वारली चित्रकला ही ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वारली आदिवासी समाजाने जगाला दिलेली सांस्कृतिक देणगी आहे. महाराष्ट्राच्या अनेक अनमोल कलांपैकी आहे ही 'वारली चित्रकला' -वारली चित्रलिपी .. जिव्या सोमा मशे या वारली चित्रकार पितामहांनी ही कला भारताच्या सीमेपार नेली. वारली चित्रे ही केवळ भिंती रंगवण्याची कला नसून वारली समाजजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. एखाद्या घरात लग्न असेल तर लग्नपत्रिका छापण्याऐवजी त्या घरातील स्त्रिया शेणाने सारवलेल्या भिंतींवर लग्नाचा चौक चितारतात आणि सर्वांना कळते की य घरात लग्न आहे! एक चित्र म्हणजे एक संपूर्ण कहाणी असते!.. उदाहरणार्थ, लग्नः लग्नाचा चौक, वाजंत्री, वराती, देवी, वरात,नवरा,नवरी.
त्रिकोण, चौकोन, वर्तूळ, रेषा यांनी बनलेल्या या सुंदर चित्रलिपींनी मला भुरळ घातली! सप्टेंबरमध्ये लग्न झाल्यावर मागील ३ महिन्यांपासून मी सध्या पूर्णवेळ 'बायको' च्या भुमिकेत आहे. लहानपणी अभ्यासाच्या आणि नंतर करियरच्या गोंधळात माझा चित्रकलेचा छंद हरवला होता. त्यात नियतीने मला आई होण्याचे स्वप्न दाखवून माझ्यापासून ते सुख दीड महिन्यातच हिरावून घेतले. स्वत:ला सावरताना माझ्या पतीदेवांनी आणि या छंदाने मला खूप मदत केली.
आत्ताच सुरुवात केली आहे......आवडली तर नक्की सांगा... मला आनंद होईल!
याला tree of life म्हणतात.
वारली चित्रकला
Submitted by अबोली on 23 April, 2011 - 09:09
गुलमोहर:
शेअर करा
सर्वांना अनेकानेक
सर्वांना अनेकानेक धन्यवाद.
रुपाली, क्लास घेत नाहिये सध्या .. पण आपली ही कला पुढच्या पिढीकडे न्यायचा छोटासा प्रयत्न करण्याची इच्छा आहे....जयश्री, वारली चित्रे त्यांचे रोजचे जीवन दाखवते. मीदेखील अजुन दु:खी वारलीचित्रे पाहिली नाहीत.
सिंडरेला, त्याचा फोटू देणार का?
मोर तयार झालाय पण त्याच्या पिसार्याचे वजन जास्त झाल्यामुळे तो गुलमोहराखाली यायला तयार नाही. तो http://aboli-blog.blogspot.com/ येथे भेटेल.
अर्रे सही आहे सगळी चित्रे.
अर्रे सही आहे सगळी चित्रे. अबोली मस्तच. तुमची मधुबनी चित्रे मला जास्त आवडलीत.
>>मोर तयार झालाय पण त्याच्या पिसार्याचे वजन जास्त झाल्यामुळे तो गुलमोहराखाली यायला तयार नाही>>
Microsoft Office Picture Manager मधून वजन कमी करण्याचे प्रयत्न करा.
नीलू, मी सर्व चित्रे पिकासात
नीलू, मी सर्व चित्रे पिकासात 'येडिट' करुनच घेते.
पहिला पाऊस! पिसारा फुलवून नाचणारा मोर, डोलणारी झाडे. आकाश, पृथ्वी आणि त्याखालील जीवन या पावसाचे स्वागत करत आहेत. मागील गर्द निळाई दाटून आलेल्या 'नभ उतरू आलं' चे प्रतिक.
अहाहा ! सुरेख आहेत सगळेच
अहाहा ! सुरेख आहेत सगळेच पेंटींग. हे निळाईतलं नभ उतरू आलं जास्तच भावलं.
वॉव! मस्त सारीच चित्रे.
वॉव! मस्त सारीच चित्रे.
