गडावरील अजरामर कवींनी आज केलेल्या कविता पाहोनी आमचे डोळे तृप्त जाहले. पण त्यातील काही कविता आधीच वाहून गेल्या असे समजले. तरी उरलेल्या कविता वाहून जाउ नयेत म्हणुन हा प्रयास. तिथल्या कविता मी इथे छापतो आहे. मूळ कवींनी आपापली कविता मग इथेच खाली पेस्ट करावी. नंतर ही पोस्ट एडिट करेन म्हणजे मालकीहक्क कायद्याचा भंग होणार नाही. वाहून गेलेल्या कवितांच्या मालकांना जर त्या लक्षात असतील तर त्या इथे पोस्टून आमचे देखील प्रबोधन करावे..
तर आजच्या सर्वोत्कृष्ट कवितेने सुरुवात करुया:
*********************
अरभाटः
मागल्या दिवसाचा संताप अन दु:ख
अवहेलना, निराशा व नकार
यांचा बघत असता
जमिनीवर पसरलेला निचरा
आगामी विदग्धतेची चाहूल लागते
जेव्हा आसमंतात घुमते आवाहनात्मक हाक.......
"बाईsss, कचराsss"
*********************
मीनु:
दादा देतो दणका
दुखुन येतो मणका
दोघं मिळून खातो आम्ही
भाकरीबरोबर झुणका
दादा जातो कालेजात
पुस्तकं मात्र घरात
म्हणतो नको दिसायला
खोट मुळी तोर्यात
दादा चालवतो बाइक
वर म्हणतो माझं आइक
आपल्याला काय
लाच दिली की आपण त्याचे पाइक.
*********************
माता:
दीपिका पडुकोणच्या बहिणीने लिहिलेली कविता.
ताई माझी रुपवान,
जशी लावण्याची खाण.
उंची केवढी हो तिची,
पाहता दुखते मान.
ताई घालते ड्रेस,
फॅशनेबल अति अति.
कपाट तिचे उघडिता,
अबब! ड्रेस किती?
ताई घालते पायांत
बूट उंच टाचांचे.
तिला फारच शोभती
बूट नाजूक काचांचे.
ताई करते कॅटवॉक,
एक हात कमरेवर.
सर्व लोक गं म्हणती,
जशी परी धरेवर.
ताई गेली सिनेमात,
तिथे भेटे रणबीर.
ताईच्या नखाचीही,
त्याला मुळी नाही सर.
*********************
गजानन देसाई:
सोमवारचा शाप
लांबुडका गोल
एक डोंगर
छिद्र त्यास
एका सोंडेस
त्यातून गोवली
बलदंड शृंखला
खडखड .... .... (मंदशी)
जीव दडपून जाय
रवीच्या ढळत्या निशी
दिली पायात जोखडून
*********************
पुन्हःश्च मीनु:
ती पोळेवाली बी
माझ्या गुलाबाच्या
झाडाची पानं
खुशाल तोडून नेते
ती पोळेवाली बी
तीला एक छोटी सोंड
सोंड कसली कात्रीच ती
नीट लायनीत कापते.
ती पोळेवाली बी
मग कधी तरी
खाते फटका
जुन्या वर्तमानपत्राचा
*********************
वरील कवितेवर एकापाठोपाठ एक खालील दोन प्रतिक्रिया आल्या:
@मीनु...
छान कविता होती...:ड
**************
@मीनु...
छान कविता आहे...:-प
*********************
आणि मीनु यांना अजुन एक कविता स्फुरली:
एकदा भुतकाळ
एकदा वर्तमानकाळ
जीडीच्या कवितांना नाही चाल
एकदा ड
एकदा प
अंगावर पडते प्रतिक्रियेची पाल
एकदा बरं
एकदा वा!!
दिपीकाच्या गालाला रणबीरचा गाल
*********************
पुन्हा एकदा मीनु:
कवितेचं नाव आहे 'ओळखा पाहू'
काका माझा होतो भुवन
काका कधी असतो मंगल
काकाच्या बोलांनी
का होते मोठी दंगल?
