मंगळवार, २५ जानेवारी २०११, २०:५० (+०५:३०) — dr.sunil_ahirrao
आपण दरवर्षीप्रमाणे १५ ऑगष्ट व २६ जानेवारीला भल्या पहाटे उठून आपापल्या कार्यालयांकडे राष्ट्रध्वजास वंदन करायला जातो.राष्ट्रभक्तीपर गीतांच्या सीडीज लावतो.आणि वातावरण अगदी देशभक्तीने भारून टाकतो.तास दोन तास टीव्हीवरील देशभक्तीपर कार्यक्रमांनी आपलं रक्त थोडा वेळ उसळतंही...नंतर हळूहळू सारं शांत होत जातं.का घडतं असं? काही सरकारी
महाभाग तर केवळ नाईलाजास्तव आणि सक्तीचे म्हणून ध्वजवंदनासाठी येतात; पूर्ण सुटी मिळत नाही म्हणून ते बिचारे
नाराज असतात.काही लोक थोडा टाईमपास करण्यासाठी येतात.काही विद्यार्थी हजेरी लावण्यासाठी येतात.काही थोडा
नाश्तापाणी होईल म्हणून येतात.हे 'काही' जे कोणी असतात,त्यांची संख्या तशी अल्प असते;पण आहेतच ना या प्रवृत्तीचे
लोक? त्यामुळेच प्रश्न पडतो की आपणाला स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणवून घेण्याचा काय अधिकार आहे,जर आपण आपल्या
क्षुद्र स्वार्थांचे गुलाम आहोत तर? किती भारतीयांना आपल्या नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्यांची जाणिव आहे?आणि जाणिव
असूनही किती लोक त्याचे पालन करतात?
कुठे रस्त्यात अपघात झालेला असला तर फक्त बघ्यांची गर्दी होते.मदतीला कुणी पुढे येत नाही.बरेच जण उगाच लचांड
नको म्हणून पटकन तेथून पळ काढतात.आपण दिवसेंदिवस स्वतःपुरते मर्यादित होत चाललो आहोत.आज आपण केवळ
माणुसकी म्हणून करता येण्यासारखे सुद्धा करत नाही,तर देशावर उद्या एखादे संकट कोसळले तर काय करणार? कुठे आहे लोकांचं लोकांसाठी चालवलेलं सरकार? आपण चोर,भामटे आणि दरोडेखोरांना निवडून देतो,स्वतःच्या क्षुद्र स्वार्थ पोसण्यासाठी! मग हे पुढारी
सरकारी तिजोरीवर डल्ला मारून चांगलेच सोकावतात आणि जनतेवर गुलामी लादतात.पैश्यांच्या जोरावर वारंवार निवडून येतात.
आपल्यासमोर 'प्याकेज ' चा एक तुकडा फेकतात आणि मग आपण 'खुष' होऊन जातो.त्यांचेच गुणगान गातो.आपण आपल्या किरकोळ स्वार्थासाठी आपलाच आत्मा विकून टाकतो आहोत.संविधानात सांगितलेल्या भारतीय नागरिकाच्या व्याख्येत आपण खरोखर बसतो आहोत का?आपल्याला फक्त हक्क हवे आहेत,कर्तव्ये नकोत.आपण अत्यंत संकुचित आहोत,अल्पसंतुष्ट आहोत.
आपणाला आपल्यापुरती सुरक्षितता हवी असते,मग इतरांचे काहीही होवो.(सारे भारतीय माझे बांधव आहेत,हे आपण सोयीस्करपणे
विसरतो आहोत)आपण स्वतःचे आणि मुठभर पुढाऱ्यांचे गुलाम झालो आहोत.जो पर्यंत आपणाला आपल्या कर्तव्यांची खऱ्या अर्थाने जाणिव होत नाही,तोपर्यंत आपण स्वतंत्र भारताचे नागरिक गुलामीतच राहू!
बरं मग? !
