वारली चित्रकला ही ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वारली आदिवासी समाजाने जगाला दिलेली सांस्कृतिक देणगी आहे. महाराष्ट्राच्या अनेक अनमोल कलांपैकी आहे ही 'वारली चित्रकला' -वारली चित्रलिपी .. जिव्या सोमा मशे या वारली चित्रकार पितामहांनी ही कला भारताच्या सीमेपार नेली. वारली चित्रे ही केवळ भिंती रंगवण्याची कला नसून वारली समाजजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. एखाद्या घरात लग्न असेल तर लग्नपत्रिका छापण्याऐवजी त्या घरातील स्त्रिया शेणाने सारवलेल्या भिंतींवर लग्नाचा चौक चितारतात आणि सर्वांना कळते की य घरात लग्न आहे! एक चित्र म्हणजे एक संपूर्ण कहाणी असते!.. उदाहरणार्थ, लग्नः लग्नाचा चौक, वाजंत्री, वराती, देवी, वरात,नवरा,नवरी.
त्रिकोण, चौकोन, वर्तूळ, रेषा यांनी बनलेल्या या सुंदर चित्रलिपींनी मला भुरळ घातली! सप्टेंबरमध्ये लग्न झाल्यावर मागील ३ महिन्यांपासून मी सध्या पूर्णवेळ 'बायको' च्या भुमिकेत आहे. लहानपणी अभ्यासाच्या आणि नंतर करियरच्या गोंधळात माझा चित्रकलेचा छंद हरवला होता. त्यात नियतीने मला आई होण्याचे स्वप्न दाखवून माझ्यापासून ते सुख दीड महिन्यातच हिरावून घेतले. स्वत:ला सावरताना माझ्या पतीदेवांनी आणि या छंदाने मला खूप मदत केली.
आत्ताच सुरुवात केली आहे......आवडली तर नक्की सांगा... मला आनंद होईल!
याला tree of life म्हणतात.
वारली चित्रकला
Submitted by अबोली on 23 April, 2011 - 09:09
गुलमोहर:
शेअर करा
मस्तच ...
मस्तच ...
फार छान उपक्रम. याची एखादी
फार छान उपक्रम. याची एखादी मालिकाच बनवा नां!! शुभेच्छा!
मस्तय.. अजून येउ दे..
मस्तय.. अजून येउ दे..
मस्त!
मस्त!
खूप सुंदर नीटस आलंय चित्र
खूप सुंदर नीटस आलंय चित्र अजून भरभरुन चित्रं काढ आणि आम्हाला दाखव.
मस्तच आहे.
मस्तच आहे.
खूपच सुंदर! वारली चित्रकलेवर
खूपच सुंदर! वारली चित्रकलेवर एक माहितीपूर्ण मालिका बनवा नां..
खूपच छान ! कशावर काढलंय हे
खूपच छान !
कशावर काढलंय हे चित्र ? त्या पार्श्वभूमीवर खुलून दिसतंय हे चित्र.
हा हँडमेड पेपर असावा.
हा हँडमेड पेपर असावा.
खूपच मस्त
खूपच मस्त
वा मस्त... आता एकेक पॅटर्न
वा मस्त... आता एकेक पॅटर्न आणि डिझाइन येऊदे...
आमच्या पहिल्या हपिसातली आख्खी भिंत मी वारली चित्रांनी रंगवून काढली होती त्याची आठवण झाली. दुर्दैवाने नंतर ४-५ महिन्यातच त्या जागेचं लीझ संपलं आणि आम्ही ती भिंत तशीच ठेवून जागा सोडली..
सर्वांना धन्यवाद! खूप हुरूप
सर्वांना धन्यवाद! खूप हुरूप आला तुमच्या प्रतिक्रिया पाहुन! भ्रमरा, मी सुरुवात तर केली आहे.. पण चित्र अपलोड करायला थोडे कष्ट होतायत.. एकेक टाकेनच. अश्विनी, अंजू नक्की भरपूर चित्रे काढणार आहे मी..भाऊ, हा हॅंडमेड पेपर आहे. नीधप, अख्खी भिंत !! वा! किती छान दिसत असेल ना! फोटो नाही का काढला त्याचा?
