शिक्षा सोपी वाटत होती व आपल्याला ती मिळायला पाहिजे होती अशी हुरहूर प्रत्येक जिसीच्या मनाला लागून राहिलेली होती. कॉर्पोरल बैन्सलाने बरोबर साडेतिनाला पट्टी परेड संपवली. चहा पिऊन गेम्स परेडला जाण्यासाठी लागतो तेवढाच वेळ दिला होता त्या महाभागाने आम्हाला.
आम्ही गेम्स ड्रेस घालून परेड ग्राउंड वर गेलो. गेम्स परेड मध्ये, कॅप्टन गिलने प्रत्येक जिसी, कोणकोणत्या खेळांमध्ये प्रवीण आहे ते जाणून घेतले. सैन्यात खेळाला खूप महत्त्व देण्यात आले आहे. दररोज, खेळाच्या रूपाने व्यायाम झाला तर आपले शरीर निकोप राहते व मनाचे संतुलन बिघडत नाही हे आयएमए मध्ये सुरवाती पासूनच बिंबवले जाते. सैनिकांबरोबर एक प्रकारचे सकारात्मक नाते जमवायला, खेळ हे अत्यंत प्रभावी प्रशासनाचे साधन आहे ही शिकवण पायी पायी आयएमएत दिली जाते. खेळताना सैनिक किंवा सैन्यातले जवान सेनाअधिकाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने खेळतात. तसेच युद्धामध्ये सैन्यातले जवान सेनाअधिकाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने लढतात. युद्धा मध्ये एकदुसऱ्याबरोबरचा तालमेळ खूप महत्त्वाचा ठरतो. एकमेकात तालमेळ जागृत होण्यास सामूहिक खेळाचा उपयोग होतो. म्हणूनच खेळ येणे व त्यात प्रवीण असणे ही आयएमए मध्ये एक ‘ऑफिसर लाइक क्वालिटी’ समजली जाते. ह्या ‘ऑफिसर लाइक क्वालिटीला’ थोडक्यात ओएलक्यू असे म्हणतात. ओएलक्यू हा शब्द आयएमएत आल्यापासूनच सारखा कानावर पडू लागला होता. त्या बद्दलचे ज्ञान जेयुओ भुल्लरने पहिल्याच दिवशी आम्हाला दिले होते. ज्यांचे आपण नेतृत्व करीत आहोत ते आपला आदर्श पुढे ठेवून आपल्या सारखे वागायचा प्रयत्न करायला लागतील असे प्रत्येकाचे आचरण असले पाहिजे व अशा आचरणाला ओएलक्यू म्हणतात. आपण सैन्यातल्या जवानांच्या गळ्यातला ताईत बनू शकू असे आपले वर्तन असले पाहिजे त्यासाठीच आयएमएच्या अभ्यासक्रमात ओएलक्यू वर एवढा जोर दिला जातो. पुढच्या काळात येणारी कोठचीही जबाबदारी समर्थपणे पेलण्यास सक्षम ठरेल असे आचरण आपण अंगी बाणले पाहिजे हे सारखे बिंबवले जाते. टर्मच्या सुरवाती पासून शेवट पर्यंत जिसीला त्यांच्या ओएलक्युवर आधारीत गुण प्रदान केले जातात व पुढे गुणवत्ताक्रम ठरवताना ओएलक्युचे गुण विचारात घेतले जातात एवढे त्याचे महत्त्व.