बरं मग? !
भ्रष्ट नंद राजे अनेकवेळा
भ्रष्ट नंद राजे अनेकवेळा जन्माला येतात. त्यांना सत्तेपासुन तोडणारा आर्य चाणाक्य आणि त्याचा शिष्य चंद्रगुप्त मौर्य जेव्हा निर्माण होतील, अशी जुलमी सत्ता अनेक वेळा झुगारता येईल.
@balu joshi bar mag? ya
@balu joshi bar mag? ya prashnache uttar aata aapanach aapalya muddesud vicharandware sangave, dhanyavaad.
डॉ साहेब आपले विचार पटतात पण
डॉ साहेब आपले विचार पटतात पण
एकतर व्यवस्थेत बदल झाला पाहीजे व
दुसरे म्हणजे सामाजिक बदल झाला पाहीजे.
व्यवस्थेत बदल निवडून येणारे प्रतिनीधींनी करायला पाहीजे (बापरे बरेच बोललो का मी)
आपल्या हातात आहे सामाजिक बदल घडवून आणायचा - बाल, शिशू आहेत त्यांना चांगले वळण लावून व राष्ट्रव्रत घ्यायला उद्दिप्त करुन. कारण वयाच्या २५ वर्षा पर्यंत विचारांना आकार देता येतो मग ते विचार पक्के झाले असतात मग बदलता येत नाही. प्रत्येकाने हे लक्षात ठेवून मुलांना घडवले तर बरीच बाजी मारली असे म्हणता येईल.
कारण वयाच्या २५ वर्षा पर्यंत
कारण वयाच्या २५ वर्षा पर्यंत विचारांना आकार देता येतो मग ते विचार पक्के झाले असतात मग बदलता येत नाही.
>>>
विचार बदलतात, २५ वर्षापर्यंत जगाचा अनुभव नसतो. अनुभव आल्यानंतर सगळे संस्कार बाजुला राहतात. आणी आपण कसे सुरक्षित राहु याचाच विचार करावा लागतो / करतात. बाकीच्यांचे जाऊ द्या.
...................अनुभव
...................अनुभव आल्यानंतर सगळे संस्कार बाजुला राहतात.
राजेश्वर साहेब मला असे नाही वाटत. जे जातात ते संस्कार नव्हेतच.
देश आपला आहे, सरकार आपले आहे,
देश आपला आहे, सरकार आपले आहे, हे स्वातंत्र्य आपले आहे असं लोकांना वाटू लागलं कि लोकशाही रूजायला सुरूवात होईल. मग व्यवस्थापरिवर्तनाबाबत बोलता येईल... फार लांबच्या गोष्टी आहेत सध्या. चौथीच्या मुलाला स्पर्धापरीक्षेला बसवण्याचा प्रकार !
राजेश्वर साहेब मला असे नाही
राजेश्वर साहेब मला असे नाही वाटत. जे जातात ते संस्कार नव्हेतच.
>>>
शक्य आहे, पण मग बहुतांश लोक प्रजासत्ताक ला सहल आयोजीत करतात ते संस्कारीत नसतिल का?
२६ जानेवारीला झेंडा लावतो ना?
२६ जानेवारीला झेंडा लावतो ना? म्हण्जे प्रजासत्तकच
राजेश्वर साहेब, ह्या आपल्या
राजेश्वर साहेब,
ह्या आपल्या प्रश्नाला हो पण उत्तर आहे व नाही पण, थोडा वेळ असेल तर हे माझे मत.
बहूतांशी आपली पिढी नव्या पिढीला (किंवा मागच्या पिढीनी आपल्याला) प्रजासत्ताक दिन हा एक राष्ट्रीय सोहळा आहे किंवा आपले कर्तव्य आहे किंवा तो एक मानदंड आहे असे शिकवण्याचा प्रयत्न केला आहे का तो आपणच ताडला पाहीजे. माझ्या मते ह्या बाबतीत आपली किंवा पुढची पिढी संस्कारीत नाहीत.