काका आपल्याच नादात मग्न
काकाची होतात दोन्दोन लग्न
काका कापतो केस बारीक
काका खातो रोज खारीक
काका बोलतो विचार करुन
काका अस्सा माझा छान
काका कोण? मी कोण?
*********************
हीच कवितेची बाधा आजुबाजुच्या बाफंना होउन, मृण्मयी ह्यांनी पाडलेली कविता:
इथे कुणालाही दुखवायचा हेतु नाही
आणि मनं जोडणारा कवितेसारखा सेतु नाही
काव्य स्फुरायला मदतीची अपेक्षा नाही
पण माझं गद्य वाचण्याखेरीज दुसरी कठोर शिक्षा नाही.
*********************
आणि सरते शेवटी, फूल ना फुलाची पाकळी म्हणुनः
जळे तयांची काया
ज्यांनी कविता केल्या
सृजनाच्या अमूर्ताला
शब्दांचा साज दिला
का जळजळते तुम्हाला
की वाचण्यास दाम मोजला?
आम्ही लिहितो, आम्ही वाचतो
कौतुक का बघवेना तुम्हाला
मनाच्या क्षतांतून
'मंद'सा तरंग पसरला
चक्षूच्या सीमा ओलांडून
रवीचा चंद्र झाला
असेल विषय तोच पुन्हा
पण रोज नवा साज दिला
कागद फुकट मिळाला
म्हणुन दिसामाजी रतीब घातला
*************************************
"तू मेरा या
"तू मेरा या उसका या किसी औरका?" Contd....
होय, संतोष वेडा झाला. हाय रे दैवा, त्याच्या आई वडिलांना कुणीच कसे वेळीच सावध केले नव्हते. त्या वेडाच्या भरात, तो त्या जॉन अब्राहमलाच ऍश समजु लागला, आनि मित्रा उभा होता त्याला जॉन अब्राहम. इतक्यात दरवाजा उघडला आणि त्याला तीच गुलाबी केप्री घातलीली दिसली, त्याच्या उधळलेल्या अंजीर बर्फीला उचलुन घेत असताना. त्याला ती केप्री पाहुन कापरं सुटलं.
वेडाच्या भरात त्याला कळेना हिच का ती रंभा, का हि ती मेनका ??
काय करु काय नको हे कळायच्या आताच त्याचे हात वही पेनाकडे गेले आणि तो कविता लिहु लागला..
कविता लिहुन झाल्यावर चाल ठरली आणि तो लगेचच कविता रेकॉर्ड करायला लागला ..
त्यानी कविता रेकॉर्ड करायला सुरवात केली पण हाय रे कर्मा...
त्याच्या टेप रेकॉर्डरनी त्याला नेहमी प्रमाणे दगा द्यायला सुरुवात केली.
एक वाक्य रेकॉर्ड करुन झालं की तो टेप काहीतरी भलतच.. ऊऊऊऊऊऊऊऊऊऊउ असं रेकॉर्ड करायचा.. त्यामुळे तो जाम भडकायला सुरुवात झाली.. पण तेव्हढ्यात त्याचा मित्र त्याला सावध करतो.. त्याला खालून वर येणार्या बुटांचा आवाज ऐकू येतो..
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...
सिंडी
सिंडी
जनता सुटलीये :):-)
***
... कारण चड्डी असतेच (कुठे ना कुठेतरी) !
सिंडी, मृ,
सिंडी, मृ, आशू, हिम्स
मला हे विद्रोही गुलमोहर संमेलनच फार आवडायला लागलय खर्या गुलमोहोर साहित्य संमेलनापेक्षा.
शिंडे स्टो
शिंडे
स्टो ने हात ठेवला का तुझ्या डोक्यावर ? कित्ति बै मस्त मिंग्लिश लिहिलीस रेसिपी.
मॄ - तिखटं जीटीजी करूया का अजून एक तुझ्या कवितेवरून प्रेरणा घेउन ?