मैदानी खेळात आपण निपुण नाही त्याचे मला नेहमी दुःख वाटे. मैदानी खेळ येणे हा एक ओएलक्युचा भाग झाला. मैदानी खेळ म्हणजे हॉकी, बास्केटबॉल, फुटबॉल, हॅन्डबॉल आणि एथलेटीक्स सारखे सामूहिक खेळ. टेबल टेनिस व बॅडमिंटन ह्या खेळांना तितकेसे महत्त्व नाही. बॉक्सिंग हा खेळ तर प्रत्येक जिसीने एकदा तरी खेळलाच पाहिजे असा नियम. कोणते जिसी कोणते खेळ खेळतात व कशात तरबेज आहेत ह्याची कदर आयएमेत केली जाते. खेळात ज्याने विशेष प्रावीण्य दाखवले आहे त्याला आयएमए मध्ये त्या खेळासाठी निळ्या रंगाचा मानाचा कोट म्हणजे ब्लेझर मिळतो व अशा जिसीला आयएमए ब्लु म्हणतात. आयएमए ब्लु होणे म्हणजे जिसीसाठी फार अभिमानाची गोष्ट असते. प्रबोधिकेत खेळले जाणारे प्रत्येक खेळ भयंकर चुरशीचे होतात. मी पळण्यातच त्यातल्यात्यात बरा होतो. आमच्या वेळेला डोंबिवललीकरांचे लाडके खेळ म्हणजे कोठेही खेळता येणारा अगदी बाल्कनीत सुद्धा असा क्रिकेट व कबड्डी. त्यावेळेला भागशाळा मैदानावर वार्षिक कबड्डी सामने व्हायचे आता होतात की नाही माहीत नाही. त्यामुळे हेच खेळ जास्त माहिती. ह्या खेळांना फारशी काही साधनं लागत नाहीत. मला अजूनही आठवते, पूर्वी आपल्याकडे हॉकी, बास्केटबॉल, फुटबॉल, हॅन्डबॉल अशा मैदानी खेळाची परंपराच नव्हती व अशा खेळांचे वातावरण नव्हते. त्या मानाने उत्तर हिंदुस्थानात व भारताच्या ईशान्य राज्यातून खेळांना जास्त प्रोत्साहन मिळते हा फरक प्रकर्षाने जाणवला. एकूणच मध्यम वर्गीय लोकांची खेळांच्या बाबतीतल्या उदासिनतेमुळे मुलांना खेळांसाठी प्रोत्साहन कमी मिळायचे. चाकोरीच्या बाहेर जाऊन, खेळाला महत्त्व देऊन, सरावासाठी लागणारा वेळ काढावा लागतो. तो माझ्या लहानपणी काढता येण्यासारखा नव्हता. परिस्थितीचा दोष म्हणता येईल कदाचित पण चाकोरी बाहेर जाण्याचे स्वातंत्र्य फार क्वचित आपल्याकडे अनुभवायला मिळायचे. जसेकाही अनंत फंदी ह्यांचा ‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको’ हा फटका आपण तंतोतंत पाळतो असे वाटावे, इतके आपल्याकडे चाकोरीबद्ध जीवन कसे जगायचे त्याचे उत्तम धडे दिले जायचे.
गेम्स पिरेड मध्ये फार काही घडले नाही व आम्ही आमच्या खोल्यांवर आलो. मी संध्याकाळच्या फॉलइनची वाट बघत होतो आणि फॉलइनची घोषणा झालीच. आम्ही मधल्या अंगणात जमलो. ह्या वेळेला पटकन जमलो. आम्हाला दिवसातल्या चुका सांगण्यात आल्या व अजून काही नियम समजावून सांगण्यात आले. पहिला नियम असा होता की शॉपिंग सेंटर मधले कँटिन आमच्या साठी ‘आऊट ऑफ बाऊंड’ करण्यात आले होते. म्हणजे तेथे जायचे नाही व त्यातले काही खायचे नाही. खरेतर तेवढा वेळच मिळणार नव्हता आम्हाला. दुसरा नियम असा की घरातल्या कपड्यात जर खोली बाहेर पडायचे असेल तर प्रत्येकाला दिलेला, तो, ‘पिक्चर मध्ये नायिकेचा बाप घालतो तसा’ गाऊन घातल्या शिवाय बाहेर पडायचे नाही. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे जो पर्यंत ड्रिल टेस्ट पास होत नाही तो पर्यंत ‘लिबर्टी गेटेड’. म्हणजे आयएमएच्या बाहेर जाता येणार नाही. नाहीतर नियमानुसार जिसीजना दर रविवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ८ पर्यंत डेहराडून शहरात मुफ्ती ड्रेस घालून, सायकलने जाता येत असे. पण आमच्या सीनियर्सनी त्याला काट लावली होती. आता आम्हाला ड्रिल टेस्ट पास झाल्या शिवाय बाहेर जायचे स्वातंत्र्य नसणार होते.