ह्याचा अर्थ असा नव्हे की काहीच संस्कार नाहीत. बाकीचे खुप आहेत पण हे नाही होऊ शकले आपल्या हातून.
त्यांना सत्तेपासुन तोडणारा
त्यांना सत्तेपासुन तोडणारा आर्य चाणाक्य आणि त्याचा शिष्य चंद्रगुप्त मौर्य जेव्हा निर्माण होतील, अशी जुलमी सत्ता अनेक वेळा झुगारता येईल. >>>
माबोवर तरी आला आहे चाणक्य.
डॉक्टरसाहेब, आपण मांडलेली
डॉक्टरसाहेब, आपण मांडलेली परिस्थिती बव्हंशी खरी व सर्वज्ञात आहे. पण मला वाटतं अशा प्रश्नांवर पर्याय समोर ठेवूनच अर्थपूर्ण व फलदायी चर्चा होऊं शकते. नपेक्षा, सध्या तरी आपण प्रजासत्ताक आहोत पण आदर्श प्रजासत्ताक असण्यापासून खूपच दूर आहोत, हे स्विकारणं व व्यक्तीगत पातळीवर तरी सुधारण्याचे प्रयत्न करणं यापलिकडे खरंच या चर्चेतून कांही अपेक्षित आहे ?
@रणजित चितळे आणि भाऊ नमस्कर
@रणजित चितळे आणि भाऊ नमस्कर ,
माझ्या पोस्टचा आशय आपणास समजला आहेच.सध्या देशातील जी परिस्थिती आहे,ती लोकशाही आहे का? आसपास घडणाऱ्या घटना पाहता आपण स्वकीयांनी लादलेल्या पारतंत्र्यात जगत आहोत,ही जाणीव क्षणोक्षणी होते.याला कारणीभूत आपणच असल्यामुळे सामान्य मनुष्य अत्यंत हताश,निराश झालेला आहे. आपल्याला ही परिस्थिती बदलायला हवी असेल,तर प्रत्येकाला स्वतःपासून सुरुवात करावी लागेल.आपल्या पुढच्या पिढीला एक आदर्श नागरिक बनवायचं असेल तर स्वतः 'लाच' खाणे/देणे बंद करावे लागेल.अन्याय कुणावर होताना दिसल्यास आवाज उठवावा लागेल.आपणच पळून गेलो तर आणखी एक षंढ पिढी जन्माला येईल.रणजित चितळे यांचा स्वतःला ,समाजाला आणि सिस्टीमला बदलणे हाच मुद्दा मला अभिप्रेत होता.आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
डॉ.अहिरराव.... तुमची भूमिका
डॉ.अहिरराव....
तुमची भूमिका आणि त्यामागील तळमळ आदर्श समाजातील एका सुजाण नागरीकाचे मनोगत व्यक्त करते जे अनुकरणीय आहे असेच म्हणावे लागेल. प्रजासत्ताकाची जी काही घटनात्मक व्याख्या असेल ती १ अब्ज लोक जशीच्यातशी अंमलात आणत असतील हे मानणे थोडेसे धाडसाचे होईल. जे लोक सेंट परसेंट मानत नसतील त्यावरून त्याना 'प्रजासत्ताकाचे दुष्मन' समजणे काहीसे आततायीपणाचे होईल. काही रोखठोक कारणे आहेत ज्यामुळे १० पैकी एकास व्यक्तिगत पातळीवर जर मानसिक आणि आर्थिक त्रास सोसावा लागत असेल तर त्या उदाहरणावरून बाकीचे ९ शहाणे होतात.
