Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिनोती, पर्टूच्या रेसिपीच्या
मिनोती, पर्टूच्या रेसिपीच्या लिंकबद्दल धन्यवाद! कालच त्या पध्दतीने केले होते मसूर! मस्त मस्तच झाले होते.
अरुंधती, या पद्धतीची मसुर
अरुंधती, या पद्धतीची मसुर तळ्ला मसालावाली आणि जोडीला भाजाणीचे वडे एकदम झकास लागतात.
कोणी यीस्ट वापरून जिलबी केलीय
कोणी यीस्ट वापरून जिलबी केलीय का ? नेटवर बर्याच रेसिपीज आहेत पण इथे मिळणारं अॅक्टिव्ह ड्राय यीस्ट घालून करायची रेसिपी दिसली नाही. जाड वडी साराखं दिसणारं यीस्ट असतं ( भारतात मिळत असे तसलं ) त्याऐवजी इथलं पॅकेटमधलं यीस्ट त्याच प्रमाणात वापरता येईल का ?
कोर्न पावडर चे अजुन काय काय
कोर्न पावडर चे अजुन काय काय करता येइल? सुप सोडुन
[कालच सुप केले होते- टोमॅटो ,कांदा ,सिमला मिर्ची ,आल्-लसुन पेस्ट, मॅगी क्युब आणी कोर्न पावडर]
प्रिया, कॉर्नफ्लोअर तु
प्रिया, कॉर्नफ्लोअर तु कट्लेटस, काप, मंचुरियन करताना पण वापरु शकतेस. काही भाज्यांच्या (सगळ्या नाही) ग्रेव्ही दाट करण्यासाठी पण वापरता येते.
मेधा मी मंजुळा काकूंची यीस्ट
मेधा मी मंजुळा काकूंची यीस्ट घालून जिलेबी ( युट्युब वर असलेली ) एकदा करून बघीतली आहे. मला तरी नाही आवडली, छान दिसत होती आणि फुलली पण होती, पण ते texture नव्हतं. मला तरी ती डबल का मीठा टाईप लागत होती. बरचसं ब्रेड सारखं texture वाटत होतं. चब बरी होती, पण texture मुळे जिलेबी ची मजा आली नाही.
आणि खूप तेलकट पण झाली होती. त्याऊलट गीट्स चे रेडीमेड पॅक वापरून केलेली जास्त चांगली झालेली.
कोणी सोडे भात कसा करतात ते
कोणी सोडे भात कसा करतात ते सांगू शकेल का?
पल्लवी, सोड्याची खिचडी इथे
पल्लवी, सोड्याची खिचडी इथे आहे -
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/102236.html?1090340059
IE मध्ये पहा.
तळला मसाला घालून एक रेसिपी इथे आहे-
http://www.prahaar.in/collag/25658.html
@ प्रिया, कॉर्नफ्लार वापरुन
@ प्रिया, कॉर्नफ्लार वापरुन तु 'टेंपुरा' नामक जपानी भजी करु शकतेस...
http://www.japaneselifestyle.com.au/food/recipe_crispy_tempura.html
धन्यवाद अन्कॅनी
धन्यवाद अन्कॅनी
मला गणपतीच्या दर्शनासाठी
मला गणपतीच्या दर्शनासाठी येणार्यांकरता काही खाद्य आयटम सुचवा. मागच्या वेळेस मी बटाटेवडे, चटणी, प्रसादाचा शिरा अशी प्लेट ठेवली होती.
यावेळेस काय? ढोकळा..?
आशु घरात करणार आहेस की ऑर्डर
आशु घरात करणार आहेस की ऑर्डर देणार आहेस ?
शिरा घरात आणि दुसरा आयटम काय
शिरा घरात आणि दुसरा आयटम काय आहे यावर अवलंबुन आहे, वडे वगैरे ऑर्डरच दिली होती, एवढे कोण तळणार? पण ढोकळा करू शकेल.
इडली चटणी पण चालू शकेल. आधी
इडली चटणी पण चालू शकेल. आधी करता येईल.