भिंतीवर काढलेली आणि ट्रि ऑफ
भिंतीवर काढलेली आणि ट्रि ऑफ लाईफ चं पेंटींग आवडलं. अश्या डिझाईन्स टि शर्ट्स किंवा कुर्त्यावर आहेत काय? असतील तर ते कुठे उपलब्ध होतील?
सुरेख आहेत सगळीच चित्रे,
सुरेख आहेत सगळीच चित्रे, मधुबनी तर फार सुंदर!
वॉव हे पण मस्तय अबोली भारी
वॉव हे पण मस्तय अबोली भारी पेशन्स चे काम आहे. हे पूर्ण चित्र बनवायला किती वेळ लागला.
वाहवा अबोली !!खरचं छान.
वाहवा अबोली !!खरचं छान.
नीलू, तीन दिवस लागले. मोराला
नीलू, तीन दिवस लागले. मोराला एक, जमिनील एक आणि इतर एक. पेशन्स तर हवेतच सोबत बोटे, हात, डोळे, मान आणि पाठीची वाट लागते. .. पण जेव्हा ते चित्र पूर्ण होते तेव्हा तो सर्व त्रास पळून जातो. खरं सांगू, प्रत्येक चित्र किंवा कलाकृती आपल्या अपत्यासारखी असते. तिला जन्म द्यायला पेशन्स, वेदनातून जावे लागते.. पण एकदा का तिचा जन्म झाला की होणारा आनंद काही औरच!!..
(फारच अति झालं )
www.ebay.com or
http://cgi.ebay.in/Bookmark-handmade-ETHNIC-designer-gift-customizable-/..." title="folk stroke on www.ebay.com or www.ebay.in
http://www.etsy.com/shop/Aboli?ref=seller_info
http://www.etsy.com/listing/76443780/personalize-paper-bookmark-with-red...
http://www.etsy.com/listing/76443543/corner-bookmark-handmade-green-with...
गायब होते बरेच दिवस.... दोन चार चित्रे काढली , पोस्ट्ली आणि भरभरून प्रतिक्रिया देखील पाहिल्या.... पुढे?
मित्रांनो, मी जॉब स्विच काय असते ते अनुभवत होते.......
तयारी करत होते....
"फोक स्ट्रोक"---- माझी कला या नावाने आता सर्वांसमोर येत आहे. एका प्रतिष्ठित वेबसाईट च्या मंचावर काही दिवसात माझी चित्रे विक्रीसाठी उपलब्ध होतील. (नाव नक्कीच सांगेन!) विदेशातील कलाप्रेमी मित्रमैत्रिणी ही चित्रे विकत घेऊ शकतात. मायबोलीकर म्हणून आधी इथे सांगावेसे वाटले...
ebay आणि etsy वर चित्रे आणि इतर हस्तकला मी उपलब्ध केल्या आहेत.
तुमच्याकडून हक्काने मदतीची अपेक्षा करते... भेट द्या, आवडले तर जरूर सांगा, सुरुवात आहे, चुकत असेल तर तेही सांगा.
अबोली, अभिनंदन! पुढच्या
अबोली, अभिनंदन!
पुढच्या वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा.
सर्वच चित्र अप्रतिम आहेत.
बस्के, मोर खुप आवडला.
अ कु, भिंत पण सुरेख रंगवलिय तुझ्या बहिणीने.
अभिनंदन, अबोली, आणि शुभेच्छा!
अभिनंदन, अबोली, आणि शुभेच्छा!
शुभेच्छा....
शुभेच्छा....
अबोली, सुंदर आहेत सगळी
अबोली, सुंदर आहेत सगळी चित्रे. माझ्याही शुभेच्छा तुम्हाला.
सहीच.. साइट बघत आहे..
सहीच..
साइट बघत आहे..
नलिनी, स्वाती, गजानन,अवनी,
नलिनी, स्वाती, गजानन,अवनी, जामोप्या.. धन्स!! नेहमीप्रमाणेच खूप हुरुप येतो मायबोलीकरांच्या पाठिंब्याने!!!!... जामोप्या, मस्तच!!