शिंडे, मृण
शिंडे, मृण
>>स्टफ्ड
>>स्टफ्ड किंगाळा बनान्ना
सिंडे, सुटलीस!!!! (कृपया आपल्या प्रेरणेचा स्त्रोत लिहाल का? सापडत नाहीये.)
त्याला
त्याला खालून वर येणार्या बुटांचा आवाज ऐकू येतो.. फक्त आवाज टॉक... टॉक...टॉक >> तो आवाज आता स्पष्टपणे ऐकू येत असतो पण समोर कुणीच दिसत नसत!
लिहिण्याचा कंटाळा आल्यामुळ
पुढील कथा तुर्तास सांगत नाही!
खल्लास! <<<बन
खल्लास!
:
<<<बनान्नाचा बारकान्ना:
ऐश आहे! सुटलेत सगळे.
खल्लास...
अंजीराची
अंजीराची बर्फीकार पीएसजी आणि समग्र विश्व प्रश्णकार बी ह्यांच्या सौजन्याने आज साहित्याच्या अथांग सागरात निर्माण झालेली काही पुष्पे:
पुष्पकर्त्या आशुंडर्स्कोडी:
चाल : भोंडल्याचे गाणे : १ लिंबू झेलू बाई
एक अंजीर झेलू बाई दोन उंबर झेलू
एक अंजीर झेलू बाई दोन उंबर झेलू
वीस अंजीरांचा गर काढला
दूधपावडर घाला त्यात
काजूपावडर घाला
रट रट उकळा आता खळ खळ उकळा
अगं अगं वैनी अशी कशी बर्फी?
बर्फी नव्हे ती तर वडी
तुटेना आता ही तर जाडी
आले आले धावत ते तर कवी
कवी म्हणाले वैनीला
वैनी वैनी चूक झाली तुमची
उंबरात पाखरं मेली की हो आमची
समजूत घाले वैनी त्यांची
गर कसा काढावा, बी कसे ठेवावे
फोटो का नाही टाकावा
हास्याचे हे खळखळाट
वैनी मारते कपाळी हात!!
पुष्पकर्ते टण्याबेडेकरः
हे भगवंता कमलाकांता
अस्स कस्स झालं
उंबराच्या झाडाला
अंजीर कसं आलं
अंजीराची काल मी
काढली होती साल
पाखरु पाखरु म्हणुन त्याने उडवुन टाकली
हे भगवंता.....
अंजीराचा काल मी
काढला होता गर
बी कडू का म्हणुन त्याने चाखायला घेतला
हे भगवंता.....
अंजीराची काल मी
केली होती बर्फी
उंबर उंबर म्हणुन त्याने तोंडात टाकली
हे भगवंता...
-------------------------------------------
अरुण ह्यांनी दिलेले जाहिरातप्रत जाहीर निवेदन:
" आमच्याकडे शिकवणी लावा. आम्ही ४० दिवसात तुम्हाला उत्तम कविता पाडण्याचे शिक्षण देऊ. त्वरा करा. थोड्याच जागा शिल्लक. आमची कुठेही शाखा नाही "
आणि ह्यावर स्लार्टी ह्यांनी बेंबीच्या देठापासून दिलेली आदीम प्रतिक्रिया:
"अरूण, दिवसाला एक का ? म्हणजे 'बबन कमळ बघ, वर वर ढग' या इ. पहिलीपासून ते 'गडगडत ये, दडदडत ये, कडकडू दे काव्यरुंड, चरफडत हो, तडफडत हो, करकरा शमव काव्यकंड' इथपर्यंतचा कोर्स"
चाल : नाना
चाल : नाना पाटेकरचा जगप्रसिध्द डायलॉग.

साली (काढलेली) एक अंजीर बर्फी आदमी को भोंडले का कवी बना देती है!
----------------------
एवढंच ना!
छोट्या
छोट्या बहराची गझल -
कापले अंजीर, निघाले उंबर
पाखरांचे गृह, स्टीलचे झुंबर
.