माझ्या शेजारच्या खोलीत ब्रजेशप्रतापसिंह राहायचा. तो बिहारचा होता. त्या पलीकडच्या खोलीत जिसी परितोष शहा राहायचा तो सिक्कीमचा राहणारा. माझ्या समोरच्या फ्लॅन्क मध्ये जिसी अमित वर्मा होता. तो दिल्लीचा होता, एनडिए मधून आलेला व त्याचे वडील सुद्धा सैन्यातलेच होते. त्या मुळे आमच्या सारख्या वासरांमध्ये जिसी अमित वर्मा लंगडी गाय होती. अजून एक लंगडी गाय म्हणजे जिसी हरबिंदर सिंह. तो रेलीगेटेड जिसी होता. रेलीगेशन म्हणजे कोर्स मधून नापास होणे. रेलीगेशन झाले की पुन्हा सहा महीने टर्म रिपीट करावी लागायची. रेलीगेशन झाले की आणखीन सहा महिने आयएमएचे सारे नियम व शिक्षा झेलाव्या लागायच्या व पुढे नोकरी मध्ये पदोन्नती करता लागणारी ज्येष्ठता कमी व्हायची, ती वेगळीच. त्यातून जर दोनदा रेलीगेशन झाले तर प्रबोधिकेतून काढून टाकले जायचे व तेथेच एखाद्या जीसीची अधिकारी व्हावयाची स्वप्न भंग पावायची. शीख पंथी वेगवेगळ्या प्रकाराने पगड्या बांधतात. पगड्या बांधण्याची पद्धत व ठेवण त्यांच्या पंथातल्या जातींवर आधारीत असते. आयएमएच्या गणवेशात एका विशिष्ट प्रकारानेच पगडी बांधायची असते. जिसी हरबिंदर रोज रात्री जितके शीख पंथी सरदार जिसी होते त्यांची ‘पगडी परेड’ घ्यायचा. एका विशिष्ट पद्धतीने पगडी बांधायला शिकवायचा, जेणे करून गणवेश घातल्यावर सगळ्या शीख सरदारांची पगडी एकसारखी दिसू शकेल अशी.
संध्याकाळच्या फॉलइन मध्ये जेयुओ भुल्लर व कॉर्पोरल बैन्सलाने आम्हा प्रत्येकाला स्वतः बद्दल माहिती द्यायला सांगितले. दोन शब्द बोलायला सांगितले.
अमित वर्मा – दिल्लीचा पंजाबी मुलगा. त्या आधी सहावी ते बारावी डेहराडूनच्याच राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजात शिकलेला. पुढे बारावी नंतरची तीन वर्ष पुण्याच्या राष्ट्रीय सैन्य प्रबोधिकेत खस्ता खाऊन आता येथे आयएमएत दाखल झालेला. उंची ६ फुट. देखणा बांधा व गोरा गोमटा.
आशुतोष महापात्रा – ओडिशा मधल्या संभलपुरचा, बिएस्सी करून सिडीएसची परीक्षा देऊन आलेला डायरेक्ट एंट्री होता. अत्यंत सालस. पळण्यात नेहमी पहिला नंबर असायचा. क्रॉसकंट्री रनर.
मद्रासचा सुब्रमण्यम – सावळा, घारे डोळे असलेला. कपाळावर आडवे भस्म लावणारा, पण आयएमएतल्या पाहिल्याच दिवशी सीनियर्सने त्याला त्याच्या कपाळावरचे भस्म उतरवायला लावले होते. कोणत्याही पोषाखात हे भस्म बसत नाही. भस्म्याकडे बोट दाखवत ‘आय विल नेssssव्हर टेक धिस ऑफ’ असे म्हणणारा सुब्बू, त्या दिवशी पासून विदाऊट भस्म असा आम्हाला दिसायला लागला. हा जिसी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन युनिव्हर्सिटी एंट्री स्कीम मधून निवडून आयएमएत आला होता.
सुनील खेर – काश्मिरी ब्राह्मण, खूप बोलणारा. आमच्या सारखाच अधिकारी होण्याच्या प्रतीक्षेत दिवस मोजत. त्याला वडील नव्हते. तो आणि त्याची आई, बारामुल्ला जवळच्या सोयीबुक ह्या गावात राहायचे. तिथे त्यांची एक छोटी हवेली होती. त्याचे वडील काश्मीर खोऱ्यात एका दैनिकाचे संपादक होते. दीड वर्षापूर्वी एक दिवस त्याचे वडील कचेरीत गेले व परत आलेच नाहीत. त्यांना म्हणे अतिरेक्यांनी पळवून नेले व आजपर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता. त्यामुळे खूप बोलणारा हा जिसी मधूनच कधी कधी दुःखी दिसायचा.
मी, जिसी आकाश काशिनाथ शिरगावकर, डोंबिवलीचा राहणारा..........
(क्रमशः)
http://rashtravrat.blogspot.com
http://bolghevda.blogspot.com
सहीच.... पुन्हा एकदा पुढील
सहीच....