फारच सुंदर आहे. आणखीन चित्र
फारच सुंदर आहे. आणखीन चित्र टाकली तर बर वाटेल सलग छान चित्रे बघताना.
अबोली, सगळी चित्र सुरेख आहेत
अबोली, सगळी चित्र सुरेख आहेत आणि त्यातली मेहनतही जाणवते. त्याहीपेक्षा तु ती विकण्यासाठी म्हणून केलेले प्रयत्न फार कौतुकास्पद आहेत. तुला पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा.
.. पण जेव्हा ते चित्र पूर्ण होते तेव्हा तो सर्व त्रास पळून जातो. खरं सांगू, प्रत्येक चित्र किंवा कलाकृती आपल्या अपत्यासारखी असते. तिला जन्म द्यायला पेशन्स, वेदनातून जावे लागते.. पण एकदा का तिचा जन्म झाला की होणारा आनंद काही औरच!!..>>>
हे खूप छान लिहील आहेस. मी पण खूप काहीतरी miss करते आहे, तु लिहीलेल वाचून जाणवल कदाचित हेच ते. परत ब्रश धरला तर काही जमेल का वाटण्याइतका गॅप पडलाय.
खूप खूप शुभेच्छा!
खूप खूप शुभेच्छा!
यावर्षी मायबोली दिवाळी
यावर्षी मायबोली दिवाळी अंकाला सजावट म्हणून वारली चित्रांची थीम वापरली तर.?
अबोली खूप सुरेख. मी पण वारली
अबोली खूप सुरेख. मी पण वारली आर्ट फॅन आहे. जामोप्या तुम्ही काढलेले चित्र पण छान आले आहे. दिल्लीच्या एक बाई पण असेच क्राफ्टस करून विकतात.
लोडशेडिंग मुळे आज तुम्हा
लोडशेडिंग मुळे आज तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांना उत्तरे देऊ शकले नाही. ...
हुर्रे!! हुर्रे!!!... मित्रमैत्रिणींनो, खुशखबर!!!!
माझे पहिले चित्र पॅरिस येथील एका कलाप्रेमीने विकत घेतले...!!! मी त्याच धावपळीत होते संध्याकाळभर..
मला चित्र आता पाठवायचे आहे पण कुरियर सेवांच्या किमती खूपच जास्त आहेत. कुणी सांगू शकेल का भारतातून विदेशासाठी स्वस्तात पण व्यवस्थित मेल सेवा कोणती.
समर्पण, मनात इच्छा असेल तर त्याला काळ काहीच करू शकत नाही, प्रयत्न करून पहाच. माझा गॅप कित्येक वर्षांचा आहे.
बंडूपंत, हे घ्या,
भ्रमर, मामी धन्यवाद. जामोप्या आयडियाची कल्पना छान आहे!!
अरे व्वा अबोली सही... खूप
अरे व्वा अबोली सही... खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!
अरे वा! अभिनंदन!!
अरे वा! अभिनंदन!!
खूप छान अबोली! 'सुप्रभात
खूप छान अबोली! 'सुप्रभात वारली' फारच आवडलं
सही! अबोली अभिनंदन.
सही! अबोली अभिनंदन.
नीलू, अॅन्कनी, स्वप्ना_राज,
नीलू, अॅन्कनी, स्वप्ना_राज, चिंगी धन्यवाद. आता आणखी काही चित्रे काढून तयार ठेवावी लागणार.
हे कालच काढले. अजुन पूर्ण करायचे आहे.
आजच हे पोस्ट बघीतले, खूप
आजच हे पोस्ट बघीतले, खूप शुभेच्छा
अबोली धन्यवाद. तुझी साईट आजच
अबोली धन्यवाद. तुझी साईट आजच बघितली. खुप सुंदर चित्र आहेत.
मला "ट्री ऑफ लाइफ" काढायचे होते. नेट वर खूप वारली झाड बघितली पण तू काढलेल्या झाडाचे प्रमाण (स्ट्रक्चर ??) फार आवडले म्हणून काढून बघितले.
Pages