फोटो आहे कुठेतरी पण शोधायला
फोटो आहे कुठेतरी पण शोधायला हवा. सापडला तर टाकेन झब्बू म्हणून.
अतिशय सुंदर. प्लीज अजून
अतिशय सुंदर.
प्लीज अजून येउद्यात....
'सुप्रभात वारली'
'सुप्रभात वारली' सुर्यनारायणाने दर्शन दिले. नाष्टा करा, विहिरीचे पाणी भरून आणा, शेताला चला, सोबत शिधा बांधून घ्या, लाकडे तोडा, कोंबड्यांना दाणे द्या.बाळाला तीट लावा..... म्हटले ना, वारली चित्र म्हणजे एक संपूर्ण कहाणी असते. या एका चित्रातच सकाळची सगळी लगबग दिसतेय.
खुप सुन्दर.... वारली मधला मोर
खुप सुन्दर.... वारली मधला मोर पण मस्तच असतो त्याच पण येऊ दे ना चित्र
माफ करा पण काही चित्रे मला
माफ करा पण काही चित्रे मला पोस्टता येत नाहियेत...
जरूर भेट द्या http://aboli-blog.blogspot.com/
http://www.youtube.com/watch?v=-1JPs-U0eqU
तुझ्या ब्लॉगवरची मधुबनी
तुझ्या ब्लॉगवरची मधुबनी पेंटींग्ज पण किती छान आहेत. तूच केलीयेस ना? कुठे शिकलीस?
तुझ्या blog मधे वारलीचे
तुझ्या blog मधे वारलीचे चित्रे दिसत नाहीये. आणी मधुबनी तर मस्तच आहे.
सुपर्ब!!!! दोन्ही चित्र
सुपर्ब!!!!
दोन्ही चित्र मस्तच!!!!
खुप खुप सुंदर !
खुप खुप सुंदर !
अखी,कृपया पुन्हा पहा एकदा...
अखी,कृपया पुन्हा पहा एकदा... नीधप, मीच केलंय सगळं.. शिकायला वेळ कुठे होता..
हो ग आता दिसतय.. पण मी
हो ग आता दिसतय.. पण मी बघितलेला मोर वेगळा होता. पिसारा पुर्ण फुलवलेला
व्वा दुसरे चित्र सुंदरच.. मला
व्वा दुसरे चित्र सुंदरच.. मला ही स्टाईल खूप आवडते बघायला..
पण पहिले चित्र खूप आवडले.. वारली चित्रांमध्ये असे पाहिले नव्हते
वारली चित्रे कोणत्याही
वारली चित्रे कोणत्याही माध्यमात छान दिसतात, पॉट पेंटिंग, पेन्सिल होल्डर
सुरेख आहेत चित्रं.
सुरेख आहेत चित्रं.
अबोली, खूपच सुंदर आहेत हि
अबोली, खूपच सुंदर आहेत हि चित्रे.
आणि माध्यमातली कल्पकता पण वाखाणण्याजोगी.
वा फारच छान! तो वरचं छोट्या
वा फारच छान!
तो वरचं छोट्या घड्यासारखं फारच सुरेख!
धन्यवाद दिनेशदा,प्राची,यो
धन्यवाद दिनेशदा,प्राची,यो रॉक्स,अवल, जिप्सी,महागुरू, बागुलबुवा, आउटडोअर्स, शैलजा..
जमले तर ब्लॉगवर चक्कर मारा..
मस्त चित्रं!! हा मी काढलेला
मस्त चित्रं!!
हा मी काढलेला मोर. कापडावर अॅक्रिलिक पेंट..
Pages