उदा. माझ्या मित्राच्या वडिलांना पोलिसांनी दिलेला अतोनात त्रास. ते बांधकाम कंत्राटदार आहेत. एकदा संध्याकाळच्या वेळेला नदीवरील बंधार्याचे बांधकाम पाहून जीपने घरी परतत असताना एके ठिकाणी एक सायकलस्वार जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला विव्हळत पडलेला दिसला. स्पष्ट होते की कुणी चार चाकीवाल्याने त्याला धडक देऊन तिथून पोबारा केला होता. कंत्राटदारानी जवळच्याच शेतात मजूरी करत असलेल्या दोघांना हाका मारून त्यांच्या सहाय्याने त्या जखमीला जीपमध्ये घेतले व तडक सरकारी दवाखान्यात दाखल केले. आता इथून त्याना साडेसाती अशी काही सुरू झाली की तीनचार दिवसातच ते आणि त्यांचे कुटुंबिय "कुठून दुर्बुद्धी सुचली आणि त्या जखमीला दवाखान्यात घेऊन आलो.." असे म्हणू लागले. याला कारण पोलिसांनी कंत्राटदार काकांची घेतलेली जीवघेणी 'झाडाझडती'. आरोपच थेट की, 'तुम्हीच त्याला उडविले आहे...आता ती जीप जप्त...आणि खेटे मारा दवाखान्यात सकाळ-संध्याकाळ तो जखमी शुद्धीवर येईपर्यंत....आला तर ठीक....नाही तर मग....!!" इथे, त्या इन्स्पेकटरच्या विशिष्ट "पॉज..." नंतर मित्राच्या कुटुंबियांची जी पांचावर धारण बसली ते थेट त्याच्या आईने देवीला "वाचव" म्हणून साकडेच घातले. दुसरीकडे त्या सायकलस्वाराच्या खिशातील छोट्या डायरीवरून त्याच्या घराचा पत्ता तर लागला. पण त्याची बायकापोरेही आमच्या कंत्राटदार काकांकडेच 'खुनशी' नजरेने पुढील तीन दिवस पाहात होते. नशीब बलवत्तर की तो सायकलस्वार तिसर्या दिवशी शुध्दीवर आला आणि त्याने जबाब दिला की, एक टॅन्कर चालक त्याला धडकून पुढे गेला.....बाप रे ! पेशंटने पोलिसाच्या कबुलीजबाबावर कशीबशी सही केल्यावर इकडे कंत्राटदार आणि त्यांची बायको रडूच लागली....किती बीपी वाढले असेल त्यांचे त्या तीन दिवसाच्या काळात...? आहे काही मोजमाप या आदर्श प्रजासत्ताक देशात ? [या घटनेला एक पश्चात उपप्रकरणही आहे. दोन आठवड्यानंतर तो सायकलस्वार खडखडीत बरा होऊन घरीही गेला. पण त्याने किंवा त्याच्या कुटुंबियापैकी एकाने/एकीनेही साधा एक रुपयाचा फोन करून आपला जीव वाचविणार्या उपकारकर्त्याचे आभार मानले नाहीत....ही बाब मित्राच्या वडिलाना पोलिसांच्या त्रासापेक्षाही जास्त झोंबली.]
....आणि तुम्ही लिहिले आहे..."कुठे रस्त्यात अपघात झालेला असला तर फक्त बघ्यांची गर्दी होते.मदतीला कुणी पुढे येत नाही.बरेच जण उगाच लचांड
नको म्हणून पटकन तेथून पळ काढतात..." ~ तुम्हीच स्वतः या "लचांड" क्रियाविशेषणाची व्यवहारी व्याख्या करा...आणि मग अपघातापासून दूर जाणार्यानी पळ का काढला याचे उत्तर आपसूकच तुमच्यासमोर येईल.
