बागकामाबद्दल जुन्या हितगुजवरची माहिती

Submitted by webmaster on 18 July, 2008 - 00:04
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑर्किड भारतात (मुख्यतः पुण्यात) वाढू शकतो का? असल्यास काही विषेश काळजी घ्यावी लागते का?
जाणकारांकडुन थोडी माहिती हवी आहे.
कारण इथे (UK मध्ये) खुप थंडी असल्याने आम्ही याला सकाळी स्नानग्रुहात (moisture साठी )आणि नंतर दीवान खोलीत ठेवायचो कारण तिथे शक्यतो नॉर्मल तापमान असते. आता याला पुण्यात न्यायचा बेत करतोय.
विमानातुन रोपे कशी नेता येतील हेही सांगा.

मी अलीकडेच ( ३/४ महीन्यांपूर्वी) गॅलरीत एका कुंडीत रातराणीचं रोप लावलंय .ते चांगल रुजलंय देखिल कारण नविन पालवीही आलीय..पण अजुनही फुलं मात्र येत नाहीत...कुणी सांगेल का मी काय करावं?
अंजुली

गुलाबाची पाने पिवळी होण्याची साधारण कारणॅ -
१. पाणी जास्त होतय (झाड कुंडीत असेल तर हि शक्यता खूप जास्त असते)
२. सूर्यप्रकाश पुरेसा न मिळणे (२-३ तास तरी थेट सूर्यप्रकाश मिळायला लागतो गुलाबाला)
३. काही कीड वगैरे लागली असेल