चिकणे पाखरु, धपापे राउळ
आलवारी साल, शिवला झंपर
.
काय पेढे व कसली बर्फी मग
मुंगळ्यापश्चात, मम हो नंबर
(गझलही छोटीच)
***
... कारण चड्डी असतेच (कुठे ना कुठेतरी) !
स्लार्ट्य
स्लार्ट्या
झंपर हा शब्द फार दिवसांनी ऐकला ..
-----------------------------------------
सह्हीच !
(No subject)
चिनू(क्स)
चिनू(क्स) यांची
बर्फी स्पेशल
दिवस हा अंजिरांचा
उंबरातील पाखरांचा
ज्यात असती बिया हजार
जसे रवाळ तूप कणीदार
अथवा उंबराचे पेढे जसे
किंवा अंजीराचे श्रीखंड जसे
पण नैवेद्यास चालत नाहीत
कारण अंजीर लाल असते
ज्यांचे एका बर्फीवर भागत नाही
अथवा आईस्क्रीम आवडत नाही
त्यांना उंबर वापरावे लागते
आणि तिथेच पाककृती फसते
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...
मायबोलीकर
मायबोलीकरोंकी खिदमत मे पेश है एक छोटासा नजराना. गझलेचं वृत्त आहे कानामा गेलावा.
अक्कण अळ्या चिक्कण पाखरं उंबर ते काढावे
अस्से उंबर सुरेख बाई स्टील ते द्यावे
अस्से स्टील सुरेख बाई गर तो काढावा
अस्सा गर सुरेख बाई रटरट उकळावा
अश्शी उकळी सुरेख बाई बर्फी ती पाडावी
अश्शी बर्फी सुरेख बाई पुनमला धाडावी
अश्शी पूनम सुरेख बाई वैनी ती आणिक
अश्शी वैनी सुरेख बाई गडावर पडीक
अस्सा गड सुरेख बाई पिंका त्या टाकाव्या
अश्शा पिंका सुरेख बाई वाद ते रंगावे
अस्से वाद सुरेख बाई बाफ ते भरती
अस्से बाफ सुरेख बाई मायबोली असती
अश्शी मायबोली सुरेख बाई हसाया मिळतं
अश्शी #### द्वाड बाई शिव्या देत सुटतं
हेहेहेहे
हेहेहेहे
धन्य सिन्डे!!!
(No subject)
सकाळी
कसला म्स्त
कसला म्स्त टाईमपास करता तुम्ही सगळे. सगळेच एकदम अल्टीमेट आहेत. मस्त मजा येते वाचायला.
मला लिखाण कविता काही जमत नाही पण वाचायला आवडत.
सिंडीताई...
सिंडीताई... तोडलतं.. !!!!!!!!!!!!!!
तुम्हाला त्रिवार सलाम.. !!!
आज दिवसभरात अशक्य हसलोय !!!!!!!!!!!!!
सिंडे...
सिंडे... चाबूक...

=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...
स्लार्ती
स्लार्ती गझल यक नंबर बरं!
सिंडीताई, काय छान तालासुरात म्हणण्याजोगं लिहीता बॉ तुम्ही!
पेढ्यांसा
पेढ्यांसाठीची सगळ्यात सोपी कृती...
१. घरातल्या कोणाचेही आपल्याकडे लक्ष नाही असे बघून हळूच पर्स काखोटीला मारावी.
२. हळू हळू घराच्या मुख्य दरवाज्याकडे कूच करावे..
३. पटकन पादत्राणे घालून कोणाच्याही नकळत घराबाहेर सटकावे..
४. रस्त्यावर आल्यावर एखाद्या रिक्षा, टॅक्सीला थांबवून त्यात बसावे..
५. रिक्षा अथवा टॅक्सी जवळच्याच एखाद्या चांगल्या मिठाईच्या दुकानापाशी थांबवावी.