२. "महाभाग तर केवळ नाईलाजास्तव आणि सक्तीचे म्हणून ध्वजवंदनासाठी येतात..." ~~ इतरांचे माहीत नाही, पण मी स्वतः शाळाच नव्हे तर महाविद्यालयीन जीवनातही राष्ट्रीय कर्तव्य म्हणून झेंडावंदन कार्यक्रम अटेंड केले आहेत. इतकेच नव्हे तर मी आणि माझे एन.एस.एस.ग्रुपमधील डझनभर स्वयंसेवक राष्ट्रीय दिनाच्यानिमित्ताने रोटरी क्लबच्या ब्लड बॅन्केत हजर राहून रक्तदानही करत होतो. नोकरीनंतर बाहेरगावी या ना त्या कारणाने जरी रक्तदान क्रिया थांबली असली तरी कार्यालय परिसरात होत असलेल्या झेंडावंदन कार्यक्रमास "उपचार" म्हणून हजर न राहता 'कर्तव्य' म्हणूनच उपस्थित असतो.
अशी अनेक उदाहरणे समाजात सापडतील...शोध घेतल्यास....त्यामुळे अगदीच निराशेचे वातावरण आहे असे म्हणता येणार नाही.
फक्त कुणीही मध्यमवर्गीय आणि शांत जीवन जगू इच्छिणारी व्यक्ती 'पोलिस' नामक व्हायरसपासून दूर राहू केव्हाही पसंत करेल...मात्र ती व्यक्ती तसे करते म्हणून ती समाजद्रोही होऊ शकत नाही, हेही नमूद करणे अगत्याचे आहे.
लेख आवडला... भावना
लेख आवडला... भावना पोहोचल्यात...
कुठे रस्त्यात अपघात झालेला असला तर फक्त बघ्यांची गर्दी होते.मदतीला कुणी पुढे येत नाही.
---- खरोखरीच असे आहे का? नाही.
किती लोकांना अपघातात मदत केली म्हणुन त्रास झाल्याचा किंवा पोलिस नामक लचांड मागे लागल्याचा अनुभव आहे ?
माझा छोटा अनुभव अतिशय चांगला आहे. मी आणि मित्राने जबर जखमीला दवाखन्यात दाखल केले होते... नंतर मला किंवा मित्राला अपघातग्रस्ताला मदत केली म्हणुन कुठलाही त्रास झालेला नाही. पोलिस थोडी फार चौकशी करणारच... करु द्या त्यांना त्यांचे काम. हा थोडा चौकशी चा ससेमिरा थोडा झेलला आणि अंपुर्ण आयुष्यात एकाचे प्राण वाचवण्याचे काम निभवता आले तर त्याचा आनंद किती असेल?
@प्रतीक देसाई आणि उदय ,आपल्या
@प्रतीक देसाई आणि उदय ,आपल्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत. अनुभव व्यक्तिसापेक्ष असतात. माझेही काही असे अनुभव आहेत,त्याविषयी नंतर केव्हातरी लिहीन.धन्यवाद.
उदयराव.... "...तर त्याचा आनंद
उदयराव....
"...तर त्याचा आनंद किती असेल?..."
नक्कीच मोजता न येण्यासारखा आनंद आहे हा, हे मी मान्य करतो. प्रश्न येतो तो त्या त्रासापलिकडील अनुभवाचा. उदा. त्या सायकलस्वार वा त्याच्या कुटुंबियांनी एक फोनही न करणे. काहीच वाटले नसेल त्याना त्या अनोळखी व्यक्तीबद्दल की ज्याने जीव वाचविला, पोलिसांचा ससेमिरा सहन केला, आप्तेष्टांची बोलणी खाल्ली...इ. ? त्या व्यक्तीसाठी केवळ 'आभारी आहे काका आम्ही तुमचे...' एवढे चिमुकले वाक्य न वापरण्याजोगी त्यांची मानसिकता बथ्थड झाली असेल ?
तुमच्या प्रतिक्रियेवरून स्पष्टच आहे की तुम्हाला चांगला अनुभव आला. जर त्या जबरी जखमी झालेल्यानेही घरी गेल्यावर तुमची याद ठेवली असेल तर तो अनुभव मग द्विगुणित मानेन मी.