आशू, इडली-चटणी/ इडली-फ्राय/
आशू, इडली-चटणी/ इडली-फ्राय/ इडली चिली/ कॉकटेल इडली/ पांढरा ढोकळा किंवा पिवळा ढोकळा/ मटार करंजी / अमीरी खमण/ खस्ता कचोरी/ आलू टिक्की किंवा आणखी कोणती तरी टिक्की/ मेदू वडा - चटणी/ मसाला पुरी - पालक पुरी - चटणी, अळूवडी/ कोथिंबीर वडी/ सुरळीची वडी, साबुदाणा वडा - चटणी असे खूप खूप पर्याय आहेत!
ते पुणेरी बाणा वगैरे वरुन
ते पुणेरी बाणा वगैरे वरुन पुण्यातील दिवस आठवले आणि आठवली खास पुण्याची गोल भजी.......कुणाला माहीती आहे का की ती कशी बनवायची?
कसुरी मेथी वापरुन मेथीच्या
कसुरी मेथी वापरुन मेथीच्या पुर्या बनवता येतात ना? त्याची कृती माहीती आहे का?
ह्या टिकणार्या पुर्या असतात का? (म्हणजे प्रवासात नेता येतील का?)
कुळीथ पीठ कसे बनवावे. त्यात
कुळीथ पीठ कसे बनवावे. त्यात आणखीन काही टाकावे लागते का ?
कूळीथ मंद आचेवर खमंग भाजून
कूळीथ मंद आचेवर खमंग भाजून घेतात. मग ते भरडतात. भरडल्यावर साले वेगळी होतात. ती पाखडून टाकतात, मग त्याचे पिठ करतात.
काहि लोक त्यात हळद, तिखट व मिठ टाकतात. म्हणजे पिठले करताना नाही टाकले तरी चालते. पण असे काही टाकायलाच पाहिजे असे नाही. त्याशिवायही पिठ होते.
दिनेशदा , पण जर कुळिथ
दिनेशदा , पण जर कुळिथ दळणाच्या चक्कीवर द्यायचे असतील तर....
किंवा मी असे घरी मिक्सरवर करू शकते का.. चांगल होईल ना
हो आधी भाजून, भरडून, साले
हो आधी भाजून, भरडून, साले पाखडून काढून मग चक्कीवर नेता येतील. या सालांबाबत एक सूचना. या सालांचा भरपूर कचरा होतो. आणि कुळीथ सिंकमधे पाखडु नयेत. सिंक चोक होते. (स्वानुभव )
धन्यवाद दिनेशदा
धन्यवाद दिनेशदा
अनु ३, मस्त होतात कसूरी मेथी
अनु ३, मस्त होतात कसूरी मेथी घालून केलेल्या पु-या. टिकतात पण...
मी कडकवाल्या करते. पण नेहमीच्या मऊदेखील करता येत असाव्यात. त्यात काळी मिरी घालायची आणि मीठ. मस्त मस्त होतात.
धन्स चिवा, म्हणजे पुरीत
धन्स चिवा, म्हणजे पुरीत (तिखटामिठाच्या) पुरी प्रमाणे सगळ घालुन मिरी सुध्दा घालायची का? का फक्त मिरी, मीठ आणि कसुरी मेथी वापरु?
मी तिखट नाही घालत. किंचित
मी तिखट नाही घालत. किंचित साखर, भरपूर मिरी (मुख्य चव तीच) आणि मीठ, भरपूर कसूरी. ले भारी होतात बघ. थोडं मोहन पण...
ओके. करुन बघेन आणी सांगेन.
ओके. करुन बघेन आणी सांगेन.
चिवा, तू पुर्यांबद्दल
चिवा, तू पुर्यांबद्दल लिहिलयस ना, ते सविस्तर लिहिलेस तर बरे होईल... म्हणजे प्रमाणासकट. मला वाटतं, अशा शंकरपाळ्या बनवता येतील दिवाळीत.
चिवा कसुरी मेथी कृती लिहीणार
चिवा कसुरी मेथी कृती लिहीणार असाल तर लिहीण्यासाठी "नवीन पाककृती" धाग्याचा वापर करायला विसरू नका
चिवा खरच प्रमाणासकट पाककृती
चिवा खरच प्रमाणासकट पाककृती मिळाली तर बर होईल.
लिवते. मी अमि, माझ्या
लिवते.
मी अमि, माझ्या मैत्रिणीची रेसिपी आहे. तिनं शिकवल्यासारख्या मी पण दिवाळीला कसूरी मेथी घालून शंकर बनवते. गोड नव-याला आवडतात आणि या खा-या मला...नक्की लिवते.
Pages