ट्रेकर्सलोकांचा आवड्ता ट्रेक म्हणुन ढाक बहिरी कडे आवश्य पाहिले जाते. आम्ही चार -पाच मावळे एके दिवशी थ्रिल् म्हनुन पावसाळ्यात ढाक ला जाण्यास निघालो. पुण्यातून सकाळी ६.३० च्या लोकल ने कामशेत ला आलो.
कामशेत वरुन खाजगी वाहनाने २५ किमी वरील जांभवली गावी निघलो वाटेत एक धरण खुप नयनरम्य दिसत होते.
जांभवली गावातुनच पाण्याच्या बाट्ल्या भरुन घेतल्या कारण ढाकच्या गुहेत पोहचे पर्यन्त पाण्याची सोय नाही.
पाउस खुपच येत होता आणि प्रोफेशनल ट्रेक कधी केली नसल्या कारणाने सोबत घेतलेल्या नायलोन च्या दोरीचा मावळ्यानी असा वापर करुन घेतला.
काही वेळ चालल्यानंतर समोरच ढाक चा बहिरी आम्हाला खुनावत होता
वाटेत बरेच वॉटरफॉल होते.
या वॉटरफॉलला मस्त एन्जोय केला. काही अंतर चालल्यानंतर आम्ही ढाक च्या सुळक्याजवळ आलो.
इथुन मात्र दरीत उतरायचे होते. आमची ढाक ला पहिलीच व्हिझीट असल्यामुळे आम्हाला रस्त्याची महिती पण नव्हती .
तरीदेखील या दरीत उतरण्याची रिस्क आम्ही घेतली
ही दरी उतरल्यानंतर आम्ही परत तो गडच चढ्ण्यास सुरुवात केली.
मी आणि माझा मित्र महेशने काही ट्रेक केल्यामुळे आम्ही आमच्या सवंगड्यांना मद्त केली.
पण व्यर्थ....
शेवटी मी आणि महेशच वरती गेलो. आमच्या मागे थांबलेल्या मावळ्यांनी सुळ्क्यावरुन घेतलेला आमचा फोटो.
मस्तपैकी भैरोबाची पुजा केली.
आणि आम्ही दोघांनीच फोटो सेशन केला.
आमच्या मावळ्यांना पाण्याच्या बाट्ल्या भरुन घेतल्या.
शेवटी आम्ही ढाक सर केलाच...........!
मायबोलीकरांनो हा माझा पहिलाच लेख असल्याकारणाने काही (बरेच कांही) चुकले असेल तर समजुन घ्या.
आणि विदाउट प्लानिंग पावसाळ्यात एकदा ढाक सर कराच....
मि तर कधीही तयार आहे...
जर तुम्ही कधी ढाकला जाण्याचा बेत आखत असाल आणि मझी काही मदत हवी असेल तर मला नक्की फोन करा ९२७०७१४०५६.
मायबोली करांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्हीही तुमच्या फोन नंबरचा त्या लेखात उल्लेख करावा.
कांही चुकले असेल तर परत क्षमस्व.....
पवन तुमी लोक्स सुके सुके
पवन तुमी लोक्स सुके सुके दिसतायत, तुमच्या बरोबर पाउसाला नेल नाही का ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शेवटी मी आणि महेशच वरती गेलो >>> का ? वाट निसरडी झाली आहे का ? अधीक माहीती दे.
लय भरि .
लय भरि .
छान आहेत फोटो. ओली सुकी चालले
छान आहेत फोटो. ओली सुकी चालले होते वाटतं. आणि काहीही चुकलेले नाही. असेच लिहित रहायचे.
मस्त रे मावळ्या शेवटी आम्ही
मस्त रे मावळ्या
शेवटी आम्ही ढाक सर केलाच...........!>>> ये हुइना बात आरे तिथ भल्या भल्यां ची **ते
ह्या ट्रेक ची हिच तर खरी मजा आहे , तऴ कोकणं चा फोटो? पु.ले.शु.
मस्तच!!!! आणि काहीही चुकलेले
मस्तच!!!!