वर डॉक्टर म्हणतात तसे अनुभव व्यक्तीसापेक्षच असतात, पण दुर्दैवाने आम्हाला आलेले अनुभव हे डाव्या हाताचेच आहेत याचेच वैषम्य वाटते.
डॉ अहिरराव आपल्याला राग येईल
डॉ अहिरराव
आपल्याला राग येईल कदाचित...
आपल्या मुद्द्यांशी मी असहमत आहे असं नाही. आपले मुद्दे चुकीचे आहेत असंही नाही. पण जसं क्रोकरीच्या दुकानात जाऊन आपण पुस्तकं मागत नाही तसच कुठले मुद्दे कुठे चर्चेला घ्यावेत याचं एक लॉजिक असतं असं मला वाटतं.
स्वतंत्र भारताचे दोन भाग पडतात एक बाबरी मशीद पडण्याअगोदरचा आणि दुसरा बाबरी मशीद पडल्यानंतरचा. आता बाबरी मशीद पडण्याचा आणि विषयाचा काय संबंध आहे ? तर काहीच नाही. पण त्या कालखंडात असे कित्येक बदल झाले किंवा बदलांची नांदी होऊ घातली कि या क्रांतीसाठी हीच विभागणी योग्य ठरते.
बाबरी मशीद पडत असतानाच काँग्रेस सरकारने एलपीजीचं धोरण स्विकारलं. नंतर आलेल्या भाजपाने ते गतिमान केलं. ज्या विदेशी मेडियाच्या आक्रमणाला भाजपा आणि संघ परिवार संस्कृतीवरचं आक्रमण असं म्हणत होता त्याच भाजपाच्या राज्यात वाहिनीसंस्कृती आणखीच बोकाळली. वास्तविक तिला आळा घालणं अपेक्षित होतं. नाही म्हणायला न्यूडिटी कमी झाली.
या बदलानंतरची पिढी आत्ममग्न निघाली. पूर्वीच्या कालखंडात असलेला भाबडेपणा, सामाजिक जाणीव, उत्तरदायित्व, संवेदनशीलता असे गुण लुप्त झाले. आहे रे आणि नाही रे ही दोन वेगवेगळी राष्ट्रं निर्माण झाली. या राष्ट्रांमधेही धर्म, जातवार विभागणी होऊन अनेक राष्ट्र निर्माण झाली.
मग या राष्ट्रांकडून बंड होऊ नये म्हणून त्यांना एका छत्राखाली आणण्याचे जे काही उद्योग सुरू झाले त्यांचं विश्लेषण एकदा झालं पाहीजे. एकत्र तर आणायचं पण ध्येयं आणि उद्दिष्टं आहे रे वर्गाची. त्यासाठी चित्रविचित्र मांडणी होऊ लागली. बाबरी मशीद पाडूनही नाही रे वर्गाचं जसं भलं झालं नाही तसचं त्यांना घरी बसवून आम आदमीच्या हाताला निवडून देऊनही भलं झालं नाही.
नाही रे वर्गाचा आवाज ऐकायची सध्या कुणाची मनःस्थिती नाही. तशी कुणाची इच्छा नाही म्हणण्यापेक्षा त्यांच्या आवाजाला व्यासपीठच नाही. त्यामुळे त्यांना हे राष्ट्र प्रजासत्ताक वाटणे शक्यच नाही. पण संवेदनशीलता हरवल्याने हा आवाज काहींना चक्क विनोदी वाटू शकतो. त्यांच्यापुछे ज्वलंत प्रश्न बरेच आहेत. भ्रष्टाचार, धर्म, दहशतवाद इ. इ.. अर्थात या प्रश्नांचा चटका बसावा अशा स्थितीत नाही रे राष्ट्र नाहीच !