पुन्हा एकदा पुढील भागाच्या प्रतिक्षेत ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच... ओळखपरेड समोर उभी
मस्तच... ओळखपरेड समोर उभी राहून ऐकतेय असं वाटलं.
ओएलक्यू आणि खेळाबद्दलचे परिच्छेद अतिशय आवडले.
आवडला हाही भाग.
आवडला हाही भाग.
मस्त लिहताय ..वाचताना प्रसंग
मस्त लिहताय ..वाचताना प्रसंग डोळ्यापुढे ऊभे राहतात.
खुप मज्जा येत्येय वाचायला.
खुप मज्जा येत्येय वाचायला. एकदम इंटरेस्टींग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा! आला पुढचा भाग... वाटच
व्वा! आला पुढचा भाग... वाटच बघत होतो.
मस्त! नेहमीप्रमाणे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
सगळे भाग एकदम वाचुन काढले.
सगळे भाग एकदम वाचुन काढले. अप्रतिम चालू आहे मालिका. पुढील भागाच्या प्रतिक्षेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप मस्त !!! पुढील भागाच्या
खुप मस्त !!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुढील भागाच्या प्रतिक्षेत !!
मस्त आहे. एखादा चित्रपट मन
मस्त आहे. एखादा चित्रपट मन लावुन पहातो किंवा एखाद पुस्तक चवी चवी ने वाचातो तसं वाचत आहे.
चिमुरी, ललिता-प्रीती, शैलजा,
चिमुरी, ललिता-प्रीती, शैलजा, एक मुलगी, लोजो, मित, कविता नवरे, स्मित, निकिता - आपणा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
काका... यंदा जरा लेट आलाय
काका... यंदा जरा लेट आलाय भाग.. लवकर लवकर पुढचे भाग लिहा... वाचताना सगळे चित्र उभे रहाते आहे डोळ्यासमोर..
हाही भाग आवडला.
हाही भाग आवडला.
सुंदर लिहीला आहे हा भाग
सुंदर लिहीला आहे हा भाग सुद्धा. बरेच तपशील छान आले आहेत. पुढच्या भागाची वाट पाहतोय.
मस्त लिहताय पुढच्या भागाची
मस्त लिहताय पुढच्या भागाची वाट पाहतोय.
खुपच मजा येतेय वाचताना... एक
खुपच मजा येतेय वाचताना... एक वेगळंच विश्व उलगडतंय.
सात वजा एक, स्वप्ना_राज,
सात वजा एक, स्वप्ना_राज, फारएन्ड, ओझरकर, मामी - आपणा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मस्त! पु.भा.प्र.
मस्त! पु.भा.प्र.
मस्त लिहिताय तुम्ही
मस्त लिहिताय तुम्ही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अखी, रोहित एक मावळा, - आपणा
अखी, रोहित एक मावळा, - आपणा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
परत एकदा तेवढाच छान भाग. पण
परत एकदा तेवढाच छान भाग. पण हा थोडा लवकर संपला. अजुन लिहावेत पुढ्च्या भागात.
मजा अशी की प्रत्येकाला
मजा अशी की प्रत्येकाला दुसऱ्याला झालेली शिक्षा सोपी वाटत होती व आपल्याला ती मिळायला पाहिजे होती अशी हुरहूर प्रत्येक जिसीच्या मनाला लागून राहिलेली होती.
मस्त!
जसेकाही अनंत फंदी ह्यांचा ‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको’ हा फटका आपण तंतोतंत पाळतो असे वाटावे, इतके आपल्याकडे चाकोरीबद्ध जीवन कसे जगायचे त्याचे उत्तम धडे दिले जायचे.
अगदी बरोबर!
छान लिहीलय.
मस्तच !!
मस्तच !!
मस्तंssss. पुढला भाग कधी?
मस्तंssss. पुढला भाग कधी? उद्या?
चैत्रा, जयनीत, -, दाद आपणा
चैत्रा, जयनीत, -, दाद आपणा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
दाद पुढचा भाग जरा वेळाने देईन.
आजच सगळे भाग एकत्र वाचून
आजच सगळे भाग एकत्र वाचून काढले. खूप मस्त आहे ही मालिका.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
फारच मस्त...... पुढच्या
फारच मस्त......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुढच्या भागाला उशीर नका करू........लवकर येउ देत......
स्वानुभवाच रेखाटन वाचकांना
स्वानुभवाच रेखाटन वाचकांना गुंतवून ठेवण्याची तुमची हतोटी दिसते. पुढे वाचण्याची उत्कंठा प्रबळ आहे.