६. आपल्याला कोणी बघत नाही आहे हे बघून विजेत्याच्या थाटात दुकानात प्रवेश करावा.
७. ज्या प्रकारचे पेढे हवे असतील त्याची मागणी करावी. काउंटरवर पैसे देऊन दुकानातून बाहेर पडावे.
८. मगाचचा रिक्षा, टॅक्सीवाला थांबलेला असेलच.. त्याच गाडीत बसून परत घरी यावे.
९. गाडीवाल्याला हळूच पर्स उघडून त्यातून पैसे काढून द्यावेत.
१०. मग एकदम चोर पावलाने मुख दरवाज्या पर्यंत पोहोचावे.
११. हळूच दार ढकलून कोणी नाही आहे ह्याची खात्री करून घरात प्रवेश करावा.
१२. चपला काढत काढत परत एकदा खात्री करावी कोणी पाळत ठेवून नाही आहे हे.
१३. पटकन स्वयंपाक घरात जावे.
१४. पेढे बॉक्स मधून काढून एका सुंदर डिश मध्ये काढून ठेवावेत.
१५. संध्याकाळी घरी आल्यावर नवर्याला खायला द्यावेत व कसे झालेत हे सारखे सारखे विचारावे.
त.टि. - शक्यतो हा प्रकार दुपारी घरातील बाकीची मंडळी झोपलेली असताना करावा.
अ.म.सू.- पेढ्यांच्या बॉक्सची न विसरता व्हिल्हेवाट लावावी अन्यथा खूप धोके संभवतात. तसेच पेढे खाल्ल्यावर ह्याच्या दुकानातले पेढे असेच लागतात वगैरे प्रश्नांकडे सोयीस्कररित्या दूर्लक्ष करावे..
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...
हिम्स,
हिम्स, पेढे की अंजीर बर्फी?
सिंडी,
सिंडी, फॉर्मात आहेस! ज ब री च

बापरे! आज प्रचंड हसलीये ..
हा वीकेंड लक्षात राहील
-----------------------------------
क्या कोई नयी बात नजर आती है मुझमें
आईना मुझे देखके हैरानसा क्यूँ है..
अशक्य
अशक्य हसलेय सकाळी सकाळी!!!
सगळ्यांना "टोप्या काढा"
सिंडी
सिंडी


गुलाबी सणाच्या पूर्वसंध्येनिमित्त एक सवालजवाब -
ती - गुलाबी सण मोठा, नाही प्रेमा तोटा
तो - प्रेमालाच नाही, खिशालाही घाटाच घाटा
ती - गुलाबी सण मोठा, प्रेमाचा भरुया कोटा
तो - हो दूर नाहीतर, मामा हाणेल सोटा
ती - गुलाबी सण मोठा, मी कंबर, तू करदोटा
तो - कंबर नव्हे हा कमरा, अन् तुझ्या पोटास लागेल पोटा
ती - गुलाबी सण मोठा, प्रेमचषक लावू ओठा.
तो - ते आले सनातनी, न आता निदर्शनांना तोटा
ती - गुलाबी सण मोठा, जाऊ या बोरघाटा
तो - छे ! आपल्यासारखेच शेकडो, बोरघाटही पडे छोटा
ती - जाते मी, नको मला हा नर्मदेचा गोटा
तो - गुलाबीसणाच्या दिवशीच ब्रेकप, हाय! सिक्का निघाला खोटा !!
.
तटी : हा तो-ती यांच्यातला संवाद आहे, पण सध्याचा बहर बघता तो-तो असाही असू शकतो
तर लोकहो, हा संवाद तुमच्या बाबत घडू नये (किंवा काही जणांच्या बाबत घडो) अशा मनःपूर्वक इच्छेसकट संतवालन्तिनदिनाच्या शुभेच्छा
***
... कारण चड्डी असतेच (कुठे ना कुठेतरी) !
आई ग काय
आई ग काय सुटलेत सगळे. अशक्य.
हे
हे भग्गू!!
अरे काय हे!
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
Pages