सर्वात महत्वाचं म्हणजे या वर्गासाठी राबवली जाणारी कल्याणकारी अर्थव्यवस्था आता रावबिणे शक्य होणार नाही. कारण एलपीजी धोरणामुळे आता ते शक्य नाही. जागतिकीकरणाचा रेटा वगैरे काही नसून त्यातून मिळणारे घबाड इतकं प्रचंड आहे कि लाभार्थी त्यात मश्गुल आहेत. पुढच्या चौदा पिढ्या बसून खातील इतकं कमावणं चालू आहे. यात सगळेच सामील आहेत. प्रादेशिक नेते, बहुजन नेते, अगडे नेते, पिछडे नेते, हिरवे नेते, भगवे नेते, लाल नेते सगळेच.
नाही रे वर्गाचे नेतेच त्यांना फसवत असल्यावर भविष्य अधिकच अंधःकारमय आहे. एकाच देशात अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या राष्ट्रात कसलाही संवाद नसणे, वर्षानुवर्षे प्रश्न न सुटल्याने खदखदत असलेला असंतोष आणि प्रश्नांचं भांडवल करून त्याला भावनिक इश्युचं स्वरूप सर्वच राजकारण्यांनी देणे आणि महत्वाचं म्हणजे संबंधितांनी त्या त्या लाटेवर स्वार होऊन स्वतःचं अधिक नुकसान करून घेणे हे माझ्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न आहेत. या राष्ट्राला वास्तवाचे भान नाही ते आणून देण्यासाठी बुद्धीजीवींनी तिथे जाऊन आपली बुद्धी खर्ची केली पाहीजे. त्याइअवजी ज्यांना या प्रश्नांशी घेणेदेणे नाही तिथे हे प्रश्न मांडून वादविवाद घडवून आणण्याने ( अनेक कळफलक ऑफीसच्या वेळेत बडवण्याचे कार्य घडवून ) नेमका काय फायदा होतो हे मला समजत नाही.
थोडक्यात नाही रे वर्गापुढे फरफटत जाणे हा एकमेव पर्याय उरलेला आहे. आणि ते मान्य नसल्यस मनगटात दम असेल तर दिल्लीचं तख्त इजिप्त, ट्युनिशिया, लीबिया, बहारीन, येमेन, प. आशिया आदि देशांप्रमाणे उठाव घडवून आणून काबीज करणे हा एक मार्ग आहे. अर्थात अशा संभाव्य आंदोलनातली धार अण्णा बाबांच्या विनोदी चाळ्यांनी कमी झाली आहे हे ही लक्षात घ्यायला हवं.
- किरण
( एलपीजी - लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन )
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/25164
@किरण्यके, प्रत्येकाचं लॉजिक
@किरण्यके, प्रत्येकाचं लॉजिक आणि चष्मा वेगळा असतो.आता माझ्या मते स्वतंत्र भारताचे अनेक विभाग कालखंडानुसार पडतात
१)नेहरूंच्या काळापासून शास्त्रीजींपर्यंत
२)इंदिरा गांधी ते १९७७ आणीबाणी वगैरे
३)मधील दोन वर्षांचा कालखंड(जनता सरकार)
४)पुन्हा इंदिरा ते राजीव गांधी
५)व्हीपी सिंग ते गुजराल,
६)अटलबिहारी ते अटलबिहारी
७)मनमोहन ते आजपर्यंत
आता ह्या विषयावर स्वतंत्रपणे माझे लिखाण सुरु आहे,त्यामुळे मी आता त्याबद्दल काहीही बोलू इच्छित नाही.बाकी जे विषय आपण मांडले आहेत,त्यात नवीन काहीच नाही.त्यावर कधीपासूनच आम्ही एफबी वर काम करतोच आहोत त्यामुळे त्यात माझ्यासाठी काही नवीन विशेष नाही.आपल्या बोलण्याचा विषय सध्या लॉजिक नाही.त्यामुळे त्यावर चर्चा करण्यात काय लॉजिक आहे?
त्यामुळे त्यावर चर्चा करण्यात
त्यामुळे त्यावर चर्चा करण्यात काय लॉजिक आहे?