आणि काहीही चुकलेले नाही. असेच लिहित रहायचे.>>>>>दिनेशदांना अनुमोदन. असंच लिहित रहा आणि मस्त फोटो चिकटवत रहा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ढाक रिटर्न्सना सलामच ठोक्तो
ढाक रिटर्न्सना सलामच ठोक्तो बॉ आम्ही नेहमीच
सही लोक्स ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त रे ... हा अजुन करायचा
मस्त रे ... हा अजुन करायचा राहिलाय ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान लिहीलंय. सुंदर फोटो.
छान लिहीलंय.
सुंदर फोटो.
अवघड दिसतोय चढायला.
अवघड दिसतोय चढायला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा अजुन करायचा राहिलाय ..
हा अजुन करायचा राहिलाय .. >>>>> यो ने ठरवलं तर लवकरचं जाउ
माझा ४ दा तरी झालाय पण आवडता ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुपच छान , मित्रा... लगे
खुपच छान , मित्रा... लगे रहो.. टेक केअर
आणी पु.ले.शु.
वाट निसरडी तर झालीच आहे रे पण
वाट निसरडी तर झालीच आहे रे पण पण आमचे नविन मवळे अगोदरच घाबरले होते.....
मस्त मस्त झाली सहल मग पुद्ची
मस्त मस्त झाली सहल मग पुद्ची सहल कधी आहे.
जांभवली गावातुनच पाण्याच्या
जांभवली गावातुनच पाण्याच्या बाट्ल्या भरुन घेतल्या कारण ढाकच्या गुहेत पोहचे पर्यन्त पाण्याची सोय नाही.
.............................................................................................................
पवन्या लेका,भर पावसात ढाक बहीरीला जाताना वाटेत पाणीच पाणी असते रे..लिखाणाचा पहीलाच प्रयत्न होता म्हणून सर्व चुका माफ हा..पण पुढच्या वेळी ट्रेकचे वर्णन विस्तृत पाहीजे बरं का..बाकी फोटू भारीच आहेत.मागच्या महीन्यात राजमाचीच्या श्रीवर्धन वरून ढाक बहीरीचे मस्त दर्शन घडले होते.
भर उन्हाळ्यात गेलो होतो इथे,
भर उन्हाळ्यात गेलो होतो इथे, तेव्हा वांदे झाले होते पाण्याचे....![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अजुन वर्णन येऊ देत, पुलेशु !!
मस्त! अन तुमच्या विनोदी
मस्त!
)
अन तुमच्या विनोदी वृत्तीला देखिल दाद देतोय! घोटाभर पाण्यात दोरीच्या सहाय्याने हसतखिदळत ओढा पार करणार्या तुम्हाला बघुन जाम हसू आले....... फोटोवाल्याने देखिल नेमका क्षण टीपलाय!
(ववि वेळचा दोरीचा प्रसन्ग ही आठवला, पण तेव्हा छातीभर पाणी होते)
ढाकचा शेवटचा टप्पा अवघडच आहे, नविन शहरी माणसाला तर नक्कीच नक्की! तेव्हा काही मागे राहिले यात विशेष नाही, योग्य निर्णय असेच मी म्हणेन! (मी तर बर्याच वर्षान्पूर्वी "इरसाळ" ला देखिल मागे राहिलो होतो दोघान्बरोबर!
लय भारी मस्त फोटो. वांड
लय भारी मस्त फोटो.
वांड अनुभव....
खुप सून्दर आहेत फोटो,तु पण
खुप सून्दर आहेत फोटो,तु पण फार निडर आहेस कारण ते कड्याकपारितले फोटो पाहुन जरा वेगलेच वाट्ते ,तुझि तर कमालच आहे.
इथे जाताना रस्त्यात एक
इथे जाताना रस्त्यात एक रिसॉर्ट दिसते. डोंगरावर बांधलेल्या लहान लहान खोल्या ज्यांच्या गॅलरीज दिसतात रस्त्याने. त्या गॅलरीज मधून संपूर्ण जंगल दिसतं. रिसॉर्टचं नाव मात्र सापडत नाहीये. कुणी मदत करू शकेल का?