अंग अश्शी... आत्ता कसं !!
आपल्या बोलण्याचा विषय सध्या लॉजिक नाही
हे वाक्य मनास भिडले. मज गहिवरून आले. असा प्रांजळपणा हल्ली कोठें पहावयास मिळतो हों ?
अहिरराव साहेब तुम्हि फारच
अहिरराव साहेब तुम्हि फारच sincerely घेताय comments. एवढे सरळपणे लिहु नका. जेवढ्या लवकर (शालजोडे आणी जोडे) द्यायला शिकाल तेवढे जास्त enjoy कराल इथे. दुसर्याची काढणे हाच एक उद्योग असतो इथे माबोवर लोकांचा. तुम्हि त्याला बळी पडत आहात (या आणी तुमच्या इतर बीबीवर)
@चाणक्य,आपल्या
@चाणक्य,आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.
लेख आवडला.मला पुन्हा नमुद
लेख आवडला.मला पुन्हा नमुद करावेसे वाटते आपली निवडणूक पद्धत चुकीची आहे.आजकाल नगरसेवकापासून खासदार कींवा मंत्रीपदापर्यंत सर्व विकत मिळतात.कारण ठराविक लोक रक्कम घेऊन मतदान करतात, काही लोक प्रामाणिकपणे मतदान करतात तर बहुतःशी लोक मतदान करतच नाहीत. सहाजिक मतांची टक्केवारी कमी म्हणून त्रिशंकू अवस्था .. आणी मग ......आपण सर्व जाणताच.
@vikastrimurti, matdan
@vikastrimurti, matdan saktiche karayala have. tyasathi sarkarne matdaranna matdanbhatta mhanun kahi 100-200 rupaye suddha dyayala kay harkat aahe. jenekarun matdan 80 takkyanchya var zale pahije. aani negative voting va umedwarala maghari parat bolavanyachahi adhikar matdaranna asayala hava.yamule je nalayak umedwar gundgiri,jat,dharm aani paishyachya jorawar nivadun yetat, te honar nahi.
श्री अहीरराव, आपण भारतातील
श्री अहीरराव, आपण भारतातील सद्य स्थिती बदलण्यासाठी काय पावले उचलत आहात कींवा उचलण्याचा विचार करत आहात, हे कळेल का?
मतदान सक्तीचं... ४०%
मतदान सक्तीचं...
४०% लोकांनी मतदान केलं आणि शंभर टक्के लोकांनी मतदान केलं तर फरक पडेल ? उरलेले साठ टक्के लोक हे आधीच्या ४०% लोकांपेक्षा वेगळ्या आणि लायक उमेदवाराला(च) मत देतील असा निष्कर्ष कुणी आणि कसा काढलाय हे समजू शकेल का ?
@ mi ami, mi janjagruti
@ mi ami, mi janjagruti karnyacha praytn kartoy. community sites chya madhyamatun. aapan fb var asal tar aswasth bharat ya aamchya groupla join vha.
@anil sonawane , samaja eka
@anil sonawane , samaja eka kirkol nivadnukit 2 umedwar ubhe aahet aani matdar donch aahet mhanje umedwar dharun char mate! aata ithe 2 shakyta aahet eka umedwarala 1 viruddha 3 ne parabhav patkrava lagel kinwa doghannahi sarakhi mate padtil. pan ithech jar don umedwar aani 1000 matdar asale tar chitra kahi vegale asu shakte. matr ha prayog karun pahilyashivay tyache parinam samjnar nahit. pan te nakkich sakaratmak asatil ashi mala aasha watate.
कस आहे ना एखादी वस्तू फुकट
कस आहे ना एखादी वस्तू फुकट मिळाली कि त्याची किमत राहत नाही हे तर सर्वाना माहित असेल.
कदाचीत स्वतन्त्र ही असेच फुकट मिळाल आहे तुमच्या आणि आमच्या पिढीला.
Pages